HIS W I F E


प्रेम असेलच खर तर ते निभवाव लागत. नुस्त प्रेम करून दाखवणारे बरेच आहेत आणि असतील. पण निभावणारे बरेच कमी आहेत. असच होतो आपण दोघ. प्रेम करणारे ते निभवणारे. कशी ओळख झाली आपली अगदी सहज. आणि ओळखीच प्रेम झाल अगदी ठरवल्यासारख. तू आणि मी खूप स्वप्न बघायचो. जास्त भेटता यायचं नाही आपल्याला, पण जेव्हा पण भेटायचो खूप काही ठरवायचो. पुढच्या भेटीपर्यंत त्यातली एक हि गोष्ट घडलेली नसायची पण तरी त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुढच्या भेटीत नवीन विषय, स्वप्न ठरवून खुश होऊन जायचो. नव्या भेटीला मागच्या भेटीची आठवण काढून आपल प्रेम अजून टिकलय हे जाणून घेऊन उगीच खुश व्हायचो. प्रत्येक भेटीत छोटी छोटी भेट वस्तूपण आकाशाहून मोठी वाटायची. भले ती वस्तू तुझ्या गाडीच्या डीगीत बसणारी असली आणि माझ्या खिशात मावत असली तरी ती खूप मोठी होती तुझ्या-माझ्यासाठी. माझ्या प्रत्येक वाक्यांना तू खर आणि खरच मानायचीस. उद्या बाहेरचा येऊन तुला माझ्याबद्दल कुणी काय सांगितल असत तरी तू सगळ जग खोट ठरवून मला खर सिध्द केल असतस. इतका तुझा माझ्यावर विश्वास आणि त्याहून जास्त माझ तुझ्यावरच प्रेम. यात कधी वर्ष गेल कळाल नाही. किती बोलायचो आपण एकमेकांशी. आणि शेवटी मग एक विषय कायम एक दोन दिवसातून तुझ्या ओठांवर यायचा कि, “आपण लग्न कधी करायचं ?”

मी तुझी समजूत काढायचो. पण तू ऐकायची नाहीस. मला तुझ्याशी लग्न करून तुला घरी आणून सुखात ठेवायचं होत. आणि तुला माझ्यासोबत आहे त्या परिस्थितीत राहायचं होत. पण मी खूप समजावलं कि तू समजून घ्यायचीस. आणि मग आय लव्ह यु म्हणून लाडात यायचीस. अस वाटायचं तिथ येऊन तुला जवळ घ्याव. लग्न सोप्प होत करन. पण समाजाला ते मान्य झाल नसत. कारण तुझ्या लग्नाला नुकतेच सहा वर्ष पूर्ण झालेले. तू तुझ्या नवरऱ्यावर फार प्रेम करत होतीस. मग तरी तू माझ्या प्रेमात पडली यात तुझ प्रेम कमकुवत होत अस नाही. पण नवरा जगासाठी हा फक्त असतो. पण घरात त्रास देणारा, छळ करणारा, मनाविरुध्द सेक्स करणारा, मारहाण करणारा, बंधन घालणारा नवरा कुणाला माहित असतो ? त्याच्यात ज्या गोष्टी तू सहा वर्षे शोधत होतीस त्या आणि त्याहून जास्त चुकून तुला माझ्यात जाणवल्या आणि तुझ मन माझ्यावर बसल. त्यामुळे तुझी चुकी किंवा आपल प्रेम वाईट आहे अस मी तरी कधीच म्हणणार नाही.

आपण भेटलो होत मागच्या रविवारी मध्ये पंचवीस दिवस आपल्याला पावसामुळे भेटता आल नव्हत. पण भेटलो आपण. दोघांच्यात बरच बोलन झाल, मग तू लग्नाचा विषय काढला आणि मी पुन्हा तुला समजावलं. समजावण एकमेकांच्या मिठीतून बेडवर जाऊन पोचलं. तुझ्या डोळ्यात पाणी आणि माझ्या हृदयाची मंद धडधड यात मी तुला होकार दिला. पण करायचं काय ? कधी आणि कस या प्रश्नानंतर तू माझ्यावरून बाजूला झालीस. पर्समधून एक पाकीट काढल. मी तुझ्याकडे बघत होतो. तू माझ्या जवळ बसलीस. मी तुझा हात धरला आणि तू माझ्या हातात मंगळसूत्र ठेवलस. या आधी लग्न झाल्यावर तू फक्त वर्षभर मंगळसूत्र घातलेलंस पण नंतर नवऱ्याच्या त्रासाने तू ते घालण सोडून दिलेलंस. आणि त्याचा तुझ्या नवऱ्याला काहीच फरक पडला नाही. आणि तुझी हि ती सवय मोडलेली. पण तू माझ्या हातून माझ्या नावाने ते मंगळसूत्र घालून घेतलस. सिंदूर स्टिक मिळते आजकाल, तसली तू माझ्या हातात दिलीस आणि म्हणालीस, “लाव”. मी तुला सिंदूर हि लावल. काय चाललेल आणि काय करतोय मी सगळ न कळण्यासारख होत. तुझे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले. “मी मरेन तेव्हाच हे मंगळसूत्र काढेन. माझ्यासाठी आता तूच माझा नवरा” मी तुझे डोळे पुसण्या ऐवजी माझे पुसले. आणि तू मला मिठीत ओढलंस.

त्या भेटीनंतर आज आठवडा झाला पण तुझा माझा संपर्क झाला नाही. नवरा आणि तुझ काय अस झाल कळायला मार्ग नाही पण मी तुला खूप मिस करतोय.

तुम्हाला काय वाटत अस नात खर असू शकत ? तुम्ही तुम्हाला या पात्रात ठेवून बघा आणि सांगा....  


copyrighted@2020

0 टिप्पण्या