Dear Husbund

 


तुला शोधत असताना वाटेत कित्येक लोक मला सापडले. त्या प्रत्येकाशी ओळख करताना मी तुझ्यासाठी अनोळखी होत होते. समजत होत मला पण तू मिळत हि नव्हता लवकर. या वाटेतल्या गर्दीत कित्येक चेहरे भेटत गेले. ज्यांना मी त्यांच्या वागण्यावरून माझ्या जवळ-लांब करत गेले. कुणाशी ओळख कुणाशी मैत्री कुणाशी कोणतही कौटुंबिक नात बनवल असल तरी प्रेमाच नात तुझ्यासाठी कुणाशी हि जोडलं नाही. माझे दिवस-दिवस या अशा लोकांसोबत घालवताना मी त्यांचे कित्येक तास घेतले. माझे कित्येक दिवस त्यांना दिले. पण तू मला तुझ आयुष्यच देशील या हिशोबाने मी माझे हे वेळ देत राहिले. विचार येत असतात मनात. त्यावर माझा ताबा नाही. पण त्या विचारांना चार चौघात मांडताना कायम मीच खरी असते अस होत नाही. पण मी व्यक्त असते. मी व्यक्त राहते. कारण मला एक माहित आहे मी तुझ्यापुढे हि असे माझे काही विचार व्यक्त करेन तेव्हा तू माझ्या विचारांवर शंका घेणार नाहीस. उलट मला साथ देशील. माझ्या विचारांवर विचार करशील. आणि म्हणून मी व्यक्त राहण्याची सवय ठेवतेय.

मला आयत खायला आवडत पण तरीही बरेच पदार्थ मी बनवायला शिकले. मला माहित आहे मला जस आयात खायला आवडत तस तुला हि आवडत असणार आणि तेव्हा तुझा हिरमोड नको व्हायला म्हणून मी शिकून घेतल. मला दिवसरात्र बाहेर फिरायची सवय आहे. आणि आवड हि आहे पण उद्या आपल लग्न झाल तर घरच कोण बघणार ? म्हणून मी हल्ली बाहेर कमी आणि घरी जास्त असते. खूप बदल करून घेतला मी माझ्यात. खूप बदल करायचा आहे माझा माझ्यात. तुला ज्यामुळे त्रास होईल ते सगळ बदलायच होत मला. सगळे हे बदल माझ्या आयुष्यात कधी घडतील मला वाटल नव्हत. पण झाले. हे झालेलेल बदल घेऊन जेव्हा मी आरशासमोर उभी राहते, मी माझी मला ओळखू येत नाही. पण मला खात्री आहे कि तू जेव्हा मला भेटशील तू माझ्यातले हे बदल ओळखशील. आणि म्हणून मी निश्चिंत आहे. आता हि झाली आजची गोष्ट. उद्या आपण भेटणार आहे. आईला आणि बाबांना तू पसंत पडला आहेस. मला हि तू आवडला आहेस. तुलाही मी आवडेन बहुदा. पण उद्याची भेट आपली खास आहे. उद्या आपली भेट झाली कि पुढच्या महिन्यात आपल लग्न होईल. माझ्यातले हे बदल कायमस्वरूपी होऊन जातील. आजचे बदल नंतर कधी सवय झालेली असेल. पण होणाऱ्या माझ्या नवऱ्या मला एक सांग, “तू घेऊ शकतोस का माझ्यासाठी तूझ्यात काही बदल करून”. 

copyrighted@2020  

0 टिप्पण्या