सेर-वाजीछ.शिवाजी महाराज यांना नव्याने समजून घेताना काही पैलू, काही गुणवैशिष्ठ आपल्या समोर येतात. इतिहास म्हंटल कि त्यात एक राजा, त्याची प्रजा आणि त्या राजाशी लढणारा आणखी एक दुसरा राजा अर्थातच खलनायक हा असतोच. मग त्या खलनायकाला लिहिताना जमेल तितक भल-बुर लिहिणारे लेखक, आणि इतिहासकार असतात. आणि राजाला म्हणजे नायकाला लिहिताना त्याचे बहुरूपी पैलू, त्याचे विशेष गुण अगदी उदाहरणासकट लिहितात. प्रत्येक विषयाला एक सीमा आहे. तसच लिखाणाच हि आहेच, ती तिथपर्यंतच आपण लिहू शकतो जिथपर्यंत तिला आपण वाचू शकतो.
शिवाजी महाराज म्हंटल कि राजा नाही देव येतो आपल्या मनात. कारण त्यांच्याबद्दल असलेला आदर हा देवा समान आहे. आणि असलाच पाहिजे. महाराजांनी आपल्या आयुष्यात जश्या एक-से-एक कल्पना लढवून गनिमी कावा खेळला. तशाच काही चुका हि केल्याच असतील. आणि माणूस म्हंटल कि चूक आलीच. चूक झाल्याविना त्या व्यक्तीस माणूस म्हणन तस गैरच. आणि म्हणून मला पडलेला एक ओझरता प्रश्न आणि त्यात सापडलेली महाराजांची चूक. काही ताळमेळ दिसत नाही मला तरी.
ज्या राजाने रणनीतीत एक एक पाउल विचार करून टाकल. मग अगदी ते स्वराज्य स्थापना असो किंवा कोणतीहि मोहीम. पण त्यात अपयश क्वचितच आलय त्यांना. कित्येक धोके आजूबाजूला असून हि फक्त आपल्या सोबतींवर असलेल्या विश्वासावर तरून निघालेले महाराज गाफील कधीच नव्हते. जेव्हा जेव्हा त्यांना मारण्याचा कट रचला त्यात हिरीरीने भाग घेतेलेल एकतर ब्राम्हण ( आजचे नाही. गैरसमज करून घेऊ नये ) आणि मराठा हेच होते. क्वचित कधी खालच्या जातीचा कोण मावळा किंवा सरदार असेल. ज्या भावक्या जपल्या महाराजांनी त्या भावक्यांनीच राजांना मारण्यासाठी किती काय कट केलेत. अजून इतिहासाला माहित हि नाहीत. जशी युक्ती येते पण ती लिहिली तरच ती नंतर हाती लागते काही वर्षांनी. पण ती युक्ती जर मनातच मारून टाकली तर ? अशाच काही युक्त्या काळाबरोबर मरून गेल्या आहेत. ज्याचा थांगपत्ता कुणाला लागला नाही आणि कुणाला त्याचा पुरावा सापडलाहि नाही. ज्या राजाला कुठल्याही राजधानी किल्ल्यावर बसून संपूर्ण महाराष्ट्राची बातमी मिळत होती. उघड बातमी, ठळक बातमी, आणि शत्रू सैन्याची गुप्त बातमी. आणि अशा या महान राजाला एवढ सुद्धा कळाल नाही ? कि दोन-तीन वेळा आपल्यावर विष प्रयोग झालाय आणि पुन्हा हीच चाल आपल्यावर चढली जाईल.
मृत्युच्या आधी बारा दिवस अंथरुणाला खिळलेले महाराज खात काहीच नव्हते. करत होते फक्त रक्ताच्या उलट्या. काय आहे हे ? अर्थातच विष प्रयोग. कारण या आधी हि त्यांना आला होताच न अनुभव. तरीही आजारी आहे असा बहाणा करत ते फक्त सोसत राहिले.
बर पुढे मृत्यू दिसत असताना संभाजी राजेंना गादीवर बसवावं हा हट्ट किंवा हि शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त का केली नाही ? बर केली नाहीतर मग ते पहिल्यांदा जसे विषप्रयोगातून वाचले तसे या वेळेस हि वाचतील अस वाटल असेल का त्यांना ? आणि ज्या अर्थी ते विषप्रयोगाच्या नंतर बारा दिवस जगले याचा अर्थ ते विष त्यांना एका दमात दिलेलं नसेल. रोज थोडी थोडी मात्रा त्यांना दिली असेल. दिली असेल ठीक आहे पण मग राजांनी दोन तीन दिवसातच आपल्या जवळच्या लोकांना शोधायला का सांगितल नाही या गुन्हेगारांना ? किंवा जर महाराज अगदीच खिळून असतील, निपचित असतील तर महाराजांना आपल जग मानणारे सहकारी, त्यांनी का शोधले नाहीत हे गुन्हेगार ? का तेच स्वतः गुन्हेगार होते याचा अर्थ काही मला कळत नाही.
वाघाच्या मिशीचे बारीक तुकडे करून ते जेवणात टाकले तर ते आत आतड्यांना चीटकतात आणि मग जे काही आपण खाऊ त्याला ते पुन्हा बाहेर फेकतात. मग ते जेवण असो वा पाणी. आणि पोटात अन्न पाणी न राहिल्याने येणारा थकवा आणि त्या मिशीचे वाढत जाणारे विष माणसाला मारून टाकायला पुरेस आहे. असहि तेव्हा वाघ वैगरे जंगली प्राणी सामन्य होते. दुर्मिळ नव्हते. शिकारी हि काही कमी नव्हते. मग असा प्रयोग केला असेल का राजेंवर ?
बर महाराजांना आपला मृत्यू समोर दिसला असेल तर मग त्यांनी कोणतेच आदेश का दिले नाहीत ? आणि आपण वाचणारच आहोत या वेळी सुद्धा अस जर राजेंना वाटल असेल तर मग त्यांनी गुन्हेगार शोधायला आदेश का दिला नाही. काहीच कळत नाही मला.
अस निपचित राहून मौन पाळून नकळत का होईना महाराजांनी संभाजी राजेंना मारून टाकायला आयती संधी मिळवून दिली गुन्हेगारांना.
तरी मला वाटत कायम कि महाराजांनी हि चूक केली कि जाण्याआधी कोणतेच आदेश , फर्मान काढले नाहीत. ज्या आदेशाला मानून रयत सुरळीतपणे जगेल महाराजांमागे. पण अस काही घडल नाही. मान्य आहे आदेश, फर्मान काढायला-द्यायला राजेंना शुद्ध नव्हती किंवा असेल तरी बोलायची ताकद नसेल. पण नुसत्या त्यांच्या एका नजरेवरून त्यांचे सहकारी अख्ख मन ओळखायचे महाराजांचं त्यांना इतकीशी गोष्ट समजली नसेल का ?
माझा हा तर्क आहे अभ्यास नाही. पण पडलेला प्रश्न चुकीचा हि नाही.....
आपली छोटीशी आर्थिक मदत कुणाला तरी खूप मोठा आधार देऊ शकते. 

2 टिप्पण्या

  1. खरंच प्रश्न चुकीचा नाही. तार्किक आणि अगदी सोप्या भाषेतला लेख विचार कराल भाग पाडतो. आजपर्यंत महाराजांच्या विविध पराक्रमांबद्दल लिहिलेले असंख्य लेख वाचले, ज्यांच्यातून प्रेरणा मिळाली आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान आणखीच दुणावला. पण हा असा एकमेव लेख जो पहिल्यांदाच वाचला आणि खरंच या लेखाने विचार करायला भाग पाडलं. त्यावेळी नक्की काय झालं असेल कुणालाच माहित नाही. आपण जे वाचतो, ऐकतो ते इतिहासकारांनी सांगितलेलं आहे. कदाचित महाराजांच्या मृत्यूची घटना यापेक्षा वेगळीही असेल. आपण फक्त त्यांच्यातले चांगले गुण वेचायचे आणि आत्मसात करायचे जेणेकरून महाराज आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतरी विचारांच्या माध्यमातून सदैव राहतील आणि आपण एक चांगले राष्ट्र निर्माण करण्याच्या कामी येऊ.

    उत्तर द्याहटवा