इतिहास


 त्यांचे नदीवरचे घोडे आमच्या समुद्रावर काय येतील. विचार जरी झाला तरी हकीकत आणि कल्पना सारखी नसते. मनातल्या कल्पनेत हर कुणी जिंकू शकतो पण कल्पनेत ही हरणारे प्रत्यक्षात कितीही लवाजमा घेऊन इथल्या प्रदेशात उतरले तरी आम्ही त्यांना थोडीच इथे जिंकून देऊ ? आम्ही देऊ शकतो आसरा, आदर आणि सल्ला बाकी विजय आमचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि ते प्रयत्न फक्त आमच्यासाठी राखीव असतील. पाण्यातून जमिनीवर आणि जमिनीवरुन पाण्यात असा प्रवास करणारे काय इथे कायमचे राहतील ? त्यांची असतील लक्ष स्वप्ने. पण ती त्यांना पुरी होण्यासाठी आम्ही हार पत्करावी यासाठी आम्ही त्यांचे शत्रू नव्हे तर पालक होणे भाग पडेल. आपल्या पाल्याचे स्वप्न पुरे होऊ देण्यासाठी वाटेतील सारे मार्ग खुले करणारे नि स्वतः आपल्या इच्छा मारून टाकणारे पालकच असतात. आणी हे परकीय माझे फक्त शत्रू आहेत.इतिहास लिहिला जाईल आजचा मग उद्या जेव्हा, एकमेकांविरोधी ची लढाई अर्थातच लिहिली जाईल. कुणाची हार कुणाची जित लिहिताना कुणाला किती कणव दाखवली जाईल हे भविष्यालाच माहीत. आमचे रागे कणव मागत नाहीत. ते मिळणार ही नाही पण म्हणून इतिहास चुकीचा झाला तर तो कधी खरा च असेल असे नाही. आमचे वडील ह्या सत्तेला निर्माण करू शकले हे तेव्हा कुणास जमले नाही नि आत्ता ही कुणाचे ते काम नाही. मृशबल (भोसले) घराणे बडे पराक्रमी आणि त्यांचे हातून हे स्वराज्य निर्माण झाले त्यात गैर कुणी आयता हिस्सा ओढत असता तो हिस्सा त्यास मिळेल हे शक्य नाही. भले भले बहाद्दर इथे जीव सोडून गेले, कित्येकदा यमास इथे हेलपाटे मारावे लागले. तरी पराक्रमी सैन्यांना आपले जीव द्यावे लागलेच नि त्यावर उभारले हे स्वराज्य. हेच स्वराज्य उद्या अभ्यासले जाईल.पण कुणास कळतील का वेदना प्रत्येक पराक्रमी लोकाची. कुणास कळेल का धडपड एका स्वराज्य निर्मितीची. कुणास कळेल का की जातीचे नाही मातीचे राजकारण झालेले. आणि कळलेच नाही कुणास तरी, हा काळ असाच जात जाईल. सारी युगे अंत पावतील आणि पुन्हा नव्याने युगे येतील. विसरलेला इतिहास पुन्हा, नव्याने होऊ लागेल. आणि पुन्हा येईल छत्रपती शिवाजी आणि पुन्हा इतिहास रचला जाईल..
-श्रीमंत श्री छत्रपती संभाजी राजे भोसले महाराज. (कल्पना)
आपली छोटीशी आर्थिक मदत कुणाला तरी खूप मोठा आधार देऊ शकते. 

Copyrighted@20200 टिप्पण्या