मी दुसरा

 

 ठरलेल्या प्रत्येक गोष्टीला मोडायचं ठरवलेलं आधीच तू. जे होणारच नाही ते करायची आवड तुझी आणि तुझी प्रत्येक आवड जपणारा मी. या आपल्या दोघांच्या दोन्ही गोष्टी लोकांना आता मी सांगितल्या तर लोक मला हसतात. तू कशी आहेस हे मला माहित असताना पण मी तुझ्यावर प्रेम केल. तुझ्यासाठी बरच काही केल. तुझ्या प्रत्येक हट्टाला पूर्ण केल. तुला हव ते आणून दिल. कशाला तर तू मला सोडून जाव म्हणून. तुझ्या माझ्यात कधी पुढचा- भविष्याचा विचार झाला तरी लग्नाबद्दल कधीच झालेला मला आठवत नाही. असो, तू लांब जाणार होतीस. तू लांब झालीस. तू माझ्याकडे येण्याआधी हि कुणाकडून तरी आलेलीस. हे मी विसरलो नव्हतो. पण तुला माझी गरज होती. म्हणून मी ते सगळ विसरत होतो कायमच. नंतर तू आणि मी इतके जवळ आलो कि, बऱ्याच तुझ्या त्या सगळ्या गोष्टी मी विसरलो. आणि मग त्यात मी हे हि विसरून गेलो कि, तू मला हि सोडून जाणारेस तिसऱ्याकडे. कायमची. आणि या विसरलेल्या विचारात मी तुझ्यावर खर प्रेम करून बसलो. कायमच.

जेव्हा तुला गरज वाटली मी होतो. तुझी गरज संपली तर तू नव्हती पण मी होतो. आणि आहेच. तू आता कुणाच्या मिठीत असशील. त्याचा परफ्युम तुला आवडत असेल. तुला किशोर कुमारची गाणी आवडतात म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये आता किशोर कुमारच्या गाण्याची प्ले-लिस्ट असेल. लागेल तेवढ पेट्रोल भरून ठेवणारा तो, आता किमान अर्धी टाकी तरी भरून ठेवतच असेल. गुरुवारी तुला सुट्टी असते म्हणून तो हि गुरुवारी सुट्टी काढत असेल. पगार कट झाला तरी त्याला त्याच काय ? आणि तुझ त्याच्यावर खूप खूप प्रेम असेल. आणि त्याच हि तुझ्यावर. आणि आणखी काय बोलू ?

एवढ सगळ असताना तुमच्यात ‘ते’ हि सगळ होत असणार. मला हि आठवत आपल्यातल ते सगळ. पण फक्त आठवत, आणि मग आठवतेस तू. पण.......

copyrighted@20200 टिप्पण्या