प्रिय,
माझी प्रत्येक प्रियसी आणि प्रियकर,
प्रेम हि एक कल्पना आहे. एका स्त्रीला प्रेम करायला पुरुष लागतो आणि मी शोधला माझ्याच काकाचा मुलगा. तो एकदा घरी आला. त्याला बघून त्याच्या मिठीत जायचा विचार मनात आला आणि प्रेम झाल. त्याच्यासोबत साखरपुडा आईने लावून दिला पण पुढे काय आमच जमल नाही. प्रेमात समजूतदारपणा हवा. विश्वास हवा. मुळात प्रेम हव अस प्रेम करून बसलेले म्हणत असतात. पण एकाच व्यक्तीसोबत तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आयुष्यभर करताना कंटाळा का येत नाही माणसाला ? आयुष्यभर नव्याच्या शोधात असणारा माणूस प्रेम मात्र एकावरच करत राहतो. जगताना कांटाळतो पण त्याच व्यक्तीवर प्रेम करताना आलेला कंटाळा लपवणारा खोटा माणूस भारतात तर जास्त दिसले मला. बाहेरच्या देशात सगळ्या बाजूने स्वातंत्र्य आहे. कित्येक मुलांची चित्र काढताना त्यांच्या शर्टांना काढून माझ्यातल्या अमाप प्रेमाला त्या प्रत्येकाला मी दिलय. मी काल्पनिक प्रेम दिल तर बदल्यात मला काल्पनिक काहीतरी मिळाव अस मला वाटायचं. पण ऐकायला यायचं ‘मी तुझ्यासोबत कायम राहीन. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करीन. मी तुला फसवणार नाही’. माणूस जे करू शकतो त्याचीच फक्त वचन तो दुसऱ्याला देऊ शकतो. जे करू शकत नाही ते बोलायची हिंमत पण साधी कुणी करत नाही. आणि माझ्या डोक्यातला एक विषय कायमचा निघून गेला कि, एका स्त्रीला प्रेम करायला पुरुषच लागतो. माझ्या खोलीच्या शेजारी राहणारी माझ्या खोलीत आली.
खोलीत असलेली माझी न्यूड चित्र बघून ती कित्येक वेळ माझ्याकडे बघत होती. त्या नंतर ती रोज माझ्यासोबत राहायला लागली. आणि चित्रातल्या सगळ्या मापांना तीने माझ्या शरीरावर मोजल आणि तिने माझ कौतुक केल. जे आणि जस माझ्या शरीरावर होत. जसच्या तस मी त्या चित्रात उतरवलेल. नंतर ते चित्र कॉलेजमध्ये सापडल आणि मला तिथून निघून जाव लागल. पुरुषाच्या प्रेमाची वेळ हि ठराविक असते. बेडवर जायच्या आधल्या दिवशी. आणि बेडवरून उठेपर्यंतच. नंतर जो कुणी प्रेम करत असेल मला नाही वाटत असा कुणी जगात वावरत असेल. मग कित्येक पुरुष माझ्या आयुष्यात येऊन गेले. मी प्रेम प्रत्येकावर सारख केल. कुणाला कमी मिळाल असेल अस शक्यच नाही. तीन वेगवेगळ्या वयातल्या मुलींच्या सोबत संबंध असताना पुन्हा पुरुषाच्या प्रेमाची गरज वाटली आणि नेमक तेव्हाच अली खान सोबत माझ लग्न ठरल. त्याच्यापासून मी गरोदर राहिले. आणि मला अजून प्रेम करायचं होत. खूप जास्त. आणि म्हणून मी पोटातल मुल पाडायचा विचार केला. आणि मुल पाडल. पण त्या बाळाच्या बद-दुव्याने मला पोटाच्या पिशवीचा आजार झाला. मी आत्ता बेडवर झोपून आहे. सगळी औषध थकलीयत मला उभारी देण्याचा प्रयत्न करून. मला हि नाही आता जगू वाटत. आयुष्य कशाला जगायचं असत प्रेम करायला ना फक्त ? मी मग खुश आहे. मी खूप प्रेम करून बसलेय. ज्या काळात एक प्रेम करण म्हणजे मोठा गुन्हा होता असे मी खूप गुन्हे केलेत. आणि त्याच्या शिक्षेला भोगायला मी तयार आहे. आयुष्य जगायचा कंटाळा आला कि रटाळ एक बरा न होणारा रोग प्रत्येकाच्या मागे लागतो आणि माणूस मरून जातो. सोबत त्याच्यावर प्रेम करणारी व्यक्ती कधीच मरत नाही. मग सुरुवातीला सोबत रहायची वचन माणूस का एकमेकांना देऊन फसवत असतो ? अर्धवट आहे हे आयुष्य. अशा या आयुष्यात प्रेम मिळवून फुल(फिल) होण्यापेक्षा (बेटर) हाफ असण्यात सुख आहे. आणि मी सुखी आहे.
तुमचीच अमृता.
0 Comments