People you may know
तू आणि मी आपण दोघे शांत बसलेलो. नेहमी एकमेकांना चिटकून बसायचो पण आज दोघांत अंतर होत. नेहमी दोघांना बोलायला विषय इतके असायचे पण वेळ पुरायचा नाही आणि आता वेळ असून विषय नव्हते. समोर मोकळं रान होत. एका कट्ट्यावर आपण बसलेलो. मागे ही बरीच उंच झाड होती. आपल्या बाजूला माझी गाडी लावलेली मी. लांब एक कुत्रा झोपलेलं. कुठून तरी बारीक झऱ्याचा आवाज येत होता. कधी कधी होणार झाडांचा सळसळ आवाज. एकदम बारीक पाऊस अंगावर पडत होता. थोडस ऊन ही होत. बाकी काहीच नाही. मी तुझ्याकडे बघितलं. तू मलाच बघत होतीस. एका बाजूला केलेले केस आणि कोरडे ओठ बघून मी तुझ्या पुढे सरकलो. तू नजर दुसरीकडे फिरवलीस. मी तुझ्या शेजारी सरकून तुझा हात हातात पकडला. गरम होता. मी तुला हॉट आहेस म्हणायचो पण तू दिसायला ही हॉट होतीस आणि तुझं अंग ही हॉट लागायच. मी तसाच तुझा हात धरून माझ्या मांडीवर ठरवला. मग अजून जरासा जवळ सरकून तुझ्या खांद्यावर मी हात ठेवला. खांद्यावरून हात कानाखाली आणून गळ्याशी धरून  पुढे सरकत हाताने गाल धरून तुझा चेहरा माझ्याकडे वळवून तुझ्या ओठांना माझ्या ओठात धरलं. मग उजवा हात मागे केसात नेऊन डाव्या हाताने पूर्ण तुला जवळ ओढत तुझ्या ओठात हरवून होतो. पण तुझी साथ काहीच नव्हती. म्हणून मी डोळे उघडले. माझ्या डोळ्याला लागून तुझे डोळे होते. उघडे. मी मागे सरकलो. मगाशी तुझ्या डोळ्यात मी मला दिसत होतो पण आता तुझ्या डोळ्यासमोर माझे डोळे आणले तर मी गायब. ओल्या ओठांना हाताने पुसत, मी खाली बघितलं. माझ्या मांडीवरचा तुझा हात तू केव्हाच बाजूला केलेलास. तुझ्या ओठांना तू स्वतः पुसून नजर दुसरीकडे फिरवून गप्प बसलीस. पुढची पंधरा मिनिटं पुन्हा आपल्यात शांतता. जेव्हा तुझं माझ्याकडे लक्ष गेलं शेवटचं तू एकच वाक्य बोललीस, चल जाता. सोड मला घरी. मी उठून गाडी सुरू केली. तू मागे बसलीस. आपल्या दोघांत अंतर होत सीटवर. वाटेतून कित्येक गोष्टी, व्यक्ती मी हरवून चाललेलो. त्या वेळात तू मला तुझ्या व्हाट्सअप्प आणि फेसबुकवरून हरवून टाकलेलंस. घरी गेल्यावर मला ते समजलं.  तू सगळीकडे मला ब्लॉक केलेलंस. मी तुला घराच्या अलीकडे सोडलं. तू निघून गेली मी माझ्या घरी निघून गेलो. आपण एक होतो आता वेगळे. खर प्रेम झालं की माणूस खुश असतो. आणि खर प्रेम मिळालं तर स्वतः ला नशीबवान समजायला लागतो. पण मुळात खर प्रेम हे जास्त दिवस न जगणार असत. आणि खर प्रेम जगात कुणाला कधी मिळाल आहे? मिळालं असेल तर कुणाचं आयुष्यभर टिकलं आहे ? तिला कोण नव्हतं तेव्हा मी तिचा झालो. जेव्हा तिच्या आयुष्यात तिचा पहिला आला. तिला तीच खर प्रेम हवं होतं आणि म्हणून तिने माझ्याशी नात तोडलं. आणि माझं प्रेम मला हवं होतं तर तिने सरळ मला दुसरी शोधायला सांगितली. मी त्या नव्या शोधात आहे. त्रास कित्येक दिवस होतोय. अजून तरी कुणी मिळाली नाही मला. आशा सोडली होती मी की मिळेल मला प्रेम पुन्हा.
पण हे काय ? मगाशी झोपेतून उठून फेसबुकवर दुसऱ्यांच्या पोस्ट बघताना तुझा फोटो तुझं नाव दिसलं. बाजूला ऍड फ्रेंड अस आलेलं  आणि वर लिहिलेलं
 "People you may know "

Copyrighted@2020


0 टिप्पण्या