COVID-20

 

कोरोना संसर्ग आता आपला विस्तार वाढवत आहे. कित्येक कोरोना लग्न झालेले रुग्ण आपल्याआसपास मिळत आहेत. आपल्याला भीती वाटते पण नक्की कोरोना काय आहे ? याचा एक विचित्र आढावा,

कोरोन रुग्ण सापडल्यास त्याला जवळच्या सरकारी किंवा कोरोना दर्जाप्राप्त रुग्णालयात दाखल केल जात. जिथे त्यांना वेळोवेळी औषधे आणि थोडक जेवण दिल जात. सलाईन वैगरे असल काही नसत. अगदीच श्वास घ्यायला त्रास झाला तर व्हेंटीलेटर लावून प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांना असा काही त्रास होत नाही ते सध्या गोळ्यांवर बरे होऊन घरी जातात. आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त नाही ते आपले प्राण गमवतात. न्यूज मिडिया आणि सोशल मिडिया या दोन मिडियांच्या मते कोरोना म्हणजे काय ?

न्यूज मिडिया- एका शहरात आज दोनशे कोरोना रुग्ण सापडले आहेत, एकूण कोरोना झालेले रुग्ण आहेत दोन हजार. त्यातले घरी गेलेले आहेत अठराशे आणि मृत आहेत वीस. म्हणजे आज जेवढे सापडले तेवढचे रुग्ण कोरोना बाधित आहेत पण सरसकट सगळी आकडेवारी धरून शरांची बाधित संख्या उंचावरून दाखवणारे न्यूज मिडिया रुग्णालयातील अद्यावत तंत्रज्ञान आणि डॉक्टरांची तारीफ करत असत. दिले जाणारे फ्री औषध आणि बाकी सुविधा यांवर जोर देताना त्या त्या शहरातल्या रुग्णालयांची जाहिरात हे न्यूज मिडियावाले करत असतात.

अशी कित्येक रुग्णालये आहेत ज्यांची काळी बाजू न्यूज मिडीयावर आली आहेत त्या रुग्णालयांची नावे पुन्हा लोकांसमोर आली नाहीत. पण म्हणून ती रुग्णालये बंद पडली किंवा त्यांचा कोरना दर्जा काढून घेतला आहे अस काहीही झाल नाही. तिथे सावळा बाजार सुरूच आहे. तर काहींचे काळे धंदे आज समोर आलेत आणि दोन दिवसांनी त्याच रुग्णालयाची तारीफ करणारी बातमी दाखवली जाते. हि खरी तारीफ असते कि गपचूप पैसे घेऊन केलेली तारीफेआड जाहिरात असते, हे न्यूज मिडियाच जाणे आपण बघणारे अजाण लोक असतो.

सोशल मिडिया- यांवर कित्येक कोरोना रुग्ण रुग्णालयातून सर्व माहिती देऊन त्या व्हिडीओ, फोटो आणि लेखांना सोशल साईटवर टाकून खरी बाजू सांगत असतात. जे खर असत दिखाऊ नसत. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केल जात. आणि त्या प्रसिध्द झालेल्या व्हिडीओ किंवा फोटोची सत्यता तपासणी केली जाते तेव्हा कित्येक असे रुग्ण मदत मागून आपले प्राण गमावून बसलेले असतात जिकडे सोशल मिडीयावर अशा फोटो किंवा व्हिडीओ कमेंट मिळत असतात तेव्हा त्याच रुग्णालयाची न्यूज मिडीयावर तारीफ होत असते. यावर आपण काय बोलायचे ?

कित्येक असे मृत रुग्ण आहेत जे कोरोनासोडून वेगळ्याच कोणत्या रोगाने अन जास्त करून भितीने मृत झाले आहेत पण तरीही त्यांना कोरोना रुग्ण म्हणूनच जाहीर करून त्यांच्या कुटुंबियांकडून लाखो रुपये रुग्णालये मिळवत होते आणि आहेत. काही लोकांचे वेगळे आजार, राहिलेली शस्त्रक्रिया वैगरे करून देखील जेव्हा असे लोक मृत होतात तेव्हा त्यांना कोरोना बाधित मृतदेह असच संबोधतात. कॅन्सरहि आजकाल बारा होतो मग बाकी सर्व शस्त्रक्रिया किंवा रोग हे बरेच होतात पण तरी हि क्षुल्लक रोगांना बर करण्यात किंवा रोजच्या माहित असलेल्या शस्त्रक्रिया फसल्या जातात आणि कोरोनाचे कारण देऊन पैसे घेऊन मृतदेह हि स्वतःच जळणाऱ्या रुग्नालाय्च्या प्रशासनावर मला एक संशय येतो.

१)     कोरोना बाधित जर मृत झाला तर त्याचे पैसे त्याच्या कुटुंबाकडून जबरदस्ती का मागविले जातात ?

२)     कोरोना जर फुफ्फुस आणि हृदयाच्या संबंधित आजार असेल तर त्यात डोळे, किडनी यांवर जास्त परिणाम होत नसावा किंवा होतच नसेल. आणि जर होत नसेल तर या अवयवांची अवाढव्य किंमत बाहेरच्या देशात खूप मिळते. जर मृत रुग्ण झाला असेल तर त्याचा या अवयवांना काढत तर नसतील ? कोण बघायला गेल आहे ?

३)     जे रुग्ण कोरोना बाधित असूनही ठीक ठाक असतात आणि ते अचानक काही वेळात मृत होतात आणि त्या व्यक्तींना हि कुटुंबाच्या हवली करत नाही. पोस्टमोर्टमच्या नावाखाली त्यांचे अवयव हि काढून घेत असावेत. आणि हे सर्व अवयव कुणी मोठी रुग्णालये हि एकमेकांना सामील असावीत. कारण १०० पैकी 20 लोकांचे मृत्यू कारण कोरोना संसर्ग हेच असते पण ८० लोकांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असत. आणि उत्तर द्यायला बांधील असलेल्या रुग्णालयाकडून कोरोना हेच उत्तर मिळते. पण त्याचे रिपोर्ट दिले जात नाहीत. आणि मेलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट मिळवून काय होणार म्हणून ते मिळवले हि जात नाहीत.

यातून हेच समजते कि कोरोनाबद्दल भीती असणे स्वभाविक आहे पण जे काही आसपास आणि खास करून रुग्णालयात घडते ते सगळ कोरोनामुळेच होत अस नाही.


Copyrighted@2020

2 टिप्पण्या