साजरा.

 

तू.... तू खूप सुंदर आहेस. तुझ्यासारखं या जगात तरी दुसर कुणी नाही. असेल तरी मला माहित नाही. आणि असली तरी मला काय तिच्याशी देण-घेण काहीच नाही. तू आहेस न माझी. मग कशाला मला अजून दुसरी कुणी हवी. तू इतक माझ्यावर प्रेम करतेस. तर मी हि कायम तुझ्यावर फक्त प्रेम करत राहीन. तुझ्यासाठी दिवस रात्र एक करून खूप पैसे कमवेन. तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण करीन. तुझ्या मनातल तू न बोलता सगळ ओळखण्याचा प्रयत्न करीन. तुझ्या माझ्या या नात्याला बघून लोकांना आपला हेवा वाटायला हवा अस आपण एकत्र राहू. कायम आपल प्रेम वाढवत नेऊ. कधीहि मी तुझ्यावर शक घेणार नाही. कधीही तुझा राग-राग करणार नाही. तुझ्यावर फक्त प्रेम करेन. इतक कि तू कंटाळशील मला. पण तरीही मी ते प्रेम कमी होऊ देणार नाही. तुझी कायम काळजी घेईन. तुझ्यासाठी माझा सगळा वेळ देईन. एक वेळेस माझ काम बाजूला ठेवेन पण तुझ्याशी कॉलवर नाहीतर मेसेज करून बोलत राहीन.

तुझ्या प्रत्येक फोटोला मोबाईलमध्ये एक फोल्डर बनवून जपून ठेवेन. आपल लग्न झाल कि त्या सगळ्या फोटोंची प्रिंट काढून त्याचा एक वेगळाच अल्बम बनवून घेईन. आपल बरचस बोलन झालेल आहे त्या सगळ्या मेसेजचे स्क्रीनशॉट मी जपून ठेवलेत. मी बाहेर जाताना कायम मला आई काहीना काही येताना आणायच्या वस्तूंची यादी सांगत असते. माझ्या त्यातली एक हि गोष्ट नीट लक्षात राहत नाही पण तुझ्याशी आजपर्यंत इतक काही बोललोय तरीही मला एक अन एक शब्द लक्षात आहे. पहिल्या हाय पासून आत्ता मी मेसेज करतोय तिथ पर्यंतच सगळ. आज आपल्याला एकत्र येऊन एक वर्ष पूर्ण झालय. या एका वर्षात तीनशे पासष्ठ दिवस झाले. कित्येक तास मिनिट झाले. आणि या एवढ्या वेळात आपण कितीतरी जास्त बोललो आहे. पण सगळ सगळ लक्षात आहे. आपण भेटलो तेव्हा आपल्यात जे काही झाल तेही सगळ लक्षात आहे. फुल एच.डी. तुझा आवडता रंग, तुझ्या आवडती ठिकाण. तुझ्या आवडत्या प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवून आहे मी. इतक कि मला माझी आवड लक्षात येत नाही. कधी कधी मी आवड निवडताना चुकलो तर आई आठवण करून देते मला काय आवडत याची.  

इतक का कुणी प्रेम करत असेल तुझ्यावर मला तर नाही वाटत. माझे आता इतके मित्र आहेत. प्रत्येकाच बाहेर सुरु आहे. पण दोन चार दिवस झाल कि भांडण, ब्रेकअप आणि बरच काही सुरु असत त्याचं. पण या वर्षभरात आपण कधीच अस काही केल नाही. माझ्या मित्रांची रिलेशन्स बघून जाणवत मला आपल प्रेम खरच खूप आहे एकमेकांवर. आणि हे असच टिकवून ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन. तुझ्या माझ्या प्रेमाला मी तुझ्याशी लग्न करून कायम करून टाकेन. तू फक्त माझ्यावर कायम विश्वास ठेव. मी कधीच तुला फसवणार नाही. तुझ्यापासून कधी लांब जाणार नाही. बस तुझ्यासोबत कायम राहीन. तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन. आय लव्ह यु.

असे त्याचे मेसेज होते. आणि ते मेसेज मला त्याच्या गर्लफ्रेंड पाठवले. मी ते सगळे वाचले. आज त्यांनी त्यांच्या प्रेमाचा एक वर्ष पूर्ण झाला तो दिवस “साजरा” केला. आणि मी मोजून बघितले त्याने मला सोडून किती दिवस झाले. आणि बेरीज आली. तीनशे पासष्ठ दिवस. एक वर्ष........

त्यांनी प्रेमाचा एक वर्ष साजरा केला. आणि मी साजरा केला आजचा दिवस एकटेपणाचा.    

copyrighted@2020


 

2 टिप्पण्या