प्रेमाची किंमत शून्य.


एकदाच प्रेम होऊन हजारदा त्रास होतो. हे माहित असत तरी सुध्दा हे मन प्रेम करायला तयार असत. प्रेमात पडून अखंड प्रेमात बुडालेले मी किती बघितले आहेत. प्रेमात तरंगताना कुणीच दिसल नाही. दिसले ते बुडालेलेच. एका प्रेमासाठी किती काही गोष्टींचा त्याग करायला हा जीव तयार असतो. किती वेळ तो वाया घालवायला तयार असतो. किती काही बोलायला तयार असतो. आणि ऐकून घ्यायला ही. प्रेम करून जिंकणारे बरेच पण हरणारे फार कमी. पटत नाही ना ? पण हेच खर. अस म्हणतात कि ज्याची सहन करायची ऐपत असते त्याच्याच नशिबी खूप दुःख असतात. म्हणूनच देव त्यांना खूप संकट देतो. प्रेमवीरांसाठी हि हाच नियम आहे देवाच्या दारी. ज्यांना प्रेमभंग सहन करता येतो त्यांनाच धोका मिळतो. आणि बाकीचे आत्ता प्रेम करून लग्न करून सुखात जगत आहेत.किती हि कुणावर प्रेम केल तरी त्याची किंमत वस्तू, वेळ, आणि आपण वागलेल्या काही गोष्टींवर ठरते. पण प्रेमाची किंमत नसते हो. पण हे कळेल कुणाला ? ज्याला खर प्रेम झालय. चित्र काढणारा कधीच आपल्या चित्राची किंमत ठरवत नाही. ठरवणारे तर ते चित्र विकत घेणारे असतात. ज्या व्यक्तीसाठी काय करायचं बाकी अस असत ? सगळ करून झालेलं असत. तरी काय केल म्हणून सवाल पुढून येतो. किती वचन दिलेली असतात पुरी करण्यासाठी आणि विचारल जात काय तू हे पूर्ण करणार ? 
सगळा दिखावा. सगळा लोभ. शारीरिक मोह. जो काय तो माझ्याच प्रेमात आहे आणि आख्ख जग पवित्रच प्रेम करत जगतय असा तिचा अविर्भाव असतो. असो. हरकत काय आहे मी म्हणतो. पुढच्या व्यक्तीच्या नजरेत बेवफा व्हायला. पुन्हा कधी पुढच्या जन्मी आमचच प्रेम झाल एकमेकांवर तर तेव्हा तिला एक शिक्षा देईन मी. ती माझ्यावर प्रेम करत असेल आणि मी तिला फसवेन. 
किती काही मनात मी माझ्या सजवून ठेवलेलं तिच्यासाठी. पण सजवलेलं तिला दिसलच नाही. रस्त्यावर प्रकाश दिसतो तो आजूबाजूच्या लाईटीचा. चंद्राचा विसर हा पडतोच आपल्याला. पण तीच लाईट गेली तर उरत कोण ? 
माझ हि प्रेम कळाल नसल तिला तरी प्रेम म्हणाल्यावर मीच आठवणारे तिला. बाकी ? शून्य. कारण प्रेमाची किमत माझ्या शून्य झाली. पण एक विसरून कस चालेल कि, शून्य लावू तितकी किंमत वाढत जाते. मी न एक आहे ना नऊ यातच मी खुश आहे. आणि तिकडे ती खुश आहे. 

Copyrighted@2020


1 टिप्पण्या