आणि ऐश.


माझा डावा हात आणि तुझा उजवा हात एकमेकांना जुळवून बघितला तर आपल्या हातावरच्या रेषा एकमेकांना जुळत होत्या. पक्क झालेलं आपण एकमेकांच्या नशिबात होतो. शंभर टक्के. कोणत्या ज्योतिषाची गरज नव्हती हे सांगायला, आणि खरच आपण एकमेकांच्या नशिबात होतो, म्हणून सातशे करोड लोकांच्यात मला तूच भेटलीस. आपण दोघ यातच खुश होतो. हृद्य रेषा दोघांच्या अंतराच्या, आकाराच्या होत्या. आपल्या हातावर मोजून एक बारीक खालून-वर आलेली पातळ रेष होती हातावर जिचा अर्थ असतो मुलगी. जरा वर उचलेली रेष असेल तर मुलगा हे अपत्य असत. पण आपल्या दोघांच्या हातावर खालून-वर आलेली रेष होती. ति पण एकच. आता लग्न कधी होईल आपल याचीच वाट बघत होतो तू आणि मी. सगळ आपल्या मर्जीने आपल्या मनासारखं होत. इतका फिदा देव थोडीच कुणावर असतो. मी तयारीत होतो. पण ऐक तुला एक सांगू ? माझ तुझ्यापेक्षा पण जास्त प्रेम माझ्या आईवर आहे. आणि मी तिला जाऊन सगळ सांगितल. आणि आईला नाही पटल. मी खूप समजावलं तिला. पण सगळ व्यर्थ. आपण दोघ लांब राहतो. मी रोज तुला बघू शकत नाही. आणि तू सकाळी फोटो नाही पाठवला तुझा तर  मला इतक काही वाटत नाही पण आईला सकाळी नाही बघितल तर मला चैन पडत नाही इतक माझ आईवर प्रेम आहे पण तीच आई बोलली मला मी तिला किंवा तुला निवडाव. आणि मी तुला निवडल. आपण ठरवल आईची समजूत कशी काढायची. पळून जाऊन लग्न कस, कधी, आणि नंतर कस काय सगळ सांभाळायच. इतका कोण विचार करत ? पण आपण चार दिवस रोज रात्री दोन-तीन पर्यंत जागून बोललोय. ठरवलय. आणि आपल ठरल मी माझ्या आईपासून लांब व्हायचं आणि तू तुझ्या नवऱ्यापासून.
दोघांनी एका ठिकाणी भेटायचं. लग्न करायचं. सोबत तुझ्या तुझी खास मैत्रीण आणि एक मित्र जो मला हि चांगला ओळखतो असे चौघ मिळून भेटायचं. आणि आपण लग्न करायचं. माझ्याकडे पैसे नव्हते. पगार झाला नव्हता. आणि आधीचा झालेला मी आईला सगळा दिलेला. तू म्हणालीस मी आहे न ? मी असताना तू कसली काळजी करायची नाहीस. आणि मी मनाची तयारी केली. दोन महिने आई माझ्याशी बोलत नव्हती. दोन महिन्यात मी हजार वेळा मेल्येल्या प्रेतासारखा घरात एकटाच वावरत होतो. पण म्हंटल तू आलीस माझ्या आयुष्यात कि होईल सगळ ठीक. म्हणून मग मी दोन महिने कसे तरी काढले.
आता माझ्याशी आई बोलते पण पहिल्यासारख नाही. मी तिला सांगितल आपण काय ठरवलेलं ते सगळ. आणि हे पण कि आता आपण सोबत नाही. तिने कारण विचारल नाही आणि मला हि ते ठीकस माहित नाही. सहज माझ्या आयुष्यात आलीस. सहज निघून गेलीस. हे येण-जाण नक्की काय होत मला माहित नाही. पण तू मला खूप प्रेम दिलस या विचारावर मी खुश असतो. अजून कुणावर प्रेम होत नाहीये सध्या. प्रेम काय असत हे मला तुझ्यासोबत कळाल. पहिलं प्रेम तू मला विसरायला भाग पाडलस. आता मला पहिलं प्रेम आठवत नाही. फक्त तू आठवतेस. कोण म्हणत पहिलं प्रेम विसरता येत नाही ? तू सगळ्या जगाचा नियम बदलून टाकलायस. आणि स्वतःला हि बदलून टाकलयस. पण शेवटी जगात जो निसर्ग नियम लागू आहे तो मात्र तुला बदलता आला नाही.
तो नियम आहे, “खर प्रेम कधीच मिळत नाही आणि मिळाला तर टिकत नाही”.    

लेखाचे हक्क लेखकाकडे आहेत copyrighted@2020 

0 टिप्पण्या