फसवा

कुणाची साथ आयुष्यभर मिळावी म्हणून कुणाच्याही शोधत राहून कुणीतरी मिळतच नक्की. पण साथ आयुष्यभर मिळेल ती याची शशवती नसते. वर वरच प्रेम जास्त खोलवर कधी नसत. खोलवर जखम होते फक्त. पण वर वर फक्त आनंदी असण्याचा आव आणावा लागतो. अवस्था अशी होते की स्वतःची कीव यायला लागते. कित्येक स्वप्न त्याने दाखवलेली असतात. कित्येक मी जगलेली असतात. तो स्वप्न दाखवून विसरतो आणि मी बघितलेली स्वप्न विसरुन जाण कठीणच. तरी पुन्हा पुन्हा विश्वास आणि विश्वासघात या नात्यातल्या पैलूंवर काम करत असताना एवढ्याश्या विश्वासाचा एवढा न सहन होणार विश्वासघात कुठवर सहन करत राहायच ?
तरी विश्वासघाताला सहन करत प्रेम त्याला मानत त्या व्यक्तीला मी माझं म्हणत जगताना मीच मला किती फसवत राहते. मनाला कधी फसवता येत नाही पण मी पार फसवलं आहे मनाला माझ्या. त्यामुळे तो माझ्यावर खोट प्रेम करून मला फसवत असला तरी मला ती फसवणूक वैगरे अशी काही वाटत नाही. बर, माझं प्रेम कुठं कमी पडल नाही, त्याला हवं तितकं त्याहून जास्त आणि त्याला हवं तसं मी त्या त्या वेळेस करून सिद्ध केलं. पण त्याला फक्त मला त्याच म्हणणं पण जमलं नाही आत्मविश्वासाने. माझ्या मित्रांच्यात तो सगळ्यांना माहीत आहे. तो माझा कोण आहे ते. त्याच्या मित्रांमध्ये मी मात्र अनोळखीच. कित्येक आशा फसव्या गोष्टींना त्याच्या मी मान्य केलं, आपलंस केलं. पण त्याला नाही जमलं हे प्रेम करणं.
बाकी मी आता खुश आहे त्याच्यापेक्षा जास्त. आणि त्याला हल्ली माझी आठवण येते. आठवण येण्याला प्रेम म्हणत नाहीत. येऊन भेटणाऱ्याला खरा प्रियकर म्हणतात. पण तो तर फक्त मेसेज करून मला मिस करतो. मी त्याला मिस करत नाही पण त्याच्यावर केलेलं प्रेम विसरलेय अस ही नाही. असो, त्याची फसवणूक मला फसवून गेली. आणि माझं प्रेम त्याला प्रेम शिकवून गेलं. त्याला आता परत कुणाकडून इतकं प्रेम मिळणार नाही. आणि मला आता कुणी प्रेमात परत फसवू शकणार नाही.

Copyrighted@2020

0 टिप्पण्या