वहिनीरस्त्याने जाताना गर्दी,  साहजिकच असते. प्रत्येक व्यक्तीला डोळ्याने बघता येत नाही पण चालत चालत गर्दीतून वाट काढता काढता काही पाऊल पुढे एक नवरा बायको चालताना तिला दिसले की. तिला अप्रूप वाटल त्या दोघांच. रस्ता ओलांडताना तो त्या बाईचा हात धरतो आणि रस्त्यापलीकडे निघून जातो. त्यांना बघून ती सुद्धा गाड्यांचा अंदाज घेते आणि मुलाचा हात धरून त्याला  नीट जवळ ओढून रस्त्यापलीकडे होते. रस्त्यावर सगळं जग रंगीबेरंगी प्रकाशात वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेलं असत. त्या भरलेल्या जगाला बघून भारावणारा तो लहान मुलगा तिला प्रत्येक गोष्ट मागत राहतो. त्यातलं सगळंच ती त्याला घेत नाही पण तिला जे योग्य वाटत ते त्याला घेऊन देते. त्याचा हट्ट पुरवणं तिला कायमच आवडत. पण जेव्हा मुलाला एका दुकानात नेऊन खुर्चीवर बसवून जेव्हा विचारलं तुला काय हवं तेव्हा तो बोलताना तीच पुढे लक्ष गेलं. एक नवीन लग्न झालेले नवरा बायको तिथे बसलेले. ती त्याला हे घे ते घे सांगत होती अन पुन्हा पुन्हा ते नको दुसरं अस करत हट्ट करत होती. मुलाच्या आवाजाने उठून ती त्याला हवं ते घेऊन देते. मुलाला सगळं जाणार नाही हे तिला माहीत असत आणि म्हणून ती त्याला भरवत भरवत स्वतः ही खायला लागते त्याच्याच डिशमध्ये. पुढं बसलेले नवरा बायको ही एकच डिशमध्ये खत होते. त्यांचं खाऊन झालं तरी ही दोघे खात होते. लहान मूल वेळ लावतातच. तो नवरा पैसे देतो आणि बायकोचा हात धरून दुकानाबाहेर पडतो. मुलाचं खाऊन झालं. त्याचा हात धुवून ती पैसे देऊन मुलासोबत बाहेर पडते.
फुटपाथवर चालत असताना रस्त्यावरून जाणारे गाडीवरचे भर भर नजरे समोरून जात होते. पण कित्येक असे नवरा बायको गाडीवरून जाताना बघून तिच्या पायाला जाणीव झाली की ती खूप चाललीय. वर मुलासोबत चालताना तिला खूपच धीम्या वेगाने चालावं लागतंय. ती रिक्षा करते आणि घरी निघते. दारात रिक्षा थांबते. एव्हाना नऊ वाजून गेलेले. शेजारी बायकांचा आवाज येत होताच. आज नागपंचमी होती आणि घरी त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. सगळ्यांना बोलवलं होत. त्यांच्या छोट्या मुलीने. पण तिला खास बजावलं होत शेजारी आहे त्यांना पण सांग जाऊन, सात वाजता बोलावलंय हळदी कुंकवाला. आणि म्हणून ही मुलासोबत पाच वाजताच बाहेर गेलेली. हळूच कुलूप उघडून आत जाऊन तिने मुलाला मोबाईल दिला. मुलगा त्यावर कार्टून बघत बसला. ही आत जाऊन कपडे बदलून मुलाशेजारी बसली. सहज तीच लक्ष समोरच्या आरशात गेलं डोळे ओले होते तिचे. केस नीट असले फिकट गुलाबी ओठ दिसत असले तरी कपाळावर कुंकवासाठी जागा नव्हती. काही जागांवर अधिकार आपला नसतो. जरी ती जागा आपली स्वतःची असली तरी. समाजाचे नियम खरच त्रासदायक असतात. आणि म्हणून समाज नियमाला घाबरून लोक आपलं आयुष्य कसबस जगत राहतात. पण तेच समाजच नियम पाळूण कुणी जगत नाही.शेजारच्या घरचा आवाज हळू हळू कमी होत अखेर थांबला. आता टीव्हीवरच्या मालिका वाजू लागल्या. त्या ही अकरा नंतर शांत झाल्या. मुलगा तोपर्यंत झोपून गेलेला. आणि ही झोप येण्याची वाट बघत होती. डोळ्यात पाणी असताना कुणाला झोप लागेल ? डोळे कोरडे हवेत तरच ते मिटतात. डोळ्यात तिच्या पाणी होत पण का येतंय हे विचारायला तिला कुणी तीच नव्हतं. कित्येक तयार होते तिला आपलंस करायला अगदी मुलासकट. कित्येक जण आहो-जाहो तर कधी वहिनी आणि कधी एकेरी नावाने बोलत तिला मिळवण्याच्या प्रयत्नात होते. तिला एक हो म्हणायला कितीसा असा अवकाश होता ? पण ती मुलासाठी स्वतःच आयुष्य त्याच्या आयुष्यात खर्ची घालत होती.तिला ही मिळालं असत कुणी रास्ता ओलांडताना हात धरणारा. तिचे हट्ट पुरवणारा, रात्री मिठीत घेणारा. पण हे सगळं फक्त तिलाच मिळालं असत. तिच्या मुलाला नाही. आणि या एका गोष्टीसाठी तिने कुणाला जवळ येऊ दिल नाही. पण तिला हवं असलेलं सगळं तिच्या डोळ्यात स्पष्ट रोज रात्री झळकत होत. समाजाचे सगळे नियम हे त्रासदायक असतात आणि त्यातून हर एक माणूस सुटून जातो. अगदी सहज. निर्लज्जपणे. पण एक विधवा स्त्रीच एक खरी असते जी या समाजाचे सगळे नियम पाळूण या जगात वावरत असते. तिला ही हक्क असतात जगणायचे पण ती जगत नाही. आणि कुणी तिला जगू देत नाही. विधवा होता येत नाही. विधवा नसते ही. तिला मानलं जातं. तिला हिणवल जात विधवा म्हणून. आणि याच शिक्क्याने ती तीच तारुण्य संपवून वृद्ध ही होते कुणा पुरुषाच्या स्पर्शाशिवाय. एक पुरुष बाईच्या स्पर्शाशिवाय दोन दिवस राहू शकतो. बर अगदी आठवडाभर. पण त्याहून जास्त नाही. पण एक विधवा स्त्री आपलं अख्ख आयुष्य असच कोरड्या अंगाने जगते. आणि असच ती जगत होती. आणि तीच लक्ष बाजूला झोपलेल्या मुलाकडे गेलं. तेव्हा तिला तिचं हसू आलं. आणि तिला बर वाटल. की तिला मुलगा झालाय. कारण तिला मुलगी झाली असती तर तिला ही असच काहीस आयुष्य नशिबाला असत पण अस होणार नाही म्हणून ती मुलाला जवळ मिठीत ओढून झोपली.

Copyrighted@2020

0 टिप्पण्या