तुझी आठवण येते. पण...

breakup sad whatsapp stetus


तुला चंद्र म्हणताना मी डोळ्यांवर माझ्या हात ठेवायचो. मी अंधारात राहून तुला चंद्र म्हणून बघायचो. कित्येक शब्दांना जिभेवर घेऊन तुझी तारीफ करायचो. त्या शब्दांना चांदणी म्हणायचो. माझ्या मिठीला थंडी म्हणून तुझ्या मिठीतल्या ऊबेला मी ऊन मानायचो. क्षणाक्षणाला तुझ्या डोळ्यांची उघड झाप व्हायची. तू मिटता डोळे मी अमावस्या जगायचो. तू माझ्याकडे बघितलस कि पोर्णिमा बघायचो. या हृदयाला माझ्या तर काही ताळतंत्रच उरल नव्हत. माणसाच हृद्य आहे ते विसरूनच जायचं. तुला बघितल कि चित्त्याच्या वेगाने धडधड करायचं. कित्येकदा जीव जातोय कि काय म्हणून भ्यायचो मी, पण तुझ्यासाठी जगायचं आहे अजून या विचाराने हृद्य ताब्यात करायचो. तुला निसर्ग म्हणताना मी आकाशासारख तुझ्याकडे वरून पाहायचो. तू मात्र नजर खाली ठेवून माझ्या मिठीत यायचीस. त्या नजरेत मी माझ प्रतिबिंब बघायचो. आणि तू नदी व्हायचीस. कोरड्या ओठांना हि तेव्हा प्रेमाच्या झऱ्याची धार लागायची.
तुला किती तरी शब्दात मी लिहून ठेवल एक पुस्तक अस म्हणून. कित्येकदा मी वाचल तुझ्या डोळ्यांना. जणू काय ते पुस्तक माझ पाठच आहे. तुझ्य्साठी जगतो मी म्हणताना मी माझ आयुष्य तुझ्याशी जोडलं. तू जितके दिवसाला श्वास घेतेस मी हि तेवढेच घ्यायला लागलो. मी मला तू म्हणायला लागलो. सगळे म्हणतात म्हणून मी स्वतःला वेड म्हणायला लागलो. तुझ्यासाठी लोकांशी संबंध तोडायला लागलो. तुझ्यासाठी सगळे संपर्क तोडायला तयार झालो. रात्रीला दिवस म्हणायला लागलो. त्या दिवसात तुझ्या आठवणीत वेळ घालवायला लागलो. माझ आयुष्य तुझच आहे म्हणत नशीब हि तुझ्या हवाली करायला लागलो. इतक सगळ करून तू काय दिल ? थोडे दिवस फोनवरच बोलण. तुला वेळ मिळेल तेव्हा मेसेज. महिन्यातून एकदा भेट. इतक्या मित्र-मैत्रीणीत फक्त दोघा तिघांना माझी ओळख सांगितली. आणि मला प्रेमात पाडून निघून गेलीस. खूप वाईट वाटत. रडू येत. पण तुझ्यावर जबरदस्ती करून तूला माझ्याकडे नाही आणू शकत. तू खुश आहेस. अस मला तुझ्याकडे बघून दिसत. आणि कधी नव्हत आता मी माझ्याबद्दल बोलायला लागलो आहे. रात्रीचा रडून हि मी दिवसाला स्वतःला खुश म्हणायला लागलो आहे. मी संबंध तोडलेले लोक जेव्हा मला भेटतात मला खुश आहेस असच म्हणतात. पण माझ रात्रीच दुःख कुणाला कळत नाही. काय करणार प्रत्येक जण तुझ्यासारखं मला ओळखणार नसत ना ग. तुझी आठवण येते. पण...

0 टिप्पण्या