तिला शोधताना


इशाबेल पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच काही वाक्य वाचते.

“बलात्कार झाल्यानंतर हि हा समाज, जर प्रेमाला मान्यता देत असेल तर मला पुन्हा त्यान माझ्या मर्जीन माझ्यावर प्रेम कराव अस मला वाटत. तस बघायला गेल तर हा एक फक्त विचार आहे माझा आणि बलात्कार पण माझ्यावर झालाय, म्हणून मला हे विचार मनात आले. संपलय माझ सगळ आणि मीही आता संपतेय. नायला हिनोरी .

इशाबेल पुस्तक बाजूला टेबलावर ठेवते. पुस्तकावरच violate नाव, नायलाचा फोटो आणि लेखक म्हणून इशाबेलच नाव दिसत. पुस्तकाच्या बाजूचा कॉफीचा कप इशाबेल उचलते आणि तिच्या मनात बरेच प्रश्न येतात. आणि ती मोबाईलमध्ये तिचे ते प्रश्न रेकॉर्ड करायला सुरुवात करते.

“आत्ताच जस्ट मी लिहिलेलं ‘व्हीयोलेट’ पुस्तक वाचल. त्याच्या पुढच्या भागात काही तरी नवीन लिहाव म्हणून माझा शोध सुरु होता. शोध संपला मला स्टोरी मिळाली. हि स्टोरी खरी आहे जरा खोटी आहे. आणि त्यापेक्षा ती जरा न पटणारी आहे. अंममम ! सेकंदाला दोन बाळ जन्माला येतात. त्यातला फक्त मुलगाच जगवला जातोय. वर्षाला तरी १ ते 5 लाख अबोर्शन होतायत फक्त मुली आहेत कळल्यावर आणि त्यातून जर त्या मुलीला जन्म दिलाच तर दूसरीकड कुठ एका बाईवर, एका मुलीवर बलात्कार होतोय, लग्नाच आमिष दाखवून मनाविरुद्ध सेक्स केला जातोय. आणि हे कांड लपवायला त्यातल्या निम्म्या मुलींचा खून होतोय. कसबसा जन्म मिळाला या स्त्रीला तर हे बलात्काराच भय आहे आणि त्यातून सुटल तर मरण आहेच आणि ते हि नाही झाल तर हा समाज तिला वाळीत टाकायला केव्हाचा तयारच आहे.

एका २१ वर्षाच्या मुलीची हि गोष्ट आहे जिला जन्म मिळाला पण बहुतेक तिच्यावर बलात्कार व्हावा म्हणूनच. अमानी वर तीन जणांनी बलात्कार केलेला. एक वर्ष झाल त्याला. अघोरी नव्हता तो बलात्कार म्हणजे जास्त दुखापत नाही किंवा तिचा खून हि झाला नाही. कारण तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांनी हिंस्त्रपणा दाखवला नाही कारण दोघ हि एकमेकांना ओळखायचे. हे एक कारण असू शकत किंवा पुन्हा असाच वारंवार बलात्कार करायला ती ठीक ठाक दिसावी म्हणून त्यांनी जास्त अघोरीपणा दाखवला नाही. हा पण तिच्यावर बलात्कार केला हे मात्र नक्की.” इशाबेल सगळी कॉफी पिते आणि निट मांडीवरच्या पुस्तकाकड बघत बोलू लागते.

“या प्रकरणात एक गोष्ट मला मिळाली ती म्हणजे तिने बलात्कार झाल्यानंतर बनवलेली व्हिडीओ क्लिप. ज्यात तिने आईसाठी 5 मिनिटात काही मेसेज रेकॉर्ड केलेला आहे. तिच्या वडिलांनी तिला शिकायला लांब ठेवलेलं. आणि त्यांचा विश्वास होता कि अमानीकडून वाकड पाऊल कधी पडणार नाही आणि पडल हि नाही. तरी तिला तिच्यावर बलत्कार झाला याच गिल्ट वाटत होत. ते तीच गिल्ट तिच्या व्हिडीओत स्पष्ट जाणवलं मला. म्हणजे जेव्हा तिच्यावर बलात्कार होत होता तेव्हा त्यातला एक जण तिला जवळ ओढत तिच्या केसांना ओढत होता. एकाचे दोन्ही हात तिच्या छातीवर नखांनी वार करत फिरत होते आणि त्यातला महत्वाचा तिसरा इसम म्हणजे तिच्या मैत्रिणीचा भाऊ ज्यान हे कांड केलेलं तो पुढ येऊन त्या दोघापासून तिला मुक्त करतो.

तो आपल्याला वाचवेल अशी अशा अमानीला होती. पण तो क्षण डोळ्यात टिपेपर्यंत तिला आकाश दिसलं. त्यान तिला खाली झोपवल. त्या क्षणाला ती शेवटच्या श्वासाची अपेक्षा करत होती पण झाल उलटच. तिचे श्वास अजून जोरान वाढत चाललेले. तिच्यावर पडणाऱ्या पुरुषी ताकदीने प्रत्येक धक्क्याला तिच हृदय थांबून परत सुरु होत होत.

तिच्यावर बलात्कार होताना देव पण कसा काय इतका निष्ठुर होऊ शकतो हे मला समजलेल नाही. म्हणजे ज्या रस्त्यावर ती रोज ये-जा करायची. जिथ तिला रोज रोज नवीन माणस दिसायची आणि रोजची पण असायची. तिथल्या रस्त्यावर तेव्हा ओस पडलेला. तीच गिल्टी वाटण मला काही पटल नाही. म्हणजे ती त्या व्हिडीओत सांगत होती.

त्या वेळी त्यातल्या एकाने तिच्या मांड्यानवरून हात फिरवला तेव्हा संपलेली ताकद पुन्हा एकवटून तिला सेक्स करावासा वाटला. किंवा ती जागा उत्तेजित झाली. एकच सेकंद. ती इच्छा मनापासून नक्कीच झाली नव्हती. आणि असा परस्पर्श झाल्यावर अशी इच्छा होण साहजिकच आहे. आणि तशी इच्छा तिला एक दोन सेकंदच वाटली पण, तिचा पहिला अनुभव होता अशा पद्धतीच्या शरीरसंबंधाचा, आणि तो हि अशा अनोळखी माणसासोबत आणि इतक्या वाईट पद्धतीने. पण इतक गिल्ट वाटून घेण चुकीच आहे तीच. असा मला ती क्लीप बघताना वाटल.

अमानीच्या आधी हि मी खूप ब्रेकिंग न्यूजखाली गाजलेली नायला हिनोरी बलात्कार आणि आत्महत्या केस पहिलीय. त्या आधीही बराचश्या केसेस पहिल्यात, तिथे स्पॉटवरचे पुरावे बघितलेत आणि कोर्ट, पोलीस, मिडिया यांच्याकडून पिडीतेला उलट सवाल करून जे प्रश्नांनी तिच्या हळव्या मानसिकतेवर बलात्कार पुन्हा पुन्हा केले जातात ते भारतातल खूप भयाण सत्य हि मी बघितलंय.

इशाबेल मोबईलपुढे अजून जरा सरकून बसते.

मी तर हे सुद्धा ऐकलय कि मध्यंतरी काही पुरुष लेखकांनी अस हि लिहायचं म्हणून लिहून ठेवलय कि, बलात्कार होत असताना ती पिडीत सेक्स्यूअली active असते. आणि म्हणून ती बलात्काराला नंतर नंतर जास्त विरोध करत नसावी असा अंदाज त्या हुशार लेखकांनी लावला. त्यांच्या बोलण्यात तथ्य कितीय आणि यावर विज्ञान काय सिध्द करत हा पुढचा विचार आहे पण मानसिकतेच्या या खेळात स्त्री लेखिकांनी हि आपल्या परीने अशा अफवेबाज लेखकांना उत्तर दिलय. यात ठाम मत कुणी मांडल नाहीये पण प्रत्येकाचा उद्देश्य आणि बलात्काराच कारण आणि त्यावर सरळ दोष हा त्या स्त्रीलाच दिला जातो. कायम.

इशाबेल तिच्या व्हीओलेट पुस्तकावरचा नायलाचा फोटो निट बघत आणि पुस्तकाची पान चाळू लागत बोलते. पण अमानीच्या त्या बोलन्यामने मी मात्र गेले सहा महिने विचारात आहे. म्हणजे खरच का पिडीतेला बलात्कार होत असताना सेक्सुअल इच्छा होत असेल का ? आणि मला वाटत कि झाली तरी त्यात काय वावग आहे ? आणि अस असेल तर त्यात पूर्णपणे ती स्त्री मुलगी कोणीही असो तीच का दोषी असेल ? मनाविरुद्ध केलेला सेक्स जर बलात्कार असेल तर त्या मुलीच्या मर्जीविना तिच्या गुप्तांगाला केलेल्या स्पर्शाने तशी इच्छा होऊ शकतेच न…? काही क्षण काही सेकंद का होईना पण होऊ शकतेच.

त्यात परत अशा प्रकरणातल्या स्त्रिया निम्म्यातर सायको होतात नाहीतर एकलकोंड्या  होतात. आणि काहीं जणी तर पुढच्या बदनामीच्या विचारांनीच आत्महत्येचा ऑप्शन निवडतात. आणि म्हणूनच अशा केसेस समाजासमोर एकतर येत नाहीत, आणि आल्यातरी खर सत्य सांगायला ती पिडीत जिवंत राहत नाही. आणि म्हणून मग अशा दुसऱ्या अमानी आणि नायलाच्या शोधात हे भटके पीर फिरतच असतात. हममम! अमानीची केस पेंडिंगच राहिली. सरकारकडून नुसते दिवस घालवायची काम चालू आहेत. त्या पिडीतेच कुणाला काहीच नाही. बस फक्त पुरुष धर्माला वाचवायचं एवढच माहितीय. कारण सरकार सगळ पुरुषांनीच भरलय. ते सरकार म्हणताना त्यात त्या स्त्रियांचं सरकार नाही तर ते पुरुष प्रधान सरकार  असच मानल जात. आणि हे होतंय यामूळ कि स्त्रिया कधी बलात्कार करतच नाहीत. नाहीतर आत्ताचे स्त्रियांचे सगळे कायदे पुरुषांनाच अदा झाले असते. पण तरीही या घटनेत स्त्रियांच्याच चुका शोधण सुरु असत कायम. मुलींचे कपडे, अनैतिक संबंध वैगरे. वैगरे. आणि मुलीने प्रेम केल तर तो गुन्हाच असतो इथे. पण त्या बालात्कारिक पिडीतेचा विचार फक्त एकाच बाजूने केला जातो. पण त्या घटनेला दुसरी हि बाजू असते. पण कुणी बघत नाही. तिला काय झाल? तिला काय वाटत? हे जाऊदेच पण तीच आता काय एवढच बोलून तिला संपवायचं चालू आहे या समाजच. मग या दुसऱ्या बाजूचा विचार लोक करणार तरी कधी ? आणि मला तरी नाही वाटत या भारतात कोण करेल. इथ वस्तू घेताना पाच रुपयाच नाण दिल तर पुढची व्यक्ती ते नाण घेताना पुढचा छापील पाच आकडा बघते. मागे छापलेला अशोकस्तंभ काय कामाचा आहे ? आहे का काय कामाचा ?

असच झालय या समाज कायद्याच. एका बाजूंच जाणून निकाल लावायचा.

पिडीत जगली तर तिला वाळीत टाकून तिला मारायचं आणि ती जर मरण पावली तर तिच्या नावान एखादा नवा कायदा तिच्यासारख्या असुरक्षित स्त्रियांसाठी बनवायचा. नाहीतर कुठल्यातरी इमरजन्सी हॉटलाईनला तीच नाव देऊन श्रद्धांजली वाहायची.

होत फक्त एकच कि बलात्कार हे होतातच आणि होत राहणारच. आणि यात कायम पुरुषांचीच चूक असणार असा पण काही नाही. पण शेवटी पुरुषार्थ गाजवायचं हक्क वडिलांनीच मुलालाल दाखवलेला, शिकवलेला असतो. आणि आईने फक्त मुलीला एवढच सांगितलेलं असत कि कुणाची नजर छातीवर पडली तर ओढणी लगेच छातीवर सरकून घ्यायची. पण कोण शिकवत का मुलाला, कि मुलीच सौंदर्य छातीच्या वर हि आहे... चेहऱ्यावर. शेवटी मला अमानीच्या त्या गिल्टच काही न सुटणार कोड सतावत राहतंय. तिला झालेली ती इच्छा क्षणभर होती पण त्यात तिची काय चूक आहे का ? माझा शोध अजूनहि पुढे सुरूच राहील. अमानीने आत्महत्या केलीय. तिने पाण्यात विष टाकून पिल. तिच्याच रूमवर. इशाबेल रेकॉर्डिंग बंद करते.

( तिची आणि अशा बऱ्याच पीडितांचा हा कधी न कळलेला प्रश्न समोर आणलाय मी. आणि त्याच उत्तर शोधतोय. तुम्हाला माहितीय का याच उत्तर ?. आणि जर तुम्हाला प्रश्नच समाजालाच नसेल तर तुम्हीहि त्याच भारतातल्या ढ वर्गातल्या समाज नियामातीले एक ढ गोळे सदस्य आहात.

अल्ट्रा व्हीयोलेट या अवार्ड विनिंग लघुचित्रपटावर आधारित .

copyrighted@2017

0 टिप्पण्या