ऐश.


social mesia sad stetus


रात्र होणार आता. जग झोपणार पुढच्या वेळेत. मी तुझ्याशी बोलत तिच्या बोलण्यात हरवत जात रात्रीला लवकर जवळ करत आनंदित व्हायचं. उशीवरच्या डोक्यातल्या माझ्या केसांनी थोड भिजायचं. केसावरच्या तेलाने हळूच उशीच्या कव्हर वर निसटून त्याच व्हायचं. डोळ्यांनी पापण्यांवर झोप आणायची नाही. हृदयाने रोज रोज सारख-सारख मिनिटाला बहात्तर ठोकेच का द्यायचे. आत्ता जरा जास्त झाले तर काय हरकत ? गुढग्यातून वाकलेले पाय ताठ करायचे. एका हाताने मोबाईल धरून दुसऱ्या हाताने तुझा स्पर्श माझ्या हाताने मलाच करत राहायचं. आलाच अंगावर काटा तर तुला सांगायचं. त्यावर तू तिकडे लाजणार, माझ्याशी मग पुढच आणि त्या पुढच हि बोलून माझ मन तुझ्याकडे ओढत नेणार. मला तुझा बनवण्याचा हट्ट मन करत आणि नेमकी तू जवळ नसतेस. मोबाईल हातात असतो. त्यावर तुझे मेसेज सुरु असतात. पण तू स्वतः हि जवळ समोर हवी असतेस’ त्या क्षणाला. माझी हालत बघून तुही तुझी हालत बिघडवून घेतेस. तुही तुझ्या हातांना छातीवर नेतेस. मला तुझ्या विचारात अगदी घट्ट जवळ घेतेस. अगणित चुंबन आणि तुझ मला सगळ देतेस. पण विचारात.
मग माझ्या शर्टला मी वर करतो. तुझ्या ड्रेस मधून हि आता आत वारा येतो. एक एक गोर अंग तुझ वाऱ्याच्या संबंधात येत. मी हि त्याच वाऱ्याशी मैत्री केली आता. काही क्षणांनी आता तुझ्या नावच प्रेम मुक्त होणार होत माझ्यातून. तू कुठे तरी हरवून गेलीस. व्हिडीओ कॉलवर दिसत होतीस. नाहीशी झालीस. कॉल कट झाला. नेटवर्कने दगा दिला. मुक्त होणार प्रेम मधेच अडल. साठल आणि तुंबल. मेसेज झाले खूप पण तुझा पत्ता नाही. रात्रीची बे’रात्र झाली. ताठ पाय गुडघ्यात गेले. हातांनी मोबाईलची साथ सोडून डोक्याखाली आश्रय घेतला. उशी पायाशी गेली. अंगावर नाही पण पापण्यांनी डोळ्यांवर झोपेच पांघरून घेतल. नेटवर्क भरपूर होत. रात्र भरपूर झालेली. ती मोबाईल जवळच होती.
मी झोपेच्या मिठीत मनाविरुद्ध झोपलो होतो. आणि तू..........
तुझ्या नवऱ्याच्या मिठीत झोपली होतीस. ( मनाविरुद्ध ) तरी माझ तुझ्यावर प्रेम आहे.तुझ माझ्यावर आहे. आणि..... ( निशब्द )

      

0 टिप्पण्या