तिला जाणून घ्यावंती नसून असल्यासारखी. न दिसता दिसण्यासारखी. खूप प्रश्न आणि उत्तरासारखी. हवेतली थंडी नि उबेसारखी. सुर्यासारखी प्रखर शांत चंद्रासारखी. आईसारखी प्रेमळ बायकोसारखी सोबती. स्वप्न पडलेली कधी पोटच्या मुलीसारखी. हृदयाचा मऊ भाग नि ठोस कोणतासा भूतकाळ. विझलेली वात पण उजेडाची खात्री. पडण्याची सवय पण जिंकण्याची इच्छा असणारी. जगात वावरणारी मुक्त पण स्वतःत एक जग जगवणारी. पळतानाचा दम नि सावलीचा आधार. एकटेपणा आणि सोबतीचा हात. माणूस आणि देवी पण. सगळं ती पण काहीच नाही ती. स्वतंत्र स्वप्नांची पण ताब्यात हर एक पुरुषाच्या. अशी ती स्त्री. तिच्यावर प्रेम करताना कोण तिला जाणून घेत ? 
प्रेम होतं. आणि ते बेशक करावं पण ते तिला जाणून करावं. कोण करत अस प्रेम ? तिला जाणून घेताना कित्येक सुरुवातीचा काळ असाच निघून जाईल. त्यात फक्त तिला जाणून घेताना सुरुवातीला ती फक्त एक मुलगी दिसेल, जाणवेल. पण जस जसे तिला जाणून घ्यायला सुरुवात होईल तेव्हा स्त्रीत्वाचा अनुभव येईल. प्रेम फक्त शरीरभर किंवा मनभर करून भागत नाही. त्या दोन प्रेमाने आयुष्य निघेल पण सोबतच्या स्त्रीच प्रेम मागून किंवा मिळवूनच घेता येईल. ज्याची किंमत शून्यच राहील. पण त्या प्रेमाची किंमत जाणून घेण्यासाठी तरी निदान स्त्रीला जाणून घ्यायला हवं. अनोळख्यासारख समजून घेऊन, आपलाच एक हिस्सा बनून आयुष्यभराच्या साथीची वचन देणारी ती वर वर प्रेमात वाटत किंवा दिसत असेल पण तीच ते बोलत वागणं जाणून घेणं ही गरजेचं आहे. मनावर आणि शरीरावर केलेलं प्रेम म्हणजे लांबवर पसरलेला समुद्र बघण्यासारखा आहे.आणि स्त्रीला जाणून घेण त्या समुद्राची पातळी जाणण्यासारखं आहे. समुद्राची लांबी अंदाजे तरी सांगू शकू पण खोली कोण सांगेल ? तिला जाणून घेताना कित्येक नव्या भावना सापडतील. ज्या ऐकीव असतात किंवा काही नव्या असतात.जगात जे जे घडलं ते त्या स्त्रीमुळेच. ती सहज प्रेमात पडते पण ती सहज कुणावर प्रेम करत नाही. पण ती आपल्या प्रेनात  पडली तेव्हा तिला जाणून घेत का कोण ? ती शांत असते तर  तिच्या मासिक पाळीला पुढे करत तिच्याकडे दुर्लक्ष होत पण मासिक पाळी महिन्यातून पाच दिवसच असते. बाकी दिवशी ही तिला कसलासा त्रास होऊ शकतो हे जाणून घेत का कोण ?  तिच्या हसण्याला, तिच्या रुसण्याला, एकट कधी तर बाजूला गप्प बसण्याला जाणून घेत का कोण ? आय लव्ह यु च्या आवाजातला यु म्हणतांना तिच्या घशात येणार तिचा जीव आवाजातून तिच्या जाणून घेत का कोण ? स्त्रीला कुणी जाणून घेत नाही निदान प्रेम करताना तरी तिला जाणून घ्यायला काय हरकत आहे ?
तिला जाणून घेऊन प्रेम केलं तर अर्थातच ते कायमस्वरूपी टिकेल. बाकी कमी दिवसाच्या प्रेमात कित्येक लोक खुश आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या पोस्ट आणि स्टोरीजवर. आणि पांघरुणाच्या अंधारात भिजणारी उशी कधी कोणी पोस्ट केलेली बघितली आहे आहे का ? प्रेमात पडताना ती ला जाणून घ्याव. करणं प्रेम करणारे सगळेच असतात पण त्यांना प्रेम म्हणजे काय विचारलं तर तोंड उघडून कुणी दाखवावं मी माझं नाव बदलेन.
उत्तर देण्याआधी प्रश्न नक्की जाणून घ्यावाच लागतो.

Copyrighted@2020

4 टिप्पण्या