प्रेम आहे पण ..?


विचारांनी तरी किती याव या मनात ? त्याला काही सुमार नाही. त्याला काही वेळ नाही. कित्येक चुकांची झलक येते विचारात आणि त्यांना झाकणारी खोटी खोटी कृत्य अगदी सहज चूक लपवून जातात. कुणाच्यातरी मनाला दुखावून कोण सुखी जगत या जगात ? कुणीच नाही. कुणावर तरी अगदी वेड्यासारखं प्रेम करायचं. त्याच्यावर जीव लावायचा त्याला आपली सवय लावायची आणि वेळ आली कि त्याच्यापासून दूर निघून जायचं. तो त्रासात तडफडत राहणार. तो आपल्या विचारात राहणार. तो आपली आठवण काढणार आणि आपल्याला इथे एक उचकी हि येणार नाही. मग यात आपली चूक कि त्याच्या प्रेमातली खोट समजायची ? त्याने दिलेल्या प्रेमाला मी माझ म्हणायचं कि मी दिलेल्या प्रेमाला विश्वासघात नाव द्यायचं ? त्याला त्याचा आहे कुणी अस समजून त्याला एकट्याला सोडून जायचं आणि आपण आपल नवीन सोबत्या सोबत आयुष्य जगायचं हे कसल प्रेम ? त्याच्या मनाला झालेल्या वेदना काय अशाच कमी होणार का ? नाही. तो त्रासेल. मनातून व्हिवळेल. आणि तो चिंतू लागेल आपल्यासाठी वाईट साईट. मग तो सुख घ्यायला लागेल अशा वाईट विचारांतून आणि आपण काही न काही भोगायला लागू. प्रेम भोगून मग हा त्रास. उगीच पूर्वीचे लेखक लिहायचे नाहीत कि प्रेमात त्रास होतो. प्रेमाने त्रास होतो. हो खरच होतो. खोट्या दुनियेत खर प्रेम करायला गेल तर नाही हो जमत आजकाल. काही न काही खोट निघतेच त्यात. काहीतरी कमी पडत. उरत. राहत. आणि ह्यातल काहीच नाही झाल तर आपलीच मानसिकता बदलते. आणि खऱ्याच प्रेम खोट अगदी क्षणात होउन जात. मग गैरसमज करून घेत घेत एक पक्का समज होऊन जातो. केलेलं प्रेम संपून जात. पुढचा दुसऱ्या प्रेमात अडकून आपल्याला विसरून जातो. आपण हि वेळेसोबत कुणाच्या तरी मिठीत विलीन असतो. न तो आपला स्पर्श त्याच्या अंगावर उरलेला असतो. न तिचे चुंबन आपले ओठ अजून ओले ठेवू शकलेले असतात. सगळ कोरड. आणि प्रेम हि. प्रेम होत. कितीदा हि होत. ते व्हाव हि. पण सुरुवात आणि शेवट सोडून मध्ये जे होत ते व्हाव. पण नेमक तेच आपल्याच्याने होत नाही. मग होते घुसमट. आणि बाकी ? बाकी काय लिहणार. प्रेमाबद्दल लिहाव तितक कमीच. आणि जास्त लिहून पण वाचणार तरी कोण ? सगळेच प्रेमात आहेत.

Copyrighted@2020


0 टिप्पण्या