एक पत्र.


प्रिय,
खूप आठवण येते तुझी. डोळ्यात पाणी येत. श्वास धिमे होतात. हृद्य फक्त बंद पडायचं बाकी राहत. अंग थंड होत जात. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तुला माहित होत. पण समजून नाही घेतलस. सहज जोडलं गेलेलं नात सहज तोडून तू फक्त तुझी आठवण माझ्याकडे विसरून माझ्या आठवणी जाताना कुठेतरी वाटेत सोडून निघून गेलीस. आत्ता मला तुझी आठवण येते पण तुझ्या विचारात मी एक क्षण हि नाही. तुझ्या माझ्यातला स्पर्श मला अजून जाणवतो. तुला का नाही जाणवत ? मला कळत नाही. मी आहे या एका गोष्टीवर तू निश्चिंत आहेस. मला तर तुझ्या झोपेपासून उठेपर्यंतच्या प्रत्येक श्वासाची काळजी लागून राहते. तू घेतलेला श्वास त्याला माझा स्पर्श नाही. तू सहज सोडलेला श्वास माझ्यापर्यंत येत नाही. हि झालेली हालत माझी कोण समजून घेणार. माझ अस फक्त तू होतीस. ती हि आता तू नाहीस. कोण विचारणार मग मला ? काय मिळाल दूर जाऊन ? स्वातंत्र्य ? आनंद ? कि नवीन प्रेम ? जुन्याचा त्याग केल्यावर  नव बरच काही मिळत. पण जुनाट मागे तसच उरत. एका बाजूला. ते संपत नाही. ते संपवता येत नाही. एकमेकांची काळजी कुठेतरी हरवून गेलीय. माझा मोबाईल दिवसभर पूर्ण चार्ज केलेला असतो. तू भर भर चालतेस पण तुला हळू चाल म्हणून कोण म्हणत का ? मी दिवसदिवस जेवलो नाही तरी मला भूक लागत नाही. तू कमी जेवलीस तर शप्पथ घालून कोण जास्तीच खायला सांगत का ? दर महिन्याला शेवटचा आठवडा त्यातला एक दिवस भेटायला पूर्ण तीस दिवस तास मिनिट मोजायचो. तुला हल्ली वेळ कुठे जातो कळत का ? तुझ्याशिवाय मी माझ आयुष्य दोन हजार एकोणीस मधेच अडकून ठेवल. तुझे फोटो बघितले दोन हजार वीसच्या साजऱ्याचे. इतकी खुश आहेस का तू ? माझ्याशिवाय ? माझ्याशिवाय कोण इतक तुझ्यावर प्रेम करत नाही तूच म्हणाली होतीस ना मला? मग माणूस कस जगू शकतो प्रेमाशिवाय ? सांगशील का ,मला ?
मी हसत नाही हल्ली. मी कमी रडत हि नाही. सारखा तुला शोधत असतो. माझ्या विचारात. माझ्या मनात. माझ्या कवितेत. आणि लिहिलेल्या लेखात. तू कुठे सापडत नाही. त्याचा त्रास कमीच होतो पण तू मला शोधत नाही याचा खूप त्रास होतो. काहीच कारण नसलेल्या गोष्टीने हा दुरावा झाला. का झाला मला माहित नाही. तरी त्या माहित नसलेल्या गोष्टीसाठी मी माझ्यात कितीतरी बदल करून घेतला. पण तो बदल हि कामाचा नाही. तुझ्या आठवणीत रोज काही न काही लिहितो. हे माझ प्रेम झाल तुझ्यावरच. आणि तू मला एकदा हि आठवत नाहीस ह्याला मी तुझ काय म्हणाव ? खूप आठवण येते. खूप त्रास होतो. त्रासाचा त्रास नाही पण तू नसल्याचा त्रास कधीक होतो. रोज थोडा थोडा तुटत पूर्ण तूकडा होत चाललोय. आणि तू नवीन स्वप्न बघतेस. देव तुझ्या इच्छा पूर्ण करो. आणि मला इथच थांबवावं त्याने. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो हा निर्णय माझा बरोबर होता. पण तुझ्या माघारी जगतो आहे हा निर्णय जरा चुकीचा वाटतोय. बाकी जशी असशील नीट रहा. कारण काळजी घेणारे खूप असतात. पण,
काळजी करणारा कुणीतरी एकच असतो.
तुझाच.  

Post a Comment

3 Comments

  1. खुपचं सुंदर लिहिलय अजिंक्य.... खरच काळजी करणारा एकच असतो . हे वाक्य खूप आवडलं मला....👌👌😘

    ReplyDelete
  2. खुपचं सुंदर लिहिलय अजिंक्य.... खरच काळजी करणारा एकच असतो . हे वाक्य खूप आवडलं मला....👌👌😘

    ReplyDelete