Another Love


त्या बाईला पहिलं प्रेम झालं. मग दुसर झालं. दुसऱ्यातून फसवणूक झाली म्हणून तिसरं प्रेम झालं. नंतर अशा वरवर प्रेमाची तिला इतकी सवय झाली कि आता तिची कित्येक लफडी बाहेर आहेत. हा समाज तिच्याबद्दल अधून मधून बोलतो पण तिची हि लफडी सगळी नजरेआड करतो. तिच्या प्रेमाचा किंवा तिच्या व्यक्तिगत आयुष्याचा विचार करायला तिला तिचा नवरा आहे. त्यामुळे समाजाला कही गरज वाटत नाही त्या बाईकडे लक्ष द्यायला. नवरा असेल तर काहीही करता येत. नवरा सोडून सगळे त्या गोष्टींकडे डोळेझाक करतात. कायम ड्रेस किंवा साडी नेसणारी अचानक कधी  जीन्स टॉपमध्ये बाहेर आली तरी तिच्या नवऱ्याला चालत ना ? म्हणत समाज तिला नकळत मान्यता देतो. गाडीवरून फिरताना स्टोल न बांधता मेकअप करून त्यावर तिला शोभणारा गॉगल लावला तर लोक तिच्याकडे बघतात आणि परत अरे तीच लग्न झालंय म्हणून तिच्यावरून नजर काढून घेतात. कुठे आसपासच्या दुकानात ती आली तर तिच्यापेक्षा तिच्या नवऱ्याची चौकशी करून आपलेपणा दाखवणारे समाजात खूप आहेत. कारण फक्त एकच. "तिला नवरा आहे".
नवरा असेल तर काहीही करता येत. काहीही करण्याचं स्वातंत्र्य असत. तिच्या नवऱ्याला चालतात त्या सगळ्या गोष्टी समाजमान्य होतात. पण जिचा नवराच नसेल तीच काय ? रस्त्याने चालताना तिला तिच्या जवळचा, ओळखीचा, नात्यातला, ऑफिसमधला, कुणी दिसला-भेटला आणि ती थांबून बोलत राहिली तर लोक तिला आणि त्याला एकाच बेडवर भर दिवसा एकत्र आलेले बघतात. ( विचारात ). तिला तो आवडत नसतो, तीच त्याच्यावर प्रेम नसत. ओळख फक्त निम्मित कधी त्याने तिला मदत केलेली असते ती लक्षात ठेवून तिने वाटेत थांबून त्याला दाखवलेली ओळख हि परतफेडच असते. पण समाजाला तिची हि अशी परतफेड मान्य नाही. तिने गॉगलसोडा पण साधा कधी स्टोल बांधून घराबाहेर ती पडली तर तोंड लपवून कुणाला भेटायला चालली असा विचार करणारा समाज ती घरी येताना स्टोल काढून आली तर उन्हापासून वाचलेला तिचा चेहरा उजळून निघतो तर समाज बोलतो आली वाटत करून. त्यामुळेच उजळलीय. तीच पहिलं प्रेम म्हणजे तिचा नवरा तो मेला कि तिला पुन्हा हक्क नाही. समाजाला ते मान्य नाही. ती कुठे आसपास दुकानात आली तर दुकानदार आपुलकीने तिच्याशी बोलत तिला समजेल अशा नजरेनं तिच्याकडे बघतो. आजूबाजूची लोक तिला त्या वेळात मागून आणि बाजूने बघून तिच्या अंगाच्या मापावरून ठरवतात कि तीच कुणासोबत लफडं आहे कि नाही. आणि आपण पण का मागे राहायचं म्हणून कधी न बोलणारी कित्येक लोक अचानक तिच्या जवळ जाऊन तिची हालहवाल विचारून घेतात. आणि घरचा अंदाज काढून घेतात. कधी कोणत्या बहाण्याने तर कधी कामानिमित्त तीच घराचं दार वाजवलं जात कित्येक पुरुषाकडून. कित्येक स्त्रिया तिला हिणवण्यासाठी मंगळसूत्राचा दिखावा करत राहतात.
ती कुठे काम करून स्वतःचा व्यवसाय करून कसबस कुणाची मदत न घेता घर सांभाळत असते. तुला काय कमी पडत का ? तू मुलांना नीट खायला घालते का ? तुझं घर चालत का ? हे एवढे साधे प्रश्न न विचारणारे समाजातले घटक. तिने पैसे साठवून एखादी वस्तू घरी आणते. त्या मागे पैसे साठवण्यासाठी लागलेले दिवस, घेतलेले कष्ट, केलेली काटकसर, मुलांची मारलेली मन, इच्छा या सगळ्याचा विचार न करता कुणी सहज बोलून जातो, " अरे त्याच्या सोबत फिरते ना ती, त्यानेच दिली असेल घेऊन, हिला आयुष्यात कधी जमलं असत का घ्यायला". तिने केलेलं सगळं तिथेच संपून जात. अशा कित्येक गोष्टी असतात ज्यात तिचा संघर्ष तिचे प्रयत्न सगळं सगळं डोळ्यांआड केलं जात. फक्त तिला नवरा नाही हे बघून. पण तेच एखाद्या बाईने स्वतःचे केस जरी कट केले आणि तिला चांगले दिसले नाही तरी तिला कुणी नाव ठेवत नाही कारण तिला नवरा आहे तिला बघायला. पण विधवा स्त्रीला बघायला नवरा नसतो आणि मग हा अख्खा समाज तिला बघत राहण्याची जबाबदारी घेतो. समाजातले कित्येक असे वाईट रीती नियम माणूस एकमेकांवर लादत राहतो. स्वतःची वेळ आली कि स्वतःला हवं तसच तो वागतो. एक नियम हि धड आपण पाळू शकत नाही अशात ती प्रत्येक विधवा स्त्री या समाजाचे वाईट सगळे नियम रोज पाळत असते पण तीच कौतुक कुणालाच नसत. धंदा करणाऱ्या बायकांना पैसे देऊन समागमाची मागणी करताना आपला पैसा जातो म्हणून माणसाला त्यांच्या बद्दल पण आपुलकी असते पण विधवा स्त्री म्हणजे फुकटची सत्ता समजून तिच्या मागावर चालत, गाडीवर, कधी टेरेसवरून कधी खिडकी बाल्कनीतून नजर ठेवून असणारे पुरुष, नवरा नाही माहित असून हि आपल्या नवऱ्याचं कौतुक तिच्यापुढे गाणाऱ्या स्त्रिया, आपल्या वयाच्या मुली सोडून अशा विधवा स्त्रियांना प्रेमाची स्वप्न दाखवून तिला फसवणारी तरुण मुलं कधीच समजू शकणार नाहीत तीच दुःख. माणूस म्हणून जगताना स्त्री,आणि पुरुष अस प्रत्येकाला जगता येत. पण विधवा बनून जगता येईल का कुणाला ? ( निदान विचारात तरी ).

copyrighted@2020

0 टिप्पण्या