Sushant are you here?


जेव्हा खोलीच दार उघडल गेल, बेडवर शांत झोपलेला सुशांत होता. पोलीस आणि सहकारी आत शिरले. नुकताच एक व्हिडीओ प्रसिध्द झाला आहे. जो त्या खोलीतला आहे. जो तिथ उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. कपाटाचे दार उघडे दिसत आहे आणि पंख्याला बांधलेला हिरवा कपडा दिसत आहे. साधा विचार केला तर, सुशांत जर बेडवर गुडघ्यावर बसला तरी त्याच्या छातीपर्यंत तो कपडा येईल. इतक्या खालून गळफास घेतल्यास जीव जाण अशक्यच...!

तरी बाहेर बातमी पसरली गळफास घेऊन सुशांत सिंगची आत्महत्या. न पटणारी गोष्ट आहे. एखाद्या लहान शाळा शिकणाऱ्या मुलाला जरी तिथे गळफास दिला असता तरी त्याचा जीव गेला नसता कारण बेड आणि कापड यातल अंतर जीव न घेणार आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत. त्याच व्हिडीओच्या व्हायरल झाल्यानंतर काहींना ती व्हिडीओ झूम करून बघितल्यावर सुशांतच्या डाव्या हाताची बोट हलताना ( मुठ उघडताना ) दिसली. मी स्वतः ती व्हिडीओ डाउनलोड करून बघितली. ब्लर व्हिडीओ आहे ती. आणि सुशांतच्या खोलीत जेव्हा पोलीस गेले. तेव्हा त्यांनी अंदाज घेऊन सुशांतचे काही फोटो काढून घेतले. आणि त्या नंतर त्याच्या अंगावर पांढरे पांघरून टाकले. आणि त्याचा निम्मा मृतदेह झाकला. ते पांघरून हातावर आल्यामुळे डाव्या हाताच्या मुठीवर अंधार आहे, पण तरी त्यात मुठीची हालचाल दिसते. आणि कित्येक लोकांनी असा अंदाज बांधला कि सुशांत तेव्हा जिवंत होता. पण त्याच्या हृदयाचे ठोके न तपासता किंवा त्याला दवाखान्यात घेऊन न जातात त्याला मृत घोषित केल गेल. त्या व्हिडीओमध्ये डॉक्टरांसारखे काही लोक हि दिसत होते. व्हिडीओ काही वेळाने घेतली गेलेली असली तरी अर्थातच त्या लोकांनी आधी सुशांतला गळफासावरून उतरवून आधी तपासलं असाव.

आपल्या धर्मात लोकांना अग्नी दिली जाते. बाकी बहुतांश धर्मात दफन केल जात. मी बऱ्याच दफनविधीच्या व्हिडीओ बघितल्या आणि काही व्हिडीओ मला अशा दिसल्या कि त्यात त्या शव पेटीतल्या मृतदेहाने हालचाल केली आहे. काही मृतदेह हात हलवताना, डोळे उघडताना, जीभ बाहेर काढताना, छातीवरून हात बाजूला ठेवताना, श्वास घेऊन तोंडातून बाहेर सोडताना बघितल आहे. त्यामागच कारण जाणलं आणि समजल कि, माणूस मृत झाल्यावर त्याच्या शरीराच्या पेशी ज्या हृदयावर अवलंबून असतात. त्या हृदयाच काम थांबल्यावर त्या पेशी आहे त्या स्थिती जखडून जातात. जेव्हा बाहेरील हवा तोंडावाटे किंवा नाकावाटे आत प्रवेश करते, तेव्हा त्या पेशी मोकळ्या होतात. आणि त्या मोकळ्या झाल्याने त्या अवयवाची हालचाल होते.

सुशांतचा खून झाला असेल तर त्याने त्या वेळेस विरोध केला असेल आणि त्यामुळे हाताच्या त्या पेशी तसाच जखडल्या असतील. गळफास घेतल्यावर जीभ दातात अडकते. डोळे पूर्ण बंद असतात. पाय ताठ झालेले असतात. उलट, सुशांतचे डोळे अर्धवट उघडे होते. तोंड उघडे होते. वरच्या आणि खालच्या दातात हि अंतर होत. पाय पूर्ण सैल पडलेले होते.

सुशांतच्या खोलीतला तो हिरवा कपडा बिन कामाचा आहे. अर्थातच कुणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला असावा, प्लंचिट करून काही लोकांनी सुशांतला काही प्रश्न केले. ज्याची उत्तरे त्यांनी दिली. आता ती खरी किंवा खोटी यावर बरेच प्रश्न आहेत. आणि या सर्व व्हिडीओ युट्युब माध्यमावर आहेत. लोकांचा या अंधश्रद्धेवर विश्वास नाही. पण जर विश्वास नसेल तर अशा गोष्टींसाठी संशोधकांनी शोध लावून यंत्रे-उपकरणे का बनवली ? हा हि एक प्रश्नच आहे. विज्ञान दैवी अवताराला मानत नाही. पण दैवी शक्ती मानते. तसच भूत प्रेत या गोष्टीना विज्ञान कोणता हि आधार देत नाही पण अशी कोणतीतरी शक्ती असते. यावर विज्ञान संशोधन करत आहे. आणि हे संशोधन करताना अंधश्रद्धेचा, मंत्र-तंत्र यांचा आधार न घेता यंत्राचा उपकरणांचा वापर ते करतात.

या अशा उपकरणांना वापरून सुशांतचा आत्मा बोलावल्याचा दावा काही लोकांनी केला. आणि त्याबाबत काही व्हिडीओ युट्युबवर प्रसिध्द केल्या आहेत. ज्यात सुशांतला काही प्रश्न विचारले आहेत. आणि त्याची उत्तरे काही सांकेतिक शब्दांद्वारे, आवाजाद्वारे दिली गेली आहेत. काहींच्या व्हिडीओत तर सुशांतचा स्पष्ट आवाज येत आहे.

हे खर कि खोट किंवा कोणती ऑडीओ ट्रिक आहे, हे न समजण्यापलीकडचे आहे. पण मी स्वतः प्लंचिट केले आहे आणि त्याच्या अनुभवावरून सांगतो कि, भूत येत कि नाही हा मुद्दा नाही. पण काही शक्ती तिथे जागृत असते जी आपल्या प्रश्नांची उत्तरे देतात. आणि ती खरी असतात.

मी प्लंचिट केले होते. तेव्हा एका व्यक्तीस मी बोलावले होते. आणि त्यावेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चार वर्षानंतर वेळेसोबत खरी होताना जाणवत आहेत. जेव्हा प्लंचिट सुरु होत. घरातल वातावरण काहीच क्षणात बदललं होत. श्वास घेण्यास त्रास होत होता. घरात डीम लाईट लावलेली. ( जास्त प्रकाश चालत नाही म्हणून ). पण त्या लाईट मध्ये हि स्पष्ट दिसत होत. पण जेव्हा प्लंचिट सुरु झाल तेव्हा डोळ्यापुढे अंधारलेल. हातातली वाटी आपोआप उत्तरांकडे जात होती. मेणबत्तीवर कुणीतरी श्वास घेऊन सोडावेत अशी मेणबत्तीची ज्योत फडफडत होती. आणि भविष्यातल्या प्रश्नांना मिळालेली उत्तर आत्ता सत्य होत आहेत.

मी अंधश्रद्धा मानत नाही. पण माझ्या आयुष्यातला अनुभव इथे दिला आहे. व्हिडीओतील सुशांतच्या उत्तरांना जर ऐकल तर तो सुशांतच असल्याच जाणवत. त्याची उत्तर खरी वाटतात. पण आपल्या आणि जगातल्या कोणत्याच देशात अशा प्रकारे उत्तर मिळवून निकाल दिला जात नाही. पण सुशांतच्या आत्म्यास बोलावून त्याकडून घेतलेली सगळी उत्तरे ऐकून मन विचलित झाल आहे. आणि अस वाटत सुशांत इथेच कुठे तरी आहे. जो जो त्याचा विचार करतोय त्याच्या जवळ. कारण त्याच्या फैनमध्येच त्याचा जीव होता. आता वाट बघायची कि पोलीस काय पुढे विषय आणतात.

आत्म्यास शांती लाभो. सुशांतसिंग रजपूत !  


copyrighted@2020


0 टिप्पण्या