फक्त ‘एक क्षण'

 

प्रिय, xxx

तू विचारलं असत तर मी किती जगलो असतो ? फक्त ‘एक क्षण’. एक क्षण तुझ्या मिठीत येऊन बाकीच सगळ आयुष्य तुझ्या हवाली केल असत. कित्येक स्वप्न माझी मी बघितलेली, त्यांना पूर्ण करण्यासाठी किती केलेल्या खटापटी, त्यासाठी घालवलेले कित्येक दिवस आणि वर्ष मागे सोडून फक्त तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून जगायला सुरुवात केली असती, तुला साथ देऊन. मी काही काय कित्येक चुका केल्या असतील माझ्या आयुष्यात, ज्या प्रत्येक माणसाकडून होतात. तुझ्याकडून हि झाल्या असतील. त्या सगळ्या चुका मी तुला एकदा हि न विचारता तुला माफ केल असत. माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या व्यक्तींना मी विसरून आणि तुझ्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींशी तुझा संबंध असेल तो विसरून तुझ माझ नात एवढाच विचार केला असता. माझ्या एकट्या आईला आधार देऊन तुझ्या आई बाबांना माझ्या आई वडिलांसारखच मानून त्यांचा आदर केला असता.

मी लिहिलेल्या आधीच्या आठ हजार कविता सगळ्या जाळून नव्याने फक्त तुझ्यासाठी सोळा हजार कविता लिहिल्या असत्या. प्रत्येक गोष्टीत तुझ नाव माझ्या सोबतीने लिहून लोकांना तुझ नाव सांगितल असत. लोक टाकत असतात त्यांच्या साथीदारासोबत त्यांचे फोटो, मी हि टाकले असते आपले फोटो फेसबुकवर. तुला बुलेट आवडते, मला हि आवडते. लगेच नाही पण लवकरच घेतली असती ती. तुला सातारा आवडतो आणि मला तू. मी साताऱ्यात राहतो आणि तू पुण्याला. पण माझ्या मनात तुला जागा दिलीच असती. पाऊस इकडे खूप पडतो. माझ्या घराच्या बाल्कनीतून कास रोडवरचे बारा धबधबे दिसतात मला रोज. तुला हि ते बघायला मिळाले असते. तू ते बघितले असते. आणि मी तुला बघितल असत.

तू अगदी फिट आहेस. आजारी पडत नाहीस, पण महिन्यातून चार दिवस तुला खूप त्रास होतो. तेव्हा खूप काळजी घेऊन तुझा तो त्रास सगळा हरवून टाकला असता. जादुगार नाही मी पण प्रेम सुध्दा जादुपेक्षा कमी नाही. केली असती जादू प्रेमाची आणि तुझा तो चार दिवसाचा त्रास हि गायब झाला असता.

तुला अंधाराची भीती वाटत नाही. अस म्हणतेस, पण आहे भीती तुला. रात्री घरात उजेड ठेवून तुझ्या दिमतीला जागून तुला झोपवल असत. सकाळी उठल्यावर तूला सकाळचा चहा ते रात्रीच्या कॉफीपर्यंत सगळ तुझ्या हातात आणून देऊन खुश केल असत. आणि हे फक्त काही दिवस नाही आयुष्यभराच सांगतोय हे मी. जगात कुणी कुणावर करत नाही इतक मी तुझ्यावर प्रेम करायचो. पण.....

तू दूर निघून गेलीस माझ काहीच न ऐकूण घेता. आता एक एक क्षण माझा जाता जात नाही. आणि तुझे पूर्ण दिवस कसे जातात ते मी बघतो ना, स्टेट्स तुझे बघून. तुझा हसरा चेहरा त्यात असतो आणि तुला बघताना माझे ओले डोळे. जुळत नाही ग हे कॉम्बीनेशन. असो,

तुझी खूप आठवण येते पण...

 

तुझाच......   


Copyrighted@2020

No comments:

Post a comment

Featured Post

एक होत प्रेम !

  मला तू आवडायचीस. तुला मी आवडायचो. आवड मग सवय झाली. सवयी कधी सुटतात का लवकर ? तेच झालं. सुरुवातीला थोडं थोडक चॅटिंग नंतर कॉल आणि कित्येक सा...

WARNING!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

Name*


Message*


  • Phone+91 7558356426
  • Address302, gurupushp apartment, medha kondve road, sartara, maharashtra. (india)
  • Emailajinkyaarunbhosale8@gmail.com