तो गणपती मी आणि ती.

( image by me )

गणपती बसले कि प्रेम पण आमच वेगळच होत. म्हणजे वर्षभर लपून छपून केलेलं प्रेम पूर्ण अस नाही पण थोडफार तरी बिनधास्त होत. इतरवेळी तिला तिची आई बाहेर सोडत नाही. पण तिला कारणच मिळत मी जाते गणपती बघायला इथले जवळचे. आता जवळ गणपती ते असे किती ? अगदी चार ते पाच. पण आई हि तिची तिला परवानगी देते. ती बाहेर पडते. मी हि माझ्या आईला सांगतो मी आलोच जाऊन मित्राकडे. मुलगा असल्याचा फायदा असतो आई जास्त काही विचारत नाही आणि वडिलांजवळ जायचा संबंध नाही कारण मला वडील नाहीत. आणि तिला पण नाही. मग काय वडील पण माझी आईच मला. आणि तीच हि तेच.

ती येते. एका गणपतीच्या मंडळापाशी थांबते. मला बघून लांबूनच हासते. तिने तोंडाला स्टोल बांधला आहे. दिसतायत फक्त मला तिचे डोळे. पण तरी मी तिला खूप ओळखतो. ती हासते आणि डोळ्यात चमक दिसते त्यावरून मला समजत. आम्ही मग थोड अंतर ठेवून चालत राहतो रस्त्याने. गणपती बघतो. माझ्या मोबाईलमध्ये मी फोटो काढतो तिला मी ते फोटो तिच्या मोबाईलमध्ये पाठवतो. ती खुश होते. ते फोटो ती तिच्यानावाने पोस्ट करते. असो.
रस्ता पार करताना नकळत इकड तिकड बघून ती माझ्या डाव्या हाताची दोन तीन बोट धरते. आता कुणी बघितल तर तिला ओळखणार कोण आहे ? ओळखल तर मलाच ओळखणार आहेत. पण वेडीच्या लक्षात येत नाही. मी पण मग चान्स मारून तिन पकडलेल्या माझ्या दोन तीन बोटांना तिच्या हातात गुंतवून तिचा पूर्ण तळहात माझ्या तळहातात पकडतो आणि आम्ही रस्ता पार करतो. असच मग गणपती दोन चारच बघतो. पण जिथे वर्दळ कमी आहे तिथून जास्त फिरतो. खूप बोलतो आम्ही. खूप काही सांगते ती मला.
मला पण तीच ऐकू वाटत. पण वेळ जात असतो. आणि आता ती म्हणते मी जाते. पण मग जाता जाता तिला आठवत तिला एका गणपतीला जायचं होत. ती मला तिथ घेऊन जाते. मी आपल कसा तरी पाया पडतो आणि माग होतो. ती अगदी खाली वाकून गणपतीच्या पायाला डोक टेकवून स्वतःला हळद-कुंकू लावून घेते. आणि माझ्याजवळ येते आणि मला पुन्हा निट जाऊन नमस्कार करायला सांगते. “लहानपणी हट्ट करून ती वडिलांना तिच्या इथे घेऊन यायची या गणपतीला. ते गेले त्या नंतर ती एकटी यायला लागली. आणि आज ती मला घेऊन आली. हट्टाने.” खुप भारी वाटल मला इतक तिने महत्व दिल मला म्हणून. आम्ही निघालो. तिने रिक्षा थांबवली. त्यात आम्ही बसलो. मी आरशात बघून पुढे भांग पाडत होतो. तिने मग हळूच माझ्या गालावर तिचे ओठ टेकवले. पण वेडी त्यात पण लाजत होती. रिक्षावाला मागे बघेल कि काय म्हणून स्टोल बांधलेल्या स्थितीच तिने ओठ टेकवले माझ्या गालावर. काही का असेना. पण गणपती मुळे प्रेमाचा हा क्षण मला जगता आला...

0 टिप्पण्या