गणपतीतला देखावा आणि तुझा दिखावा.दरवर्षी सारख मी आज हि गणपतीतला देखावा बघायला गेलो. पहिला देखावा होता तो चित्र-मुर्त्यांचा तो बघून झाला पंधरा मिनिट एवढाच वेळ होता. तिथून पुढे वाट काढत-काढत अंधारातून मग कधी प्रकाशाच्या उजेडातून चालत-अडखळत मी एका मंडळापाशी पोचलो. जरा नीट जागा बघून उभ राहणार तोच लाईट गेली. आणि पुढे स्टेजवर एक लाईट सुरु झाली. आणि जिवंत देखावा सुरु झाला. मी देखावा बघत होतो पण पुढ उभ्या लोकांमुळे एकदा उजवीकडून एकदा डावीकडून अस तोंड फिरवून बघाव लागत होत. त्यामुळे बघताना काही नीट दिसत नव्हत मला. आवाज मात्र सुस्पष्ट ऐकू येत होता त्यावरून पुढे काय चालल असेल याचा मी अंदाज लावत होतो. तेवढ्यात मागून बारा-तेरा लोक आले आणि ढकला-ढकलीत मी पण त्यांच्यासोबत बाजूला ढकललो गेलो.
माझी जागा गेली नसेल या विचाराने मी परत माझ्या जागेवर पटकन गेलो तर तिथ आता दोन मुली उभ्या होत्या. आता त्यांना कस म्हणायचं हि माझी जागा आहे बाजूला व्हा. मी तसाच थांबलो बाजूला. त्यांना पण दिसत नव्हत. पण तरी दिसतय त्यात समाधान मानून उभ्या होत्या. स्टेजवर अजून पात्र वाढली सोबत लाईट पण वाढली. आणि त्या प्रकाशात मी त्या मुलीला बघितल. आणि त्याच वेळेला तिने माझ्याकडे बघितल. मी माझी नजर तिच्यावरून लगेच पुढे स्टेजवर वळवली.
तिने पण लगेच पुढे लक्ष नेल. पण अस आतून वाटत ना कि ती आपल्याकडेच बघत असेल वैगरे. ती पुढे बघत होती पण उजेड आणि सावलीच्या त्या खेळात मला डोळ्यांना अस जाणवत होत ती माझ्याकडे बघतीय. मी तीन-चार मिनिट वाट बघितली. छातीत धडधड वाढत होत. आणि मी मनाची तयारी करून बघितल तिच्याकडे तर ती पुढे बघत होती. मग माझ मलाच वाईट वाटल. ते तिच्या तोंडावर सावली पडली होती म्हणून मला अस वाटत होत ती माझ्याकडे एकटक बघत आहे. शीटट...! पोपट झाला माझा.
देखावा संपला. तिथून मी पुढच्या गणपती मंडळाकडे वळलो. तिथ उजेड होता खूप. तिथ देखावा सुरु झाला. लाईट घालवली आणि पुन्हा सुरु झाली. लोकांची ढकला-ढकली चालू होतीच. कोण जात होत, कोण येत होत, कोण मधेच काहीतरी विसरल्यासारख चालता-चालता मध्येच थांबून देखावा बघायला थांबत होते आणि मागून जोरात मला धक्का दिला. मी माग वळून बघितल एक बाई तिच्या छोट्याश्या मुलीला घेऊन उभी होती. तिला मागच्या तीन मुलांनी धक्का दिला होता. आणि मुलीला कडेवर घेतलेली ती बाई माझ्या पाठीवर धडकली. नीच असतात लोक गर्दीचा आणि अंधाराचा फायदा घेतात आणि असा न तसा स्त्रियांना हात लावण्याचा बहाणा करतात.
ती बाई माझ्याकडे बघायला लागली. मी त्यांना म्हणालो तुम्ही पुढे व्हा. मी त्यांच्या मागे थांबलो. मागची मुल दुसरीकडे निघून गेली. मी बघत बसलो मग देखावा. ती छोटीशी मुलगी किमान एक वर्षाची असेल ती मला बघून हसत होती. मी तिच्याशी खेळत असताना मागून मला धक्का बसला मी त्या पुढच्या बाईच्या अंगावर जाणार होतो पण सावरल. मागून आवाज आला “सॉरी”.
पुन्हा एक धक्का बसला. आणि माझ्या खांद्यावर हात होते दोन. मला आता राग आला माग बघितल तर तीच मुलगी जी तिथ होती. त्या देखाव्यापाशी. मगाशी नीट दिसली नव्हती ती पण आत्ता प्रकाशात दिसली. पुढचा स्टेजवरचा देखावा विसरायला झाल मला आणि तिचा ह्या सौंदर्याचा दिखावा बघून माझ्या मनात काहीतरी झाल. ती पूर्ण वेळ मागे होती. पण मी पुन्हा तिला वळून माग बघू शकलो नाही. देखावा संपला. मी पटकन माग बघितल ती नव्हती. मी खूप शोधलं कुठेच दिसली नाही. आता चार वर्ष झाले. मी कायम बघतो देखावे त्याच त्याच मंडळांच्या गणपतींचे. पण आजतागायत ती मला दिसली नाही. पण आज हि गर्दीत तिला माझे डोळे अजाणतेपणाने शोधत राहतात. आणि ती मुद्दामहून मला दिसत नाही. पण तिची आठवण येत असते मला. दर गणपतीला देखावा बघताना.


    

2 टिप्पण्या