मांडलेली लोक | pablo picasso


उन्हाळ्यात तसे रोग, संसर्ग हे कमी होत जातात पण ज्या गोष्टी होणारच असतात त्याला आपण काय करू शकत नाही. माझी इव्हा. तिच्यावर माझ खूप जास्त प्रेम होत. तिच्या प्रेमाखातर मी माझ्यात बदल करून घेण्याचा बराच असफल प्रयत्न केला. पण माझ्या या असफल प्रयत्न करण्यात हि तिला एक समाधान मिळायचं जे तिच्या चेहऱ्यावर कालपर्यंत दिसत होत. मागच्या पावसाळ्यात एक संसर्ग तिच्या गोऱ्या अंगाला लागला. जो तिने माझ्यापसुन लपवून ठेवला. मी तिच्यासोबत शारीरिक संबंध पण ठेवलेत. मला काही झाल नाही. अजून हि नाही. पण या उन्हाळ्यात जेव्हा तिचा त्रास वाढला तेव्हा मला समजल. मग तिला घेऊन मी काही दवाखान्यात गेलो. तिथे चाचण्या तपासण्या करून औषधोपचार बदलत तिच्यासाठी वातावरणात बदल करून मी तिची जमेल तितकी काळजी घ्यायची ठरवली. प्रेम केल तर त्याला निभवण हेच खर प्रेम असत.

पण मला जुलैपासून जाणवायला लागल कि ती बरी होणार नाही. आणि तिचा वाढणारा संसर्ग मला हि लागणार होता आणि माझ्यातला स्वार्थी माणूस जागा झाला. दिवस दिवस मी तिच्या जवळ बसणारा मी आता दिवसभर माझ काम करून रात्री तिच्या जवळ असायचो. तिच्या गोड चेहऱ्यावर कडवट मृत्यूच्या सुरकुत्या तिला कुरूप बनवत चाललेल्या. प्रेमात सौंदर्य नाही मन महत्वाच असत. आणि मी तिच्या मनासाठी तिथे रोज जात होतो. तिच्या मनात मरणाची भीती नव्हती दिसत. कारण तिला समजतच नव्हत कि ती मरणार होती. ती अजून हि ह्याच विचारात होती कि ती बरी होईल आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊन आमचा संसार थाटू. आणि तिच्या या विचाराने मला त्रास व्हायला लागला. आता संध्याकाळी वेळ काढून मी तिला जाणारा पिकासो आता वेळ मिळाला तरच तिच्या इथे जायला लागलो. आधी प्रेमाला मिळवण्यासाठी आसुसलेल मन जेव्हा आपल प्रेम हरत आहे आपल्याला सोडून जात आहे या पक्क्या विचारावर उतरत तेव्हा वाटत यातून सुटका व्हावी आपली आणि त्या व्यक्तीची हि. पण तरी हा विचार मनातून येऊन गेला कि तिच्यासोबतचे गाव भर फिरलेले दिवस आठवत राहतात. तिच्या सोबतच्या रात्रीचे अंधार डोळ्यापुढे अंधारी करून जातात. मग अस वाटत खऱ्या प्रेमाच आयुष्य माणसाइतक का नसत ?
तिचा त्रास ऑक्टोंबरनंतर वाढत गेला. तिच्या मांडीवर डोक ठेवून कित्येकदा मला गाढ झोप लागलीय पण आता तिच्या उशाशी बसून तिचे धिमे श्वास सुरु आहेत कि नाही हे बघण आता मला अशक्य झालेलं. तिच्या श्वासाच्या नादात मला मोकळा श्वास घेण मुश्कील झालेलं. तिचे वाचण्याचे अंदाज डॉक्टर बांधत होते पण तिला त्रास होण्यापेक्षा तिने मराव अस मला वाटत होत. कारण तिला सुख मिळाव इतकीच माझी इच्छा होती. माझ्यासारख्या वेड्या माणसासोबत ती आनंदात कधी जगली नसती कारण तिच्या आनंदाच्या वाख्या माझ्यासाठी वेडेपणा होता. आणि माझा विक्षिप्त-वेडेपणा हाच माझा मोठा आनंद आहे.  माझ्यासाठी तिने बदलाव अस मला वाटत नाही. जे आहे जस आहे त्यात ज्याला सुखात जगता येत तेच नात खऱ्या प्रेमाच असत. आणि माझ्या मनात असलेल तिच्याबद्दलच खर प्रेम खोट्यात बदलायचं नव्हत मला. ओल्गाशी माझी ओळख झाली होती. ती माझ्याशी सलगीने राहत होती. इव्हाची जागा ती भरून काढणार होती. पण शेवटी केलेलं प्रेम मरण पावणार ह्या विचारांनी मी अर्धमेला झालेलो. या अशा सगळ्यात माझ काम सुरूच होत. पण त्यात जीव ओतला जात नव्हता. सतत इव्हाचा विचार करून मला आता त्रास व्हायला लागलेला. यातून देवाने मला सोडव इतकच वाटत होत. आणि परवा १५ डिसेंबर सकाळी इव्हा मेली. मला वाटल होत मोकळा श्वास मिळेल मला. आणि तिला देवाघरी आनंद मिळेल पण ती त्रासात मेली. आणि मी तिच्या आठवणीत स्वतःला त्रास करून घेतोय.
खर प्रेम ज्याला करता येत तोच खरा माणूस. नाहीतर चित्रकारापुढे मांडलेल्या वस्तूसारख या दुनियेत खोटी लोक मांडलेली आहेत त्या देवाने असच मला वाटत.
      

महान स्पानिश चित्रकार पाब्लो पिकासो. copyrighted@2020    


0 टिप्पण्या