विधवा रोमान्स


स्वतःला ती आरशात बघते. आधी होती तशीच आत्ता हि ती दिसतेय. केसांची ठेवण बदलली आहे बस, बाकी डोळ्यांपासून पायाच्या नखांना लावलेल्या नेल-पेंटचा कलर हि तोच आहे. सगळ आधीच आहे. आठवणीसुध्दा. आवरून बसायचं. सगळे आपापल्या कामाला, शाळेला बाहेर गेले कि घर रिकाम होत अकरा वाजता. मग बंद दरवाजाच्या आत बघायला कुणी नसत. मधे-मधे येऊन मनातल्या इच्छेला कुणी छेडत नाही. मनात आल कि सुरुवात करायची आणि करून कंटाळा येईल तेव्हा थांबायचं. आणि हे अस रोज करायचं. कोण बर करत अस रोज-रोज ?
आयुष्यात रोमान्स असावा पण कधीतरी, रोज-रोज करायला कुणाला जमत ? आणि केला तरी जीव जाईल एखाद्याचा महिन्याभरात. पण तरी दोघांना इच्छा होत असते. दोघांना हि रोज हा असा अकरा नंतर घरात कुणी नसल्याचा फायदा घ्यायला आवडतो. आपलच घर असत पण तरी हे असच चोरून-चोरून केलेला खेळ नेहमीचाच. स्पर्श त्याचा तोच आहे जो रोज असतो. केसांना तिच्या वास तोच आहे जो रोज येत असतो. तिच्या छातीचा आकार हि आता वाढायचा थांबलाय. तो तेवढाच आहे. त्याच्या ओठांवरची केस ही तेवढीच आहेत. तिच्या स्पर्शात मऊपणा आहे. त्याच्या दाढीची केस टोचतात तिला तरी तो दाढी कमी करत नाही. आणि तिला पण बिना-दाढीचा तो आवडत नाही. आज पण दोघ घरी होते. दार बंद झाल. ती आरशासमोर येऊन केसांना सावरत होती. तो सोफ्यावर बसून तिला बघत होता. त्याला उठून लगेच तिच्या मागे जायचं होत. पण तो तिच्या इशाऱ्याची वाट बघत होता. तिने एक नजर टाकली, आणि तो पापणी मिटून तिची उघडेपर्यंत तिला मागून घट्ट पकडून उभा झाला.
मग तिने डोळे उघडलेच नाहीत. त्याने तिच्या मानेपासून सुरुवात करून तिला स्वतःकडे फिरवून ओठांपर्यंत ओठांनी ओल करत तिला आणखी जवळ केल. तिला अंगातून त्राण गेल्यासारखं झालेलं. त्याला कुठून तरी दहा हत्तींच बळ आलेल. ती त्याच्याजवळ जायच्या प्रयत्नात होती. आणि तो तिला कुठे तरी लांब न्यायच्या विचारात होता. या जगातून दूर गेलेले ते दोघ, या जगातल्या बंद खोलीतल्या या दोन शरीरात तात्पुरते रहायला आल्यासारखे अनोळखी होऊन एकमेकांशी ओळख करून घ्यायला लागले. त्याने थांबण्याचा प्रयत्न केला आणि तिने सुरुवात केली. त्याच्या दंडापासून दाढीवरून मिशी खालच्या ओठांपर्यंत न थांबता ओठांनी त्याला ओल करून टाकल. बाहेर ऊन पडलेलं. अंग घामजलेल पण तरी घसे दोघांचे कोरडे पडलेले. जिभेने जिभेला भिजवत डोळ्यांपुढे अंधारी करत दिवसाची रात्र केली त्यांनी. इतक्या सहज दिवसाची रात्र तर निसर्गाला पण करता येत नाही. डोळे उघडल्यावर जेव्हा उजेड पडला डोळ्यांवर, तिने त्याला पाठ दाखवली. त्याने पुन्हा मागून तिला मिठीत घेतल. तिच्या मोकळ्या कपाळावर त्याने तसच तिला मिठीत घेऊन तिच्या हातातल्या डबीतून सिंदूर बोटाच्या चिमटीत घेऊन पुढे आरशात बघून तिच कपाळ लाल केल. त्याने तिच्या कानाला ओठात पकडल. आणि तिला कसस झाल. हातातून पुन्हा त्राण गेला. हातातली डबी खाली पडली. तिने पटकन डोळे उघडले. नवऱ्याची बहिण येऊन तिने तिथली सिंदूर डबी उचलून नेली. जाताना बोलली सुध्दा, मला न विचारता आणत जाऊ नकोस इकडे हि डबी. ते काय कुंकू आहे का ? सिंदूर आहे. कुंकू कुणाला पण चालत सिंदूर नाही चालत. ती तिथून चालती झाली. आणि ही नवऱ्याच्या आठवणीत पुन्हा जुन्या दिवसात चालती झाली.         
  
लेख लेखकाधिन  आहे.copyrighted@2020 

0 टिप्पण्या