फुटका तलाव ती आणि मी
येणार होतीस पण आली नाहीस. तरीपण मी वाट बघत बसलो. एक-दोन-तीन आणि खूप तास पण तरी आली नाहीस. मग मीच स्वतःला समजावलं. अस वाटल आत्ता येशील मग येशील पण येणारच नाहीस अस कधी वाटल नव्हत. पण नेमक तेच झाल. त्या नंतर मग कधी मी चांगला विचार केला नाही. म्हंटल आपण चांगला विचार केला कि देव उलटच वाईट करतो मग मी वाईट इच्छा नसताना हि विचार करायला लागलो. आणि तेव्हा पण वाईटच व्हायला लागल. अस कस बर ? मला काय समजतच नाही. म्हणजे माझ्याच बाबतीत का अस ?
मी प्रेम करतो तुझ्यावर खर मनापासून. मग अस का ? उत्तर तो देव देऊ शकत नाही आणि तू येऊन सांगू पण शकत नाहीस. आज एक वर्ष झाल आपल्याला भेटून. मी तारीख लक्षात ठेवलीय. आजच्याच दिवशी संध्याकाळी साडे सात वाजता मला तू फुटका तलावापाशी दिसली होतीस. गणपतीला तू नमस्कार करून उभी होतीस. मी कधी जात नाही देवा जवळ पण तेव्हा गेलो. तुझ्या पाठोपाठ गणपतीला प्रदिक्षणा घातली. त्या तळ्यातले मासे बघण्याच्या बहाण्याने आणि तुला समजू नये मी तुझ्यासाठी तिथ थांबलोय म्हणून मी खाली वाकून बघत बसलो. त्या माश्यांच्या नादात तू कधी निघून गेलीस कळालच नाही. मला वाटल तीन प्रदिक्षणा घालशील म्हणून मी दोन फेऱ्या मारून मासे बघत बसलो आणि तू एकच फेरी मारून निघून गेलीस. मी पळत बाहेर देवळाबाहेर आलो.
चप्पल घातली आणि रस्त्यावर आलो. 

मोठा रस्ता होता एक. प्रेमाची सुरुवात झालीच होती कि देवाने माझी परीक्षा सुरु घेतली. एक मोठा रस्ता त्यात छोटे रस्ते. एक जातो वर समर्थ मंदिर. एक जातो तोफखाने क्लास. एक जातो सोमवार पेठेत. एक जातो शनिवार पेठेत. एक गुरुवार बागेकडे. एक राजमाचीला. आता मला सांग मला लिहिताना आणि हा लेख वाचणाऱ्याला कंटाळा येईल इतके रस्ते तिथून जातात त्यातल्या तू कोणत्या रस्त्याने गेलीस मला समजलच नाही. मी प्रत्येक रस्त्यावर गेलो निम्म अंतर कापून माघारी फिरत होतो. 
या सगळ्यात अर्धातास गेला. गाडी नव्हती. मला चालवता येत नव्हती. जे काय ते चालत फिरायच. मी मग स्वतःवरच चिडलो. का तिकड कधी न बघितल्यासारख मासे बघत बसलो म्हणून स्वतःला कोसत राहिलो. 
तू आठवत राहिलीस. घरी येई पर्यंत. रस्त्याने तुला आठवत आठवत तुला विसरून गेलो मी. म्हणजे तुझा चेहरा अस्पष्ट झाला डोळ्यासमोरून. मी आता घाबरायला लागलो. तुला बघून झालेली छातीतली धडधड पहिल्यांदाच मला अस झालेलं. म्हणून तो अनुभव आणि तू तुम्हा दोघांना मला हरवायचं नव्हत. मी घरी आलो. जेवणार नव्हतोच पण चालून चालून पायाची वाट लागलेली. मग जेवलो आणि झोपलो. सकाळी उठून परत तिथ देवाला फुटका तलावपाशी गेलो तू नव्हती. रोज संध्याकाळी तुला तिथ बघायला यायचो. अस मी आठ-नऊ महिने केल असेल पण परत तू दिसली नाहीस. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा मला तू दिसलीस. मला तू बघितलस. बहुदा तू मला विसरलेलीस हे तुझ्या चेहऱ्यावरून दिसत होत पण मी तुला विसरलो नव्हतो. 
आणि मी तुझा पाठलाग करून तुझ घर बघून ठेवल खूप लांब होत ते. आणि............
परत त्या घराला कुलूप लागल. परत मला तू दिसली नाहीस. कुलूप ते कधी काढलेलं दिसल नाही. आणि आता तर तिथ आज मी सहज गेलेलो तर तुझ ते घर पडून तिथ अपार्टमेंटच काम सुरु आहे. 
सगळ जमीनदोस्त झाल. पण तुझी आठवण नाही. आज हि आणि अजून पुढे हि मला तू आठवत राहशील.    

Copyrighted@2020

0 टिप्पण्या