कुणीतरी.
 
( vfx artist image by google )

०१

सकाळच्या धावपळीच्या वेळेला अभिजित कसाबसा गर्दीतून वाट काढत आपली लाल स्विफ्ट रस्त्याने चालवत होता. हॉर्न वर हॉर्न वाजत होते ना पुढ असणारी लोक पटापटा गाडी पुढ नेत होते ना अभिजितला पुढ जाता येत होत. कसाबसा सिग्नल सुटला. आणि अभिजितने एक जोराने मोठा उजवीकडे टर्न घेतला. आणि शिवानीचा विचार करू लागला. शिवानी त्याची बायको. दिसायला सुंदर. घारे म्हणजे पिवळसर डोळे आणि मोठे कमरे एवढे केस असलेली. उत्तम बांधा असलेली शिवानी याची बायको झाली कशी असा प्रश्न अभिजितच्या प्रत्येक मित्राला पडायचा. त्याला ते विचारायचे हि पण याच्याकड उत्तर असून तो देऊ शकत नव्हता.
अभिजित मराठे. वय वर्ष सत्तावीस. पुण्याच्या आय.टी.कंपनीत व्ही.एफ.एक्स. आर्टिस्ट म्हणून काम करायचा. आणि शिवानी हि. दोघांची ओळख तिथेच झालेली. दोघांची आधी ओळख झाली. मग दोघांच्या कामाची वेळ म्हणजे नाईट शिफ्ट होती आणि नंतर दोघ एकाच टीम मध्ये काम करू लागले. काम आणि मग आधी मधी झोप आली कि खाली कॉफी प्यायला जायचं. अस त्याचं सुरु असायचं. पहिल्या पहिल्यांदा हाय हेल्लोच्या बोलण्यातून मग कामाविषयी बोलण सुरु झाल. अस हि शिवानी त्याला सिनियर होती. मुळात ती अभिजीतच्या आधी दीड वर्ष आधी तिथ कामाला लागलेली. त्यामुळे तिथलं वातावरण काम आणि कामाची पद्धत सगळच तिला ओळखीच होत. अभिजीतला हि आता दोन वर्ष झालेली इथ कामाला लागुन.
नवीन कोणती इंग्लिश पिच्चर व्ही.एफ.एक्स साठी आली कि यांची टीम चांगल काम करत. आणि त्या वेळी दोघांच बोलण कामावरून पर्सनल होत गेल. रात्री झोप घालवायला वेग-वेगळे कॉफी प्यायला जाणारे आता दोघ एकत्र खाली जाऊन कॉफी पिऊ लागले. कॉफी पिताना पण बोलू लागले. अभिजितला चहा आणि सिगरेट लागायची. कारण सिगरेटने झोप जाते असा त्याचा समज होता. पण शिवानीमुळे त्याला कॉफीची तर सवय लागलीच पण सिगरेट पण सोडावी लागली. म्हणजे तिच्या समोर तरी तो ओढायचा नाही. बाकी एकटा किंवा मित्रांसोबत असताना ओढायचा. 
आज रविवार होता आणि कामाला सुट्टी होती. अभिजित झोपलेला अगदी गाढ. सतत कॉम्प्युटर समोर बसून डोळ्यावर ताण यायचा त्याच्या.अकरा वाजले असतील अंदाजे आणि मोबाईल व्हाईब्रेट होत होता. त्याने कॉल कट केला. परत तसच. त्याने झोपेतच कॉल उचलून विचारल,
अभिजित : हा, कौन हे ?
शिवानी : मी आहे, नंबर सेव्ह नाही का केला ?
अभिजित डावा डोळा उघडून बघतो तर शिवानी अस नाव दिसत. आणि हडबडून उठून म्हणतो,
अभिजित :  सॉरी बोल ना , आज सकाळ सकाळी कॉल केलायस ? एनी प्रोब्लेम ?
शिवानी : हा, आय नीड युवर हेल्प.
अभिजित : हा बोल
शिवानी : मला ना म्हणजे मी आता राहते ना त्या होस्टेल मधून अल्टीमेटम मिळाल आहे.
अभिजित : कसल ?
शिवानी : मला रूम सोडायला लावलीय
अभिजित : का ?
शिवानी : अरे आपल ऑफिस टायमिंग माहित आहे ना ? चालत नाही त्यांना. सगळे रूम देताना पहिल्यांदा हो चालेल अजेस्ट करू वैगरे बोलतात आणि नंतर खाली करायला सांगतात. खूप चेंज केल्यात मी रूम या आधी. आता मला तीन दिवसाचा वेळ दिलाय. महिना भरेल माझा परवा.मग सोडावी लागेल रूम यार.
अभिजित : ओह शीट.... ओके मी बघतो विचारून कुणालातरी आहे का रूम. बर कस बघू म्हणजे लेडीज हॉस्टेल बघू का ? पी.जी. बघू ?
शिवानी : काहीही चालेल. फक्त वेळेच बंधन नको.
अभिजित : बर मी बघतो. आणि तुला तासाभरात कॉल करतो.
शिवानी : बर प्लीज बघ मी करते तासाने कॉल तुला.
अभिजित : ओके डन.
कॉल कट करतो अभिजित. मग विचार केल्यासारखं तोंड करतो आणि पायाखालच पांघरून ओढून झोपून जातो.


( image by google )


०२
तासाभराने तिचा कॉल येतो. पण अभिजित तर गाढ झोपलेला. तो पर्यंत शिवानीचे अकरा मिसकॉल आलेले असतात. अभिजीतला एक वाजता जाग येते. उठून फ्रेश होऊन अंघोळ करून मग बाहेर मेसमध्ये जेवयला गेला. आणि मग जेवण ताटात येईपर्यंत त्याने मोबाईल बघितला आणि सुचायच बंद झाल त्याला. त्याने तिला कॉल लावला. शिवानी एकाच रिंग मध्ये कॉल उचलते.
अभिजित : हेय, हेल्लो सॉरी ते मी जरा,
शिवानी : झोपेलेलो होणा ?
अभिजित : हो सॉरी
शिवानी : असु दे. थकला असशील ना. बावीस तास झाल आपल काम. असुदे आणि अस हि प्रॉब्लेम माझा होता मी जस्ट तुला विचारलं. म्हणजे मला वाटल तुझी हेल्प होईल मला पण ठीके.
अभिजित : अस नको ना बोलू, वेट कुठ आहेस ?
शिवानी : हे काय इकड चंदननगरला होते आता परत येतीय खराडीत.
अभिजित : कोणे सोबत ?
शिवानी : नाही कोण नाही. मीच आहे एकटी.
अभिजित : मी येऊ का ?
शिवानी : हा येना.
अभिजित : दहा मिनिट वेळ दे आलोच.
तो कॉल ठेवतो आणि जेवण वाढणाऱ्याला सांगतो नको जेवण म्हणून आणि मेसच्या मालकाला सांगतो संध्याकाळी येईन आत्ता नको. आणि घाईत जातो रूमवर आणि गाडीची चावी घेऊन पल्सर २२० ने शिवानी कडे जातो. तिथे तिच्याशी बोलतो. ती सांगते तिने आठ रूम बघितल्या पण सगळीकडे वेळेच बंधन होत. आणि ती जेवली नव्हती आणि नाष्टा हि केला नव्हता. अभिजित तिला घेऊन जेवायला जातो. आणि तिथून निघून दोघ खराडीला रूम बघतात पण नाहीच हाती निराशा फक्त. अख्खा सुट्टीचा दिवस दोघांचा रूम शोधण्यात जातो. नकळत का होईना दोघ एकत्र असतात कामाव्यतिरिक्त बोलत असतात. शेजारी नाही तर एकमेकांच्या जवळ बसलेल असतात. रात्रीच जेवण हि दोघ एकत्र करतात. तो तिला सोडतो रूमवर तिच्या. शिवानीला रूम मिळाली नाही यापेक्षा आज तिच्या मदतीला, गरजेच्यावेळी कोणीतरीहोत या विचाराने तिला बर वाटत होत.
दुसऱ्यादिवशी दिवसभर काम होतच. आणि परवा दिवशी संध्याकाळ पर्यंत ती कामावरच अडकून होती. काम होत तिला खूप त्यामुळे ते पूर्ण करायचच होत. आता झाला प्रॉब्लेम ती थकून घरी आली. रिक्षातून ती उतरली आणि दारात घर मालकीण उभी होती. आल्या आल्या तिने कटकट केली. शिवानीने जाऊन वर सगळ समान गोळा केल. आणि मैत्रिणीला कॉल लावला.
शिवानी : हेल्लो माया |
माया : हा बोल ना शिना |
शिवानी : अरे एक प्रॉब्लेम हुआ हे |
माया : क्या हुआ ?
शिवानी :  वो जॉब के टायमिंग के वजह से मुझे रूम देखणे को टाईम हि नाही मिला. अभी आई रूमपर तो ओनर ने बहुत सर फिराया हे मेरा. अभी के अभी रूम खाली करणे को कहा हे. अभी तो ऑप्शन हि नही. अब सात बजे हे कहा जाऊ में तो इसीलिये तुम्हे कॉल किया. कुछ हो सकता हे क्या तेरे यहा ?
माया : अरे यार आज तो मनदीप आंने वाला हे कई दिनो बाद मुझे मिलणे |
शिवानी : तो ?
माया : तो आज मूड हे मेरा. और उसका भी. तो आजकूछ भी हो सकता हे |   
शिवानी : ओह...ओके ठीक हे.. एन्जॉय चल रखती हु फोन . बब्बाय... सिया.
माया : बाय डीअर....
शिवानीला कळत नाही आता काय कराव. ती तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला कॉल लावते पण ती उचलतच नाही.
शिवानी विचार करत उभी असते. तेवढ्यात घरमालकीण येते आणि तिला डीपॉजीट देते. आणि निघून जाते. हव तर थांब तोवर आत बोलली पण शिवानी निघते सांगून तिथून जरा पुढे चालत राहते हातात सामान खूप होत आणि त्याहून खूप डोक्यात विचार घेऊन ती चालताना मोबाईल वाजतो. तिला वाटत मगाशी कॉल लावलेल्या मैत्रिणीचा कॉल आलाय म्हणून ती उचलते तर अभिजीतचा कॉल असतो.
शिवानी : हा बोल
अभिजित : मिळाली का रूम काय झाल रूमच ?
शिवानी : बाहेर आहे.
अभिजित : कुठ ग बाहेर ?
शिवानी : रूम खाली केली मी. डीपॉजीट घेतल आता निघालेय.
अभिजित : कुठ ?
शिवानी : माहित नाही अजून तरी बघू एक फ्रेंड आहे तिकडे जाईन.
अभिजित : कोण बॉयफ्रेंड ?
शिवानी : नही रे बाबा, फ्रेंड मीन्स गर्ल वाली फ्रेंड.
अभिजित : ओह्के. मग लावला का कॉल तिला ?
शिवानी  : उचलतच नाहीये कॉल बिझी आहे वाटत बहुतेक.
अभिजित : बर ऐक मी फोन ठेवतो तिला कॉल लाव एकदा आणि काय होतय सांग मला लगेच ओके ?
शिवानी  : बर.
ती कॉल कट करते आणि मैत्रिणीला कॉल लावते पण ती उचलतच नाही. मग ती अभिजीतला कॉल लावते.
अभिजित :  काय झाल ?
शिवानी :  उचलतच नाही .
अभिजित : ओके कुठ आहेस ?
शिवानी : आहे रूम जवळ ते कोल्ड्रिंक हाउस आहे तिथ बाजूला.
अभिजित : ठेव फोन आलोच मी.
शिवानी : का  ?
अभिजित : करतो तुझी मी सोय.
शिवानी : अरे कशाला तुला त्रास. आधीच दिला मी परवा तुला त्रास.
अभिजित : गपे तू. थांब आलो.

अभिजित पोचतो पंधरा मिनिटाने तिथे. आणि तिला घेऊन त्याच्या घरी येतो. त्याने अख्खा flat घेतलेला असतो. तो सांगतो इथे राहा तू. भाड नको देऊ. ती माग लागते तरीपण तो घेत नाही. सेव्हिंग कर ते पैसे अस सांगून तो तिला कॉल्ड कॉफी आणून देतो आणि मग ती रात्री निवांत झोपते. दोन बेड रूम असतात एका रूम मध्ये ती दुसऱ्या अभिजित. आणि मग अशा गैरसोयीतून दोघ एकत्र राहायला लागतात. हॉर्नचा मोठा आवाज येतो आणि अभिजित भानावर येतो. आणि त्याला आठवत तो तर आत्ता लाल स्विफ्ट मध्ये आहे आणि तो शिवानीकडे चालला आहे. मग एका बाजूला गाडी थांबवून तो एका टपरीतून सिगरेट घेतो आणि ओढत थाबतो. आणि मोबाईल मध्ये किती वाजले बघतो. आणि त्याला शिवानीचा फोटो वॉलपेपर वर दिसतो.

( image by google )
०३

कॉल आला. अभिजित राहिलेली सिगरेट पायाशी टाकून बुटाने विझवतो. आणि कॉल उचलतो.
अभिजित : बोल ग बायको.
शिवानी : मी घेतले रिपोर्ट तुझे.
अभिजित : हा काय म्हणतायत डॉक्टर ?
शिवानी  : सगळ नॉर्मल आहे. फक्त जरा काळजी घ्यायला लावलीय आणि रेस्ट घ्यायला लावलीय दोन आठवडा.
अभिजित : हा घेता येईल. अस हि आता काम कमी आहे. झाली आपली फिल्म कम्प्लीट रोटो मारून.
शिवानी : अस नाही. पूर्ण झोपून राहायला सांगितल आहे.
अभिजित : का ?
शिवानी : माहित नाही आणि तुला ऐकाव लागेल माझ.
अभिजित : हो बायको.
शिवानी : कुठ आहेस. माग गाड्यांचा आवाज येतोय.
अभिजित : तुझ्याकड येत होतो.
शिवानी : कशाला ? काय कोण नेणार आहे का मला पळवून ?
अभिजित : नाही ग. पण तू कुठ रिक्षाने येणार म्हणून आलेलो तुला न्यायला.
शिवानी : अरे मग गाडी थांबव आणि मग बोल नाहीतर ठेव फोन.
अभिजित : थांबलेलोच. इथ बाजूला.
शिवानी : कशाला ?
अभिजित : असच तुझी आठवण आली म्हणून.
शिवानी : सिगरेट ओढलीस ना?
अभिजित : हो. पण अर्धीच. त्यापेक्षा पण कमी.
शिवानी : पण कशाला अभी.माझी आठवण आली म्हणून सिगरेट ओढायची काय लॉजिक आहे ?  नाही ओढायची सांगितल आहे ना डॉक्टरने. का ऐकत नाहीस. मला प्लीज त्रास नको देऊस. खूप त्रास होतोय आधीच मला.

आणि शिवानी रडायला लागली. अभिजित तिला समजावू लागतो. कारण विचारू लागतो. पण ती काहीच बोलत नाही. त्याला फक्त तिच्या हुंदक्याचा आवाज येत होता. तिने कॉल कट केला. अभिजित तिला आणायला जातो. शिवानीच्या घराजवळ तो थांबवतो स्विफ्ट आणि हॉर्न वाजवतो. शिवानी बाहेर येते. हातात हॉस्पिटलची फाईल आणि मोबाईल घेऊन गाडीजवळ येते. आणि डोळ्यातल पाणी लपवत दाराच्या काचेवर थाप मारते. अभिजितने दार उघडल. ती आत बसते. अभिजित तिच्याकडे बघतो. आणि गाडीच्या गिअर बार वर हात ठेवतो आणि पहिला गिअर टाकतो. शिवानी त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याच्याकडे बघते. अभिजित पुढच्या रस्त्याचा अंदाज घेऊन तिच्याकडे बघतो. गाडी चालत राहते.

अभिजित : काय झाल ?
शिवानी : काही नाही.
अभिजित : मग अस का बघतीयस.
शिवानी : काहि नाही.
अभिजित : आणि रडत का होतीस.
शिवानी : काही नाही. असच. आठवण आली तुझी.
अभिजित : काल दुपारी भेटलेलो आपण हॉस्पिटल मधून तू आईकडे गेलीस. आणि आता परत आत्ता भेटलोय एक रात्र फक्त तू लांब होतीस. हा पण फक्त शरीराने मनान तर जवळ आहेच ना तू माझ्या मी तुझ्या. मग रडायचं काय वेडाबाई. काय झाल सांग मला. चल लवकर.
शिवानी : आपण काहीच जगलो नाही. अस वाटत का रे तुला ? अभी.
अभिजित : म्हणजे.
शिवानी : लग्न झाल ठीके आपल पण आपण काहीच स्वप्न बघितली नाहीत आणि कोणतीच स्वप्न पूर्ण केली हि नाही. आणि त्यात आता मी प्रेग्नेंट आहे दोन महिन्याची. सात महिन्यांनी परत आपण अडकून राहू आपल्या बाळाच्या काळजीत.त्याला सांभाळण्यात.मग काहीच  होणार नाही आपल्याकडून. म्हणजे स्वप्न बघण ती पूर्ण करण. जी स्वप्न असतील ती बाळासाठी असतील. आणि त्याच्या सिक्यूअर फ्युचरसाठी ती आपल्याला पूर्ण करावी लागतील. मग काय जगलो आपण आणि काय जगणार आपण ?
अभिजित : बरोबर आहे तुझ पण करायचं काय ?
शिवानी : आपल्याकडे वेळ कमी आहे आपण लिस्ट बनवू आणि तुझ्या इच्छा पूर्ण करू. चालेल ?
अभिजित : हो चालेल पण फक्त माझ्या ?
शिवानी : हो तू लहान आहेस बेबी माझ्याहून विसरलास का मग माझ कर्तव्य आहे तुला आनंदी ठेवण.
अभिजित : अस का बोलतीस ?
शिवानी : आज जायचं बाहेर जेवायला ?
अभिजित : हो.
शिवानी : चल मग.

दोघ हॉटेल मध्ये जातात. आणि ऑर्डर देतात. ती यायला वेळ असतो. तोवर दोघ बोलायला लागतात.

शिवानी : मी विचार नाही करू शकत कि मला तू कधी एकट सोडून जाशील.
अभिजित : नाहीच जाणार मी कुठ.
शिवानी : नक्की ना ?

अभिजित तिच्या हाताला घट्ट धरतो,

अभिजित : हो नाही कधीच नाही जाणार. इव्हन मी तुझ्या नंतर मरेन. पण तुला एकटीला सोडून नाही जाणार कुठ.
शिवानी : मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय अभी.
अभिजित : अग रडू नकोस. आपण कुठ आहे बघ ना लोक आहेत इथ. नाही मी कुठ जात अस का करतीस. आहे ना समोर बघ बर. हास चल.

शिवानी जरास हासते.

अभिजित : हे काय ? नीट हास.
शिवानी नीट हसते. 
अभिजित : कल अपने वांगे कि सब्जी खायी थी क्या ?
शिवानी : नाही तो क्यू ? मटण खाया था.
अभिजित : ओह. सो सॉरी.
शिवानी : का काय झाल ?
अभिजित : दाताला तर वांग दिसल मला. पीस जास्तच शिजलेला वाटत आईंच्या हातून ?
शिवानी : शी , काहीही कायरे बोलतो. 
ती मोबाईल काढून बघते, 
अभिजित : नाही ग काही हास कि तू. काय तू एनी टाईम सिरीयस असतेस. काय कराव ग तुझ मी. देवा बघतोयस नारे कसली मुलगी दिलीयस मला. हसतच नाही. मला न तुझ्यात काहीतरी fault वाटतोय बर का.
शिवानी : कसला ?
अभिजित  : कवळी नाही ना तोंडात तुझ्या ? बघू इकड. मोठा आ कर बर.
शिवानी : अरे हे... ए काय बोलतोयस वेडायस का जरा ? का उगीच काहीही ?
अभिजित : काय जोक पण सुचेना मला नेमका आत्ता. 
शिवानी : हाहा. कसा रे असा तू वेडा. गप बस मग जरा. पीजे नको मारू.

तेवढ्यात ऑर्डर येते. आणि दोघ जेवू लागतात.   


( image by google )

०४

दोघांच जेवण झाल. आणि दोघ घरी गेले. अभिजित थकल्यासारख मटकन बेडवर जाऊन बसतो. आणि उशी पाठीशी घेऊन झोपतो. शिवानी त्याच्याजवळ कागद पेन घेऊन येते.
अभिजित : काय करतीस ?
शिवानी : लिस्ट?
अभिजित : कसली ? सामानाची ?
शिवानी : नो, विशलिस्ट.
अभिजित : हा लिही मग.
शिवानी : हा बोल कि, नंबर वन ?
अभिजित : आय वोन्ट टू गो मिलान इन इटली. विथ यु.
शिवानी : इतक मोठ ?
अभिजित : काय ?
शिवानी : स्वप्न ?
अभिजित : हो आणि मला फोर्च्युनर कार घ्यायचीय. तुला आवडतो न म्हणून आयफोन घ्यायचाय.
शिवानी : ओ-ओ-ओ , अजून पहिलाच नंबर चाललाय. इतकी मोठी नको स्मॉल थिंग्स बोल.
अभिजित : मग ती कसली स्वप्न ?
शिवानी : स्वप्न नाही मग इच्छा सांग जी आत्ता करावी वाटतात पूर्ण तुला.
अभिजित : माझी प्रत्येक इच्छा तुझ्याशिवाय पूर्ण होणारच नाही.
शिवानी : माझीपण.
अभिजित : बर सांगू का सिम्पल इच्छा माझ्या ?
शिवानी : हो सांग नंबर वाईज.
दोघ मिळून एक लिस्ट बनवतात. त्या कागदाच्या मधोमध एक रेघ आखलेली असते. उजवीकडे अभी आणि डावीकड शिवानी नाव लिहिलेलं असत. अभिच्या नावाखाली त्याच्या इच्छा पूर्ण लिहिलेल्या असतात. शिवानीच्या नावाखाली रिकाम असत.
अभिजित : आता तुझ्या लिहू दे...दे मला इकड पेपर पेन.
शिवानी : लिहिते मी.
अभिजित : काय आहे इच्छा तुझी ?
शिवानी : तुझ्या सगळ्या इच्छा  पूर्ण कराव्यात.
अभिजित : इतक नको प्रेम करू मरून जाईन मी.
शिवानी : काय होत नाही तुला गप्प आता झोप.दोघांनी सुट्टी काढलीय दोन आठवडे फुल एन्जॉय करू ओके ?
अभिजित : ओके बायको.
अभिजित झोपतो. आणि शिवानी पेपर टेबलवर ठेवून अभिजित जवळ जाते आणि त्याने डोक्याखाली घेतलेला हात ओढून त्याच्या दंडावर डोक ठेवते आणि डावा पाय त्याच्या कमरेवर टाकून लहान बाळासारख झोपते. आणि अभिजित हि मग तिला घट्ट मिठीत ओढून तिच्या ओठांना हलकाच कीस करतो. तिला भारी वाटत त्याच अस जवळ असण मग अजून त्याच्या मिठीत शिरून ती त्याच्या नाकाला चावते. तोही मग तिच्या कानाला चावतो. मग ती पायानेच पांघरून ओढते. आणि दोघांच्या अंगावर पांघरून ओढून ती आत त्याच्या गालावर एक थप्पड मारते हळूच. तो मग तिच्या केसांना धरून ओढतो तसा शिवानीच्या तोंडून आह.... चा सूर निघतो. मग थोडस लाडात येऊन ती त्याच्या गालाला कीस करते आणि मग शांत डोळे मिटते. आणि अभिजित हि झोपतो तिच्या अंगावर हात टाकून झोपतो.( image by google )


०५
सकाळचे आठ वाजलेले. शिवानी उठून आवरते. आणि अभिजीतला उठवायला येते. तो उठत नाही. म्हणून ग्लासात पाणी आणून त्याच्या चेहऱ्यावर उडवते. अभिजित उठतो. खरतर उठायचं नव्हत त्याला. पण शिवानीचा खुललेला चेहरा, फ्रेश चेहरा बघून त्याचा आळसच गेला. तो उठून आवरायला गेला. आणि आवरून शिवानी समोर आला.
शिवानी : चला मग करायचं ना स्टार्ट आपल काम ?
अभिजित : कसल ग ?
शिवानी : विशलिस्टच.
अभिजित : हो , ये लॉक लाऊन मी तोवर गाडी काढतो.
शिवानी : नाही तू लॉक लाव मी कार चालवणार आज.
अभिजित : ओके.
शिवानी जाऊन स्विफ्ट गेट बाहेर काढते. अभिजित लॉक लाऊन येतो आणि गेट लाऊन घेतो.मग शिवानीच्या शेजारी सीट वर बसतो आणि दोघ निघतात. गुडलक कॅफे कडे. तिथ गेल्यावर दोघ मस्तपैकी कॉफी पितात. आणि तिथून बाहेर पडतात. आता कुठ जायचं ? असा विचार दोघांना पडतो.
शिवानी : आज थांबायचं नाही कुठ. नुस्त खायचं आणि फिरायचं ओके ना?
अभिजित : ऑफकोर्स
दोघ रस्त्याच्या पलीकडे पार्क केलेल्या गाडीत जाऊन बसतात आणि गाडी वळते शनिवार वाड्याकडे. गर्दीतून वाट काढत वन-वे च्या मार्गाने जात अखेर ते शनिवार वाड्याजवळ पोचतात. आत जाऊन दोघ बसतात.
अभिजित : खूप दिवसांनी आलोय आपण काय ग इथ ? पहिल्यांदा तू माझ्या रूमवर आलेलीस राहायला त्याच्या तिसऱ्यादिवशी संडेला आलेलो सहज आपण. किती अनोळखी सारख वावरत होतो आपण. आणि आता इतक्या दिवसांनी एकमेकांच्या जवळ आणि हातात हात घेऊन बसलोय.
शिवानी : होणा. मला वाटल नव्हत कि मला साथ देणार कधी कुणीतरी भेटेल.
अभिजित : का ? इतकी सुंदर आहेस तू यार सो ब्युटीफुल आहेस आणि का मिळाल नसत तुला. ऑफकोर्स मिळाल असत तुला कुणीतरी नाही खूप जण मिळाले असते.
शिवानी  : पण तुझ्यासारखे नाही.
अभिजित : मी काय अस मोठ काम केल नाही. जी माझी गरज होती तीच तुझी होती म्हणून मी हि म्हंटल कुणाशी प्रेम करून तात्पुरत सोबत राहून तिला सोडण्यापेक्षा  असहि तुझी माझी ओळख झालेली मैत्री झालेली मग वाटल तुझ्याशीच प्रेम कराव.
शिवानी  : तुझ खरच प्रेम आहे माझ्यावर ?
अभिजित : हो स्वतःपेक्षा पण जास्त.
शिवानी : का ? दुसर्या कोण नव्हत्या का आसपास ?
अभिजित : होत्या कि पण याच कारण माहित आहे तुला.
शिवानी : मला ? नाही बाबा. का करतोस रे तू माझ्यावर इतक प्रेम ?
अभिजित : होका ? इतक मोठ काम केल आहेस माझ्यासाठी. म्हणून.
शिवानी : तोच तोच विषय नको मला पुन्हा अभी. आणि काही मोठ केल नाही मी. मला जे वाटल ते मी केल. आणि मीही तुझ्याहून वेगळी नाही पण वेळ आली कि सांगेन मी का तुझ्यावर प्रेम केल ते.
अभिजित : बर पण आत्ता का नाही सांगणार ?
शिवानी : नाही आत्ता इच्छा पूर्ण करायच्यात. कुणीतरी असाव सोबत आपल्या इच्छा पूर्ण करणार अशी माझी हि एक इच्छा होती. आता तू आहेस मी आहे. ते करू आधी. बाकीचे विचार सॉरी, thanks नंतर बघू . बर चाल निघता.
अभिजित : मी चालवू कार ?
शिवानी : हो. घे चावी
दोघ शनिवार वाड्या बाहेर येऊन गाडीत बसतात. आणि मग गाडी सिंहगड रोडला वळवतात..
आणि बाजूला गाडी थांबवायला सांगते शिवानी.
अभिजित : काय झाल ?
शिवानी :  आठवतय का रे तुला आपण आलेललो टू-व्हीलर वरून, आपली बाईक इथ स्लीप झालेली. सगळे पाय भरलेले माझे चिखलात .पांढरी लेगींस डार्क झालेली. कसल भारी ना खाली चिख्खल आणि वरून पाऊस पडत होता. मी आपल्या दोघांच्यावर छत्री धरलेली पण ते छत्रीच कापड पण निसटल वाऱ्यान. पूर्ण भिजलेलो आपण आणि ते... ..
अभिजित : आणि पहिला कीस पण आपण इथच केलेला. आठवतय ना ? तो माणूस झाड तोडत होता. म्हणून आपण गाडी देवळापाशी लाऊन पुढ चालत गेलो आणि त्या ओढ्याच्या पलिकड सात फुट खाली उतरून शेतात गेलो. कसला भारी झरा होता यार तो.आठवतोय तुला ?
शिवानी : होना टोटल व्ही.एफ.एक्स चा धबधबा वाटत होता.
अभिजित : होना मला अजून आठवतय. खूप मस्त वाटत होत. सगळ ओपन होत तिथ आपण त्या तुटक्या झाडाच्या खोडा माग परफेक्ट थांबून उभ होतो. आणि मी तुला जवळ घेतल तर. तू मला नको नको करत होतीस. कस करत होतीस ग एकदा दाखव ग
शिवानी : गप काहीही काय. नको जा.
अभिजित : हा असच. मग काय घेतल जवळ तुला आणि केल कीस. काहीच वाटल नाही मला.
शिवानी : होका खरच ?
अभिजित : हो.
शिवानी : म्हणजे आधीपण केलेलास ना तू कीस खर सांग ?
अभिजित : नाही आईची शप्पथ.
शिवानी : आईचा विषय काढत जाऊ नको सांगितल आहे ना. तुला.
अभिजित : पण तुला विश्वास बसायला नको का माझ्यावर. म्हणून घेतली शप्पथ.
शिवानी : आई नसली म्हणून काय झाल तुला मी आहे ना ?
अभिजित : हो.
शिवानी : ए जायचं का आपण तिथ ?
अभिजित : कुठ त्या झऱ्यापाशी ?
शिवानी : हा ? चल न जाता.
अभिजित : कशाला कीस करायला का ? पण असेल का आता तो झरा ?
शिवानी : ती काय मुव्ही आहे का आज आहे पुढच्या आठवड्यात नाही.
अभिजित : बर चल बघता.
दोघ चालत जातात पण तो ओढा सुकलेला असतो. झरा असतो. पण खूप बारीक झालेला दिसतो. आणि खाली उतरायला जागाच राहिलेली नसते. आणि शेतात आत्ता लोक काम असतात.
तिथून निघून मग दोघ जेवयला जातात हॉटेल मध्ये. आणि तिथून बाहेर आल्यावर अभिजितला चक्कर आल्यासारखं होत. शिवानी बिसलेरी आणायला जाते. इकडे अभिजीतला उलटी होते. आणि नाकातून खूप रक्त यायला लागत.
शिवानीला कळत नाही काय झाल अचानक अभिजीतला. ती त्याला घेऊन घरी जाते. आणि त्याला झोपवते. संध्याकाळी त्याला आठलाच जाग येते. शिवानी तोवर बिचारी त्याच्या डोक्यावर हात फिरवत बसलेली असते. तो उठतो ती त्याला कॉफी बनवून देते.
अभिजीत : सॉरी आपल प्लानिंग फसल माझ्यामुळ.
शिवानी : अस काही नाही. असुदे उद्याचा पण दिवस आहे आपल्याकड. उद्या वेगळी इच्छा पूर्ण करू.
अभिजित : आजची एक इच्छा राहिलीय पण
शिवानी : कोणती ?
अभिजित : नाईट वॉक. चंद्राच्या प्रकाशात.

शिवानी : थांबलायस का पी चल कॉफी. जाता. आणि दोघ बाहेर जातात. आणि फिरून येऊन अकरा वाजता येताना आईसक्रीम पान खाऊन येतात. आणि झोपतात.    


  
०६
शिवानी : अभी ? अभी ?
अभिजित : ......................
शिवानी : अभी ? उठायचं नाही का ?
अभिजित : हम.....
शिवानी : हा मग उठ ना.
अभिजित : मला बर वाटत नाहीये.
शिवानी : काय होतय ?
अभिजित : डोक दुखतय.
शिवानी : बर झोप.
अभिजित : नको उठतो.
अभिजित उठून आवरतो आणि. बाहेर येतो.
अभिजित : आज खडकवासल्याला जाऊ आणि इनोर्बीट मॉलला जाऊ तिथून कॅम्पला जाऊ चालेल ?
शिवानी : हि असली इच्छा ?
अभिजित : हो. का काय झाल.
शिवानी : मी सांगू पण शकत नाही आणि तुला कळत पण नाहीये.
अभिजित : काय ?
शिवानी : जरा मोठी इच्छा ठेव जी पूर्ण होऊ शकत नाही किंवा जी पूर्ण करायला पुन्हा वेळ मिळणार नाही ?
अभिजित : अस काहीच नाही.
शिवानी : मग काल लिहील ते काय होत ?
अभिजित : टाईमपास इच्छा
शिवानी : काय तू अरे. मला न राग येतो तुझा कधी कधी खरच सांगते.
अभिजित : मग काय करू. जे हव ती कधी मिळाल नाही मला. जो नव्हता कधी विचार नेमका तो विचार ती विश म्हणजे तू मिळालीस मला. तुम्हे मालूम हे ? मुझे याद हे , मेरी पेह्ली लिस्ट मुझे पोकीमोन का बॉल चाहिये था खिलौना | वो भी नही मिला | का तर बाबा म्हणाले नाही म्हणून आईने पण विचार सोडला. त्यानंतर प्रत्येक दिवाळीला मित्रांसारखे कपडे मला हवे असायचे पण नाही तेपण नशिबी नव्हत. कॉमिक बुक वाचायला आवडायची मी त्या अविनाश कडून जाऊन आणायचो आणि त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन वाचायचो तालमीत.आणि वाचून त्याला परत नेऊन द्यायचो. बाबांना मागायचो मी पण ते काय द्यायचे ? काहीच नाही. अभ्यासाची पुस्तक वाच म्हणायचे. तिथ हि मन मोडायचं माझ. त्या नंतर आठवत मला सायकल हवी होती. नवीन. सगळे माझ्या वयाची पोर घेऊन फिरायचे आणि मी ? त्यांच्या माग बसायचो नंतर नंतर तर मी दिसलो कि ती पोर एकमेकांना म्हणयचे तुझ्या माग बसव अभिला आणि तुझ्या माग बसव अस म्हणत जो तो प्रत्येकाला म्हणायचा आणि शेवटी मला तिथच ठेवून पोर निघून जायचे. त्यातून कस तरी रडून रडून आईने माझ ऐकल आणि बाबांना सायकल आणायला लावली. आणि आणली कुठली ? तर सेकंड hand तीपण लेडीज. स्वस्त मिळाली म्हणून. पुढची बास्केट काढली. आणि गुलाबी रंगाला घरी बसून बसून काळा ओईलपेंट मारून दिला मला. म्हणजे अस झाल माझ्याबाबतीत सगळ. मग मी अकरावीत बाईक मागीतली तर तीपण दिली नाही. आत्ता इतक्या वर्षांनी मी व्ही.एफ.एक्स च्या जॉबला लागल्यापासून पैसे साठवून घेतली बुलेट आणि मागच्या वर्षी स्विफ्ट. या सगळ्यात बाबांचं प्रेम मिळाव एवढच वाटायचं पण तीही इच्छा नाही पूर्ण झाली कधी. आपल्याला बाबा नकोच होते अशी इच्छा करायचो मी आणि नववीतच आई कॅन्सरने गेली माझी. ती इच्छा माझी नसताना तस घडल. मग बाबा गेले. आणि यातून सगळ सावरत घेतल मी. अस वाटल आता सगळ आहे ते आपल्यासाठी जगायचं पण त्यात जे घडल त्याने आता सगळच संपलय.
शिवानी : मी आहे अस काही बोलू नको.
अभिजित : किती दिवस आहेस ?
शिवानी : काय ?
अभिजित : सोबत आहेस म्हणतीस ना किती दिवस आहेस ? एक महिना सहा महिने ?
शिवानी : अस का बोलतोयस ? बायको आहे मी तुझी.
अभिजित : मग कस बोलू? या सगळ्यानंतर अस वाटल मला कि कोण मिळणार नाही मला आणि मी इच्छा सोडून दिली आणि तू माझ्या आयुष्यात आलीस. एक स्वप्न वाटत मला तर.
शिवानी : लव्ह यु.


 
( image by google )

०७

अभिजित : आय लव्ह यु टू.बघ न तेव्हा तू माझ्या घरी आलीस राहायला आणि तुझ्यामुळे बऱ्याच चांगल्या सवयी मला लागल्या. रूम साफ नव्हतो करत पण तुझ्यापुढे शायनिंग मारायला घर साफ करायला लागलो. जॉगिंगला जायला लागलो. सिगरेट तर फक्त तुझ्यापुढ ओढायची बंद केलेली,पण रूम वर आणून ओढायच पण बंद केल. दारू तर कम्प्लीट बंदच झाली. घरात देव नव्हता. तू स्वामी समर्थांचा फोटो आणून पुजायला लागलीस. आणि संध्याकाळी तुला यायला उशीर झाला तर मी तुझ्या समाधानासाठी त्या फोटो पुढ उदबत्ती लावायाल लागलो. आणि नंतर..
शिवानी : काय ? नंतर काय ?
अभिजित : नंतर माझे कपडे तू धुवायला लागली. माझे कपडे घडी घालून ठेवायला लागलीस. मला खायल आणून द्यायला लागलीस. जास्तिक जास्त जवळ आलीस. तुला माहित आहे का ? तेव्हा त्या पहिल्या रात्री जेव्हा तू माझ्या घरी आलेलीस. तेव्हा नाईटी घालून तू झोपलेलीस मला अस आत कसतरी होत होत. तुझ्या जवळ याव तुला टच कराव वाटत होत. मी तुझ्या रुममध्ये येऊन तुला बघितल हि होत. पण मीच मला कंट्रोल केल.
शिवानी : ( डोळे मोठे करून ) अभी ? असा विचार केलास तू माझ्याबद्दल ?
अभिजित : हो का तुला काय वाटल नाही का माझ्याबद्दल ?
शिवानी  : अख्खी रात्र जागी होती मी. मला विश्वास नव्हताच तुझ्यावर. नंतर कधी झोप लागली मला काय माहित पण आधी खूप मी घाबरून पडलेले बेड वर.
अभिजित : तू सवय लावलीस मला तुझी. नंतर पुढच्या महिन्यात तू तुझ्या घरी गेलेलीस इतका मला त्रास झाला. कि मला एकट्याला नाष्टा करायला पण जीवावर आलेल. तुला माहितीय का शिना.
आई गेल्या नंतर मी बाबा गेल्यावर रडलो त्या नंतर मला माझ्या एक्स जी.एफ.ने रडवल. म्हणजे तिच्यासाठी मी रडलो. पण आई गेल्यावर जेवढ मनापासून रडलो काहीस तस मी तुझ्या आठवणीत रडलो. ते पाच दिवस मी कसे काढले मला माझ माहित. खूप ड्रिंक केली मी. माझ प्रेम नाही तुझ्यावर पण तुझी सवय लागलीय मला हे नाकारता पण येत नव्हत. मग कळली मला तुझी किंमत कि तू किती काय करतेस माझ्यासाठी. आपल काही नात नसताना पण
शिवानी : तुझ्यासाठीच करायचे मी. तू काय भाड घेत नाहीस मग म्हणून म्हंटल घरातल तरी मी बघाव. जस्ट सिम्पल थिंक.
अभिजित : हम.. एक सांग मला ,तुला कधी जाणवल माझ्याबद्दल प्रेम ?
शिवानी : तुझ्याबद्दल फिलिंग नव्हत्या. बस एक बेस्टी मनात होते मी तुला. पण रोजचा सततचा सहवास आणि तुझाच विचार यामुळे नकळत मी तेव्हा सिंहगडच्या खाली त्या शेतात मी तुला किस करायला परमिशन दिली आणि त्या कीस मध्ये मला तुझ्या स्पर्शाने फिलिंग जाग्या झाल्या. त्यापासून आत्ता पर्यंत आय स्टील लव्ह यु. अभी.
अभिजित : मला तू आवडतेस.........खूप.
शिवानी : कधी पासून.
अभिजित : नाही नको.
शिवानी : का ? सांग कि काय झाल लाजतो का असा ?
अभिजित : गोष्टच तशी आहे
शिवानी : सांग ना.
अभिजित : नको ग.
शिवानी : सांगतोयस का जाऊ मी ?
अभिजित : बर , अग आपण गेलेलो बघ थर्टी फस्टला कंपनीच्या पार्टीला तिथ आपण वोडका पिला. ठीके. हाय झालेलीस तू, मी काय लिमिट मध्ये घेतलेली. मी तर काय आल्या आल्या झोपलो बेडवर परत सिगरेटचा मूड झाला म्हणून मी जाऊन आणली गरम एक. आणि म्हंटल तू झोपली का बघायला आलो तर तू कपडे बदलत होतीस. तुला जमत नव्हत तुझ्या फॉर्मल शर्टची बटण काढायला म्हणून मी आत येऊन ती काढून दिली.
शिवानी : काय ? तू मला सांगितल नाहीस हे. कधी आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी पण सांगितल नाहीस.
अभिजित : नाही सांगितल उगीच तू मला चुकीच समजली असतीस. बहुतेक मी वाईट वाटलो असतो तुला आणि तू गेली असती रूम सोडून. न मला माझ्या रूम मध्ये फक्त तू हवी होतीस. म्हणून मी हि आठवण फक्त माझ्या मनात ठेवली.
शिवानी : तेव्हा काय बघितल तू माझ ?
अभिजित : काही नाही.
शिवानी : गप खोटारड्या उगीच आवडले का मी तुला काहीतरी केल असणारेस.
अभिजित : मी फक्त बटण काढून दिले तू मला बाहेर जा बोललीस.
शिवानी : गेलास का मग ?
अभिजित : हो  आणि परत तूच बोलावल. शर्टची भाई तुझ्या दंडातून निघत नव्हती. सो शर्ट काढ बोललीस मला. मी दिला काढून.
शिवानी : काय ? म्हणजे आपल लग्न व्हायच्या आधी तू बघितलस मला न्यूड ?
अभिजित : हाफ न्यूड.
शिवानी : तेच ते न्यूड शब्द आहे ना त्यात मग. मग ?
अभिजित : मग मी टी-शर्ट घातला  तुला आणि तू झोपली तशीच.
शिवानी  : खालच काही नव्हत न चेंज केल ?
अभिजित : नाही नाही. वरचच फक्त.
शिवानी : सगळी पोर तुम्ही सारखीच. कुठली मुलगी तुम्हाला अशीच नाही आवडत. काहीतरी बघितल किंवा बघायचं असल तरच तुम्हला ती आवडते होणा ?
अभिजित : नाही ग. पण आवडलीस मला तू त्या रात्री. मी केल असत सगळच त्या रात्री तुझ्यासोबत पण मी केल नाही. मला तुझी मर्जी हवी होती ते पण शुद्धी अवस्थेत. सो मग मी माझ्या रूम मध्ये जाऊन गरम मारली. आणि झोपलो.
शिवानी  : एक मिनिट , प्रतीक्षाचा कॉल येतोय.
अभिजित : हा  उचल. .......  ( indian couple image by google )०८

शिवानी : हेल्लो. आज किती दिवसातून कॉल केलास तू अग, कशी आहेस ?
प्रतीक्षा : अग मगाशी आठवण आली तुझी.
शिवानी : कशी काय ?
प्रतीक्षा : मगाशी कपाट आवरताना साराची खेळणी चांगली चांगली बाजूला काढली त्यात तू दिलेलं तिच्या बारश्याला गिफ्ट मिळाल.
शिवानी : ओह, म्हणजे ते नसत सापडलं तर नसतेच आठवले मी हो ना ?
प्रतीक्षा : अस नाही ग. आम्ही उद्या येणार आहे चंदननगरला. तुम्ही आहात ना ?
शिवानी : हो इथून कुठ जाणार. बर कधी येताय. जाता लंच ला.
प्रतीक्षा : सकाळी येणार आहे काम आहे तिथ पण संध्याकाळ होईल तुझ्याकडे येईपर्यंत पाच सहा.
शिवानी : ओके मग डिनरला जाऊ. ओके ?
प्रतीक्षा : ओके डन. बाकी अभी काय म्हणतोय.
शिवानी : काही नाही आजारी आहे.
प्रतीक्षा : का काय झाल?
शिवानी : काही नाही असच.
प्रतीक्षा : आणि तू  कशी आहेस ?
शिवानी : मी पण आजारीच आहे.
प्रतीक्षा  : काय झाल तुम्हाला दोघांना ?
शिवानी : काही नाही ग स्पेशल. पण मला तुझी एक मदत हवीय.
प्रतीक्षा : होका , बोल ना काय करू मी ?
शिवानी : सांगेन उद्या. पण करशील का मदत ?
प्रतीक्षा : हो. तुझी माया कुठ गेली ? बेससससटी.
शिवानी : बिझी आहे ती त्याच्या बीएफ सोबत. माहित आहे ना तुला तीच. महिनाभर एका सोबत फिरायचं राहायचं आणि त्या मुलाने दोन चार वेळा महिन्याभरात सेक्स केला कि मग हीच त्याला लांब करते आणि तोवर महिनाभर लुटते पोरांना मग पोर तरी कशाला टिकतील तिच्यासोबत ? मग परत एक पाच दहा दिवस रडायच तेव्हा तिला मी आठवते आणि परत मग पटवायचा फेसबुकवर नवीन एक. मग नंबर एक्सचेंज करून बोलण भेटण तेच तेच असत तीच. लाइफ स्पोईल केलीय तिने तर स्वतःची. सोड तुला माहित आहे ना अस हि मी तिच्याशी कॉलेज मध्ये बोलायची जास्त. नंतर तीच राहणीमान बघून कमी केल बोलण मी पण तीच मला अजून तिची बेस्टी मानते. आणि माझ्यासाठी अजून हि तूच आहेस बेस्टी . पण हा पण पास्ट झाला.
प्रतीक्षा : का ? पास्ट का ?
शिवानी  : लग्न केलस लपून छपून. एक फोन करून पण सांगाव वाटल नाही का तुला.
प्रतीक्षा : माहितीय ना तुला अमितच काय झाल. त्या नंतर सगळ घाईत झाल आणि अजिंक्यने केली घाई मग मीही नाही विचार केला.
शिवानी : बर बर ये तू उद्या आपण बोलू खूप.
प्रतीक्षा : हो नक्की हे बघ अजिंक्य आला देऊ का त्याला फोन ?
शिवानी  :दे ना .
अजिंक्य : हेय शिना. कशी आहेस ग ?
शिवानी : मरायला आलेय.
अजिंक्य : अस का बोलतीस ?
शिवानी : हा मग काय आठवण आहे का नाही मैत्रिणीची.
अजिंक्य :  आहे कि.
शिवानी  : होका ? बर मग कोणे मी ?
अजिंक्य : शिना , बोललो ना मगाशी. विसरलो असतो तर नाव आठवल पण नसत ना मला तुझ.
शिवानी : नशीब. अजून हि तू मला तुझी मनातच नाहीस. प्रतीक्षाची मैत्रीण समजूनच वागवतोस तू मला.
अजिंक्य : नाही ग. भेटू आपण उद्या. बोल काय आणू तुझ्यासाठी स्पेशल ? माझ्याकडून बर का.
शिवानी : डेरीमिल्क बबली आणि सिल्क.
अजिंक्य : अजून आहेच का सवय. अवघड आहे तुझ बदल जरा लग्न झाल कि आता. आधी ठीक होत. अभिजीतला पण असच मागतेस का ? रोज कॅडबरी ?
शिवानी  : नाही फक्त माया तू आणि प्रतिक्षालाच मागते.
अजिंक्य : बर आणतो हा.  चल ठेवू का ?
शिवानी  : सारा कुठय ? आवाज नाही तिचा ?
अजिंक्य : क्लासला गेलीय.
शिवानी : कसला ?
अजिंक्य : चित्रकला.
शिवानी : कशाला रे तुझ्यासारखं येड बनवतो तिला आर्टीस्ट.
अजिंक्य : वाटायला नको का जगाला माझी आहे ती.
शिवानी : चांगल आहे. चलो ओके बबाय.
अजिंक्य : हा भेटू उद्या पाचला फ्री झालो आम्ही कि मनु करेल कॉल तुला.
शिवानी : ओहो....प्रतीक्षाची आता मनु... चांगल आहे . प्रगती झाली तर.
अजिंक्य : आता कसली भीती ? बायको आहे. काहीही म्हणेन मी.
शिवानी : बर बर आता नको भाषण देऊ माहित आहे. तुझ्या लाडक्या बायकोला काय बोलल कि तुझ्यातला तत्वज्ञानी जागा होतोत. पण आत्ता आम्ही ना, अभी आणि मी इथ वेळ घालवायला आलोय एकत्र. तुझ ऐकायला मला वेळ नाही. जे काय ते उद्या ऐकेन.
अजिंक्य : हा हा हा.. चल बाय.
शिवानी :  बाय.
आणि अभिजित शिवानीला विचारतो. काय म्हणत होते दोघ आणि शिवानी त्याला सगळ सांगते.
अभिजित : निघायचं ? ऊन लागतय आता. जाता गाडीतून फुल ए.सी. लाऊन.
शिवानी : हो. 
आणि दोघ निघतात. पी.व्ही.आर.ला फिल्म बघयला. तिथून फिल्म बघून जेवून. मग घरी जातात. आणि मग संध्याकाळी खराडी बायपासला दोघ फिरायला जातात आणि तिथच खाऊन घरी येतात आणि झोपतात.  


( image by google )


०९


शिवानी : अभी...! उठ बाळा आपल्याला जायचं आहे बाहेर. आहे ना लक्षात ?
अभिजित पांघरूणात झोपलेला असतो. शिवानी ओरडत ,

शिवानी : अ........भी.उठ लवकर. हे काय झाल ? कुठून रक्त येतय ?
अभिजित : अम ? अ ..... कुठाय ?
शिवानी : ते बघ उशीला लागलय. चल लवकर तोंड धु पाण्यान.
अभिजित : हम.

अभिजीतला घेऊन शिवानी बाथरूम मध्ये जाते. सगळा चेहरा धुतल्यावर टॉवेल आणून देते आणि. मग तो आवरूण दोघ जातात बाहेर. आणि गाडीत बसतात.

शिवानी : अभी यार. दोन दिवस वाया गेले आपले.
अभिजित : हा जाऊ दे कि, आहे आपल्याकडे खूप वेळ माहितीय ना ?
शिवानी : नाही ये.
अभिजित : होका ?
शिवानी  : हो तेच तुला कळत नाहीये.
अभिजित : हम कुठ जायचं ?
शिवानी : माळशेजला.
अभिजित : तिकड काय आहे ?
शिवानी : बोलत बसू.
अभिजित : मग कशाला उनातानाच तिकड जायचं लांब. बसू कि घरात.
शिवानी  : नको ना अभी
अभिजित : अग मग दुसर काय करणार आहेस ?
शिवानी  : काही नाही तुझ्याशी बोलायचं आहे प्रेमाने.
अभिजित : फक्त एवढ्यासाठी उन्हाच तिकड जायचं. ए.सी. लावला तरी गाडीत जाऊन आल्यावर परत बसल तर माहितीय ना सगळा टप तापतो. तो कुल होईपर्यंत किती वाट लागते.
शिवानी : सिरीयसली. हा ते पण आहेच. मग काय करायचं.
अभिजित : चल आज घरातच बसता. मस्त शॉर्टस घालून. आणि..
शिवानी  : आणि फिल्म बघता.
अभिजित : कोणती ?
शिवानी :  ती ए ग्रेड गर्ल्स नेक्स्ट डोअर.
अभिजित : होका. शोधावी लागेल मला.
शिवानी : पीडी मध्ये आहे न त्या लाल ?
अभिजित : कोणत्या एच.पी च्या का किंगस्टोनच्या ?
शिवानी : बहुतेक किंगस्टोन.
अभिजित : आणि  ?
शिवानी  : आणि तुझ्या हातची कोल्ड कॉफी. आ...हां.
अभिजित : कोल्ड कॉफी पिऊन ? कोल्ड होऊ आणि मग फिल्म बघून रोमांटीक होऊन गरम होऊ आणि मग ?
शिवानी :  आणि  मग ?
अभिजित : आज प्रेम करायचं ?
शिवानी  : इच्छा आहे का ?
अभिजित : दोन आठवडे झाले ना लास्ट टाईम करून.
शिवानी : चालेल.
अभिजित :  आणि मग संध्याकाळी जाऊ सनसेट बघायला ओके ?
शिवानी : प्रति-अजिंक्य येणारेत विसरलास का ?
अभिजित : अरे हो.. चालेल आराम करू आपण. ( गाडीच्या काचेबाहेर बघून ) वॉव यार मला चालवायची आहे शिना फॉरच्युनर गाडी.
शिवानी : चालवशील चालवशील. मी बघते कुणाची आहे का ? फ्रेंडची.
अभिजित : हो यार प्लीज बघ. माझी येईल तेव्हा येईल पण चालवायचीय.
शिवानी : प्रॉमिस. नक्की बघते मी. तुझी इच्छा मी अशी नाही मोकळी ठेवणार. बघते मी.
अभिजित : चल आत.

शिवानी आणि अभिजित स्विफ्ट लॉक करून आत येतात. आणि अभिजित किचन मध्ये जातो. कोल्ड कॉफी बनवायला. शिवानी बेडरूम मध्ये जाऊन ती ए ग्रेड फिल्म लावते. आणि सुरुवातीला वॉर्निंग दिसते आणि शिवानी तिथे ती फिल्म पॉझ करते, आणि अभिजितचा काळा शर्ट घालते आणि खाली ग्रे शॉर्टस घालते. आणि बेडवर बसते पाठीला उशी ठेवून.
आतून मिक्सरचा आवाज येतो. अभिजित मिक्सर मध्ये दुध , कॉफी पावडर , बर्फ टाकून सगळ मिक्स करत असतो. मग ते काढून मिक्सर पुसून ठेवतो. आणि मिक्सरचा आवाज बंद झालेला ऐकून शिवानी विचारते ओरडून ,

शिवानी  : झाल का ? नवऱ्या ?
अभिजित : हो एक मिनिट बायको
.
आणि मग अभिजित दोन काचेच्या ग्लासात कॉफी ओततो. फ्रीज मध्ये वाकून बघतो. आणि शिवानीला आवाज देतो,
अभिजित : शिना , वो डेरी मिल्क कहा हे ?
शिवानी : आहे ना आत फ्रीजर मध्ये.
अभिजित बघतो आणि त्यातून कॅडबरी काढून त्याचे सुरीने बारीक तुकडे करून त्या कॉफीत टाकतो. आणि मग चोको सिरप घेऊन एका कॉफीच्या वर एस ( s ) काढतो आणि मग दोन्ही ग्लास घेऊन जातो शिवानीकडे. आणि तिला बघून त्याचा हात थरथरतो.
शिवानी : पहिल्यांदा बघतो का रे मला. ये लवकर जवळ.
अभिजित : खूप सुंदर दिसतीयस.
शिवानी : काहीही. तुझाच आहे शर्ट.
अभिजित :  पण खरच जगात कोण नाही माझ्यासाठी तुझ्याइतक सुंदर.
शिवानी : बस हेच हव असत ना प्रत्येक बायकोला, कि रोज नाही निदान प्रत्येक प्रेमाच्या क्षणी तिच्या नवऱ्याने बायकोची एका वाक्यात तरी तारीफ करावी. मनापासून. स्वताहून.
अभिजित : बस का, मी नाही विसरू शकत तुझी तारीफ करण.
शिवानी : हा.

शिवानी पॉझ केलेली फिल्म प्ले करते आणि अभिजित टेकून बसतो बेडवर. आणि शिवानी त्याच्या पुढ्यात त्याच्या छातीला टेकून तिरकी झोपते. अभिजित डावा हात तिच्या पोटाशी ठेवतो. आणि शिवानी त्याच्याकडे एकदा वर बघते. अभिजित कॉफी पीत असतो. आणि शिवानी त्याला बघून नकळत गालात हसते. आणि एका दमात कॉफी पिते. ते कॉफीवर काढलेलं एस ( s ) ती बघत नाही. अस हि तो नेहमी तसच देत असतो तिला त्यामुळे तिला याची सवय होती. फिल्म मध्ये पाच पाच मिनिटाला प्रेमाचे सीन होते. आणि त्या पाच पाच मिनिटाला यांच्या मनात ती भावना जागी होत होती. पण तरीही फिल्म मध्ये ते गुंतून होते. आणि सापाने व्यक्तीला जखडाव तस शिवानी लाडात येऊन थंड श्वास भरून अभिजीतला कवटाळते आणि आणि त्याच्या हनुवटीला धरून त्याच्या दाढीवर बोट फिरवत त्याच्या वरच्या ओठांना आपल्या ओठात पकडते. आणि अभिजित त्या सरशी तिला जवळ ओढतो.( image by google ) 


१०

श्वासाने तर अगदी गती धरलेली. आता पुढे काय करायचं दोघांना काही बोलायची गरज नव्हती. निसर्ग नियमाप्रमाणे त्याचं प्रेम फुलत चाललेल. आणि त्या शेवटच्या चरण सुखानंतर दोघांच्यातल्या हि अंगातली ताकद गळाटली. आणि अभिजीतच्या अंगावर हात टाकून शिवानी झोपली. साहजिकच अभिजित आधी झोपलेला. आणि शिवानी त्याच्या अंगावर हात टाकून नुसती पडलेली. आणि त्याच्या ओठावरून , गालावरून छातीवरून हात फिरवत होती आणि त्याच नादात तिला हि झोप लागली.
सव्वा पाच वाजले आणि अभिजीतला जाग आली. बघतो तर शिवानी शांत झोपलेली. तिच्या अंगावर टाकलेला हात अलगद बाजूला घेऊन तो दबक्या पावलाने जाऊन फ्रेश होऊन येतो. आणि चहा बनवत ठेवतो.  आणि आत येऊन शिवानी जवळ जाऊन तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत तिच्या उशाशी बसतो आणि तिच्या केसात हात फिरवतो. स्पर्श झाल्यावर तिला जाग येते पण तरी झोपेत असल्याचा आव आणून ती त्याच्या मांडीवर डोक टेकवते आणि झोपते. तोही मग तिच्या केसात हात फिरवत राहतो. आणि मग तिच्या शर्टची वरची तीन बटण लावतो. आणि मग तिला उठवतो चहा प्यायला पण ती उठत नाही. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते. अभिजित कॉल उचलतो.
अभिजित : हेल्लो
प्रतीक्षा : हा अरे शिना कुठ आहे ?
अभिजित : झोपलीय का ग आला का तुम्ही ?
प्रतीक्षा : नाही अजून थोडा वेळ लागेल. तीच काहीतरी काम होत माझ्याकडे म्हणून कॉल केला तिन आधी करायला सांगितलेला.
अभिजित : हा थांब हा उठवतो तिला.
अभिजित : शिना उठ ते बघ प्रतीक्षा काय म्हणतेय काय काम आहे का तुझ ? तिन कॉल केलाय.
शिवानी डोळे उघडते आणि मोबाईल हातात घेते ,
शिवानी  : हा हेल्लो बोल
प्रतीक्षा : तू बोल काय काम होत ?
शिवानी : अभिजित चहा ठेवलायस का ? जा आटलं बघ.
अभिजित आत जातो.
शिवानी : हा ऐक न...
प्रतीक्षा : हा बोल.
ती काहीतरी प्रतीक्षाला सांगते मग शिवानी उठते. तेवढ्यात अभिजित चहा घेऊन येतो तिला.  आणि शिवानी पाहिला घोट पिते आणि स्वतःचा कप अभिजीतला देते आणि त्याचा कप घेते. दोघ रोज असच एकमेकांच कप घ्यायचे एक एक घोट पिऊन झाल कि. दोघांचा चहा पिऊन झाला.
अभिजित : कधी येतायत दोघ. ?
शिवानी : येतायत सहाला इथच. बर मी आवरते. तू तोवर पांघरुणाची घडी कर आणि कपडे बदल. आले मी.
अभिजित : हा आवरतो जा तु आवर. वेळ लागतो तुला.
शिवानी : जाते. 
परत कॉल येतो.
अभिजित : शिना कॉल आलाय प्रतीक्षाचा काय सांगू तिला ?
शिवानी  : थांब
आणि स्वतः येऊन कॉल उचलते ,
शिवानी : काय झाल ?
प्रतीक्षा : हा झाल काम.
शिवानी : ओकेच यार
प्रतीक्षा : आता आम्ही जातोय तिकड आणि मग येतो.
शिवानी  : हो चालेल. या मग.
कॉलकट होतो.
अभिजित : काय झाल ?
शिवानी : काही नाही असच.
अभिजित : बर.
दोघांच आवरून होईपर्यंत  वेळ होतो आणि अजिंक्याचा कॉल येतो. शिवानी बाहेर येते. आणि दारात अजिंक्य प्रतीक्षा येतात.
अभिजित : या कि आत.
अजिंक्य : नको अरे तूच चल बाहेर.
शिवानी : हेय प्रतु कशीयस?
प्रतीक्षा : मी मस्त आणि तू ?
अभिजित : अरे सारा कुठ आहे ?
प्रतीक्षा : अरे तिला शेजारी ठेवलय.
शिवानी  : ए काय ग अस , आणायचं ना तिला
अजिंक्य : नेक्स्ट टाईम नक्की आणेन. कशीयस शिना ?
शिवानी :  तू बोलू नकोस रे माझ्याशी ,
प्रतीक्षा : काग काय केल माझ्या नवऱ्याने ?
शिवानी : बरच काही केलंय पण आज माफ करतीय तुला समजल का रे आज्या.
प्रतीक्षा : होका ?
अजिंक्य : होका ? नाही बोल ना काय बोलायचं ते.
शिवानी : नाही आज मी खुश आहे तुमच्या दोघांवर.स्पेशली आज्या वर.
अजिंक्य : ओह. देव पावला तर.
शिवानी : नंतर पाऊ दे तुला तुझा देव. कॅडबरी आणलीस का ?
प्रतीक्षा : हो.
शिवानी : तू नको त्याच्या हातून दे. दे रे चल.
अजिंक्य तिला कॅडबरी देतो. ती लगेच फोडते. आणि एक बाईट अभिजीतला चारते. स्वतः दोन बाईट खाते आणि अजिंक्य प्रतीक्षाला हि देते एक एक बाईट.
शिवानी : अभी तुझी एक एक इच्छा मला पूर्ण करायची आहे. आपण लिस्ट बनवली आणि काहीच झाल नाही दोन दिवस तर आपले वाया गेले. पण त्या लिस्ट मध्ये न लिहिलेली इच्छा मी पूर्ण करणारे आज.
अभिजित : कोणती ?
शिवानी : अजिंक्य ?
अजिंक्य अभिजितच्या हातात चावी देतो. आणि उजवा हात बाजूला करून खुणावतो.
अभिजितच हृदय धड-धड करत असत. अभिजित घाईतच गाडीजवळ जातो. ती गाडी असते अभिजीतला आवडणारी. अगदी तशीच पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर. आणि त्याला आवडणारा सात नंबर हि गाडीला असतो. एम.एच.बारा. ए.डी. बहात्तर सत्तर.
अभिजित आत जाऊन सीट वर बसतो. आणि गाडी सुरु करतो. आणि पुढ वरच्या आरशात बघतो. आणि भांग पडतो. आणि बाजूला बघतो तर. अजिंक्य प्रतीक्षा शिवानी गाडीच्या बाहेर उभे असतात अभिजितला बघत. तो बटण दाबतो आणि गाडीची दार अनलॉक होतात. अभिजित अजिंक्य शेजारी बसतो. आणि माग शिवानी प्रतीक्षा.
शिवानी पुढ आरश्यातून अभिजीतचा आनंद बघत असते. आणि रडायला लागते. जरासच. प्रतीक्षा तिला जवळ घेऊन डोळे पुसते.
अजिंक्य : चालव.

आणि मग अभिजित गाडीचा पहिला गेअर टाकतो आणि मग ते निघून जातात.    Related image
( image by google )

११

अजिंक्य : हा घे इकड साईडला.
अभिजित गाडी बाजूला घेऊन थांबवतो.
अजिंक्य : शिना तुम्ही दोघी जाऊन आत टेबल बघा आम्ही आलोच गाडी पार्क करून.
शिवानी : चालतय.

त्या दोघी आत गेल्या. अभिजितने गाडी निट पार्क केली. आणि दोघ हॉटेल मध्ये निघाले.
अभिजित : अजिंक्य भावा खूप भारी वाटतय, खूप दिवस मला चालवायची होती हि गाडी.
अजिंक्य : आधी नाही का सांगायचं. खूप मित्र आहेत माझे श्रीमंत, असतात त्यांच्याकड सगळ्या गाड्या. अजून कोणती चालवायची आहे का बोल ? ऑडी , मार्स्डीज , पोर्श ?
अभिजित : नाही त्या नाही. हीच चालवायची होती इंडियन कार.
अजिंक्य : अरे तो परेश म्हणून एक आहे माझा मित्र त्याच्याकड अस्टीन मार्टिन आहे.
अभिजित : मस्तच. सिगरेट मारायची का ?
अजिंक्य : नाही मी नाही करत आता ते.
अभिजित : वाहिनी खूप दम देतात वाटत तुला.
अजिंक्य : नाहीरे अस काही नाही पण कस आधी ती जवळ नव्हती मग तिची आठवण विसरायला कधी कधी सिगरेट दारू चालायचं आता आहे ना ती सोबत मग कशाला स्वताची मी वाट लाऊन घेऊ ? तिच्यासाठी जगायचं आहे मला. मला नाही आवडणार मला काय झाल तर तिच्या आधी. सो नको. आणि तू पण नको ओढू चल आत नाहीतर ओरडा खाशील शिना चा.
अभिजित : खूप प्रेम आहे काय रे तुझ प्रतीक्षा वर ?
अजिंक्य : हो खूप न मोजता येईल इतक , शब्दात सांगता येणार नाही इतक. जमिनीपासून चंद्रापर्यंत किंवा त्याहून पुढ जास्त प्रकाशवर्ष इतक सार प्रेम आहे माझ प्रतीक्षावर............. चल आत जाता.
अभिजित : अरे तू चान्स नाही घेतला ?
अजिंक्य : कसला चान्स ?
अभिजित : बाळाचा ?
अजिंक्य : नाही. आहे ना आता सारा. उगीच कशाला.
अभिजित : हो पण ती थोडीच तुझी आहे ? ती तर तिच्या पहिल्या नवऱ्याची आहे ना.
अजिंक्य : हो पण मी अमित गेल्यावर प्रतीक्षाला स्वीकारताना मी पहिलं साराला स्वीकारलं होत आणि मग प्रतीक्षाला म्हणून या आमच्या नात्यात मी पहिलं महत्व साराला देतो मग प्रतीक्षाला.
अभिजित : भारी. मग नकोच का तुला तुझ ? कोण मुलगा ऑर मुलगी ?
अजिंक्य : नाही गरज नाही. सारा माझीच आहे.
दोघ आत पोचतात.

प्रतीक्षा : काय करत होता इतका वेळ. वेटर दोन वेळा ऑर्डर विचारयला येऊन गेला.
अजिंक्य : काही नाही जरा बोलत बसलेलो.
शिवानी : मग आत येऊन बोलायचं आम्हाला पण कळू दे तुमच सिक्रेट
अजिंक्य : अग सिक्रेट वैगरे काही नाही. जस्ट तो असच विचारत होता. बर बोला काय ऑर्डर करायचं ?
शिवानी : स्प्राईट मागव चार पाहिलं आणि चार फ्राय पापड.
आभिजीत : मला मसाला पापड.
वेटर : काय देऊ सर ?
शिवानी : तीन फ्राय पापड ,एक मसाला पापड आणि चार स्प्राईट . आणि स्टार्टर ?
अजिंक्य : नॉनव्हेज खायचं आहे ना ?
शिवानी : प्रतु , डायरेक्ट जेवण मागवू परत मग जात नाही जेवण.
प्रतीक्षा : हा तेच म्हणणार होते. उगीच सगळ उरत थोड थोड.
शिवानी आणि प्रतीक्षा ठरवतात आणि मग ऑर्डर देतात.

शिवानी : हा घ्या चार बटर नान.
अजिंक्य : मला एक रोटी. फक्त कडक द्या.
शिवानी :  बर तीन बटर नान , एक कडक रोटी. एक हाफ मटन मालवणी.
वेटर : बस  ? अजून काय
प्रतीक्षा  : नको लागल कि सांगतो. फक्त आधी पापड आणि स्प्राईट पाठवा.
वेटर : हो मॅडम
अभिजित : शिना इकड येणा शेजारी.
शिवानी : आहेस न अजिंक्य जवळ बस कि मग.
अजिंक्य : नको ये इकड बस नवऱ्या जवळ. मी जातो माझ्या बायको जवळ.
दोघ जागा बदलतात. प्रतीक्षा जवळ अजिंक्य आणि शिवानी जाते अभिजित जवळ.
प्रतीक्षा : बाकी कस चाललंय तुमच ?
शिवानी : ठीक.
प्रतीक्षा : पाच सहा महिने झाले काही कॉल नाही फेसबुकला मेसेज नाही का बर अस ?
शिवानी : अग अभीच फक्त व्हाटसप चालू आहे तेपण त्याला त्यातून वेळ मिळत नाही. मितर सगळ अनइंस्टोल केलंय. एकतर आत्ता मध्यंतरी सलग पाच फिल्म आलेल्या रोटो ( व्ही.एफ.एक्स. ) साठी. त्यामुळे इतका लोड होता कामाचा. संध्याकळी गेल कि सकाळी कितीला घरी जाऊ काही हातात नव्हत. त्यात हा असा आजारी पडतो सारखा. त्यामुळे कुणाशी जास्त संबंधच नाही आला. जो-तो गरज पडली तर कॉल करायचा मग तेवढच बोलन व्हायचं आमच. आणि तुम्हाला तर काय आमची आठवणच नाही आणि गरज पण नाही होणा ? लग्न केल पण बोलावल नाही.
अजिंक्य : अग ओळखीच्या वकिलाकड रजिस्टर केलय.मोठ नव्हत केल.

शिवानी  : हा मग ? आलो असतो आम्ही नाही म्हंटल नसत आणि लग्न झाल ठीक आहे, पण नंतर तरी सांगायचं एक महिन्यान मला कळाल ते पण बाहेरून.
प्रतीक्षा : कुणाकडून ?
शिवानी : नयना कडून.
प्रतीक्षा : कोण नयना.
शिवानी : हिला माहित नाही का ?
अजिंक्य : नाही. जाऊ दे ना.
प्रतीक्षा : सांग कि.
शिवानी : अग ती नयना कॉलेजला असताना याच्यावर खूप प्रेम करायची. तिच्या पाठीवर अजून याच्या अजिंक्य नावाचा टॅटू आहे.
प्रतीक्षा : मला बोलला नाही हा कधी.
अजिंक्य : ती माझ्यावर प्रेम करायची आणि मी तुझ्यावर.
प्रतीक्षा : अजून हि करतोस. माहित आहे पण सांगायचं ना.
अजिंक्य : ए बाबा शिना खाऊ दे सुखा सुखी.

शिवानी आणि प्रतीक्षा अभिजित हसायला लागतात.
वेटर : मसाला पापड कुठे देऊ ?
अजिंक्य :  समोर द्या.
वेटर पापड देऊन स्प्राईट ग्लासात ओतून देतो आणि मग थोडा पापड आणि स्प्राईट पिऊन. सगळे पुढे बोलायला लागतात.( bengali girl imagee by google )१२

अभिजित : मग अजून काय म्हणतोस अजिंक्य. कस चाललय काम ?
अजिंक्य : हा चालल आहे. एक हिंदी सिरीयल लिहितोय येईल पुढच्या महिन्यात टीव्हीवर.
शिवानी : ओह , thats ग्रेट. अस हि तुझ स्वप्न होतच तू लिहिलेली एखादी सिरीयल यावी टीव्ही वर फायनली आली.
प्रतीक्षा : पहिली नाही दुसरी आहे हि. अजून एक सुरु आहे आत्ता टीव्हीवर.
शिवानी : मग तू काय टीव्ही बघतच नसशील. हा लिहितानाच वाचत असशील स्क्रिप्ट होणा ?
प्रतीक्षा : नाही ग वाचण्यापेक्षा बघण्यात मजा आहे. आणि हा भूतासारखा रात्री लिहितो. तीन ते पाच मी कुठ जागत बसू. काम असतात मला सकाळी परत हा असतो पडून बारा-एक पर्यंत.
शिवानी : मग कुठ गेला होता का लग्नानंतर ?
अजिंक्य : हो गेलेलो.
शिवानी : कुठ मनाली ?
प्रतीक्षा : नाही.
अभिजित : शिमला ?
प्रतीक्षा : नाही.
शिवानी : हिमाचल ?
अजिंक्य : नाही.
शिवानी : मग काय महाबळेश्वर , पाचगणी ?
प्रतीक्षा : मिलान.
अभिजित : काय ?
अजिंक्य : अरे हा इटलीला गेलेलो. दोन आठवडे होतो तिथ.
शिवानी : मजा आहे.
प्रतीक्षा : हा मजा तर आहेच असा नवरा भेटला मला आणि मजा पण केली आम्ही तिथ .
अजिंक्य : कितीदा सांगू तुला ग , नवरा नवरा नको म्हणू मला म्हातारे झालोय का आपण अहो जाहो करायला.
प्रतीक्षा : सॉरी.
प्रतीक्षा : तुम्ही कुठ गेलेला का ?
अभिजित : बेडरूम.
शिवानी : होना आणि तिथून बाथरूम.
प्रतीक्षा :  म्हणजे ?
शिवानी : काय अग सुट्टी टाकली तर मिळालीच नाही सुट्टी मला. आणि अभिजितला मिळाली.
अभिजित : मी एकट जायचं होत का?
प्रतीक्षा : मग परत जायचं ना ?
अभिजित : वेळ नाही मिळाला कामातून.
अजिंक्य : अरे मग आत्ता जावा. अस हि सुट्टी घेतलीय ना तुम्ही?
शिवानी : नाही ती वेगळ्या कामासाठी आहे.
अजिंक्य : कसल्या ?
प्रतीक्षा : हा तू काय तरी काम सांगणार होतीस मला, तुला माझी मदत हवी होती न ? सांग
शिवानी : वेळ आली कि सांगेन आत्ता नको.
प्रतीक्षा : का ?
शिवानी : असच.
तेवढ्यात वेटर सगळ जेवण घेऊन येतो. आणि वाढतो. सगळे अगदी उपाशी. त्यामुळे आल्या आल्या सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि मग जेव्हा सगळ्यांच्या ताटातली रोटी ,नान संपली तेव्हा नवीन ऑर्डर येईपर्यंत सगळ्याचं बोलण परत सुरु झाल.

अजिंक्य : पण मला एक कळत नाही तू हिला कस काय पटवलस ?
अभिजित : नाही बाबा असल काही केल नाही मी. हिला रूम नव्हती रहायला सो मग मी माझ घर शेअर केल हिच्यासोबत. 
शिवानी  : आणि रूम सोबत कधी माझ मन याच्यासोबत शेअर झाल डोंट नो.
अजिंक्य : तरी नशीब तुला मराठी येते. काय ग नाहीतर कसले हाल झाले असते बिचाऱ्याचे.
प्रतीक्षा : होणा .
शिवानी : अरे आधी मी मुंबईला होतेच कि कंपनीत तिथ चालायची हिंदी मग माझी एक मैत्रीण झाली तिथ. ती प्रॉपर साताऱ्याची होती. आणि तिची ती सातारी भाषा ऐकून ऐकून तोडक मोडक मला जमायला लागली मराठी. तिथून मग पुणे मग गोवा आणि परत मुंबई अशा कंपन्या बदलत,एक्सपीरीयंस घेत घेत मी इथ आले. त्यामुळे जाईल तिथ मराठीचा संबंध यायचाच. सो आता जमते मला. मराठी. विथ इंग्लिश , हिंदी , गोवण भाषा आणि माझी मेन बंगाली भाषा.

अजिंक्य : होय रे अभी , पण हीच नाव शिना आहे ना ? मग शिवानी कस ?
अभिजित : काय सांगू , एकतर घरात आई नाही मला ना बाबा, बाबांचा भाऊ म्हणजे काका माझा. त्याच्याकड मी आधी रहायला होतो. त्याचा पहिल्यापसून माझ्यावर डोळा होता. आणि त्यात त्याला कळाल आमच चालू आहे. चालू आहे म्हणजे तेव्हा शिना फक्त रूम मध्ये रहायला होती. तेव्हा आमच्या दोघांच्या हि मनात काहीच नव्हत पण ते त्यांना कोण सांगणार ? त्यात जातीचा प्रॉब्लेम. आणि जागेचा पण  कोलकत्त्याची आहे हि. म्हणजे इथली पण नाही. म्हणून एकदा काका आले रूम वर तेव्हा ओळख करून दिली आणि घाईत बोलून गेलो मी हि मुंबईची आहे आणि हीच नाव शिवानी आहे. झाल. शिनाची शिवानी झाली. एकाच सेकंदात. आणि शिना भट्टाचार्या लग्नानंतर शिवानी अभिजित मराठे झाली. इट्स सिम्पल स्टोरी. यु लाईक इट ?
प्रतीक्षा : मस्तच.
अजिंक्य : होणा.
प्रतीक्षा : बाळाचा विचार आहे का नाही ?
अभिजित : विचार करायच्या आधीच विचार जन्माला येईल आता.
अजिंक्य- प्रतीक्षा : म्हणजे ?
शिवानी  : प्रेग्नेंट आहे मी ऑलरेडी टू मंथस झाले.
प्रतीक्षा : वाह आता तर पार्टी हवी.
अजिंक्य :  आणि मला तुझ्याकडून हवी अभी,
अभिजित : देऊ ना आजच जेवण माझ्याकडून,.
प्रतीक्षा : ए नाही हे खास जेवण आमच्याकडून आहे.
शिवानी : काय हव मग ?
प्रतीक्षा : काही नको. काळजी घे फक्त तू. आणि तू रे काम नको करायला लाऊ तिला जास्त नाहीतर बघच. स्वताचे स्व्तः कपडे उचलत जा. पण ना खूप गोर गोरपाण होणारे बाळ तुमच तुझ्यासारखच.
शिवानी : काय माहित. नशिबात असल तस होईल.
अभिजित : अस का बोलतीस?
अजिंक्य : हा रे ?
शिवानी  : काही नाही.
प्रतीक्षा : हा शेजारी रोटी बाकी सगळीकडे नान द्या.
वेटर : आणि अजून काय ?
अजिंक्य : कुणाला नान अजून ?
सगळ्यांनी नकार दिला.
अजिंक्य : बर मग दोन फुल जीरा राईस. आणि अजून चार फ्राय पापड आणा.
वेटर  : हा. मसाला पापड नको ?
अभिजित : नको.

वेटर जातो. परत सगळे खाण्यात व्यस्त.( image by google )१३

प्रतीक्षा : मग तुम्ही एकत्र आलात, एकत्र राहायला होता म्हणून होणा ? जॉब प्लेस सेम होत अस काही नाही ना ?
शिवानी : नाही. अस काही नाही. एकत्र राहत होतो आम्ही हे निमित्त झाल. पण याच्या प्रेमात पडण्याच कारण दुसर आहे.
प्रतीक्षा : काय आहे अभिजित ?
अभिजित : मला नाही माहित ?
प्रतीक्षा : काय ? आपली बायको आपल्यावर का प्रेम करते माहित नाही ? किंवा आपल्यातल तिला काय आवडत माहित नाही असा कसा रे तू ?
शिवानी : त्याच्यातल मला काय आवडत हे त्याला माहित नाही कारण त्याची ती गोष्ट फक्त मलाच माहित आहे.
प्रतीक्षा : कोणती ?
शिवानी : सांगेन तुला नक्की नंतर.
प्रतीक्षा : आज रात्री ?
शिवानी : हो कॉल लावेन रात्री.
प्रतीक्षा : चालेल.
अभिजित : कॉलवर का ?
अजिंक्य : होना ? आणि फक्त तिलाच का मला पण सांग कि....
वेटर  : सर राईस ?
अभिजित : हा.
सगळ्याचं जेवण होत. आणि सगळे बाहेर पडतात. सगळे गाडीत बसतात.
अभिजित : चालवू ?

अजिंक्य : हो चालव ना.
मग ते अभिजित शिवानीच्या घराजवळ येऊन थांबतात. मग अभिजित उतरतो. अजिंक्य त्याच्या जागेवर जाऊन बसतो.
आणि प्रतीक्षा पुढे येऊन बसते. अजिंक्यशेजारी.
अभिजित : या परत वेळ काढून.
प्रतीक्षा : हा आम्हीच येतो. तुम्हाला काय यायला नको.
शिवानी : येऊ नक्की.
प्रतीक्षा : हम. बर निघू ? अजून हि गाडी देऊन परत घरी जायचं आहे आणि साराला जेवण द्यायचं आहे.
अभिजित-शिवानी : हा चालेल.
शिवानी : पोचलात कि कॉल कर.
प्रतीक्षा : नक्की
अजिंक्य : चल शिना, अभी जातो रे....
अभिजित : हा. बाय.
अजिंक्य : टाटा...

आणि ते निघतात. अभिजित शिवानी हि घरात कुलूप उघडून जातात. शिवानी कपडे बदलत असते. अभिजित तोंड धुतो. मग शिवानी हि तोंड धुवून झोपायला जाते. तोपर्यंत अभिजित झोपून गेलेला असतो. शिवानीला हि डोळा लागणार तेवढ्यात मोबाईल व्हाईब्रेट होतो. ती कॉल उचलते.
शिवानी : ( हळू आवाजात ) एक मिनिट
प्रतीक्षा : बर. झोपलीस का ?
शिवानी : हा आता बोल. नाही ग अभी झोपलाय ना त्याची झोप मोडेल सो आले हॉलमध्ये.
प्रतीक्षा : काही नाही आत्ता मगाशी आले. सारा जेवलेली. सो मग तिला फक्त झोपवल. आणि अजिंक्य पण झोपला. आता तो उठेल तीनला स्क्रिप्ट लिहायला. मग मी टेरेसवर आले म्हंटल जरा चालावं आणि तुला कॉल करावा.
शिवानी : खूप मस्त वाटल आज खूप दिवसांनी आपण भेटलो. आणि अभीसाठी गाडी आणली ती. खूप खुश होता. किती वेळ मला सांगत होता कस वाटल त्याला गाडी चालवून.
प्रतीक्षा : होका. करणारच ना. मित्रांसाठी केल तर काय त्यात एवढ. आमची असती तर आठवडाभर अभिलाच दिली असती चालवायला. पण अजिंक्यने इनोव्हा घेतली.
शिवानी : नाही पण खरच बर वाटल त्याला. तुमच्यामुळे त्याला आनंद मिळाला आणि काही दिवस ज्यादाचे मिळाले त्याला.
प्रतीक्षा : म्हणजे ?
शिवानी : ..............
प्रतीक्षा : काय झाल शांत का ? रडतीयस का ? शिना ? शिना?
शिवानी : ऐक , मी अभी सोबत राहायला होते. त्या नंतर मी गावाला गेलेले. तिथून मी आले. तर त्याची सगळी सवय बदललेली. मग परत त्याला मी सवय लावली. पण एकदिवस त्याला चक्कर आली.
प्रतीक्षा : कशी ?
शिवानी : अंघोळ करायला गेला आणि बाहेर आला आणि पडला खाली. माझ आवरायचं चाललेल. मी कपडे घेऊन आत निघाले म्हंटल आता मी करावी अंघोळ. पण दारात अभी पडलेला बघून खूप भीती वाटली मला. त्यात त्याची तब्येत आहे. सो मला तो उचलत नव्हता. कुणाला बोलवायचं समजत नव्हत मला. मी त्याला तिथच खाली ठेवून डॉक्टरांना कॉल केला ते आले आणि मग हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही त्याला. त्यांनी त्याच्या टेस्ट घेतल्या आणि. मग सोडल. आणि मला एका आठवड्याने रिपोर्ट दिले.
प्रतीक्षा : काय झालेलं त्याला ?
शिवानी  : काही झाल नाही.
प्रतीक्षा : नशीब.
शिवानी  : अजून आहे.
प्रतीक्षा : काय ?
शिवानी : कॅन्सर.
प्रतीक्षा : का.................य ?
शिवानी : हो. तीन वर्षाच आयुष्य आहे त्याच.
प्रतीक्षा : अस कस ? ऑप्शन नाही का काही वाचवण्याचा त्याला ? तुझ काय ?
शिवानी  : नाही. वाचला असता पण ड्रिंक मुळ अजून इफेक्ट झाला त्याच्यावर आणि आउट ऑफ कंडीशन झालीय.
प्रतीक्षा : मला का कॉल केला नाही इतक्या दोन वर्षांत ?  इतक सगळ घडल आणि ? तू सांगितल नाहीस ? का सांगावस वाटल नाही तुला. रडू नको शिना. मला तिथ सांगायचं ना मगाशी.
शिवानी : अभी समोर ? त्याला अजून हे माहित नाहीये.
प्रतीक्षा : काय ?
शिवानी : हो त्याला मी खोटे रेपोर्ट फोटोशॉप वर बनवून प्रिंट काढून दाखवलेत.
प्रतीक्षा : मग आता ?
शिवानी : मी त्याची इच्छा ,प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं बघतेय. ज्याने करून तो मरताना तरी निट जाईल. मला नको वाटतय हे सांगाययला पण. मला का सोडून जातोय तो? मला माहित होत पुढ हे सगळ होणार पण तरीही मी त्याच्यावर प्रेम केल. कारण....
प्रतीक्षा :  कारण ?
शिवानी : कारण.... मला.( image by google )१४

शिवानी  : हेल्लो .... हेल्लो. शीट यार.....
प्रतीक्षा : हेल्लो ?
शिवानीच्या मोबाईलची BATTERY संपते. मोबाईल स्वीच ऑफ होतो. शिवानी जाऊन चार्जिंग लावते.
थोड्यावेळाने दहा टक्के चार्जिंग होत आणि शिवानी मोबाईल घेऊन बाहेरच्या हॉल मध्ये येत आणि प्रतीक्षाला कॉल लावते.
शिवानी : हेल्लो , सॉरी अग चार्जिंग संपल होत.
प्रतीक्षा : आहे का आता चार्जिंग ?
शिवानी : हा आहे थोड दहा टक्के.
प्रतीक्षा  : हा बोल. काय सांगत होतीस.
शिवानी : ऐक ना. अभी म्हणत होता त्याला अनाथ आश्रमात जायचं आहे.
प्रतीक्षा : हा मग जाऊ ना आपण उद्या.
शिवानी  : त्याला लहान बाळ आवडत पण ?
प्रतीक्षा : पण काय ?
शिवानी : नाही काही.
प्रतीक्षा :  सगळ सांग ग मला तू काही लपवू नकोस. आधीच खूप साठवल आहेस तू मनात. आणि अस काही ज्याच्यातून सुटायला आता मार्ग नाही. आणि अजून काय काय आहे तुझ्या मनात आणि डोक्यात काही कळत नाही मला.
शिवानी :  काही नाही जे सांगितल तेवढच आहे. अभिजीतला कॅन्सर झाला हे फक्त तुला मला आणि त्या डॉक्टरला माहित आहे. या पुढे मी काय करू सांग ? आणि आता विचार करून पण काही होणार नाहीये.
प्रतीक्षा : ऐक माझ्याकडे राहायला येत का तुम्ही ? जरा बदल झाला तर अभिजीतला पण बर वाटेल आणि अभिजित हि नीट राहील आणि सारा आहेच. तीच्याशी खेळेल. बोलेल. काय म्हणतेस ? येतीस का ?
शिवानी : हो दुपारी येईन.
प्रतीक्षा : हा कपडे वैगरे घेऊन ये. आपलच आहे घर समजल का ? अस समजून ये.
शिवानी : हो बर चार्जिंग उतरलं परत पाच टक्के झाल.
प्रतीक्षा : हा लाव चार्जिंगला उद्या भेटू.
शिवानी : बाय टेक केअर
प्रतीक्षा : हो तू पण काळजी घे. बाय.
शिवानी कॉल कट करते आणि चार्जिंग लाऊन अभी जवळ जाते. अभिजीतच्या डोक्याखालची उशी स्वतच्या डोक्याखाली घेते आणि अभिजितच डोक आपल्या हातावर घेऊन त्याला छातीशी ओढते आणि झोपते. इकड प्रतीक्षा हि अजिंक्य जवळ जाते. अजिंक्य साराला जवळ घेऊन झोपलेला असतो. प्रतीक्षा त्याच्या मागे जाऊन झोपते. प्रतीक्षाजवळ आल्याची चाहूल त्याला लागते. आणि तो कूस बदलून प्रतीक्षाकडे बघतो आणि ओठांना कीस करायला जातो पण झोपेत तिच्या नाकाला आपले ओठ टेकवतो. आणि मग परत उजवा डोळा उघडून बघतो आणि मग तिच्या ओठांना आपले ओठ टेकवतो. आणि तिला जवळ घेतो.
इकड रात्रीचे अडीच वाजले असतील. शिवानी गाढ झोपलेली असते. आणि अभिजीतला कसल तरी स्वप्न पडत. स्वप्न संपत आणि अभिजीतची झोप हि मोडते. तो उठतो. अंदाज घेतो. शिवानी झोपली होती. मग आत जाऊन त्याने फ्रीज मधल पाणी प्यायल. आणि आता काय कराव म्हणून तो शिवानीपाशी आला. तिच्या उशी जवळचा चार्जिंगला लावलेला मोबाईल घेतला. आणि टेबलवरचा हेडफोन घेतला आणि गाण लाऊन बारीक आवाजात तो झोपला. गाण ऐकता ऐकता आता त्याला झोप लागली. थोड्या वेळाने त्याने कूस बदलली आणि त्याला कानातला हेडफोन रुतला. आणि कान दुखायला लागला. आणि त्यान हेडफोन त्या कानातून काढायला कूस बदलली आणि तेवढ्यात एक नवीन गाण लागल........... नवीन.
कोणत ?

शिवानीच्या मोबाईल मध्ये ऑटो कॉल रेकॉर्ड व्हायचा. आणि ते रेकॉर्डिंग म्युझिक मध्ये सेव्ह व्हायचं. आणि नेमक मगाशी झालेलं बोलण शिवानी आणि प्रतीक्षाच ते रेकॉर्डिंग सुरु होत आणि अभिजित ते सगळ ऐकतो.

( image by google ) १५

सकाळी अकरा वाजता. शिवानी आवरून तयार होती. आणि अभिजित आत बाथरूम मध्ये होता. अंगावर पडणाऱ्या पाण्याचा काहीही त्याला स्पर्श जाणवत नव्हता. घुमत होता आवाज वर वर नाही एकदम कानाच्या पडद्याजवळ कालच्या रेकॉर्ड झालेल्या कॉलचा. कस तरी त्या विचारातच सगळ उरकून अभिजित बाथरूम बाहेर आला. आणि कपडे घातले. बाहेर येऊन खुर्चीवर जाऊन बसला. शिवानीला त्याची चुणूक लागली. आणि तिने त्याला कॉफी दिली. कॉफी घेऊन तो त्याच्याच नादात प्यायला लागला.
शिवानी : ऐक ना अभी. मी आपले कपडे भरलेत आपण जायचय.
अभिजित : कुठ ? आणि का ? कशाला ?
शिवानी : हो हो. सांगते पण मला सांग तुझ लक्ष कुठ आहे. मगाशी बघितल मी बाथरूम मधून आलास कमरेला नीट टॉवेल नव्हता बांधला. कानामाग साबण तसाच लागलेला. आणि आता
अभिजित : ते असच.. जरा अस काही नाही. आणि आता काय म्हणालीस ?
शिवानी : टी-शर्ट मस्त घातला आहेस माझ्या आवडता काळा. एक दम बॉडीगार्ड मधला सलमान दिसतोयस.
अभिजित : होका ?
शिवानी : पण.
अभिजित : पण ?
शिवानी : पण
अभिजित : पण काय ?
शिवानी : पण उलटा घातला आहेस बघ जरा.
अभिजित : हम.
शिवानी : हम?
अभिजित : हम हम.
शिवानी :  हम. हम
अभिजित : हम..हम...हम.. ह्म्मम्म्म्मम्म्म.
शिवानी : ओ... हमच स्पीड कमी करा. पडाल. जा आधी नीट कर तो शर्ट. आणि आवर निघता.
अभिजित उठून शर्ट नीट घालतो. आणि थोड्यावेळाने ते निघतात. आणि अजिंक्य प्रतीक्षाच्या घरापाशी थांबतात. आणि मग ते घरात जातात.
प्रतीक्षा : काय घेणार ?
अजिंक्य : ये अभी बसता आपण आत.
प्रतीक्षा : का काय झाल बसा कि सोबत बाहेर ?
अजिंक्य : नाही तुम्ही बससा बोलत. आम्ही आत बसतो फिल्म बघत.
शिवानी : हा जा अभी.
सारा : मम्मी ? हि शिवानी काकू ना ?
शिवानी :  हो. काकू नको मामी म्हण. आवडेल.
सारा : शिवानी मामी. मी बघ कस काढाल चित्र . कसय ?
शिवानी : मस्त... हे बघ तुला काय आणल मी ? तुला आवडत का चोकोलेटस ?
सारा : नको.
शिवानी :  का ग बाळा ? खूप छान आहे.
सारा : नको.
शिवानी : का मम्मी ओरडते का ?
सारा : नाही. पप्पा.
शिवानी : पप्पा आत आहे धर लवकर ये इकड आपण खाता पटकन कळणार पण नाही पप्पाला.
सारा शिवानी जवळ जाऊन बसते. आणि शिवानी तिला खायला देते.
इकड आत अभिजित आणि अजिंक्य बेडरूम मध्ये जातात आणि अजिंक्य दार लॉक करतो आणि दोघ बसतात बोलत.
अजिंक्य : काय झाल मला मेसेज केलास रात्री ते पण इतक्या लेट ?
अभिजित : हो. मी मरणार आहे.
अजिंक्य : काय ? म्हणजे समजल नाही मला.
अभिजित : कॅन्सर आहे मला यार.
अजिंक्य : कितवी स्टेज ?
अभिजित : ऑउट ऑफ स्टेज आहे .
अजिंक्य : तिसरी का ?
अभिजित : झालीय केव्हाच ती.
अजिंक्य : अरे हे काय बोलतोय तू अभी ? इकड ये तू .
अभिजित त्याच्या जवळ खुर्ची घेतो आणि अजिंक्य त्याच्या हाताला हातात धरतो आणि अभिजित घट्ट त्याचा हात धरतो. आणि त्या स्पर्शाने अजिंक्याच्या डोळ्यात पाणी येत.
अभिजित : काहीच केल नव्हत रे मी पाप कधी. तरी पण माझ्याच नशिबात अस.
अजिंक्य : नाहीरे तू खूप चांगला आहेस. ओळखतो ना मी तुला . अस काही नको मनात आणू.
अभिजित : लहानपणापासून नुसत सोसल. हा सगळ्यांना असत दुखः पण मीही ते सोसलं कधी तरी माझ चांगल होईल म्हणून. आई गेली निम्म्यात सोडून मला. बाप असून उपयोग नव्हताच. पण तरीही त्यांचा आधार हवा होता पण त्यांनी पण फसवल मला. यातून सावरत घेतल काकांनी. पण त्यांनी पण बाबा सारख वागायला सुरुवात केली. त्यातून सगळ पार करून मी माझी गाडी घेतली. टू-व्हीलर साठी तरसत होतो पण पहिली कारच घेतली. भाड्याच का होईना घर घेतल माझ मी. सेल्फ राहायला लागलो मी. शिवानीवर जीवापाड प्रेम केल.कधी कुणाला फसवल नाही. आणि मिळाल काय बदल्यात ?
अजिंक्य : नाही रे अस काही नाही होणार तुला ? आणि तुला कोणी सांगितल हे.
अभिजित : शिवानी आणि प्रतीक्षाला माहित आहे. आणि आता तूला.
अजिंक्य : तू नको रे काळजी करू मी आहे. सिगरेट ?
अभिजित : तेच बोलणार होतो.
अजिंक्य दार उघडून बाहेरच्या खोलीत जातो. बाहेर सारा शिवानी प्रतीक्षा बसलेले असतात.
प्रतीक्षा : कुठ चाललास ?
अजिंक्य :  आलो जरा काम आहे.
सिगरेट घेऊन हळूच अजिंक्य निट येतो आणि आत जातो. दार लाऊन घेऊन पंखा लावतो. दोन्ही खिडक्या उघडतो. आणि मग दोघ एकच सिगरेट ओढतात. सिगरेट ओढता ओढता ,
अभिजित : मला माझ आता वाईट वाटतय अजिंक्य.
अजिंक्य : का ?
अभिजित : मी प्रेम केल स्वप्न दाखवली ती आम्ही मिळून रंगवली. तिच्यासोबत बेड शेअर केला झोपायला आणि तिने तिची बॉडी हि शेअर केली मला... मला हव तितक तिच्यावर प्रेम करायला.हे माहित असून पण कि मी मरणार आहे. लग्न केल. माझ बाळ पोटात वाढवतीय पण आता काय ? मी जाणार तिला सोडून. एक प्रकारे फसवलच ना मी तिला.
अजिंक्य : नाही तू नाही फसवल.
अभिजित : याची सल मला कायम राहील. निदान मी जिवंत असे पर्यंत. काल रात्री शांत झोपलेल्या शिवानीला बघून तिची निरागसता मावता मावत नव्हती मनात. किती प्रेम करते ती माझ्यावर.
बाहेरच्या खोलीत.

शिवानी : काल अभिजीतला गाढ झोपलेलं बघितल मी. किती निश्चिंत होता. गाढ शांत झोपलेला. मी जवळ गेले तर माझ्या अंगावर हात टाकून झोपला त्या स्पर्शात ना प्रेम जाणवल मला. किती प्रेम करतो न माझ्यावर अभिजित प्रेम मलाच माहित आहे. 

( image by google )  १६

अभिजित : हिशोब कसा चुकवू मी ?
अजिंक्य : कसला ?
अभिजित : शिनाला दिलेल्या त्रासाचा. माझ्या सोबत रहायला आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती घर सांभाळत आलीय. मी भाड घेतल नाही तिच्याकडून हे खर असेल हि तीच कारण पण नंतर माझ्यावरच्या प्रेमापोटीच केल ना तिने सगळ ? किती हिशोब आहे ? न मोजता येईल इतका. आणि मी काय दिल तिला ? मोजक प्रेम. आता मी जाणार. न मोजता येणाऱ्या तिच्या प्रेमाच्या बदल्यात माझ हे अर्धवट मोजक प्रेम दिल मी तिला. अजिंक्य खूप पाप केली म्हणून मी म्हणून जन्माला आलोय असल दळभद्री नशीब घेऊन.
अजिंक्य :  अरे अस काय बोलतो तू. असल काही नसत. तुझी काय चुकी आहे का मला सांग ? आणि हा कॅन्सर काय कुणाला हि होतो. आणि सारख जाणार-जाणार काय म्हणतोस मी आहे ना. सोबत. शिवानी, प्रतीक्षा सगळे आहेत. कुठ जाणार नाही तू. आणि आम्हीहि कुठ जात नाहीये समजल का ?
अभिजित : बर ते सोड तुझ कस चालल आहे काम ?
अजिंक्य : खूप टेन्शन आहे रे कामाच. सकाळी द्यावी लागते स्क्रिप्ट आठ वाजता. रात्र रात्र जागाव लागत खूप खूप टेन्शन आहे.
अभिजित : होईल ठीक सगळ नको घेऊ टेन्शन.
अजिंक्य : हम.
अभिजित : गेल का ?
अजिंक्य : काय ?
अभिजित : टेन्शन ?
अजिंक्य : नाही.
अभिजित : टेन्शन घेऊ नको होईल सगळ ठीक म्हणून पुढच्याच टेन्शन कमी नाही होत समजल ना ? तसच तुम्ही सोबत आहात शिनाच माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी मरायचा वाचणार नाही.
अजिंक्य : प्लीज बस कर हे तू अजून नसताना त्रास ओढून घेतोयस स्वतःवर.
अभिजित : आधी माहित नव्हत आता माहित झालंय. नाही सहन होत आणि गप्प, शांत बसता येतहि नाहीये  मला. कारण असहि मी बोलून काहीच होणार नाही. शिवानी म्हणाली माझ्याकड कमी दिवस आहेत. पण किती माहित नाही. आणि जास्त असतील कारण ती अजून तरी आनंदी दिसतीय.
अजिंक्य : तू पूर्ण ऐकला आहेस का कॉल रेकॉर्ड ?
अभिजित : नाही. मला कॅन्सर आहे तिथ पर्यंत ऐकल आणि मी बरा होणार नाही तेवढ.
अजिंक्य :  चल बाहेर.
दोघ बाहेर जातात आणि शिवानी प्रतीक्षाशी बोलायला लागतात. सारा हि बोलत राहते अभिजीतशी. दिवस असाच जेवण खाण गप्पा मारण्यात गेला आणि यात कधी रात्र होते कुणाला कळत नाही आणि शिवानी अभिजित दोघ बेडवर बसलेले असतात.
शिवानी : कस वाटतय ?
अभिजित : ठीक.
शिवानी : ठीक का ? चांगला का नाहीयेस ?
अभिजित : तेच ते.
शिवानी : अस कस तेच ते... सांग काय झाल ?  आणि आज बायकोला सोडून अजिंक्य जवळ जास्त होतास का बर अस ?
अभिजित : नको इतक प्रेम करू माझ्यावर. राहिलेले दिवस जगू दे. दडपण येतंय मला तुझ्या या प्रेमच माझ्या मनावर.
शिवानी : काय झाल तुला ? अस का बोलतोयस ?
अभिजित : तुझ आणि प्रतीक्षाच बोलण ऐकलय मी.
शिवानी पटकन अभिजित जवळ जाते आणि त्याला जवळ घेते ,
शिवानी : काही होणार नाहीये तुला समजल का. नको विचार करू त्याचा. कित्येक मोठी लोक वाचली आहेत. स्टीफन हॉकिंग बघ दोन वर्ष आयुष्य उरलेलं पण कित्ती वर्ष जागून आत्ता मेला. असे अजून किती जण आहे स्टीव जॉब्ज पण माहितीय ना त्याच ?
अभिजित रडायला लागला. आणि शिवानीने त्याला मिठीत घेतल. थोड्या क्षणात दोघ वेगळे होतात.
शिवानी : नको रडू मी आहे सोबत. तू का रडतोयस ?
अभिजित : इतके दिवस भ्रमात होतो मी इतक प्रेम मी करतो तुझ्यावर आणि तू माझ्यावर. तुटला ग भ्रम भानावर आलो मी आणि समोर प्रेम भंग असता तर तोही पचवला असता पण तुझ्यापासून कायमचा दूर जाण्याचा आभास झाला. काल रात्री. कित्त्येक आठवणी दिल्यास तू मला. त्या मनात साठवता साठवता काही आठवणी तर मी विसरून पण गेलो. त्या कधीतरी आठवण्याचा साठवण्याचा प्रयत्न करायचा विचार होता माझा पण ? संपलच. तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ?
शिवानी : इतक इतक कि तू मोजू शकत नाही.
अभिजित : तरी किती ?
शिवानी : तुझ्यासोबत जगायचं आणि तुझ्या सोबत मरायचं हीच कंडीशन ठेवून मी तुझ्यावर प्रेम केलय.
अभिजित : मला ......मला काय झाल तर मला काही वाटणार नाही पण तुला साध खरचटलं तरी माझा जीव वर खाली होतो. दुखः मी मरणारे याच नाही. मी सोडून जाणारे निम्म्यात तुला याच आहे.
शिवानी : तुला वाटत मी जगेन ? तुझ्याशिवाय
अभिजित : नाही. पण तू माझ्यासोबत येऊ शकणार तर नाहीस ना. आणि आलीस तरी तू कुठे तरी मी कुठेतरी. कुठे शोधायचं वर मी तुला. आणि सापडलीस तर ठीक आणि नाही सापडलीस तर ?
शिवानी : तू नको शोधू मला. मी येईन ना शोधत तुला. तुझ्या मागावर. मी एकट नाही सोडणार तुला. तू झोप बघू बर.
अभिजित : नाही येत. डोळे मिटले कि समोर फक्त हसताना तू दिसतेस.
शिवानी : का ?
अभिजित : मी रडताना नाही ना बघू शकत तुला.
शिवानी : मग मी आत्ता रडले तुझ्या डोळ्या देखत तर चालेल का तुला ?
अभिजित : अजिबात नाही.
शिवानी : मग झोपून जा. ये जवळ इकड.
शिवानी त्याला झोपवते. डोक्यावर त्याच्या केसातून हात फिरवत ती त्याला झोपवते. तो झोपतो. आणि तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येत राहत. त्या पाण्याची धार कधी आटते कळत नाही. ती बसल्या जागी झोपून जाते. १७

सकाळी प्रतीक्षा दोघांना उठवायला येते.
प्रतीक्षा : शिना उठतीस का ?
शिवानी : हा. दोन मिनिट जरा झोपू का डोक दुखतय.
प्रतीक्षा : हा झोप झोप उठवते मी थोड्यावेळाने.
शिवानी : हा.

आणि शिवानी झोपते आणि प्रतीक्षा बाहेर निघून जाते. शिवानी शेजारी अभिजीतला बघते. डोळ्यातून पांढरे पट्टे ओघळलेले तिला दिसले. रात्रीचा तो रडलेला ते डाग तसेच होते. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातावर डोक ठेवून झोपते जस काय आता पुन्हा हि ऊब हा हात पुन्हा मिळणारच नाही. अभिजीतला जाणवल आणि त्यान तिला जवळ घेतल. आणि अजून अजून आत आत मिठीत शिवानी शिरू लागली आणि झोपली. 
अर्ध्यातासाने....
अजिंक्य : धर चहा. सारा कुठ आहे ?
प्रतीक्षा : झोपलीय.
अजिंक्य : हा तिला पण नंतर बोर्नव्हिटा घालून दुध देतो. तू पी लवकर चहा. अजून काय हवय का ? मारी देऊ का आणून ?
प्रतीक्षा : नको रे बस तू पी माझ्यासोबत चहा.
अजिंक्य : अभी उठला ?
प्रतीक्षा : मगाशी गेलेले उठवायला शिना ला पण थोड्यावेळाने उठते बोलली. जागली आहेत दोघ बहुतेक. झोपु दे त्यांना.
अजिंक्य : हा.
प्रतीक्षा : ते बघ उठलीच शिवानी. ये चहा घेणार का ?
शिवानी : नको. ब्रश करते अभिला उठवते मग दोघ एकत्र घेऊ.
अजिंक्य : हा.
अजिंक्य : आले बाळ उथल ग ते माझ. ये इकड. झाली का झोप सारा ?
सारा : हो.
अजिंक्य : थांब हा शिवानी मामीच झाल कि आपण ब्रश करू हा....?
शिवानी : पाठव कि तिला पण मी आवरते तीच.
प्रतीक्षा : कशाला अग खूप त्रास देते तुला वेळ लागेल आवरायला.
शिवानी :  असुदे कि मला कुठ जायचं आहे ?
अजिंक्य : आवरती का शिवानी मामी सोबत
सारा : हो..........

साराला घेऊन शिवानी जाते. बाथरूम मध्ये. अभिजित पण येतो. बाहेर थोड्यावेळाने.
तोही आवरतो. मग अजिंक्य शिवानी आणि अभिजीतला चहा बनवून देतो. आणि साराला बोर्नव्हीटा घालून दुध देतो. आणि अजिंक्य प्रतीक्षा बसतात त्यांच्या सोबत बोलत.
सगळ आवरून होत आणि आणि ते जातात अनाथ आश्रमात. आणि प्रतीक्षा अजिंक्य सारा शिवानी लहान मुलांकडे बघत असतात तिथल्या पण अभिजित एका मुला जवळ जातो.
अभिजित : नाव काय तुझ ?
सुयश : सुयश.
अभिजित : आई बाबा कुठ आहेत ?
सुयश : माहित नाही.
अभिजित : इथ कस वाटत राहायला तुला ?
सुयश : एकट वाटत.
अभिजित : का ? इथ किती मुल आहेत.
सुयश : माझे आई बाबा नाहीत न पण.
अभिजित : माझ नाव अभिजित आहे मी ना मोठ्या कंपनीत पिच्चर बनवतो.
सुयश : हल्कचा पण तुम्हीच बनवला का ?
अभिजित : हो.
सुयश : मला आवडतो तो. किती पॉवर आहे ना त्याच्याकड. माझ्याकड पण तसली ताकद असती तर मी शोधलं असत आई बाबांना माझ्या.
अभिजित : ते खोट असत सगळ. ते.
सुयश : नाही ते खर असत. तो नाही का त्याची मैत्रीण संकटात सापडली तर मोठा होतो आणि तिला शोधून वाचवतो. मग मी पण शोधू शकलो असतो ना आईला.
अभिजीतच्या डोळ्यात पाणी आल.

सुयश : तुम्ही बनवला ना तो पिच्चर मग तुम्ही शोधलं का कधी कुणाला ?
अभिजित : माझी पण आई हरवलीय पण मला सापडलीच नाहि.
सुयश : मग आता ?
अभिजित : नाही सापडत आपली आई बाबा हरवले कि कधीच.
सुयश : मला पण नाहि सापडणार ?
अभिजित : नाही.
सुयश : मग मला नाही व्हायचं हल्क.
अभिजित : हा म्हणूनच म्हंटल ना ते सगळ खोट असत. नीट रहा. हे धर तुझ्यासाठी चोकलेट.
सुयश : काकां ओरडतात.
अभिजित : धर तू मी सांगतो त्यांना.
सुयश  : नको.
अभिजित: धर तर.
तो घेतो.
अभिजित : चल जाऊ का ?
सुयश : मला भेटायला याल ? दर महिन्याला ?
अभिजित : माहित नाही.
सुयश : मला कोणीच नाही येत भेटायला.
अभिजित : मी नाही आलो ना तर ती बघ काळा रंगाचा ड्रेस घातला ना ती दीदी येईल. तीच ना... नाव शिवानी आहे. ती येईल नक्की.
सुयश : मी वाट बघीन तुमची.
अभिजित : माझी नको तिची वाट बघ ती देईल खाऊ तुला.
आणि अभिजित निघाला. आणि सगळेच निघाले. गाडीत बसले. आणि सुयश दारात येऊन अभिजीतला टाटा करायला लागला. अभिजितने हि केला. आणि गाडी निघाली.( image by google )१८

दिवसभरात असच इकड जा , तिकड जा करण्यात गेला. संध्याकाळी. शिवानी, प्रतीक्षा, अभिजित, अजिंक्य, सारा टीव्ही बघत बसलेले. थोड्यावेळाने. अभिजित उठून आत गेला. अचानक काय झाल म्हणून. शिवानी पण आत गेली. बेडवर जाऊन तो पालथा झोपलेला. शिवानी त्याच्या जवळ जाते आणि पाठीवर हात फिरवत विचारते,
शिवानी : काय झाल ? सडनली आत का आलास ?
अभिजित : कस तरी होतय
शिवानी : कस तरी म्हणजे ?
अभिजित : डोक्यातून कळ येतीय
शिवानी : थांब... डॉक्टरांना कॉल लावते.
अभिजित : नाही नको इतक सिरीयस नाही. टीव्ही बघून ताण आलाय डोळ्यावर सो म्हणून दुखत असेल. आणि चष्मा नव्हता घातला.
शिवानी : अरे हा कुठय चष्मा तुझा ?
अभिजित : विसरलो.
शिवानी : अस कस रे , महत्वाच तरी घ्यायचं ना सामान सोबत.
अभिजित : सामान तू भरल होतस.
शिवानी : ओह सॉरी. मी अब्स्यूल्युटली विसरले. सॉरी. आणू का मी जाऊन ?
अभिजित : नको राहू दे. झोपतो मी.
शिवानी : जेवण नको का ?
अभिजित : भूक नाही.
शिवानी : अस कस जेव चल माझ्यासोबत थोडस.
अभिजित : खरच नको. झोप आलीय मला.
शिवानी : माझ्यासाठी तरी प्लीज खा.
अभिजित : नको दुपारी उशिरा जेवलोय सो नाही भूक. प्लीज फोर्स नको ना करू तू तरी. समजून घे मला त्रास होतोय झोपू का मी ?
शिवानी : हा. सॉरी सॉरी ... झोप. पांघरूण देऊ का ?
अभिजित : नको.
शिवानी : पंखा लाऊ का ?
अभिजित : हो.
ती जाऊन पंखा लावते.
शिवानी : काय झाल ? कमी करू का स्पीड ?
अभिजित : हो.
शिवानी पंख्याच स्पीड कमी करून येते आणि अभिजित जवळ बसते.
शिवानी : देऊ का पांघरूण ? तुझ अंग थंड झालंय.
अभिजित : तू येणा पांघरून बनून माझ्यावर.
शिवानी : आपल नाही हे घर अभी.
अभिजित : तुझी गरज वाटतीय.
शिवानी : इथ नको ना. आपल्या घरी गेलो कि हव ते करते इथ नको ना.
अभिजित : दार लाव ना आणि ये ना जवळ.
शिवानी बर म्हणून बाहेर जाते आणि प्रतीक्षाला सांगते,
शिवानी :  अभिजीतला माझी गरज आहे. मला पण नको जेवयला मी बसते त्याच्या जवळ.
प्रतीक्षा : काय झाल ? काय होतय ? जायचं का डॉक्टरकडे ?
शिवानी : नाही अग चष्मा घातला नाही त्यान आणि टीव्ही  बघितला किंवा पीसी समोर बसल कि त्याच डोक दुखत. बस. मी त्याला झोपवते.
प्रतीक्षा : हा मग ये ना आम्ही थांबतो जेवायचं.
शिवानी : नको प्लीज. तुम्ही घ्या जेवून. मी आहे त्याच्याजवळ.
प्रतीक्षाने तीच काही न ऐकता. अभिजितसाठी बनवलेल ताट तिच्या पुढ ठेवल. आणि स्वतः हि बसली आणि जेवयला लावल जबरदस्ती. मग जेवण झाल. अजिंक्य टेबल  आवरायला लागतो. प्रतीक्षा साराला झोपायला घेऊन जाते. शिवानी अभिजीतच्या रूम मध्ये जाते.
अभिजित गाढ झोपलेला असतो. रूम मध्ये खूप थंड वार पसरलेलं असत. पंखा तर सुरूच असतो पण बाहेर झाड होती गुलमोहराची त्यामुळे वार खूप असायचं तिथ आणि नेमक शिवानीने दोन्ही खिडक्या उघड्या ठेवलेल्या. आणि अभिजीतला दिलेलं पांघरून तिने त्याला घातल नव्हत त्याच्या पायाशीच ठेवून प्रतीक्षाला सांगायला गेलेली. पण तिला जेवूनच सोडल प्रतीक्षाने. शिवानी अभिजित जवळ गेली. तो शांत झोपलेला. अंग थंड होत. तिने खिडक्या लावल्या आणि त्याच्यावर पांघरुणासारख झोपली. आणि वर पांघरून ओढलं. आणि त्याच्या ओठांवर कीस केल. अभिजितने तिला जवळ ओढलं. आणि शिवानी क्षणात झोपली.
सकाळी,
अजिंक्य प्रतीक्षाला चहा आणून देतो.
अजिंक्य : दोघ उठली का ?
प्रतीक्षा : नाही अजून. जाऊ का मी ?
अजिंक्य : हा बघ सगळ्यांसाठी चहा केलाय. सगळेच पिता एकत्र.
प्रतीक्षा जाऊन शिवानीला उठवते. शिवानी अभिजीतच्या हातावर डोक ठेऊन झोपलेली असते. ती डोळे उघडते.
प्रतीक्षा : उठ चल चहा पिता.
शिवानी : हा आलेच अभिजीतला उठवते.
प्रतीक्षा : हा उठव माझ्या देखत. उठायचा नाही नाहीतर लवकर. चहा गार होईल परत.
शिवानी : हा
शिवानी : अभिजित........ ए अभी बाळ उठ ना चल.
प्रतीक्षा : अभी उठ. चल.
शिवानीने अभिजीतच्या तोंडावरच पांघरून काढते. आणि जोरात आवाज वाढवून ओरडते.
शिवानी : अभी....... उठ रक्त आलंय उठ लवकर.

अभिजित तसाच झोपून असतो.   अजिंक्य आत येतो. आणि अभिजित जवळ जाऊन त्याला उठवतो खांद्याला धरून. आणि अजिंक्य शिवानीकडे बघतो आणि मान फिरवून प्रतीक्षाकडे बघतो आणि शिवानी अजिंक्यला ढकलून अभिजीतला मिठीच मारते. आणि अभिजीतचा तोल जातो आणि तो माग पडतो. अजिंक्य शिवानीला माग ओढतो. आणि शिवानी त्याचा हात झिडकारून अभिजीतला किस करू लागते नाकावर, गालावर, कपाळावर. आणि ओठांजवळ जाते तर.... अभिजितचे ओठ थंड गार असतात. आणि शिवानी वाट बघते त्याची, त्यान मिठीत घ्यायला हात उचलण्याची पण तो तस करत नाही. आणि त्याला जवळ ओढून रडायला लागते. प्रतीक्षा बाहेर जाते अजिंक्य खुणावतो तसा. आणि ती साराला टीव्ही लाऊन देते आणि अजिंक्य मधल दार लाऊन घेतो.  


( image by google )१९

थंड.....झालेलं. अभिजितच शरीर. थंड पडलेली ती बेडरूम. थंड पडत चाललेली शिवानीच्या अंगावरची कातडी भीतीने. थंड डोक्याने विचार करायला अजिंक्यला हि सुचत नव्हत. साराला प्रतीक्षाने टीव्ही लाऊन दिला शिवानीचा बाहेर रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून. आणि त्यावर कार्टून लावल आणि ते कार्टून पण नेमक खेळत होत थंड बर्फाच्या डोंगरावर. आणि प्रतीक्षाच लक्ष गेल टेबलावरच्या कपांकड ज्यातला चहा हि थंड झालेला.
प्रतीक्षा आली आणि तिने दारावर थाप दिली अजिंक्यने दार उघडल. प्रतीक्षा आत आली. आणि अजिंक्यने परत दार लाऊन घेतल. काय बोलाव ? काय कराव ? अजिंक्य प्रतीक्षाला समजत नव्हत. धीर द्यायचा शिवानीला पण तो कसा ? शिवानीला धीर द्यायचा कि तिला सावरायचं ? का आपला मित्र गेल्याच दुखः व्यक्त करायचं ? एकाच हि उत्तर दोघांकडे नव्हत. शिवानीच मात्र एक सारख अभिजीतला किस करण सुरु होत. आणि ती थांबली. ती उठली. तिने अभिजितच्या अंगावर पांघरून घातल.

शिवानी : अजिंक्य पंखा घालव अभिजीतला थंडी वाजतीय. प्रतु , चहा थंड झालाय का ग ? अभिजीतला लागेल ना उठल्यावर ? तो काय ब्रश न करताच पितो. गरम करून आणतेस का ?
प्रतीक्षा : शिवानी .......
शिवानी : काय शिवानी ? माहितीय मला पण अभी कधी हि उठू शकतो माझ्यासाठी. आत्ता झोपलाय झोपु दे त्याला. थांब मी चहा गरम करून आणते. तुम्ही थांबा त्याच्या जवळ. अजिंक्य खिडकी उघडू नकोस गार वार येतंय.
शिवानी जाते. चहा गरम करते. आणि कपात भरून आणते. आणि एका ग्लासात पाणी आणि कपात चहा घेऊन आत येते. बेड जवळच्या टेबलावर शिवानी कप आणि पाण्याचा ग्लास ठेवते. आणि अभिजितच्या कपाळावरून केसावरून हात फिरवत राहते. घरात वावरणाऱ्या वाऱ्यात काही हालचाल नव्हती होत अभिजीतची. पण त्याचे केस फक्त हालत होते. अभिजित जिवंत नसला तरी ती हलणारी केस शिवानीला त्याच्या जिवंतपणाची जाणीव करून देत होते. दीड तास शिवानी त्याच्या उशाशी बसलेली. शांत. अजिंक्य प्रतीक्षा तितकाच वेळ दाराशी उभे होते. गाढ झोपलेल्या अभिजीतला आणि गप्प बसलेल्या शिवानीला बघत. दारावर थाप पडली. सारा आलेली.
अजिंक्य बाहेर जाऊन ,
अजिंक्य : काय पाहिजे बाळा ?
सारा : मला अभिजित काकाशी खेळायचं आहे.
अजिंक्य : काका झोपलाय. बर नाही त्याला. त्रास नाही द्यायचा .
सारा : मला ऑगीच कॉकरोच लाऊन द्या ना
अजिंक्य जाऊन लाऊन देतो. आणि परत आत येतो.
प्रतीक्षा शिवानिकडे बघते. शिवानी प्रतीक्षकडे करुणेच्या भावनेने बघते. प्रतीक्षाच्या डोळ्यातल पाणी लपत हि नव्हत आणि धड डोळ्यातून बाहेर पडत हि नव्हत. कारण तिने सावरल नाही तर मग शिवानीला कोण सावरणार ? शिवानीने अजिंक्यला खुणावल. अजिंक्याने खिशातून मोबाईल काढला. आणि डॉक्टरांना कॉल लावला आणि सांगितल काय झाल ते.

शिवानी : काल मला जवळ ये म्हणत होता. मी नाही म्हणाले. तुमच्या घरात अस वागण चुकीच वाटल मला. तरी त्यान मला प्रेशराईज केल मग मी तुझ्याकडे आले. विचारायला आम्ही करू शकतो का तसल काही.पण तू जेवायला बसवलस. तो तिकड वाट बघत होता. त्याच्या डोळ्यात त्याच्या आवाजात समजत होत मला. त्याला माझी गरज होती. आणि तीच त्याची इच्छा होती. शेवटची. जी मी पूर्ण केली नाही.
प्रतीक्षा : माफ कर मला माहित असत तर तुला नसत थांबवलं.
शिवानी : माझी वाट बघण्यातच त्यान मला एकट सोडल.पण मी आले रूम मध्ये त्याच्या जवळ तेव्हा हि तो थंडच होता. पण मी त्याला मिठी मारली तर त्याने मला जवळ घेतल.आणि मी कीस केल तेव्हा काहीच रिस्पोंस नाही दिला. का ?

परत रुममध्ये शांतात. थोड्यावेळाने डॉक्टर येतात आणि अभिजीतची नाडी तपासून जातात. थोड्यावेळाने दारात शववाहिनी येते. अभिजित आतच खाली झोपलेला असतो शांत. गाढ. बाहेर झोपवल असत पण साराला त्रास झाला असता. कारण या आधी हि तिने अमितच बघितल होत. कंपनीतले ग्रुप मेंबर, एच.आर., टी.एल, आले होते. आणि मग अभिजीतला शववाहिनीत ठेवल. आणि शिवानीच्या पोटातल बाळाला पण बहुतेक त्रास झाला असाव. कारण इतका त्रास आघात झालेला शिवानीला. शववाहिनेत सगळे बसले. आणि शिवानी चढणार तोच तिच्या पोटात एक मोठी कळ आली. आणि ती खाली पडली. प्रतीक्षा आणि अजिंक्यने तिला उचलल. बाकीचे लोक पण अभिजीतला सोडून शिवानी जवळ आले. शिवानी बेशुध्द झाली. अजिंक्य प्रतीक्षा घेऊन तिला घरात गेले. पाणी शिपडल, पण तरी तिला जाग येईना. डॉक्टरांना कॉल लावला. डॉक्टर यायला निघाले. पण मग आता करायचं काय ? शिवानीकडे थांबायचं कि अभिजीतला घेऊन जायचं ? या विचारात असताना. डॉक्टर आले. त्यांनी तिला इंजेक्शन दिल. तिला दहा मिनिटाने जाग आली. डॉक्टरांनी तिची नाडी तपासली. आणि अजिंक्याकडे बघितल. डॉक्टर त्याला घेऊन बाजूला गेले.
डॉक्टर : मानसिक धक्क्याने शिवानीच बाळ पोटातच दगावल आहे.
अजिंक्यने माग बघितल आणि त्याच्या डोळ्यातून पाणीच यायला लागल. डॉक्टरांनी त्याला पिस्क्रीप्शन दिल आणि सांगितल तिला दवाखान्यात admit कराव लागेल आजच.
अजिंक्य : आणि अभिजित ?
शिवानी : त्याला पण माझ्यासोबत आण हॉस्पिटलला.
डॉक्टर : अशी परमिशन नाही.
शिवानी : मग मला हि जायचं नाही.
अजिंक्य : प्लीज काहीतरी बघा ना. डॉक्टर. वाटल तर  बंद व्हेंटीलेटर वर ठेवा पण प्लीज पाया पडतो.
डॉक्टर : चालेल. मी गाडी पाठवतो दोघांना आणा फक्त कुणाजवळ बोलू नका.

डॉक्टर जातात. आणि मागून शिवानी आणि अभिजीतला हॉस्पिटलला नेतात.अभिजितला आय.सी.यु.त ठेवतात आणि शिवानीला दुसऱ्या वार्डात ठेवतात. आणि तिच्या मेलेल्या बाळाला बाहेर काढण्याच काम सूरु होत. शिवानीला मात्र हे माहित नव्हत. तिला भूल दिली होती. आणि ऑपरेशन झाल. आता त्या तळहाताच्या छोट्या अर्धवट तयार झालालेल्या बाळाला एका पिशवीत डॉक्टरांनी ठेवल. अजिंक्य आणि प्रतीक्षाला बघून पोटात गोळा तर आलाच पण भीती वाटायला लागली. संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि..... 
( image by google )

२०

आत शिवानी बेशुध्द होती. इकड तीच मेलेलं बाळ पिशवीत पिशवीबंद झालेलं. त्या तसल्या अर्ध्या-निम्म्या बाळाला बघून प्रतीक्षाची तब्येत बिघडत चाललेली. कंपनीतले अभिजीतचे मित्र निम्मे आत दवाखान्यात अजिंक्य सोबत होते. आणि निम्मे त्या अभिजीतच्या मृतदेहासोबत खडे होते. आता गरम होत होत. प्रत्येकाचे विचार खुंटलेले. ज्याच त्याच प्रत्येकाच जग अभिजित आणि शिवानी भोवती फिरत होत. अचानक डॉक्टर आले. अजिंक्य लागलीच त्यांच्या जवळ गेला.
अजिंक्य : शिवानी आहे का आता ठीक ?
डॉक्टर : आहे पण नाही पण.
अजिंक्य : म्हणजे ?
डॉक्टर : त्रास खूप झालाय तिला.
अजिंक्य : कसला ?
डॉक्टर : शिवानी कोण आहे तुमची ?
अजिंक्य : मैत्रीण आहे.
डॉक्टर : शिवानीला कॅन्सर होऊन तीन वर्ष होऊन गेलेत. तिची लाईफ डेट संपून गेलीय कधीच पण दैव बलवत्तर म्हणून ती इतकी जगली. आणि तिला टेन्शन घेण बँन होत. सगळ ठीक होत. पण ...आता अभिजितच हे अस झाल. आणि बाळाच कळाल तर खूपच त्रास होईल तिला पण खरच खूप इच्छाशक्ती आहे तिच्यात. तिची आता काळजी घेतलीच पाहिजे.
अजिंक्य : हो मी आमच्याच घरी ठेवणारे तिला आता. बर डॉक्टर ,
डॉक्टर  : बोला ?
अजिंक्य : अभिजितच काय करायचं  ? काही होणार नाही ना त्याला ?
डॉक्टर : नाही उद्या सकाळपर्यंत व्हील्लेवाट लावावी लागेल. कारण मग स्कीन सडायला लागेल.
अजिंक्य : बर मग सकळी सहाला नेईन इथून अभिजीतला. मग शिवानी नाही म्हणाली तरी न्याव लागेल..
नर्स : सर.
डॉक्टर : बोला ?
नर्स : जरा आत येत का ?
अजिंक्य : काय झाल ? जाग आली का शिवानीला ?
नर्स : नाही. सर जरा या ना आत.
डॉक्टर : आलोच.
डॉक्टर अजिंक्याचा हात हातात घेऊन मग पुढे आत निघून जातात. आणि थोड्यावेळात सगळे जमा होतात. प्रतीक्षा.सारा अजिंक्य आणि कंपनीतले अभिजीतचे मित्र शिवानीच्या वार्ड बाहेर थांबलेले असतात. हॉस्पिटल मध्ये फिरणारे लोक त्या गर्दीला बघत राहतात. आणि तिकडून शिवानीची आई येते. आणि आत जाते.
शिवानी हि जग सोडून जाते. बहुतेक अभिजितला एकट सोडू नये म्हणून स्वतःत जीव अडकवून जगत असते. रात्री अकरा वाजता. हॉस्पिटलच्या दारात शववाहिनी येते आणि अभिजित आणि शिवानीला गाडीत ठेवतात. बाकी सगळे गाडीत बसतात. प्रतीक्षा साराला घेऊन घरी जाते. गाडीत खाली शिवानी शांत झोपलेली. आणि तिच्या पायश्याशी अभिजीतला झोपवलेल असत आणि गाडी निघाली.

इकड घरी प्रतीक्षा साराला झोपवत असते. आणि रडत असते. आणि तिला आठवत शिवानी आणि प्रतीक्षाच झालेलं त्या रात्रीच बोलण,
प्रतीक्षा : काय झालेलं त्याला ?
शिवानी  : काही झाल नाही.
प्रतीक्षा : नशीब.
शिवानी  : अजून झाल आहे.
प्रतीक्षा : काय ?
शिवानी : कॅन्सर.
प्रतीक्षा : का.................य ?
शिवानी : हो. तीन वर्षाच आयुष्य आहे त्याच.
प्रतीक्षा : अस कस ? ऑप्शन नाही का काही वाचवण्याचा त्याला ? तुझ काय ?
शिवानी  : नाही. वाचला असता पण ड्रिंक मुळ अजून इफेक्ट झाला त्याच्यावर आणि आउट ऑफ कंडीशन झालीय.
प्रतीक्षा : मला का कॉल केला नाही इतक्या दोन वर्षांत ?  इतक सगळ घडल आणि ? तू सांगितल नाहीस ? का सांगावस वाटल नाही तुला. रडू नको शिना. मला तिथ सांगायचं ना मगाशी.
शिवानी : अभी समोर ? त्याला अजून हे माहित नाहीये.
प्रतीक्षा : काय ?
शिवानी : हो त्याला मी खोटे रेपोर्ट फोटोशॉप वर बनवून प्रिंट काढून दाखवलेत.
प्रतीक्षा : मग आता ?
शिवानी : मी त्याची इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं बघतेय. ज्याने करून तो मरताना तरी निट जाईल. मला नको वाटतय हे सानागायला पण. मला का सोडून जातोय. मला माहित होत पुढ सगळ होणार पण तरीही मी त्याच्यावर प्रेम केल. कारण....
प्रतीक्षा :  कारण ?
शिवानी : कारण मला....
प्रतीक्षा विचार करते , बहुतेक तेव्हा शिवानीला हेच सांगायचं असेल कि ,
शिवानी : कारण मला.... पण कॅन्सर आहे आणि मी माझ कमी आयुष्य बघून त्याच्या उरल्या आयुष्याला प्रेम द्यायचं ठरवल. आणि म्हणून मी त्याच्यावर प्रेम केल.
दोघांना अग्नी देऊन अजिंक्य घरात आला. आणि त्याने दारातच अंघोळ केली. आणि येऊन बसला आत. ओली केस घेऊन पुसायची हि त्याला शुद्ध नव्हती.
दोन दिवसांनी.
अजिंक्य प्रतीक्षाच्या बेडरूम मध्ये खूप सारे अजिंक्य प्रतीक्षाचे फोटो लावलेले होते आणि....... आणि आता अभिजित आणि शिवानीचे हि आणून लावले अजिंक्यने पण त्याला हार न घालायची अट प्रतीक्षाने त्याला घातली. आणि अजिंक्य त्या फोटोला बघत राहिला. प्रतीक्षा त्यांच्या दुसऱ्या खोलीत जाते. जिथ अजून हि तो चहा कपात आणि त्या ग्लासात पाणी तसच होत........


copyrighted@2019 19 टिप्पण्या

 1. सर्व वाचकांचे आपल्या मराठी ब्लॉगवर स्वागत आहे...........

  उत्तर द्याहटवा
 2. तुमचं लिखाण खरच खूप छान आहे
  मी तुमचे बरेच लेख वाचलेत ..... आवडले मला
  असाच छान लिहीत चला & आम्हला वाचायला देत चला
  तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
  धन्यवाद ....

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद मंगेश पाटील... असच प्रेम असुदे आणि ब्लॉगला भेट देत राहा 😊

  उत्तर द्याहटवा
 4. Khupch chan. Tumche likhan vachtana ekdam dumbun jato tya kathechya vishwat.next part vachnyachu hur hur aste ki ata pudhe kay. Mstch.

  उत्तर द्याहटवा
 5. तुमचं लिखाण खरच खूप छान आहे
  असाच छान लिहीत चला & आम्हला वाचायला देत चला
  तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
  धन्यवाद ....

  उत्तर द्याहटवा
 6. अप्रतिम लिखाण आहे , पुडील लिखाणासाठी भरपूर शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा