फसवणूकघेतलेल्या शपथा आता मलून झाल्या. रंगवलेली स्वप्न कृष्णधवल झाली. एकमेकांची सोबत आता फक्त विचारात उरलीय. स्पर्श तो काय असतो ? हे तर विसरून गेलोय. प्रेमात असताना प्रेम नसतानाच हे चित्र कोण बर रेखाटत ? प्रेमाचं चित्र शप्पथ, वचन,स्पर्श,सोबत या गोष्टींनी आणखी न आणखी फक्त आपण रंगवत राहतो. पण चित्र कधीतरी जुन होतच. त्यावरचा रंग ही फिका पडतो. त्यातल्या भावना त्या रंगासोबत कमी समजू लागतात आणि मग त्या चित्राची होते फक्त अडचण. हीच अशी अडचण झालीय माझ्या मनात तुझ्या विचारांची. धड ते जात नाहीत आणि तू येत नाही. फक्त विचार आलेला तुझा, दुर्लक्षित करायचा मी प्रयत्न करतो.त्यात ही तुझं नाव घेतो आणि पहिला विचार संपतो तोवरच दुसरा विचार सुरू होतो.आयुष्यभर सोबत राहायची स्वप्न महिनाभर ही टिकली नाहीत. तुझं माझं प्रेम म्हणायला आता आपल्यात ते नात ही उरलं नाही. किती सहज लांब झालीस तू, श्वासाने आपल्यापासून दूर व्हावं तस. जो आपलाच असतो पण क्षणात परका होतो. तुझ्या सोबत वेळ घालवला मी. पण तुला मिळवूच शकलो नाही. तुला आता मी यात चुकीचं लिहिलं तर मला पुन्हा कोण  वाचणार नाही. म्हणून लपवतोय तुझा वाईट स्वभाव पण, चांगलं लिहायला सध्या सुचत नाहीये. दिवस अगदी असा रोज निघून जायचा की आठवडा आठवडा करत माझा महिना जायचा. तोच महिना बाकीचे लोक एक एक दिवस त्यातले तास आणि मिनिट मोजून जगायचे तो महिना मी तुझ्यासोबत असा आठवड्या आठवड्याने संपवलाय. आता वेळ जात नाही. आणि ही वाईट वेळ ही जात नाही. प्रेम करून चुकलो अस म्हणत नाही. कारण प्रेम चूक किंवा बरोबर नसत.. ते फक्त असत. चूक माझी होती जो मी तुझ्या प्रेमात पडलो.असो, तू खुश आहेस त्यात मी खुश आहे. बाकी तुझं दुःख मी वाटून घेतलं त्याने तू हलकी झालीस आणि माझं मन अजून जास्त भरलं आहे. रडता येत नाही म्हणून लिहून काढतो. आणि ज्याच्यासाठी असत हे लिहिलेलं त्याला त्याला वाचायला आजकाल वेळ ही नसतो. भरलेला मी भरत जाईन. बस कुणावर प्रेम करशील माझी तेव्हा एक आठवण नक्की येईल तुला. इतकं तर प्रेम मी केलंच आहे तुझ्यावर. बाकी तुझा होतो मी आता तुझा नाही.. आणि मी माझा पण नाही...

Copyrighted@2020

0 टिप्पण्या