राज्याभिषेक दिनविशेष


( image by google )
शिवशक पहिलेच. सगळीकडे आनंदाचे वातावरण. उजवीकडे, डावीकडे, पुढे आणि मागे शत्रूचे सावट आणि वरचे निळभ्र आकाश तेही शत्रू सैन्याचे. एकाच छताखाली ह्या सगळ्या सत्ता होत्या. पण सत्तेचा विस्तार, मोठालेपणा, आणि सैन्यसंख्या सर्व बाजूनेच शत्रू सेना बलाढ्य होती. पण त्यांवर वचक आणि दरारा होता फक्त एका राजाचा. पोर्तुगीज, इंग्रज, डच, मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि बर्याच छोट्या मोठ्या सत्ता होत्या. पण या सर्वांच्या मनात सतत-कायम विचारात एकच व्यक्ती यायची. “छ.शिवाजी महाराज”.
शिवाजी महाराजांचा जितका दरारा होता त्याहून जास्त त्यांचा पराक्रम होता. आणि त्या बाजूने विचार केला तर शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक होण हे अनिवार्य तर होतच. शिवराय, शिवबा, मालक, हुजर, आलमपनाह आणि राजे, महाराज या नावांसोबत एक आदब हवाच होता. पण आधी कुणाच्या नावाला जोडलेली ती पदवी राजांना नको होती. कारण त्याचं काम हे कुणाशी तुलना करण्या जोग नाहीच. आणि म्हणून कुणी कधी केला नाही असा राज्याभिषेक करवून घेऊन, या मुघली आकाशाखाली सबंध रयतेच एक आशेच छत्र झालेले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले. कुणी म्हणत त्यांनी स्वताहून करवून घेतला नाही हा राज्याभिषेक. त्यांच्यावर जिजाऊ साहेबांचा दबाव होता. कारण तेव्हाची परीस्थित बघता, आणि शत्रू सैन्याची वाढती सत्ता सीमा बघता शिवाजी राजांनी अधिकृत राजा होण गरजेच होत. कुणी म्हणत गागा भट्ट या अति उच्च पंडीताने महाराजांना हि कल्पना दिली म्हणून राजे छत्रपती झाले. शककर्ते झाले. पण मला वाटत महाराज स्वताहून छत्रपती झाले असावेत

प्रत्येक राजाचा इतिहास चाचपला तर समजेल प्रत्येक राजाने अस काही कार्य केल आहे जे इतिहासात लिहिण्याजोग आहे. आणि त्यामागे मूळ उद्देश्य हाच असायचा कि आपला इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोचला गेला पाहिजे. महाराजांनी एकेक मुलाला सोबत घेऊन त्याला आपला मावळा बनवला आणि या हिरव्या,सफेद जमिनीला भगव करून त्याला स्व-राज्य अस नाव देऊन त्याच्या संवर्धनाचा अट्टाहास सुरु ठेवला.
लाखोंचा एक पोशिंदा नेमला गेला. जो मर्हाटा होता पण तो मराठा नाही सर्वांचा होता. तो राजा होता मराठा मांग, चांग, चांभार, सुतार, माळी, शिंपी, मुसलमान, ब्राम्हण, महार या सगळ्यांचा. शत्रूच्या डोक्यातला शत्रू विचार होता. शत्रूच्या स्त्रियांचा एकतर भाऊ किंवा मुलगा होता. कुराण, भागवतगीतेला जपणारा अध्यात्मिक होता. तो राजा सगळ्यांचा होता. म्हणूनच महाराजांना छत्रपती होण महत्वाचच होत. राज्याभिषेक कसा, कधी, कोणत्या दिवशी झाला. सर्वांनाच ज्ञात आहे. गागा भट्ट काशीचे पुरोहित असे ब्राम्हण इथे रायगडास येऊन राजांचा राज्याभिषेक करतात. पण अध्यात्माला धरून. देवाची पूजा करून. धर्माचा पाया धरून. पण मुळात कुठला वार तारीख कोणती तिथी पंचांग न मानणारे महाराज देवाच्या साक्षीने किंवा राज्याभिषेकाच्या दिवस निवडी पासून त्याचा समारोप होई पर्यंतचा सर्व काळ अध्यात्मिक विचाराने करतील का ? मला वाटत नाही. आऊसाहेबांच्या इच्छे किंवा हट्टापाई त्यांनी हे मान्य केल असेल पण त्यांना हि गोष्ट कुठे तरी अमान्य असेलच. ज्या दिवसात इतक्या शत्रू सैन्यांना हरवण्याचा साधा कुणी झोपताना विचार हि केला नसेल अशा लाखो फौजा असलेल्या शत्रूला या एका विचारवंताने आपल्या पराक्रमाने हरवून दाखवल आणि स्वतः अजिंक्य झाले. आणि या सगळ्यात गमावलेली सेना. गमावलेल्या काही गोष्टी ज्या इतिहासात नमूद हि नाहीत आणि त्याचा पुरावा हि नाही अशा सर्व गोष्टींचा आनंद म्हणून एक जगातला सर्वात भव्य दिमाखदार आणि राजेशाही सोहळा केला जातो. ज्या रयतेला शत्रू पासून संवरक्षण देणारा हा राजा. आणि याच राजाला छत्रपती बनववून त्यांना संवरक्षण दिल जात देवाच. न पटण्यासारखच आहे.

तरी रामाचे वंशज ( कुळाने ) असलेले छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या या अंधश्रद्धेला माननारे मला वाटत नाहीत. हा देव मानत होते. त्यांची श्रद्धा हि होती. पण अंधश्रद्धा नव्हती. भवानी देवीने त्यांना तलवार दिली एक कथा आपल्याला माहित आहे पण खरच दिली होती का ? तर नाही. पूर्वीचा जमाना विज्ञानाचा नव्हता. त्यामुळे देवताळ पणाचा बाजार तेव्हा रूढ होता प्रत्येक मनात. भूतलागण, वशीकरण, करणी अशा आजारांची नाव तेव्हा हि प्रचलित होती. त्यामुळेच देवळात बसणारे ब्राम्हण लोक तसेच काहीसे लोक जंगलात हि बसत. देवळातले ब्राम्हण मंत्रोच्चाराने वरवरचा रोग घालवत. देवाचा धावा करत आणि जंगलातले लोक तंत्रोच्चाराने सगळा रोग मुळापासून गायब करत. अत्ताच काय कित्त्येक राजे महाराजे रणांगणावर युद्ध करत आणि मागून हि विद्या उपयोगात आणत. देवाला कोण मानत नाही ? सगळेच मानतात पण प्रत्येक वेळीस देव येईलच धावेला अस नाही.
तस बघता जर का छत्रपती बनल्यावर महाराजांना देवांच संरक्षण मिळणार होत तर मग त्यांच्या स्वराज्याला लागणाऱ्या तांत्रिक काळ्या नजरेपासून कोण संरक्षण करणार होत ?

आणि म्हणूनच सहा जूनला गागा भट्टासोबत झालेला राज्याभिषेक आणि त्यानंतर तांत्रिक पद्धतीने झालेला राज्याभिषेक माहित आहे का कुणाला ? होणारा राज्याभिषेक तुमच रक्षण फार काळ करू शकणार नाही कारण दैवी ताकद फार काळ टिकत नाही असा एका तंत्रीकाने केलेला वाक्योच्चार महाराजांच्या मनाला लागला. जितक्या दिमाखात हा राज्याभिषेक झाला. तो प्रत्येकालाच भावाला अस नाही. काहींच्या तो डोळ्यात हि खुपला. शत्रूच्या आणि आपल्या लोकांच्या हि. मग अशा करड्या नजरेतून स्वराज्य टिकवत ठेवण आणि छत्रपतींनी आपल आयुष्य अशा करड्या नजरेतून संरक्षित कराव तेही तांत्रिक विद्येने असा त्या तंत्रीकाचा हट्ट होता. जसा हट्ट जीजाउंचा आणि गागा भट्टाचा होता काहीसा तसाच हट्ट या मांत्रिकाने धरला. राजाच्या समोर कोणी निराश होत नाही या उक्तीला सोबत घेऊनच तो तांत्रिक इतक्यावर रायगडावर आलेला. आणि महाराजांनी त्याला मंजुरी दिली. दुसरा राज्याभिषेक मोठा नाही झाला. पण झाला. पूर्णत्वास आला.
स्वराज्याला आयत संरक्षण मिळाल देवाच सहा जूनला होम, हवन करून आणि ते अबाधित राहायला तांत्रिक पद्धतीने झालेला राज्याभिषेक झाला आणि म्हणूनच कि काय दैवी संरक्षण लगेच तुटूण गेल आणि जिजाऊ साहेब मरण पावल्या. आणि तांत्रिक विद्येचा बोझा इतका वाढला कि सहा वर्षांनी शिवारायंचा देहांत झाला. जी सत्ता एका राजाने कोणत्या देवाला अथवा तंत्राला धरून मानून बोलून म्हणून बनवली नाही. त्याच सत्तेला नंतर उतरती कळा लागली. योगायोग असेल. पण महाराजांनी अध्यात्मिक किंवा तांत्रिक गोष्टीना धरून राज्याभिषेक का केला हे मात्र मला अजून समजलेल नाही.


शिवराज्याभिषेकाच्या सबंध भारत राष्ट्राला शुभेच्छा.

0 टिप्पण्या