फेसबुकवरची 'ती'


आजकाल सोशल जगात जो तो खूप सोसल्यासारख जगत आणि वावरत असतो. आणि चार लोकांना अगदी अभिमानाने सांगत असतो. सोसत कोण नसत ? जो तो दुखः सोसत, भोगत असतो. पण ज्याच त्याला आपल दुखः मोठ वाटत असत. आपल्याला आयुष्य आपल फालतू वाटत. आपल्या जवळ असणारे प्रत्यक्ष मित्र, मैत्रीण यांना आपण काही जास्त सांगत नाही. कारण काय सांगितल तर पुन्हा भेटताना त्या व्यक्तीसमोर जाताना आपल्याला अवघडलेपणा वाटतो. मग अशात प्रश्न पडतो सांगाव कुणाला आपल्या मनातल ? का मनातच साठवून ठेवाव या विचारात मग फेसबुकच्या विश्वात आपण शोधात राहतो एक आपली हक्काची अनोळखी व्यक्ती. ज्याला आपण कधी भेटत नाही. पण त्याच्याशी आपण काहीही बोलू शकतो. अशी व्यक्ती जिला आपण आपली “मैत्रीण” म्हणू शकतो.शाळेपासून सोबत असलेला आपला मित्र अजून हि सोबत आहे. पण चार चौघात सांगताना आपण त्याची ओळख मित्र म्हणूनच करून देतो पण त्याच मित्राने विचारल कुणाशी बोलतोयस इतकावेळ तर चटकन बोलून जात तोंड, “बेस्ट फ्रेंडशी” बोलतोय. इतके वर्ष सोबत असणारा मित्र बेस्ट होत नाही पण काल-परवा ओळख झालेल्या आणि नुस्ता फोटो बघून प्रेमात पडलेल्या मैत्रिणीला “बेस्ट” हा शिक्का लागतो. तिच्याशीच बोलत बसाव अस वाटत. तुझ पूर्ण नाव काय ? तू काय करतेस ? जेवलीस का ? कुठे राहतेस ? काय करतेस जॉब कि कॉलेज ? असे प्राथमिक प्रश्न विचारता-विचारता तास होऊन जातो पण तिच्याशी बोलायचा कंटाळा येत नाही. तासाचे दोन, तीन, चार आणि अख्खा दिवस संपला तरी रात्री तिला गुड नाईट पाठवायचा धाडस होत नाही. मनात वाटत अजून बोलाव तिच्याशी. पण भावना आवरून मी बाय म्हणतो आणि जणू काय तिला माझ मन वाचता येत अस म्हणून ती म्हणते झोपतोयस का ? थांब ना. आणि मी डोक्याखालची उशी छातीशी घेऊन तिच्याशी बोलू लागतो. आणि मग उशिराने झोपतो. सकाळी उठतो तर माझ्या आधी तीचाच मला गुड मोर्निंगचा मेसेज आलेला असतो. मी हि तिला पाठवतो. आणि जणू माझीच वाट बघत असल्यासारखी ती पटकन मेसेज करते. “ हाय “चेहऱ्यावर माझ्या हास्य येत. ती माझी कोणी गर्लफ्रेंड नाही पण ती नुसती फ्रेंड हि नाही. मि तिला आवडतो. मला ती आवडते. आमच मन जुळत. आमचे विचार जुळतात. आम्ही एकाच वेळेस सारख्या कृत्या हि करतो. तिची आणि माझी आवडती डिश, आवडता रंग, आवडत गाण, आवडता गायक, सगळ सगळ सारख आहे. पण तरी आमच्यात फक्त मैत्रीच नात आहे. कारण प्रेमापेक्षा मैत्रीच चांगली असते. स्वच्छ. तिला बोलू वाटत माझ्याशी अस ती म्हणते. पण बोलतो मीच जास्त. ती फक्त ऐकत बसते. आणि माझ्या प्रश्नांना उत्तर देत राहते. मला हि तिच्याशी बोलायला आवडत निस्वार्थपणे. स्वार्थ ठेवला तर नात जास्त टिकत नाही अस म्हणतात. आणि मला तिला गमवायच नाहीये. मग तिच्या नावाचा अपभ्रंश( nick-name )  करून तिची वेगवेगळी नाव मी ठेवली. आणि त्याच नावाने तिला बोलतो. माझ्या मनातल मी दिलखुलासपणे तिला सांगतो. आणि तीही मला सांगते. माझा भूतकाळ तिचा भूतकाळ आम्हाला माहित आहे. पण जेव्हा आम्ही बोलायला लागतो तेव्हा नव्याने ओळख झाल्यासारखं बोलत असतो. चार दिवसाच्या ओळखीला चार वर्षांची मैत्री मानतो. अशी मैत्रीण भेटायला नशीब लागत. नशिबाने तर बायको,गर्लफ्रेंड मिळते पण जास्त चांगल नशीब असेल तर हि अशी बेस्ट फ्रेंड मिळते........
आणि अशी एक तरी फेसबुकची मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. होणा ?

Copyrighted@2018

0 टिप्पण्या