होणाऱ्या बायकोसाठी पत्रप्रिय तू ...... ( तुझं नाव लिही शकत नाही )
मम्मीला वाटत तू माझ्यासाठी योग्य नाहीस. तुझ्या दिसण्यावर मी भुललो आहे. तुझ्या शरीराकडे आकर्षित मी झालो आहे. तुझ्या कमी कपड्यांवर मी फिदा झालो आहे. तू मुलांशी बोलतेस हे चूक आहे तिच्या नजरेत. तू माझ्याजवळ फार कमी दिवसात आलीस हि तुझी आधीची सवय समजते ती.  तुझ्या माझ्या नात्याला ती नाव काहीच देत नाही. तिला वाटत आपलं नातं नाव देण्यासारखं नाही. तिला असं वाटतं तुझं लग्न झालंय आणि तरी तू माझ्या प्रेमात पडलीस यात नवऱ्याचा नाही सगळं तुझा दोष आहे. तुझा पाय वाकडा पडला हे तुझे संस्कार आहेत. असं हि पुरुषाला कोण नाव ठेवत ? त्याने काय त्रास दिला. त्याने तुला कस वागवलं माहित नाही ग तिला. तू माझ्याकडे मानसिक आधारासाठी जवळ आलीस. मी तुला तो आधार द्यायला जवळ घेतलं. पण तिला ते नाही आपण बस जवळ आलेलो दिसलो. तिला वाटत आपण लग्न करणार आहोत. हे चूक आहे. हो चूक आहे पण प्रत्येक वेळीस तुला चुकीचं समजून घेणं हे कुठं बरोबर आहे ? तिला वाटत मला लाख पोरी चांगल्या मिळतील. पण तू चांगली आहेस हे मात्र ती तिच्या विचारात गणतच नाही. तिला वाटत मी करावं लग्न तू सोडून कुणाशी हि. पण तिला कोण सांगणार मी नाही करू शकत लग्न तू सोडून कुणाशी हि. एकत्र घालवलेला वेळ आपण. स्पर्शा-स्पर्शातला वरवरचा समागम. ओठांनी अंग भिजत टाकून वाऱ्याला आपलस करत तुला माझ्याशी जोडत आपण पुढं पर्यंत आलोय किती ? मी हे तिला असच नाही सांगू शकत. तुझ्या मंगळसूत्राला मी माझं मानतो आणि तू त्याला माझं मानून रोज त्याला घालतेस हे मी नाही कुणाला सांगू शकत. तुझ्या हसण्यामागचं कारण जग आपापल्या विचाराने ठरवत राहील पण तो मी आहे हे नाही मी सांगू शकत. तुला मी स्पर्श केला तेव्हा तुझ्या छातीकडे न बघता तुझ्या डोळ्यात बघून केला होता. आकर्षण असत तर नजर एकाजागी स्थिर नसती पण तुला हि हे माहित आहे कि तुझ्या नजरेतून सुटून मी कुठं तुला बघितलं नाहीच. आणि मी नेमकं हेच नाही सांगू शकत तिला. कि जिला ती वाईट समजते तिच्याहून चांगलं तिला दुसरं कुणी सापडू शकतच नाही.  तिला वाटत तुझ्याशी लग्न करून हा समाज तिला नाव ठेवेल. पण तिला मी हे नाही सांगू शकत कि मी दुसऱ्या चांगल्या मुलीशी लग्न केलं तरी कोण माझं कौतुक करणार आहे ?  तुझ्या सौंदर्यावर भुलून तुझ्या शरीराकडे बघून तुझे कमी कपडे बघून मला तुझ्या जवळ यायचंच असत तर मी प्रेम केलंच नसत. पण इतर लोकांनी बदनाम केलेलं प्रेम जेव्हा मी पण खरेपणान केलं तिने सुद्धा आपलं प्रेम बदनाम म्हणूनच ओळखून घेतलं. मी नाही म्हणत ती चुकीची आहे. पण म्हणून मी तुला हि दोष देणार नाही. तू आहेस ती माझी आहेस. तुझ्याशिवाय मला जगता येण शक्य नाही. लग्न झालं तुझं. माझं झालं नाही . एवढाच आपल्यात फरक. बाकी आपल्या रंगाची  आपल्याला देखील काही अडचण नव्हती.तुझ्या प्रेमात इथवर आलो आहे कि आता माघार हि जमत नाही. आणि पुढे जाण ते कुणी होऊ देणार नाही. पण तरी तुझी प्रतिमा मी माझ्या मम्मीला नक्कीच  स्पष्ट दाखवून देईन. तू चूक नाही. तू बरोबर आहे. तु स्त्री आहे. माझ्याकडून तुला जगायचं स्वातंत्र्य आहे. तुला वाटत मी तुझ्यावर प्रेम करावं. खुशाल घे. तुला वाटत मी तुझ्याशी लग्न करावं नक्की करू. जे मिळालं नाही तुला ते मी तुला देईन. लोकांचे रोष सोसेन. मम्मीला समजावून सांगेन. तुला हक्क आहे तुझं प्रेम मिळवण्याचा. तो हक्क माझ्याकडून तुला अदा आहे. मी तुझा आहे. आणि तू माझी. हे हि मला मम्मीला समजावून सांगायचं आहे. बस..... आणि हो एक राहीलच कि, 
माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. हे सुद्धा तुला रोज, सतत आणि सारखं सांगायचं आहे. 
तुझाच. 
अजिंक्य

Copyrighted@2020

0 टिप्पण्या