अनघाशी केलेली मी बातचीत.            
खूप स्वप्नंचा पहाड रचवत रचवत मी सज्ञान झाले. त्या आधीच्या स्वप्नांत मी माझ्या शाळेतल्या गोष्टींची आठवण माझ्या मनात साठवू पाहत होते. अक्कल काडीची नव्हती मला. समज जराही नव्हती मला. पण एक मुलगी म्हणून समाजात वावरायची बुद्धी बहुतेक जन्मजात होती मला. कुणी पुरुषमाणूस घरी आला तर त्याच्या जवळ जायचं नाही , कुणी काय खायला दिल तर लगेच खायचं नाही , रस्त्यावर बाहेर अनोळखी व्यक्तीने बोलवल जवळ तर जायचं नाही आणि असे बरेच संस्कार माझ्यावर झालेले. सोबतच तू मुलगा नाहीस मुलगी आहेस असे टोमणे आईकडून , शेजारपाजाऱ्याकडून ऐकून घ्यावे लागत. तेव्हा वाटल आपण लहान आहोत बालिश आहोत. होतात नकळत चुका आपल्या हातून त्या बदल्यात अशी गोड बोलणी खावी लागतात आपल्याला चालत ना तेवढ आणि आत्ता ऐकल तर आपलच चांगल होईल मोठेपणी. या अशा विचारात मी सज्ञान झाले.
कॉलेजला विषयाची पुस्तक कमी पण मित्र-मैत्रिणी जास्त झाली. त्यांच्यासोबत हिंडण-फिरणं आणि त्यांच्यासोबत अमाप गप्पा मारण. एकमेकांच्या मनातल एकमेकांना सांगून टाकण आणि बऱ्याच गोष्टीना जगापासून लपवून आपल्या खास मैत्रीणींनजवळ उघड करण. अशात कधी वाटल नाही कि मला प्रेम होईल. आणि प्रेम होईल ते हि मुलावर , पुरुषावर. म्हणजे लहानपणापासून ज्या पुरुष जातीपासून लांब राहायला शिकवलेलं त्याच पुरुषाच्या जास्तिक जास्त जवळ जाण्याचा हट्ट माझा सुरु झाला. त्याला हव नको असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला विचार येऊ लागला. त्यान फक्त माझ्या सोबत असाव या एका गोड विचाराच्या बदल्यात मी कित्येकदा त्याच्या सोबत त्याची घरची खाट वाटून घेतलीय.
त्या नंतर त्याच्या मनातल प्रेम. अमम.... प्रेम नाही म्हणता येत पण त्याच्या मनातल माझ्याबद्दलच आकर्षण कमी कमी होत गेल आणि माझ्या मनात त्याच्याबद्दलच प्रेम अधिकाधिक वाढत गेल. मग बालिश विचारांच्या आणि स्वप्नांच्या पहाडावरून मी एव्हाना कधीच खाली उतरले होते. प्रेमात पडून आता मला जाणवत होत कि मी आता अशा विचारांच्या दरीच्या काठावर आहे जिथून चालताना जरा जरी तोल गेला तर संपलच आपल सगळ. आयुष्याचा बट्ट्याबोळ होणार. मग त्यातून सावरून कुणाची न कुणाची साथ घेऊन एका अशा टप्प्यात आले जिथ मला माझ्या स्वप्नाचं शिखर गाठायचं होत. ते म्हणजे लग्न.
अडीच अक्षरी शब्दात उरलेलं आपल तीस-चाळीश वर्षाचं आयुष्य सामावलेलं असत. ते लग्न केल्यावरच उमगत. बाकी म्हणायला फक्त लग्न एवढाच शब्द आहे हा. पहिल्या काही दिवसात सगळ्या रात्री नवऱ्यासोबत खाटेवर वाटून घेतल्यावर तो त्याच्या मर्जीचा मालक होऊन समाजात वावरायला मुक्त झाला. आणि कधीही मी बंधनात नसताना लहानपणापासून माझ्यावर बंधनात राहायचा परिणाम झाला. आणि आता तर काय मी एका मुलाची आई बनणार आहे. मग एकीकडे माझा संसार , एकीकडे माझा नवरा ,एकीकडे माझ कुटुंब , एकीकडे माझा होणार बाळ या सगळ्यांना सावरत, करत मी इथवर येऊन पोचले खरी पण माझ्या आयुष्याला माझ्या त्या स्वप्नांच्या पहाडाला पूर्ण चढायची मी राहूनच गेली. माझी स्वप्न माझ्या इच्छा अपेक्षा सगळ काही विसरून गेली. विसरून गेली अस म्हणता येत नाही पण राहून गेल या संसारात. असच माझ्या पोटातल्या बाळाने मला विचारल आई तू प्रेम कुणावर करतेस तेव्हा मी खर खर सांगितल बाळा, मी प्रेम फक्त तुझ्यावर करते.
प्रेम मी माझ्या नवऱ्यावर हि करायचे. पण आता तुझ्यावर करते. बाळांन विचारलं , मग मी पण मोठा झालो कि अजून कुणावर तू प्रेम करणार का ? कारण मी नसताना तू बाबांवर प्रेम केल आता मी येणार आहे.
उत्तर द्यायला काय उत्तर द्याव कळत नव्हत मला. पण मला उत्तर माहित आहे त्याच. जे त्याला कळणार नाही. ते उत्तर अस कि , पहिल्यापासूनच माझ्या नवऱ्याने माझ्या शरीरावर प्रेम केल आणि मी कित्त्येकदा त्याला मन देऊ पाहिलं पण ते घेण्याची मानसिकता त्याची कधी नव्हतीच म्हणून मी त्याला माझ शरीर दिल. तू येणार म्हणून नऊ महिने ते पुन्हा उधार घेतल आणि माझ हे मन कायमच तुला दिल मी बाळा...........0 टिप्पण्या