खोट्या प्रेमाची शप्पथ आहे तुला : भूतकाळ


भाग ०१
प्रियांका : तुझ माझ हे नात अजून किती दिवस राहील अजिंक्य ?
अजिंक्य : जोवर तुला माझ्यावर खर प्रेम होत नाही.
प्रियांका : आणि ते झालच नाही तर ?
अजिंक्य : झालेल्या गोष्टी नाही झाल्या म्हणून वर्तमान बदलतो काय ?
प्रियांका : पण जी गोष्ट नाहीच झाली ती झाली म्हणून का सांगायचं ? नाही झाल मला तुझ्यावर खर प्रेम. आणि होणार हि नाही.
अजिंक्य : इतक पण खोट बोलू नको. खोटे बहाणे ऐकायला बरे वाटतात ह्या प्रेमाच्या गोष्टी नाही. 
प्रियांका : हे बघ अजिंक्य. मी आधीच तुला सांगितल होत. आपल्यात जे काय आहे त्याला काहीच नाव नाही देऊ शकत मी. तुला वाटत हे प्रेम आहे पण नाही रे अस काही.
अजिंक्य : म्हणजे हे प्रेम नाही का ?
प्रियांका : नाही.
अजिंक्य : माझ्यासाठी हे प्रेम आहे पण, प्रियांका.
प्रियांका : कसल.. खोट प्रेम ? हे बघ खोट्या प्रेमात हे अस खरखुर मनाला काही लावून घ्यायचं नसत. आणि यात काही आपल्यात झाल ते सगळ विसरून जा.
अजिंक्य : आपल्यात जे झाल ते खोट तर नव्हत ना. ते सगळ खर खर होत ना. मग ? अस का बोलतेस तू आता.
प्रियांका : कुणी आपल्याशी चांगल बोलल, कुणी आपल्यासोबत बेड शेअर केला म्हणून लगेच ती व्यक्ती आपली हुकुमत होते अस नाही. खर प्रेम झाल तरी ते आपल्या एकट्याला झालय याची जाणीव हवी. पुढची व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या विचारानेच आपल्याशी नात टिकवून असते अस नाही. बरोबर ना ?
अजिंक्य : हो.. मी गृहीत धरल तुला. मीच चुकलो. माझीच चूक झाली. दोष तुला देवून मीच एक पाप करतोय. तुला दोष मी देऊ शकत नाही. सगळे दोष माझ्याच नावे करून घेतो मी.
प्रियांका : गुण-दोष, पाप-पुण्याचा इथ विषयच नाही अजिंक्य. आपल्यात मैत्री नव्हती म्हणून प्रेम व्हायलाच पाहिजे असा नियम तर नाही. बर ते असुदे... झाल ते झाल. तुला जे वाटल ते तू बोललास. उद्या त्या अंजली नाहीतर त्या प्रतीक्षा पैकी कुणीतरी येईलच ना तुझ्याकडे परत. मग तुला मी आठवायचे पण नाही. तेव्हा मी नाही तुला ब्लेम करणार. तेवढा अधिकार हि नसेल मला.
अजिंक्य : तुझा माझ्यावर कायम अधिकार असेल.
प्रियांका : असला तरी दुसऱ्याच्या आयुष्यात कितपत आपण दखल द्यायची त्याची चाड हवी ना आपल्याला. आणि ती चाड आहे मला. मी तुझ्या आयुष्यात परत येणार नाही.
अजिंक्य : अजून ?
प्रियांका : अजून काही नाही. मी काय इथ गोष्ट सांगतीय का ? अजून, अजून करतोययस.
अजिंक्य : नाही. आपल प्रेम पण कधी आपल्याशी परक्यासारख वागत माहित नव्हत मला. अनुभव आला पण आत्ता. मग आता ?
प्रियांका : मग काय ? काहीच नाही.
अजिंक्य : मग चाललीस तर तू सोडून मला ?
प्रियांका : बांधलेल्या गोष्टी सुटतात अजिंक्य आणि आपण एकमेकांना बांधील नव्हतो.
अजिंक्य : खरय.
प्रियांका : आणि मी अस नाही म्हणाले कि मी तुझ्याशी आता बोलणार नाही, तुला भेटणार नाही. सगळ करेन पण प्रमाण तेवढ कमी करेन. कारण आता भीती वाटते.
अजिंक्य : कसली ?
प्रियांका : खोट्या प्रेमात खर प्रेम जाणवल तर मला नाही रहावणार तुझ्याशिवाय.
अजिंक्य : मग मी कुठे काय बोललो आहे ? मी तुला साथ द्यायला तयार आहे.
प्रियांका : तू मला साथ देशील पण प्रेमाच काय ? अंजली आणि प्रतीक्षाला ते तू आधीच देऊन बसलायस. माझ्यासाठी काय उरल असेल अस नाही वाटत मला आता.
अजिंक्य : अस काही नाही ग.
प्रियांका : आणि उद्या प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात आली तर तू मला हि सोडून जाशील.
अजिंक्य : नाही जाणार. खरच. तुझी शप्पथ.
प्रियांका : अजिंक्य.... मी तुझ्यावर प्रेम करतेय खोट खोट, आणि त्याच खोट्या प्रेमाची शप्पथ घेतोयस तू.
अजिंक्य : असुदे... अस वाटत असेल तुला तर ठीके. “खोट्या प्रेमाची शप्पथ आहे तुला”. नाही सोडून जाणार तुला कुठेच सोडून.
प्रियांका : खोटी शप्पथ कोण मानत आजकालच्या जगात ? खऱ्याला किंमत नाही. खोट्याच काय घेऊन बसतोस.
अजिंक्य : हे तुझ अस दोन्हीकडून बोलन असत. मग मी किती काहीबोललो तरी तुला पटणार थोडीच आहे ?
प्रियांका : हे बघ मला इतकच वाटत. मी तुझ्या आयुष्यातली पहिली मुलगी असते तर तुझ्यावर प्रेम केल असत. पण प्रतीक्षा, अंजली, नंतर मी आहे. अंजलीच लग्न होईल. प्रतीक्षाच झालय. पण त्या तुझ्याशिवाय जगतील अस नाही वाटत मला. आणि मला नाही वाटत तू माझ्याशी लग्न केलस तर फक्त माझा बनून राहशील. इतक प्रेम करून काय मिळत तुला. प्रत्येकावर तू प्रेम करतोस पण एक सांगू तुला ?
अजिंक्य : काय ?
प्रियांका : अशी वेळ आणून देऊ नकोस कि, तुझ्याकडच प्रेम संपेल आणि... तुझ्यावर प्रेम करणार पण कुणी तुझ्याजवळ नसेल. कीव येईल मला तेव्हा तुझी. आत्ताच वेळ आहे. सुधर लवकर. मी काय तीन महिनेच आहे ना सोबत तुझ्या. मला विसरायला जास्तिक जास्त सहा महिने खूप झाले.
अजिंक्य : जितकी मला प्रतीक्षा आणि अंजली जवळची आहे तितकीच तू. तुला विसरायला सहा जन्म नाही पुरणार.
प्रियांका : ते म्हणायला झाल. येउदे पुन्हा अंजली प्रतीक्षा... मग काढ माझी आठवण. जास्त पाणी पिऊन पण जर का मला उचकी आली तुझ्या आठवणीने तर मानल तुला. 


भाग ०२
अजिंक्य : कमी पाणी प्यायल किंवा कुणीतरी आठवण काढली तरच उचकी येते अस काही नाही. काही गोष्टीना फक्त ठराविक कारणच नसतात. विचारांच्या पुढे हि काही गोष्टी असतात प्रियांका. प्रेम हि त्यातलच एक. झाल म्हणून होत नाही ते असच. त्यात आपण आपल मन गुंतवलेल असत. मनासोबत किती तरी वेळ पण गुंतवलेला असतो आपण. आणि मी तुझ्या प्रेमात गुंतवलेल मन आणि माझा वेळ हि गुंतवणूक आहे लक्षात ठेव. गुंतवलेली कोणतीही गोष्ट हि तारण किंवा घानवट म्हणून ठेवलेली नसते. सोन, घर, गाडी, बंगला ह्या गोष्टी आपण विकत घेतो ती गुंतवणूक असते आणि गरजेला पैसा हवा असतो तेव्हा ती गहाण ठेवली जाते. प्रेमाच तस नाही. मी ना प्रेम तुझ्यावर गुंतवणूक म्हणून केल ना आता ते गहाण ठेवत आहे.
प्रियांका : तू काय म्हणतोयस काहीही कळत नाही मला. विषयांतर होतय इतकच कळतय. जी गोष्ट ठाम आहे तिच्याबद्दल कितीहि काय बोलल तरी ती बदलत नाही अजिंक्य. आपल प्रेम नव्हतच होत ते आकर्षण. म्हणजे बघ ना जेवढ्या भेटी झाल्या तुझ्या माझ्या, आठव एकदातरी मला तू स्पर्श केल्याशिवाय राहीलायस ?
अजिंक्य : नाही. पण तुही जवळ येऊनच दिलस कि मला.    
प्रियांका : ती तुझी गरज होती.
अजिंक्य : आणि तुझी ?
प्रियांका : माझ काहीच नव्हत. तू जे करत होतास माझ्यासोबत मी फक्त फील करत होते. बाकी तुझ्याबद्दल मनात काहीही फील होत नव्हत.
अजिंक्य : जरा हि नाही ?
प्रियांका : अंमम... नाही म्हणजे ते. तस नाही म्हणायचं मला. पण तसच काहीतरी. आणि ते तेव्हा जे फील होत ते फक्त त्या वेळासाठीच ना. आत्ता आहे का ती भावना ? नाही ना. अजिंक्य समजून घे तू याच गोष्टीला. प्रतीक्षा तुला सोडून गेली. अंजली तुझ्या आयुष्यात आली. त्या दोघी सोडून अजून कोण होत तुझ्या आयुष्यात मला माहित नाही. पण, त्या दोघींनी दिलेला त्रास तो हलका करायला मी तुझ्या आयुष्यात आले. बस इतकच काय ते तुझ माझ नात. यात प्रेम या नावच काहीच मला दिसत नाही.
अजिंक्य : बर. हीच का जर तुझी अंतिम इच्छा असेल तर इथून पुढच्या क्षणापासून मी तुझ्यासोबत नसेन.
प्रियांका : राहू शकशील माझ्याशिवाय ?
अजिंक्य : तू राहू शकशील ना. मग मी हि सवय करून घेईन. सवय सहसा लगेच लागत नाही. लागली तर ती लगेचच सुटू शकत नाही.
प्रियांका : चांगल्या सवयी असाव्यात माणसाला प्रेमाची नको. कारण ती सवय धड सुटत हि नाही आणि सोडता हि येत नाहीत.
अजिंक्य : मी काय बोलणार आता ? जगाला समजावणारा हा अजिंक्य आज स्वतःलाच समजून घेऊ शकत नाही.
प्रियांका : मला एक सांगशील ? तू लेखक आहेस. कवी आहेस. आणि हे असले लेखक-कवी त्यांच्या लेखनात बोलतात कि, प्रेम हे एकदाच होत. आणि एकदाच झालेलं प्रेम हेच फक्त खर असत बाकीच सगळ खोट. अस काहीतरी असत बरच लिहिलेलं. मग तू प्रतीक्षावर प्रेम करतो अंजलीवर आणि माझ्यावर सुध्दा. कस काय ?
अजिंक्य : प्रेम कितीदा होईल याची गणती नाही. पण जे होईल ते खर असाव. आणि जर का एकच प्रेम खर असेल तर मग हि गर्लफ्रेंड बायको सगळ झूटच. आपल पहिलं प्रेम म्हणजे आई असते ना. पण नाही. तरीही आपण एका मुलीवर मुलगी एका मुलावर प्रेम करतेच ना ? प्रेमाची गणती नाही करायची कधी. त्याची खोली आणि त्या मागचा हेतू बघावा माणसाने. कृष्ण पण प्रेम करायचा राधीकेवर. आणि राधा कृष्णावर आणि मीरा कृष्णावर. इथवरच थांबल नाही ते. राधिका सोडून सोळा हजार बायकांशी त्याने लग्न सुध्दा केला. त्यांची हजारो मुल हि झाली. पण प्रियांका, ज्या कृष्णाने राधीकेवर इतक जीवापाड प्रेम केल अस आपण म्हणतो तिच्याशीच त्याने लग्न केल नाही त्यांच स्वतःच अपत्य नाही. मग ते प्रेम खोट म्हणायचं का ?
प्रियांका : मग तुला काय म्हणायचं आहे ? आपल प्रेम खर आहे ?
अजिंक्य : अर्थातच. प्रेम हे खोट खर किंवा चांगल वाईट नसत ग. ते फक्त प्रेम असत.
प्रियांका : मी तीन दिवस देते तुला. माझ्याशी बोलू नकोस. मी स्वतःला तुझ्यापासून लांब ठेवेन आणि जर का मला तुझ्याशिवाय राहता आलच नाही तर मी स्वतः मान्य करते कि माझ तुझ्यावर प्रेम आहे. चालेल ?
अजिंक्य : हो.
प्रियांका : पण..पण..पण... जर का मी राहू शकले तुझ्याशी न बोलता भेटता. तर मात्र नात संपल समज.
अजिंक्य : तू म्हणशील तस. भेटायचं कधी आता ?
प्रियांका : सोळा डिसेम्बरला.
अजिंक्य : काय आहे तेव्हा माहित आहे ना ?
प्रियांका : तुझ्या लक्षात आहे का ?
अजिंक्य : तुझा होकार आला तर तुझा वाढदिवस तिथून पुढे प्रत्येक वर्षी सोबत साजरा करेन. आणि नकार असेल तर...
प्रियांका : तर... जर तर फक्त अपेक्षांची सुरुवात असते. मी म्हणते अपेक्षाच का ठेवायच्या आपण ?
अजिंक्य : मग काय इच्छा ठेवायची आपण आपल्या प्रेमाकडून ?
प्रियांका : आधी प्रेम तरी सिद्ध होऊदे. मग बघू. अपेक्षा निराशा काय होत ते.
अजिंक्य : मी एक क्षण जरी तुझ्या विचारातून हरवलो तर इथे तुला तुझ्यासमोर सांगतो हा अजिंक्य पुन्हा आयुष्यात स्वतःच भोसले आडनाव अजिंक्य सोबत लावणार नाही.
प्रियांका : बघू.. कोण कुणाच्या शब्दाला जागत.
अजिंक्य : शब्द काय ग, बोलणाऱ्या व्यक्तीचे मोतात असतात. शब्द हे अनाथासारखे असतात. ज्याला बोलायच आहे त्याचे ते होऊन जातात कोणता हि न विचार करता.
प्रियांका : असुदे कि, तरी या तीन दिवसात बघू हे प्रेम आणि हे शब्द कितपत मला तुझ्या प्रेमात पाडतात.
अजिंक्य : बघूच. निघालीस ?
प्रियांका : काय करू ?
अजिंक्य : थांब कि.


 भाग ०३
प्रियांका : थांबले समज. तर ?
अजिंक्य : तर काय ?
प्रियांका : पुन्हा तेच ते बोलण त्यावरून वाद. तू बरोबर किती आणि मी किती चुकीची तेच ते सगळ पुन्हा होणार. मग थांबण्यापेक्षा निघालेलं बर. इथून आणि तुझ्या आयुष्यातूनसुध्दा.
अजिंक्य : सतत जाण्याची भाषा का बोलतेस तू ? जाते-जाते अस म्हणून असच जाता येत का आपल्याला कुणाच्या ही आयुष्यातून ? आणि या गोष्टी इतक्या सोप्प्या फक्त बोलून होत असत्या तर जगातले कित्येक लोक असेच एकटे-दुकटे दिसले असते. प्रेम विरळ झाल असत आणि माणसाचा माणसावरचा विश्वास उडला असता.
प्रियांका : हे सगळ तर असहि आत्ता सुरूच आहे. त्यात वेगळ अस काय ? पण होणाऱ्या गोष्टी ह्या होतातच आणि होणारच. आणि आपल्यात होणारी हि गोष्ट मी स्वतः करणार आहे.
अजिंक्य तिच्या जवळ गेला. प्रियांका भिंतीला टेकून उभी असते. अजिंक्य तिच्यासमोर उभा असतो. अजिंक्य भिंतीवर उजवा हात टेकवतो. आणि डाव्या हाताने प्रियांकाच्या ओठांवरून ओठांच्या आकारात बोट फिरवतो. प्रियांका डोळे मिटते. अजिंक्य तिच्या कानाजवळ बोलू लागतो.
अजिंक्य : ज्या स्पर्शाने क्षणात तू तुझे डोळे मिटले. बास झाल मला एवढच. समजल मला.
प्रियांका : काय ?
अजिंक्य : अजून हि माझा स्पर्श तुला आवडतो. आणि माझ्याच स्पर्शाची सवय आहे तुला.
प्रियांका : हो. पण सवय बदलता येतेच. वेळ गेला कि सगळ्या गोष्टी बदलतात.
अजिंक्य : काही जरी बदलल तरी आठवणी त्याच राहतात ना. ना त्या बदलतात ना त्या बदलता येतात. मी त्यातलाच एक अजिंक्य. माझ्या जागी अजून कितीही अजिंक्य किंवा अजिंक्यासारखे येवोत. नाही कुणी जागा घेऊ शकत. हा स्पर्श. त्या स्पर्शाने तुला येणारा अंगावरचा काटा तेव्हा दुसऱ्या सोबत येईल का तुला ?
प्रियांका : माहित नाही.
अजिंक्य : मला माहितीय ना. येईल. पण तो जास्त वेळ टिकणार नाही शहारा. मुळात काही गोष्टी या कमी काळासाठीच्या असतात पण त्यांना जास्त वेळ टिकवायला एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रेम. मी तुझ्यावर इतक प्रेम करतोय कि, माझा स्पर्श माझ प्रेम आणि बरच अजून काही इतक्यात संपणार नाही. तुझ्यातून उतरणार नाही.
प्रियांका : ते जरी काही असल तरी मी तुला सांगितलय अजिंक्य. तुला अंजली, प्रतीक्षा दोघी आहेत. दोघींपैकी एक तरी तुझ्याकडे येणारच लिहून घे. आणि हो आल ना कुणी तर माझी आठवण काढ हव तर कागदावर लिहून घे अंजली नाहीतर प्रतीक्षा तुझ्याकडे परत येणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि तेव्हा मी तुझ्यासोबत असेन. तू त्यांच्यात गुंतलेला मी तुला बघेन. मी त्या अवस्थेत तुला बघेन पण मी माझ हरलेल प्रेम नाही बघू शकत. ते नकोच काही. आणि म्हणून मला तू नको. माणसाला एकदाच होणारऱ्या खऱ्या प्रेमाची संज्ञा तर तू बदलूनच टाकलीयस. किती आणि कुणासोबत तू प्रेम केलयस आणि कुणासोबत बेड शेअर केलायस माहित नाही. ते तुझ तुलाच माहीत.
अजिंक्य : प्रियांका, बेडवरची बेडशीट पंधरा दिवसाला बदलली तरी बेड तोच राहतो ना.
प्रियांका : म्हणजे तुला काय म्हणायचंय ? आम्ही मुली बदललो तरी तुझ प्रेम खरच असत का प्रत्येकीवर ?
अजिंक्य : हो.
प्रियांका : मला एक कळत नाही कोणता माणूस इतक प्रेम कस करू शकतो प्रत्येकीवर ? अजिंक्य मला आता तुझ्यावर डाउट येतोय. तुला काही मेंटली त्रास वैगरे नाही ना ?
अजिंक्य : अस का वाटत तुला ?
प्रियांका : मग सांग ना अजिंक्य तू इकत प्रेम का करतोस ?
अजिंक्य : माहित नाही. पण मी तुझ्यावर प्रेम करतो.
प्रियांका : खूप सार.. बरोबर ?
अजिंक्य : हो.
प्रियांका : मी म्हंटल मी तुझ्यासोबत राहते तर ?
अजिंक्य : जर तर मला कळत नाही. मला आत्ताची वेळ आत्ताचा क्षण इतकच माहित. आणि या वेळात आणि क्षणात मी तुझ्या तू माझ्या अगदी जवळ आहोत. म्हणजे जरा जरी मी पुढे झालो तर असाच हक्काने तुला जवळ घेऊन कीस करू शकतो.
प्रियांका : तुला वाटत अजून पण ? कि तुझा माझ्यावर हक्क आहे ?
अजिंक्य : प्रेम असेल तर हक्क मागावा लागत नाही. तो मिळतो.
प्रियांका : मग घे जवळ.
अजिंक्य तिला जवळ घट्ट मिठीत घेतो.
प्रियांका : अजून जोरात. मला हरवून जायचंय तुझ्यात अजिंक्य. कोण प्रियांका काय प्रियांका काही काही नको मला. मला माझ नाव माझ गाव माझ हे शरीर आणि माझ अस्तित्व काहीच नको. इतक जवळ घे तू मला.
अजिंक्य : आय लव्ह यु प्रियांका.
प्रियांका : अजिंक्य... का तू प्रतीक्षा आणि अंजलीवर प्रेम करतोस. मला तू हवायस. आणि तू आलास कि त्या हि तुझ्यासोबत येतात भूतकाळ बनून. मला ते नकोय.
अजिंक्य : भूतकाळ कुठे जात नाही पण विसरता येऊ शकतो. तू ठरव तुला मी हवा कि माझा भूतकाळ ?
प्रियांका : श.....श्श..! काही बोलू नको. बस मला जवळ घे.
अजिंक्य तिला अजून घट्ट जवळ ओढतो. दोघे हि मिठीत आहेत. आणि प्रियांका त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहते. दुसऱ्या हाताने त्याच्या केसांत पण हात फिरवत राहते. आणि प्रियांका त्याच्या ओठांवर कीस करायला लागते. अजिंक्य तिला जवळ घेऊन कीस करत करत तिला पाठीला धरून मिठीतच जागेचा अंदाज घेत किचनमध्ये येतो. प्रियांका तिची नख अजिंक्यच्या पाठीत घुपसते.
अजिंक्य : च्च्च...हा. दुखतय प्रिया.
प्रियांका : माझ नख दुखतय ?  माझा विचार कर अजिंक्य. तुझ प्रत्येक वागण बोलन मला असच लागत असत सतत...
अजिंक्य तिच्यापासून लांब होतो. प्रियांका त्याच्या मागे जाते. अजिंक्य ग्लासात पाणी भरत असतो.
प्रियांका : राग आला का. सॉरी. पण मला त्रास होतो मी काय करू ?
अजिंक्यमागे फिरला. प्रियांका त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी होत. पण ते डोळ्यातून बाहेर पडत नव्हत. अजिंक्यने हातातला ग्लास तिच्या चेहऱ्यावर धरला आणि तिच्या ओठांवर हळू-हळू पाण्याची धार ओतायला सुरुवात केली. प्रियांका डोळे मिटते. आणि अजिंक्य तिला उचलून धरतो. ती त्याला मिठी मारून वर तोंड करते आणि डोळे मिटते. दोघ एकमेकांना कीस करतात. प्रियांका खाली उतरून त्याला बघत राहते. अजिंक्य तिच्या केसातून हात फिरवत असतो. मधेच तो काही केसांच्या बटा हातात धरून केसांचा वास घ्यायला लागतो.
प्रियांका : एक विचारू ?
अजिंक्य : ( केसांचा वास घेत ) हम ?
प्रियांका : अंजली प्रतीक्षा आणि मी. आमच्यातल तूला कोण आवडेल बायको म्हणून ?


भाग ०४
अजिंक्य : तुला काय वाटत ?
प्रियांका : उत्तराला माझ्या तीन पर्याय असले तरी उत्तर एकच असणारे तुझ आणि त्यात मी नसेन हे हि माहित आहे मला.
अजिंक्य : प्रतीक्षा. कारण माझ पाहिलं प्रेम आणि तिच्या सोबत बघितलेली स्वप्न या सगळ्यांमुळे मला बायको म्हणून तीच हवीशी वाटते. आणि हवी.
प्रियांका अजिंक्यपासून लांब होते.
अजिंक्य : काय झाल ?
प्रियांका : मिळाल कि उत्तर मला. अर्थच नाही या सगळ्याला. तुझ माझ्यावरच प्रेम हे कीस हि हि...मिठी काही काही खर नाही. सगळ सगळ अस खोट खोट वाटतय. मला नाही राहायचं इथ एक पण क्षण,
अजिंक्य : प्रियांका... तू माझ्यावर प्रेम करतेस का नाही ?
प्रियांका : असून फायदा काय ? एक काम करायचं ?
अजिंक्य : काय बोल ना. तू बोलायचा अवकाश फक्त ते आणि तसच होणार.
प्रियांका : इथून पुढे भेटायला नको. बोलायला नको. हे असले खोटे खोटे स्पर्श नकोत. सगळे जवळ असतील आपल्या पण आपण नको एकमेकांजवळ ? चालेल ना ?
अजिंक्य : नाही.
प्रियांका : पण आत्ताच तू बोललास ना. मी म्हणेन तस करशील.
अजिंक्य : शब्दात पकडतेयस तू आता मला.
प्रियांका : हो. शब्द म्हणजे फक्त तुझीच एकट्याची मक्तेदारी नाही.
अजिंक्य : नाहीच भेटायचं का ?
प्रियांका : नाही. पण एक वचन देईन तुला.
अजिंक्य : कोणत ?
प्रियांका : पण मला आधी सांग तू त्रास करून नाही ना घेणार ? मी निघून गेले तुझ्या आयुष्यातून कि ?
अजिंक्य : तुला वाटत अजिंक्य खोटारडा आहे.  खोट प्रेम करतो. काळजी करत नाही. लॉयल नाही. पण मी माझ्या बाजूने सरळच आहे. मी प्रेम करतो खूप आणि खर. पण पुढच्या व्यक्तीला ते समजत नाही. त्याला ते अती होत आणि कोण राहतच नाही सोबत माझ्या. आणि मी लॉयल असतो ग खूप पण कुणाला का समजत नाही कुणास ठाऊक. मी खर बोललो कि ते खोट वाटत. पण म्हणून मी खोट बोलू शकत नाही ना. प्रियांका. अंजलीला मी नाही सोडल. प्रतीक्षाला पण मी नाही जा बोललो. आणि आत्ता ही तुला मी थांबवतच आहे. तरी चालली आहेस ना तू. मी नाही.
प्रियांका : त्याला कारण आहे काहीतरी अजिंक्य.
अजिंक्य : सगळ्यांकडे कारण असतात. पण दोष मला का त्याचा ?
प्रियांका : कदाचित तू चुकीच वागत असशील.
अजिंक्य : चुकीच हि बरोबर होऊ शकत. मानल तर. तसच काहीस तुमच झाल. मी बरोबर आहे पण तुम्ही चुकीच समजलात मला. उद्या माझ काय झाल तर तुम्हाला असच वाटेल का माझ्याबद्दल. असा हा राग वैगरे.
प्रियांका : गप तुला काही होणार नाही.
अजिंक्य : काहीही कधीही होऊ शकत. आणि इतके धक्के खाऊन मला नाही वाटत मी जगेन जास्त.
प्रियांका : गप्प ना.
अजिंक्य : असच होऊ दे आता. मला नाही जगावस वाटत. जाऊदे व्हायचं ते होऊदे.
प्रियांका त्याला मिठी मारते.
प्रियांका : अजिंक्य तुला काय झाल तर मग मी काय करू ?
अजिंक्य : मग थांब. इथ नाही माझ्या आयुष्यात.
प्रियांका : काही वेळेस काही ठिकाणी थांबलेलंच बर असत.
अजिंक्य : मग जा.
प्रियांका : पण एक वचन देशील मला ?
अजिंक्य : काय ?
प्रियांका : भविष्यात मला गरज लागली तुझी तर माझ्याकडे येशील ?
अजिंक्य : हो.
प्रियांका : मग मी जाते. पण लक्षात ठेव मी परत येईन तुझ्या आयुष्यात...
अजिंक्य : वाट बघतोय.
प्रियांका : एक कीस करशील ?
दोघांनी कीस केला.
प्रियांका : तुझ्यासारखा नाही भेटला मला कुणी आणि नाही भेटणार. माझ्या आयुष्यातला अजिंक्य तूच मला जिंकलस आणि मी तुला हरवून बसले मला माफ कर. भेटू पुन्हा भविष्यात.
प्रियांका निघाली.
अजिंक्य : प्रियांका..
प्रियांका मागे वळून,
प्रियांका : काय ?
अजिंक्य : काळजी घे.
प्रियांका निघून गेली. आणि अजिंक्यने दार लावून घेतल.

समाप्त.          ( प्रेमाची शप्पथ आहे तुला आणि प्रेमाची शप्पथ आहे तुला २ चा भूतकाळ )


सावधान....! या कथेला ऑनलाइन रजिस्टर केले आहे. त्यामुळे या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            0 टिप्पण्या