कारण, तू आवडतेस


 
प्रिय,
प्रतीक्षा 

एका नदीवरची ओल किती खोल असेल कुणास ठाऊक ? पण तीच खोली समुद्राची तपासावी म्हंटली तर ? हा विचार सुद्धा मनी येण अशक्यच... तसच अशक्य आहे हे जाणून घेण कि, माझ तुझ्यावर किती प्रेम आहे. जरा जरी ते तुला कळाल तरी त्या कळण्यात मला तुझ्याकडून बरच काही मिळाल अस मी समजून जाईन. किती ते अस प्रेम असत आपल ? माहित नाही. पण तुला बघितल कि आतून अस वाटत अजून आयुष्य हव मला. खूप खूप प्रेम करायला. पण हा वेळ असा भर भर निघून जात असतो आणि मुळात मी ऐकलय आज्जी कडून कि आपल आयुष्य हे आपल्या श्वासांवर असत. जितके श्वास देवाने लिहून ठेवलेत तितकेच आपण घेत असतो. ना एक जास्त ना एक कमी. मला पटल. आज्जी का खोट बोलेल माझी. तर सांगायचं हे होत मला कि, तू दिसली कि माझी हृदयाची धडधड वाढते आणि..... माझे श्वास फुलतात. वाढतात. आणि अगदी भरभर आत बाहेर होतात. आता मला सांग आज्जी म्हंटली तसे माझे श्वास केवढे लिहिले असतील देवाने माहित नाही पण तुला बघून मी असे भर भर श्वास घेतल्यावर कसा जगेन मी जास्त ? तरी मी बघतो तुला. बस आवडत म्हणून मला. कारण आयुष्य किती हि असो माझ कमी, थोड, थोडक पण मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे कायम. खूप जास्त. कमी स्वप्नांना सोबत घेऊन जास्तीची स्वप्न बघणाऱ्यातला मी तो ‘प्रियकर’ नाही. माझ सगळ अस प्रेम फक्त जास्त आहे आणि माझ्या या प्रेमात जास्तला विरुद्धार्थी शब्द आहे खूप जास्त. बरच जास्त. आणखी जास्त. आणि बरेच जास्तीचे शब्द. रोमिओ ज्युलीएट खोटे. काल्पनिक. पण खऱ्या प्रेमाची उपमा देताना लोक त्यांना अगदी खर बनवून टाकतात. मी तर खरा आहे. तू खरी आहेस आणि माझ प्रेम ते तर अगदी खर. जितका खरेपणा माणूस आणि देव या दोन गोष्टींच्यात आहे. 
मी तुला माझा समजतो. मी मला तुझा मानतो. मी तुला कुणाचा बनताना बघू शकत नाही. कुणी तुझा व्हायचा विचार करत असेल तर ते मला पटणार नाही. मला सकाळी एकाने विचारल तुला काय आवडत ? मी सरळ बोललो. मला “ति” आवडते. आवडत ठिकाण, जेवणखाण, रंग वैगरे जे काही आहे ते माझ माझ्या मर्जीच नाही. यातल जे काही तुला आवडत, तेच मला आवडत. तुझ्यावरती किती बाता मी कित्येकांशी करतो. तुझ्यावरती किती काही मी लिहितो. त्याला तू सोडून कित्येक लोक ऐकतात, वाचतात. मी असा हताश दिवसभर तुझा विचार करून झोपतो असा बेडवर आणि स्वप्नात माझ्या तू दिसतेस. पण फक्त दिसतेस. ना माझ्याशी बोलतेस ना माझ्या जवळ बसतेस,  ना मला स्पर्श करतेस, ना मला मिठीत घेतेस. बस दिसतेस. जस कि माझ प्रेम आहे. मी फक्त करतो पण व्यक्त करत नाही.. तसच काहीस हे वागण तुझ. पण हे हि मला आवडत. कारण तुझ्या बाबतीतली कोणतीही गोष्ट मला आवडतेच. कारण मला…..
 तू आवडतेस......


Copyrighted@2020

6 टिप्पण्या