मुलुखावेगळा राजा

shivaji maharaj real photo

लखोजी, मालोजी, विठोजी, शरीफजी, शहाजी यांचे हाती बडी सत्ता मुघलांकरवी मिळली होती. त्याचे कारण असे कि, मृशबल ( भोसले ) वंश हे बहुत पराक्रमी होत. त्यांस विरोध करणे ऐवजी आपली थोडी-बहुत सत्ता सांभाळण्या देणे आदिल व निजामास योग्य वाटले असावे. बदल्यात बहुत द्रव, रत्ने, भू-प्रदेश, रहावयास महाल, दिमतीस नोकर चाकर अन युद्ध नी मिरावण्यास घोडदळ, पायदळ, अन हत्ती दिधले गेले. एवढ्या वैभवास आपल्या प्रराक्रमाने टिकवून अजून त्यात भर घालून हे भोसले सत्तेचा अनुभव घेत मनात (स्व)राज्याचे स्वप्न पाहित आपली जरब परकीयांना दाखवुनी आपला धाक इथे रोखून असत. हर एक भोसले हे स्वप्न फक्त बघत असत. सत्यात करते वेळी कैक प्रसंग असे येई कि, आदिलशाह नि निजामशाहास फसवणे वा दगा देणे जड जाई अन मनातले ते स्वप्न त्या वेळे पुरते विचारा मागे होई.

भारतराष्ट्रात बडी सत्ता हि फक्त मुसलमानी सत्ता असत. त्या सत्तेस विरोध करणारे हि मुसलमानीच असत. त्यांचे सैन्यात क्षत्रिय नि शुद्र सेवेत हजर असत. काही निर्णयांस गरजेपोटी ब्राम्हण ठेवत. मरणासाठी मान कायम तैयार ठेवणे शुद्रांचा धर्म असे तर क्षत्रियाने शत्रूस दोन हात करून सोबत क्षुद्रांस घेऊन हल्ले करणे, प्रतिकार करणे, विजयी होणे, पराक्रम गाजवणे हे असे स्वतःला सिध्द करून जिवंत राहणे असेच चालूच असे. मुसलमानी जनता अन त्यांचे वर्चस्व सबंध भारतराष्ट्रभर पसरलेले. अशात सारेच त्यांचे दास, चाकर, सरदार, शिपाई. कोण एकेला त्या सत्तेस तोंड दाखवणार ? आणि सारेच आपल्या जिवाचे जिव. कोणी कुणास हात मिळवणी करेना. अशा काळात श्री शिवाजींचा जन्म जाहला. त्यांचे मनी जिजाऊ सारे आजूबाजूचे वातावरण गोष्टी रूपे भरी. त्या गोष्टींच्या आधारे श्रींस काहीतरी करण्याची उपरती जाहली असावी. श्री वयात आले जेव्हा त्यांस शहाजीकडून पुणे प्रांत नी काही सैन्य अन मंत्री मिळले.

हे जरी आपले असले तरी ते मुसलमानी सत्तेचाच भाग होत. जे नाही ते मिळवण्याची जिद मराठ वंश कायम मनात बाळगून असत. आपल्या जातीस वरचेपणाने मिरवणे हे त्यांचे रक्तातच असावे. अन हे नुसते वर वरचे नव्हे तर त्यांचे अंगात खरा पराक्रम असल्या करणाने श्री शिवाजी हि वडील-लोकांचे पुराने स्वप्न मनी घेऊन एक नवे राज्य स्थापण्या तैयार जाहले. मुसलमानी सत्तेसोबत दोन हात करताना श्रींस खूप त्रास जाहलेला दिसतो. पण त्या हि त्रासाचा सूड श्री शिवाजीं घेत. एकेक भू-प्रदेश मिळवत आपली ख्याती कमवत पश्चिम राष्ट्रात आपल राज्य जमवून त्यास महाराष्ट्र घोषित केले. महाराष्ट्र म्हणजे मराठा. राजे ‘महाराष्ट्र राजा’ स्वतःस म्हणवून घेत औरंगजेबाच्या बरोबरीस समजू लागे. मुसलमानी सत्ते सोबत आता मराठ सत्ता दिसू लागली. जे कित्येक पिढ्या कुणास जमले नाही ते एका मराठा इसमाने मिळवीले म्हणून लोक त्यांस साठ देऊ लागले. मराठ सत्ता असता हर जाती-धर्मास इथे मुक्त जगण्याचे हक्क नी हक्काचा निवारा अदा होता. मुसलमानांस दोन हात करणे मराठा जातीस जमले म्हणून कित्येक पत्र नी तोंडी बातम्यांत राजास महाराष्ट्र राजा म्हणजे मराठा राजा म्हणून बोलत. जातीवाचक जरी असले तरी हेच सत्य. कुणास जमले नाही ते श्री शिवाजी हातून जाहले. शुद्र स्वतंत्र जाहले. महाराष्ट्र भारतातून मुक्त जाहले. अन श्रीं नजर ठेवू लागले दिल्लीच्या तख्तावर. त्यास काबीज करणे हाच एक ध्यास घेत ते एकेक पराक्रम करत राहिले. ज्या स्वप्नांस त्यांनी पुरे केले ते पुन्हा कुणास जमले नाही. जर शिवाजी जन्मले नसते तर कुणीच असे जन्मले नसते. हा सबंध मुलुख मुसलमानी जुलुमांनी गुंतला असता. अशा मुलुखास या राजाने आपल्या पराक्रमाने मुसलमानी मुलुखातून वेगळे केले.

 

 

( लेख अभ्यासपूर्वक आहे. श्री शिवाजी राजेंच्या इतिहासाला अभ्यासून लिहिलेला लेख सादर. जसे अभ्यासपूर्वक लिहिले आहे तसेच अभ्यासपूर्वक वाचन केले तर बरे. )

copyrighted@2020


2 टिप्पण्या