पत्र तुझच आहे आणि...


प्रिय
असावरी.
एक मी आणि एक तू. झाल. संपल इथच आपल जग. कशाला कोण हव आपल्याला इथ ? या जगात लोक आली कि त्यांचा त्रास आलाच. आपल प्रेम बघून त्यांचा जळफळाट झालाच म्हणून समज. मग कुणाची नजर लागेल. कुणाचे दुवे, बद-दुवे लागालागी नकोच ना हे. आपल जग कस फक्त चांगल असाव अस मला वाटत. ज्यात तू असणार मी असणार आपल प्रेम आणि आपली साथ, विश्वास असणार. या व्यतिरिक्त अजून काय हव जगायला ?

जगात खूप वाईट लोक आहेत. चांगले हि असतीलच तुझ्यासारखे. पण तरीही. या जगाचा त्याग करून तुझ्यावर प्रेम करून मी माझ जग तुझ्यात बघायला सुरुवात केली आहे. असावरी. मान्य आहे हे जग माझ छोट आहे. पण एक सांगू त्या जगाला तुझ्या माझ्या प्रेमाने आपण खूप खूप मोठ बनवू. इथल्या जगात खूप जागा आहे. माझ्या मनाची. तू नुस्त बोट फिरवशील ती जागा मनातली  तुझ्या नावे मी अश्शी करून देईन. तस सांगायचं झाल तर मनात जरी माझ्या खूप जागा असली तरी त्यात फक्त एकालाच रहायला परवानगी आहे. आणि आत्ता त्या ठिकाणी तूच आहेस फक्त. इथ सुंदर-सुंदर निसर्ग आहेत माझ्या प्रेमाचे. जिथे तुझ्या आवडती फुल फुललेली आहेत जी माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने फुलत गेलेली आहेत. इथे जिवंत झरे आहेत अगदी थंड.. जे माझ्या या रोजच्या जिवंत प्रेमाने वाहत आहेत. दिसताना झराच दिसेल इथ तुला पण एक सांगू का असावरी...? त्या झऱ्याच पुढ जाऊन नदी आणि मग नंतर समुद्रात रुपांतर होतय. जस कि माझ तुझ्यावरच प्रेम जे रोज-रोज वाढत जातंय. तर मग पुढे. अशा या सुंदर निसर्गात प्रेमाची फुल. प्रेमाचा झरा. प्रेमाचा चंद्रसुध्दा आहे. हा पण इथ चंद्र इतका तजेलदार नाही जितका इथल्या जगातला दिसतो. माझ्या जगातला चंद्र निस्तेज आहे. हा माहितीय मला तुला चंद्र आवडतो पण माझ काय ? मला तर तू आवडतेस ना आणि म्हणून मी तुझ्यापेक्षा कोणतीच गोष्ट इथ सुंदर बनवली नाही,. त्यासाठी मला माफ कर. बर इथे चांदण्या आहेत त्या चंद्रापेक्षा चमकतात. कारण या इथल्या जगात रस्त्यावरून तू आणि मी रात्रीच हातात हात घेऊन चालताना मंद प्रकाश हवा ना म्हणून. ते चमकत राहतात बाकी अस त्यांना काहीच काम नाहीये.
इथे खूप घर नाहीत. इथ खूप झाड आहेत. खूप खूप सारी. हिरवी गार... एक हि त्यात सुकलेल नाही. रोज तुझ्यावर मी प्रेम करतो अगदी तसच रोजच्या रोज या इथल्या झाडांना न चुकता पाणी मिळत आणि म्हणून हे जग गुलाबी प्रेमासारख हिरवगार आहे. जस प्रेम सुंदर वाटत तसच इथल तुझ माझ जग सुंदर भासत. असावरी.. या अशा जगात एक पठार आहे. उंच अस नाही पण आहे मध्यम अस उंचीच. ज्याच्या चारीबाजुला मऊमऊ गवत आहे. हिरवीगार झाड आहेत. बाजूने वाहत जाणारा थंड झरा आहे. समोरच चौकोनी आकारात वाढवलेली खास प्रेमाची तुझ्या आवडती फुलांची झाड आहेत. आणि मधोमध एक छोटस टुमदार आपल एक घर हि आहे. ज्या घरात दिवसा अंधार असतो आणि रात्री उजेड. रात्री प्रेम करण्याच्या बहाण्याने मी तुझ्याजवळ आलो तर तू कुठे तरी गुडूप होतेस. आणि सकाळीच अगदी अशी दिसतेस. म्हणून रात्रीला घराच्या बाल्कनीत पंधरा हजार सातशे त्रेपन्न चांदण्या उजेड द्यायला दिमतीने खड्या केलेल्या असतात. आणि कधी लागलीच गरज तर चंद्र येतोच साथीला. आणि दिवसा अंधार का तर दिवसा तुला बघून अस वाटत सकाळ का झाली ? आणि म्हणून अंधार जमवून घरात मी पुन्हा तुझ्यासोबत प्रेम करण्यासाठी तयार होऊन जातो. अश्या या जगात फक्त प्रेम आहे. तुझ-माझ. इथे राजा मी आणि माझी तू राणी आहेस. आपली प्रजा ? तू बोलशील तर बनवूच.. एक-दोन-तीन-चार ... पण प्रत्येक वर्षाला एकच येईल. आणि हो अशा या जगात मी मानतो तुला देवासम. कारण खर जग बनवणारा देव होता अस म्हणतात. आणि मी हि हे जग मानु शकलो, बनवू शकलो तुझ्यामुळे म्हणून माझा देव हि तूच आहेस. असावरी सरते शेवटी इतकच सांगू शकतो माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. खऱ्या जगात कोणी कुणावर करत नाही इतक. बस. या खऱ्या जगाचा ऱ्हास म्हणे अजून एक हजार वर्षांनी होणार आहे. माझ हे जग तू इतक्यात तरी नष्ट करू नकोस. ते जपायला मला मदत कर माझ्याशी लग्न करून...
पत्र मिळाल कि मला एक कॉल किंवा मेसेज कर.
आणि ? काहीच नाही. पत्र वाचताना हे लाजताना तुला बघायचं माझ्या आत्ता ते नशिबात नाही पण लाजून घे.
तुझाच.....


Copyrighted2020

0 टिप्पण्या