बलात्कार : एका वेश्येचा.

एका गावात एक कुटुंब राहत. कुटुंब कसल जिथ घरचा करता पुरुष जातो तिथ ते कुटुंब-परिवार लोकांसाठी नसतच....... अशा त्या घरात मिनाक्सी ( मीनाक्षी नाही ) तिची आई जोधाई दोघच राहत असतात. नवरा दारू पिऊन मेला. जोधाई आणि मिनाक्सी धुण्याभांड्याची काम करत. आणि आपल घर भागवत. रोजच पावशेर तांदूळ दहाची तुरडाळ आणि एक दिवसाआड पाचच लोणच आणून खात. अस हे कुटुंब आपला गुजारा करत असताना एक दिवस मिनाक्सीवर एका घरी जबरदस्ती बलात्कार होतो. गुप्तांगावरची रक्ताची जखम तीन घातलेल्या पांढऱ्या पायजम्यावर स्पष्ट दिसत होती. तशीच मुंगीच्या वेगान घरी येऊन मिनाक्सी दारातच धडपडते. आईला सगळ बघूनच कळून जात काय झाल ते. आईने तिचे कपडे बदलले. तिच्या त्या जागेवर घरी असलेल डेटोल लावून तिला झोपवल. ती झोपली. तोवर आईने सगळ घर साफ केल. आणि पोलीस स्टेशन गाठल.जे काय घडल ते त्यांना रडून रडून सांगितल पण पोलिसांनी बदल्यात मजा घेत घेत पुन्हा पुन्हा कुठ लागल कसा केला बलात्कार न बरच काही विचारल गेल. कोणी केला ? हा प्रश्न फक्त एखाद—दुसऱ्यांदा विचारल असेल.अस हे वातावरण बघून ती आई जड दुखाने तिथून निघून न्यायाची अशा सोडून घरी आली. मिनाक्सिला जाग आली.
दोघी हे गाव कायमच सोडून नव आयुष्य जगायला मुंबईत गेल्या. तिथ बस स्थानकावर गुजरा करून नंतर पत्र्याच्या शेड मध्ये राहू लागले. नंतर जिथ ती काम करत तिथल्या मालकाला सांगून मीनाक्सीसाठी मुलगा बघायला सांगितला. मुलगा मिळाला बारावी नापास. एका दुकानात काम करायचा. मिनाक्सी नाकेडोळी दिसायला चांगली आणि गोरी हि होती जराशी. त्यामुळे त्यान तिला आपलस केल. लग्न झाल एका गणपतीच्या मंदिरात एकमेकांना नारळ आणि लाडू चिवडा देऊन लग्न पार पडल. एक दहा दिवस झाले असतील. आणि मिनाक्सीचा नवरा अरुण दुकानात असताना त्याला पेपर वर मिनाक्सीचा फोटो दिसतो आणि मालकाला कारण देऊन घरी येऊन मिनाक्सिला खूप मारतो. दारू पिऊन येतो रात्री आणि मिनाक्सिला आणि तिच्या आईला दोघींना तो मारतो. आणि झोपतो. तेव्हा मिनाक्सिला पेपर दिसतो आणि त्यावर तिचा फोटो दिसतो. त्यात पोलिसांनी बातमी दिलेली असते. कि अशा एका मुलीवर बलात्कार झालाय आणि आता ती बेपत्ता झालीय कोणास सापडली तर संपर्क करा तिला न्याय मिळवून द्यायच्या. रात्री दोनला मिनाक्सिला जाग येते आणि अरुण तिच्याकड बघत असतो.ती घाबरते पण त्याची दारू उतरलेली असते. तो तिला जवळ घेऊन म्हणतो आपण निघून जाऊ लांब इथून दोघंच. आणि काही प्रेमाच्या गोष्टी करून तो तिच्याशी एकदा प्रणय करतो. आणि मग पिशवीत तिचे कपडे भरतो. आणि हळूच दोघ घराबाहेर पडतात. एके ठिकाणी दोघ जातात. खूप शांतता असते तिथ. पण लोक हि असतात. आपण आजची रात्र इथ राहू अस सांगून तो तिला आत घेऊन जातो.तिचा विश्वास बसतो कारण नवरा बायकोचा प्रणय हा असा धागा आहे कि त्यात फक्त प्रेम आणि खरे पणा असतो.म्हणून ती विश्वास ठेवते. ती झोपल्यावर अरुण तिथून पळ काढतो. सकाळी आईला इकड जाग येते. घर मोकळ. दार उघड तिची शोधाशोध सुरु होते. अरुण घरी येऊन आईला घराबाहेर हाकलून देतो. मिनाक्सिला जाग येते आणि तिच्याकड बघनाऱ्या बायका दिसतात. आणि क्षणातच तिचा हात पुढ ओढून एक रागट बाई तिला इंजेक्शन मारते आणि मीनाक्षी डोळे मिटून पडते... असच जेव्हा जेव्हा तिला जाग येई तेव्हा इंजेक्शनचे डोस तिला दिले जात. आणि दोन दिवसाड एक दिवसाड तिला खायला एखादा वडापाव देत. आणि या बलत्कार पिडीतेवर रोज तिने डोळे मिटल्यावर पैसे देऊन बलात्कार होत राहिले. आणि नंतर नंतर तिच्या उघड्या डोळ्यांसमोर. एक वर्ष तीन हलाखीत काढली. आणि एक दिवस तिन तिथून पळ काढला. ती यशस्वी झाली. नवरऱ्याला शोधून उपयोग नव्हता कारण तो तिला अस आपलस करणार नव्हता.करायचं असत तर त्यान इथ तिला सोडल नसत. आईकड जाव तर आई माझ्यासाठी न्याय मागेल आणि माझ आयुष उध्वस्त होईल. या विचाराने. जवळ असलेल्या हजार रुपयात तीन हैद्राबाद गाठल. आणि तिथल्या रेड लाईट झोन मध्ये एक वेश्या म्हणून कामाला रुजू झाली. एका काम करणाऱ्या नाजूक मुलीला तो नराधम वेश्या समजला. पिडीतेवर बलात्कार झाला म्हणून वेश्या बनवून गेला तिचा नवरा.आणि आता तर ती वेश्याच झालीय म्हणून हा कायदा त्या झालेल्या बलात्काराला कशाला महत्व देईल ??? मिनाक्सीची शेवटची खूण हैद्राबाद होती आता कुठ आहे काय माहित....
(आनंदाची बातमी : United States ( U.S.) मधील cutestat या वेबसाईटने आपल्या ब्लॉगला पाच पैकी ४ स्टार दिले. आपण प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वांचा आभारी.)

0 टिप्पण्या