आठवणीत रमून....

blog marathi blog couple love images


प्रिय,
तू..
का बर तू मला आठवणार नाहीस ? अस होईल का सांग बर मला. मला आठवतय आपल प्रेम. ज्यात आपण भेटलो. एकत्र फिरलो. गप्पा मारल्या. दुसऱ्यांच्या चुगल्या केल्या. कधी एकत्र हसलो. कधी रुसलो. कधी तर मी तुझ्याशी भांडलो पण, तेव्हा तात्पुरता राग आलेला असायचा नंतर तुझ्याकडे बघून तो निघून पण जायचा. या अशा प्रेमात अस कधी वाटलच नव्हत कि हे दिवस निघून जातील.
म्हणजे लहानाचं मोठ होतो आपण. शाळेतून कॉलेजला जातो आपण. दिवस कसे ना भर भर निघून जातात. आजचा दिवस असा काही भरकन निघून जातो आपल्या आयुष्यातून कि आपल आपल्यालाच नवल वाटत. मी या सगळ्या निघून जाणाऱ्या दिवसांसाठी आधीच मनाची तयारी केलेली. पण अगं आपल प्रेम होईल ते फुलेल आणि त्या प्रेमचे दिवस पण असेच बाकीच्या दिवसासारखे निघून जातील अस कधी वाटल नव्हत ग मला. मी रोज प्रेम करत राहिलो ग तुझ्यावर. पण एक दिवस असा पण येईल कि मी प्रेम मनात घेऊन येईन पण समोर तू तिथ नसशील अस वाटलच नव्हत कधी. स्वप्नात पण नाही. मग अस कस झाल ?
मला आठवतय ना आपल नंतर नंतरच बोलण. माझ्याशीच लग्न कर मी तुला बोललो होतो. तुही होकार दिला होतास. नंतर तुझा बघाबघीचा कार्यक्रम झाला आणि पहिला कॉल तू मला केलास. एक फॉरमीलीटी म्हणून. मी ऐकत होतो. डोळ्यातल पाणी अडवून. तू सांगत होतीस तुझ्या डोळ्यात पाणी डोळ्यातून बाहेर सोडून. काय तो क्षण होता ना ? ना माझे अश्रू डोळ्यातून बाहेर पडायला तयार होते ना तुझे अश्रू पुसायला मी येऊ शकत होतो. 
बोलण्यातून दिलासा मिळत होता फक्त. तो एकमेकांना दिला आपण. तस बघायला गेल तर मीच मला स्वतःला दिला. तुझ माहित नाही. त्या क्षणाला मला तू परकी झालीस. ( वाटलीस ) माझी मिठी आता तुला कोण तरी देईल. त्या मिठीसाठी का होईना आपण भेटायचो. पण आता विनाकारण मिठी मिळत असेल रोज तुला. तो कीस केला कि तू किती तरी वेळ डोळे गच्च मिटून तू माझ्या मिठीत विझायचीस. आता कितीही तुझ्या नवऱ्याने कीस केला तुला तरी काही होत नसणारे माहितीय मला.
तू साखरपुडा केला मला न सांगता. लग्न केलस मला सांगून. मग मी कोण ? राहीलोच नाही लक्षात तुझ्या. पण तू राहिलीस लक्षात माझ्या आणि अजून पण आहेस. आ..आ..आ. मी तुला दोष नाही देत किंवा मी किती चांगला खरा प्रेम करणारा आणि तू फसवी असही मी नाही म्हणणार. माहितीय मला तू दिवसातून एकदा तरी माझी आठवण काढत असणार. पण आठवणीने काय होणार ?
आधी पाणी इतक कुठ शुद्ध असायचं म्हणून कमी पाणी पिऊन उचक्या लागायच्या. लोक म्हणायची कोण तरी आठवण काढतय. मन खुश व्हायचं. हल्ली घरातल्या पाण्याच्या आर.ओ. मशीनमुळे उचक्यापण आता यायच्या बंद झाल्यात. मग अस वाटत तू आठवण काढत नाहीस का माझी ? मग मी माझ्या मनाला समजावतो तू आठवत असणार मला. मी हि आठवण काढतो तुझी. फक्त आपण जवळ नाही. त्यात आपण तरी काय करणार नशिबातच होत असल प्रेम आपल्या. पण ठीक आहे. तू संसारात रमलीस. आणि मी तुझ्या आठवणीत. बाकी आयुष्याला माझ्या आता काहीच अर्थ नाही.

तुझाच
अजिंक्य.


0 टिप्पण्या