सवड

भाग ०१
रविवार. 
सगळी काम आणि जेवण सगळ उरकून प्रमिला आणि हेमंत दोघ बेडरूममध्ये आले. हेमंत जरा आधीच उशीवर डोक टेकवून झोपला. प्रमिला एक नजर त्याला बघते. आरशासमोर जाऊन कानातल्या रिंग काढते. आणि आरशासमोर टेबलावर ठेवते. टिकली काढून आरशाला लावते. आता तेलाची बाटली घेते. आणि बेडवर हेमंतकडे पाठ करून बसते. हातावर जरा तेल घेऊन केसाला चोळत-चोळत ती गान गुणगुणत असते. हेमंत तिच्याकडे बघत असतो. बारीक डोळे करून. तीच तेल लाऊन होत. ती तेलाच्या बाटलीला झाकण लाऊन बाटली होती तिथ जागेवर ठेवते. आणि पुन्हा बेडवर येऊन बसते. आणि केस वर घेऊन बांधते. ते बांधत असताना हेमंत तिच्या हाताच्या कोपऱ्याला धक्का देऊन अर्धवट बांधलेली केस सोडतो. ती त्याच्याकडे बघते. आणि तो तिला जवळ बोलावतो. ती जाते. हेमंत लगेच डोक्याखालची उशी हातात घेऊन मांडीवर ठेवतो. आणि तिच्याकडे तोंड करून बसतो. 
हेमंत : तू अस तेल लाऊन केस सोडलीस न मोकळी कि बस... अस बघत बसव वाटत तुझ्याकड.
प्रमिला : किती दिवस तोच जुना पाठ केलेला डायलॉग मारणार आहात ?
हेमंत : जोपर्यंत तूझ हे रूप जून होत नाही माझ्यासाठी तोवर माझा डायलॉग पण जुना होत नाही बघ तू.
प्रमिला : बर. पण केस बांधायला नकोत का ? नाहीतर उशीवर सगळ पसरल ना तेल. परत ते उद्या धुता धुता मला नाकीनव येईल. तुम्हाला काय त्याच. 
हेमंत : असू दे ग. नवीन आणता येईल उशीला कव्हर त्यात काय एवढ. तूपण ना कशाचा हि विचार करतीस. 
प्रमिला : हो करते विचार प्रत्येक गोष्टीचा म्हणून आज इथवर संसार आलाय. नाहीतर अजून बरच माग असतो आपण. आठवतय ना. का विसरला.
हेमंत : परिस्थिती बदलली तरी ती भौगोलिक आणि आर्थिक असते माणस तर तीच राहतात. आणि त्यामुळ सगळ सगळ लक्षात आहे माझ्या. म्हणजे खिशात पैसे नसताना तीन तीन किलोमीटर बस सोडून चालत फिरलोय. कित्ती जॉब बघितले आहेत. त्या कामाला तर सुमार होता का. ते भाड्याच घर. आईचा डायबेटीस तिची काळजी घ्यायची का बहिणीच लग्नाच बघायचं ? त्यात ते आमची मिळणारी जमनी दोन गुंठे ति पण काकांनी हडपली. राहत्यात घरातून भाड्याच घर बघायला लागल. आईन सगळ सहन करून मेस सुरु केली. मी काम बघितल किराणा मालाच्या दुकानात मग स्टेशनरीच्या. आणि मग वडापाव मिसळच्या छोट्या हॉटेलात. अक्षरशः लाज वाटायची तिथ कोण कॉलेजमधल खायला आल तर. मग पेपर टाकला. आणि काय काय केल मलाच आठवत नाही. 
प्रमिला : हा मग. कित्येक अशा गोष्टीना माग टाकत एकमेकांना साथ देत आपण इथवर आलोय. आणि अजून सोबत आहे.  नवरा कसा असावा ? प्रत्येक मुलीच ते एक स्वप्न आहे जे त्या बनवतात, सजवतात पण प्रत्यक्षात तस होत नाही. आणि मी स्वप्न सजवण्यापेक्षा अभ्यासात जास्त लक्ष दिल. आणि नकळत माझ स्वप्न सत्याला आल. आणि का कुणास ठाऊक मला तुमच्यावर विश्वास होता तुम्ही मला कधी एकटेपणा किंवा फसवणार नाहीत. सुरुवातीच्या दिवसात वाटल, कि सगळ सगळ संपल पण तुम्ही मला साथ दिलीत. शिक्षण पूर्ण करयला परवानगी दिलीत. आईकडे पैसे मागायला नको म्हणून स्वतः काम करून माझी फी भरलीत. दुपारी जेवलेल्या आईंच्या हातच जेवण आणि रोज संध्याकाळी तुमच्यासोबत कधी वडापाव, ओली भेळ, मिसळ आणि काय काय खाऊन पोट भरल. किती छान वाटायचं मला काय सांगू. हा पोट भरायचं नाही पण तुम्ही हात धरायचा अगदी अंगात जीव यायचा. एकदा तर बघा आपण पूर्ण दिवस उपाशी होतो. माझ्या कॉलेजच्या प्रवेशाला अख्खा दिवस गेला. नंतर जाताना  जुहूला आपण मस्त ओली भेळ खाल्ली समुद्राच्या किनाऱ्यावर बसून. तुम्हाला कळाल का काय माहित तुम्ही वडापाव पाव पण आणला माझ्यासाठी. पैसे मग संपले तुमच्याकडचे. आपल्याला चालत घरी जायचं होत. तुम्ही म्हणालात,” पोटभर खा घरी जायला वेळ आहे” मी होकार देऊन खाल्ल.  तुमच्या सोबत चालताना तेव्हा अस वाटत होत मला अशी चक्कर यावी आणि तुम्ही मला उचलून न्याव घरी. आणि मनातल माझ्या तुम्हाला कळाल्यासारख तुम्ही माझ्याक्ड बघितलत. आणि माझा हात घट्ट धरून मला जवळ घेतल. आणि  माझा उजवा हात घट्ट धरून माझ्या डाव्या खांद्यावर करून तुम्ही माझ्या खांद्यावर हात टाकून चालत होतात. किती भारी वाटत होत ते. सगळा रस्ता गजबजलेला. आणि तुम्ही माझ्याजवळ आणि पलिकड दिसणारा पाण्यात बुडणारा सूर्य. खूप मस्त. अजून पण मला आठवतो तो क्षण.    

०२
हेमंत : हो का ? अस हि तुला बरच काय-काय आठवत असत. बरच काही लक्षात आहे तुझ्या. 
प्रमिला : हो. मी स्त्री आहे म्हंटल्यावर मला तुमच, तुमच्या आई बाबांचं, माझ्या आई बाबांचं, भावाच, माहेरचे पाहुणे, सासरचे नातलग, आपली मुल या सगळ्यांचा विचार असतोच. आणि उरला सुरला वेळ मी माझ्याकडे लक्ष देते. आणि तेव्हा मला मग एकेक अशा जुन्या गोष्टी आठवतात. आणि लक्षात पण राहतात. तुम्हाला सांगू लग्नानंतर देवदेव करायला गेलेलो आपण. अस राजा-राणी सारख वाटत होत. जो तो आपल्याकड बघत होता. धावपळीमूळ आणि त्या देवांच्या वेगवेगळ्या गुलाल बुक्क्यामूळ खरा चेहरा आपला लपलेला पण एक तेज होत तुमच्या चेहऱ्यावर. मला माझ माहित नाही पण आतून मनातून तर मी खूप आनंदी खुश होते. लग्नाआधी फक्त तुम्हाला बघितल होत. धड आपल बोलन पण जास्त झाल नव्हत. जे काय ते घरातल्यांनी आपल ठरवलेलं. आणि हळदीला तुमचा मला हाताला स्पर्श झाला. जाणवल काहीतरी आतून. 
हेमंत : काय जाणवल ?
प्रमिला : माहित नाही पण होत ते काहीतरी. मी तुम्हाला बघू शकत नव्हते. म्हणजे बघायला हरकत काहीच नव्हती पण उगीचच उपरी शरम येत होती मला. त्या नंतर लग्नात सप्तपदी घेताना एक-एक फेरा असा काही मनात बसला कि वाटल बस या प्रत्येक वचनाला तुम्ही नक्की माझ्यासाठी पूर कराल. बाकीच्या माझ्या काही मैत्रिणींच वाटोळ झाल, कुणाचा घटस्फोट झाला. कुणाचा नवरा दारुडा निघाला. कुणाची आर्थिक स्थिती ढेपाळली. आणि बरीच काय-काय वेगळी कारण जस कि हुंडा वैगरे. काहींच तर आहे त्यापेक्षा चांगल झाल. एकापेक्षा एक त्यांना त्यांचे नवरे आणि सासर मिळाल. दोन्ही माझ्याच मैत्रिणी पण त्यांच्याकडे बघताना मला नेहमी चांगला संसार असलेल्या मैत्रिणींचा हेवा वाटायचा. आणि एक सांगू ?
हेमंत : काय ? 
प्रमिला : मी केला अगदी तसाच विचार खरा झाला. माझा संसार पण अगदी उत्तम झाला.
हेमंत : ते तर होणारच होत. हे बघ तू जरी जास्त काही स्वप्न बघितली नसशील लग्नाआधी- लग्नासाठी, तरी मी मात्र बरच काही ठरवलेलं. मान्य आहे आर्थिक आणि घरगुती परिस्थिती ठीक नव्हती माझी पण प्रेमाला कुठ पैसा आणि अजून काय लागत ? मी ठरवलेलच, पैशातून कुठ कसर जाणवली तर ती प्रेमातून भरून काढायची. बायकोवर माझ्या इतक प्रेम करायचं कि तिला कधी एकटेपणा जाणवला नाही पाहिजे. बाहेरच्या कोणत्या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित मन करून उगीचच भुलून जाण्यापेक्षा बायकोत आपल मन गुंतवून सरळ एकलप्रेमी होऊन जायचं मी ठरवलेलं. आणि प्रेम म्हणजे फक्त सेक्सच अस काही नाही. प्रेम व्यक्त करायचे प्रकार बरेच आहेत. तर सकाळी उठल्यावर तुझ्या ऐवजी मीच तुला चहा बनवून द्यायचा, भांडी घासताना तुला पाणी आणून द्यायचं, कपडे धुताना ते कपडे वाळत टाकायचे. जेवण बनवताना कुठ कांदा बारीक चीर, कुठ लसून सोल, भाज्या निवडून-चिरून दे अस काहीना काही तुला मदत करून मग कामाला जाऊन घरी आल्यावर तुला सगळ्या कामात मदत करायची अस मी ठरवलेलं. अर्थात तो मी नियम पाळला आणि अजून पाळतो. 
प्रमिला  : म्हणून तर माझा भार हलका झाला. आणि मला घरच्या कामाचा इतका लोड कधी वाटला नाही.
हेमंत : खरतर नवरा बायको या नात्यात बायकोच जस स्थान आहे तस नवऱ्याच महत्व पण आहेच. जशी एकनिष्ठ, पतिव्रता पत्नी, बायको हवी असते पुरुषाला, नवऱ्याला तसा प्रत्येक स्त्रीला ,बायकोला आपला नवरा हा आदर्श पुरुष बनलेला हवा असतो. मी फक्त प्रयत्न केला.
प्रमिला : त्यात तुम्ही पास झालात. जगाच काय जग अस हि बोलत आणि तस हि. पण तुम्ही जो संसार माझ्यासोबतीन रेटला त्यात कुठेही तुम्ही कमी पडला नाहीत. माझ्यासाठी तर तुम्ही आदर्श आहातच. आणि आपल्या मुलांसाठी पण.  ०३
हेमंत : ते माहित नाही मला. पण केला मी प्रयत्न. तुला समजून घ्यायचा. तुला जाणून घ्यायचा. तुझ कधी-कधी एकट बाल्कनीत उभ राहण. कधी विनाकारण किचन कट्ट्यापाशी घुटमळत राहण. उगीचच लवकर झोपून जाणं. सगळ-सगळ मी समजून घेतल. प्रत्येक गोष्ट मला सांगून मला त्रास होईल टेन्शन येईल म्हणून तू माझ्यापासून बरच काही लपवत आलीस. आणि मी जवळ घेऊन तुला ते विचारात राहिलो. खरच का पण तू सगळ सांगितल मला ?
प्रमिला : त्रास कमी असतो का सांगा मला ? पण मी मला जेवढ जमल तेवढ तुम्हाला सांगितल. तुम्हाला पण कामच टेन्शन, घरच टेन्शन, त्या कर्जाच्या हप्त्याच आणि त्यात माझी भर. म्हणून मी थोड थोडकच सांगायची. पण मला न खूप बर वाटायचं तुमच्याशी बोलून. कधी आई बोलल्या तर मला तुम्ही संध्याकाळी जवळ घेतल कि इतक बर वाटायचं कि ते लहान बाळ कस कुणी रागावल कि आईच्या कुशीत जात आणि शांत होत आणि महत्वाच म्हणजे विसरून जात कि आत्ता मगाशी आपल्याला कुणीतरी ओरड्ल होत आणि आपण रडलो होतो. मीपण विसरून जायचे आईंच रागावन तुम्ही मला जवळ घेतल कि. आणि मला तुमची एक सवय मला कायम आवडते. ती म्हणजे कारण असताना आणि नसताना पण तुम्ही मला जवळ घ्यायचात दोन मिनिट. कामावरून आलात कि आवरायचात आणि पाहिलं मला जवळ घ्यायचात. अस दिवसभराचा कंटाळा झटक्यात गायब व्हायचा. आणि प्रेमच म्हणाल तर ते कमी कुठ पडल असेल मला तर आठवत नाही. तुम्च्यासारख प्रेम कुणी केल नाही माझ्यावर. आणि माझ नशीब म्हणून मला तुम्ही मिळालात. मागच्या जन्मी खूप पुण्य केल असणार आहे मी नक्कीच. म्हणून या जन्मी सुख भोगतेय प्रेमाच तुमच्यासोबत. 
हेमंत : तसा तर जास्त पुण्यवान मीच असणारे.
प्रमिला : का बर ?
हेमंत : मला तू मिळालीस. अर्धवट माझ्या आयुष्याला तू पूर्णत्वाची साथ दिलीस. काय होत माझ्याकडे ? न स्वतःच घर. ना मोठा आधार होता घरात कुणाचा. आईच आजारपण त्यात ती चालवत असलेली मेस. मी इकड तिकड छोटी-मोठी काम करत होतो. काय अस होत माझ्याकड कि तू इतकी शिकलेली मला मिळणार होतीस. पण देवाच्या काय मनात होत कुणास ठाऊक. मला अस सुरुवातीला वाटायचा कि आपल जमेल का नाही. तुझ राहणीमान वेगळ त्यात तू इथ कस राहणार माझ तुझ कस पटणार काहीच कळत नव्हत मला. पण तू दिली साथ. बायको, 
प्रमिला : हम..म !
हेमंत : बायको खरच तुम्ही बायका खूप खूप ग्रेट असता. म्हणजे माहेरच्या घरापासून सासरच्या घरातल्या कानाकोपऱ्या पर्यंतच सगळ सगळ तुम्ही जपतां. तुम्हाला माहित असत. कधी एकट असता तर स्वताशी बोलता. कुणी सोबत असल तर सगळ विसरून त्यांच्यात सामील होता. कधी जबाबदारी घेता. ती पेलवणारी असली तरी आणि नसली तरी तुम्ही तुमची जबाबदारी पार निभावून नेता. दिसायला फक्त अंगान पुरुष मोठा आहे. पण मनान आणि सहनशक्तीने तुम्ही बायकाच बेस्ट. काय उपयोग आहे नुसत्या फोपश्या अंगाचा. जगायचं म्हंटल या जगात तर सहनशक्ती आणि जबाबदारी पेलण्याची ताकद असायला हवी. ती तुमच्याकडे जन्मजात असते. आम्ही पुरुष मात्र फुशारक्या मारतो, पण जबाबदारी पेलन जास्त झेपत नाही. आणि सहनशक्ती तर आमच्याकडे काडीची हि नसते. तुम्हा बायकांमुळे कुठ आम्ही तरत असतो या जगात. बाकी बोलल तितक कमीच आहे तुमच्याबद्दल. आणि तू तर काय बायको माझ्यासाठी आयडॉल आहेस. जगातली सर्वात सुंदर स्त्री आणि जगातली सर्वात बेस्ट बायको आहेस तू माझी.
प्रमिला : हो हो किती कौतुक. आणि माझ कौतुक करता करता सबंध सगळ्या बायकांचाच उद्धार केलात. पण असू दे. बायकांबद्दल इतक वाटत तुम्हाला बर वाटत अस ऐकून. पण वेडे झालात का तुम्ही ? इतकी तारीफ आज करताय माझी.
हेमंत : हो वेडा तर आहेच मी. तुझ्या प्रेमामुळे झालेला आणि तुझ्याचसाठी.
प्रमिला : फक्त माझ्यासाठीच ना. बाहेर नाही न कोण दुसर ? 
हेमंत : अजिबात नाही. एखादी गोष्ट कमी भेटली ना आपल्या माणसाकडून कि माणूस बाहेर तोंड मारत फिरतो. इथ मला थोड थोडक नाही गरजेपेक्षा तू जास्त दिलयस. प्रेम म्हणा साथ म्हणा. आणि बरच काही. गरज नाही मला बाहेरच्या कुणाची. आणि माझ कायम तुझ्यावर प्रेम राहील.
प्रमिला : माझ हि फक्त तुमच्यावर प्रेम आहे. आणि.
हेमंत : आणि ? कुणावर ?
प्रमिला : घाबरू नका. तुमच्यावर आणि मुलांवर माझा खूप प्रेम आहे. बाकीच्या गोष्टीला मला वेळ नाही. 


०४
हेमंत : खर तर बोलाव तितक कमी आहे तुझ्यासाठी. तुला सांगू नवरा बायको एक अस जोडप ज्यांच्यात वाद होण सामान्य नाही. ते म्हणायला छान वाटत कि प्रेमात, संसारात भांडण झाली कि प्रेम वाढत पण वाढत का ? उगीचच काहीतरी छोट्या गोष्टीवरून धूसमूस करत राहायचं दोघांनी, दिवसभर मला नाही पटत. उलट नवरा बायकोच्यात भांडण व्हायचं कारण तस काहीच नसत. तरीपण होत. तू मला समजून घेतेस. मी तुला. मला सांग या समजूतदारीमध्ये ना तू मला ना मी तुला अनोळखी आहे. बरोबर ना ? म्हणजे शरीरापासून ते एक-एक स्वभावाचे कप्पे आपल्याला एकमेकांचे माहित आहेत. मला सांग एखादा रस्ता आपल्याला माहित असला तर तिथ आपण न चुकता न उशीर होता पोचतो. का ? तर माहिती असते आपल्याला. तसच आहे ना आपल्या या नात्यात. नवरा म्हणून मी तुला इतक्या दिवसात समजत गेलो आणि तू हि मला समजून घेत गेलीस. मग भांडण झालच पाहिजे आपल्यात असा कुठे नियम आहे का सांग मला तू ?
तुझ्या प्रश्नांना मी उत्तर देण. तुझ्या बालिश मनांत असे प्रश्न निर्माण होण. साहजिकच आहे. त्यात माझ काम मध्ये आल किंवा तुला सगळ्या गोष्टींचा त्रास झाला म्हणून वेळ जात नाही म्हणून तू भांडत बसण हा कुठला पर्याय आहे ? आणि मुळात भांडण झाल कि तू माझ्यावर रुसणार. चिडणार. हा खायला, प्यायला देणार तू मला. माझ्याच समोर जेवायला पण बसणार पण माझ्याशी बोलणार नाही. माझ्याकड बघणार नाही. रात्री माझ्या कुशीत येणार नाही. नकोच तो विरह. या क्षणाक्षणाच्या विरहात पण न मोजता येईल इतका त्रास होतो. विचार कर एक ना एक दिवस कायमचा विरह आहे. माझा किंवा तुझा एकमेकांपासून. तेव्हा कितीही डोक आपटलं, कितीही रडल, कितीही विनवण्या आणि शपथा घेतल्या वचन दिली तरी मिटणारे का हा विरह ? तो कायमचा असणारे.  तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू अस जगत असताना या नात्यात प्रेम हव. भांडण नको. तुझ प्रेम मला आत्ताही पुरत नाही. माझ प्रेम मी तुला कितीहि दिल तरी मला ते पुरेपूर वाटत नाही. ज्या कृष्णाला पण उभ्या आयुष्यात प्रेमाचा पुरेपूर आनंद मिळाला नाही तिथ तर आपण माणस आहोत. किती करायला पाहिजे आपण प्रेम सांग मला.
अस म्हणतात आयुष्य जगत असताना माणसाने नाती बनवावीत ती जपावीत. आणि त्यात प्रेम शोधून आयुष्याचा अर्थ समजून घ्यावा. दुसर काय आहे या एवढ्याश्या आयुष्यात ? पण मला वाटत नातीगोती तोवरच आहेत जोवर त्या व्यक्ती आपल्या समोर आहेत. जो तो आपल्या मार्गाला वळला कि काय उरत सांग मला ? भलं ऑफिसमध्ये कलीग, बॉस असो पण दहा तासाच्या नोकरी नंतर जेव्हा माझ्या घरी मी येतो तिथ उगीच वायफळ गप्पा मारणारा कलीग , आणि विनाकारण टेन्शन देणारा बॉस नसतो. तिथ असते माझ हसून स्वागत करणारी माझी बायको. अशी बायको जिच्यावर माझ खूप खूप प्रेम आहे. प्रमिला, कस आहे ना, जन्माला घालून कळत्या वयापर्यंत मोठ करण जेवढ मोठ काम आहे. एक मोठा तप आहे आई, वडिलांसाठी तितकाच मोठा तप बायकोसुद्धा करते. पण दिसत का कुणाला ते ? कळत्या वयापर्यंत जगाशी आणि दुनियादारीशी आपला संबंध नसतो. पण जेव्हा हाच संबंध जुळतो तेव्हा खरी खंबीर आधाराची गरज असते पण आपल्या आई वडिलांचे खंबीर खांदे बेजीव झालेले असतात. आणि तेव्हा खरी साथ देते ती बायको. 
बायको. तीन शब्द. आणि प्रेम दोन शब्द. एवढ्यातच समजत प्रेमापेक्षा पण जास्त प्रेम बायकोत असत. आणि म्हणूनच मला वाटत विश्वास, प्रेम, माया, काळजी जे जे काय नात्यांचे भावनांचे प्रकार आहेत ते ते बायकोसाठी राखीव करून जगल तर काय होईल ? कुणालाच कळत नाही. मला कळाल. विशेष काही नाही त्यात. जशी दुसऱ्यांची असते तशीच आहेस तू माझी बायको. आपल नात आपला संसार समाजाने नियम घालून दिलाय तसाच सुरु आहे. पण समजूतदार पणाची पायरी एक दोन टप्प्याने वरची आहे आपली अस मला तरी वाटत. बायको मला आई सोबत नाव घेताना कोण आठवत असेल तर ती तू आहेस. उगीचच आपण देवाला देव्हाऱ्यात ठेवत नाही. ती त्याची जागा आहे. आणि ती अशीच आपण बदलू शकत नाही. तसच आपल्या आयुष्यातली पहिली स्त्री आपली आई तिच्या नंतर किंवा बरोबरीला कुणाला प्रत्येक पुरुषान स्थान दिल पाहिजे तर ती फक्त त्याची बायको असेल. कारण असतेच अशी ती. आणि आहेस तशी तू. 
चंद्र रोज येतो रोज जातो. काही दिवसांनी कुठ तरी गायब पण होतो. हे बघ ना अशी चंद्राहून सुंदर माझी बायको. रोज माझ्या जवळ असते. कधी न लांब आणि कधी न सोडून जाण्याच वचन मला देऊन माझ्या सोबत आहे. माझ्या शेजारी. बेडवर.
प्रमिलाच्या डोळ्यात पाणी आल आणि तिने हेमंतला मिठी मारली. बसल्या जागी. सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            

4 टिप्पण्या