एक सांगावस वाटत....

प्रिय, 
सावरी..

प्रेम व्हाव आणि ते मोडाव अस कुणाला वाटत नाही. पण ते झाल तर सहन हि कुणाला होत नाही. माझ्या भावना, माझे शब्द तुझ्यापर्यंत पोचतच नसतील तर मी बेजीव भावना शब्दात उतरवतो असा तुझा समज झाला असेल पण तस नाही. शब्द शब्द असतात. ते वाचताना आपल्याला काही तरी जाणवत. ते का जाणवत ? कारण त्यात जिव असतो. त्यात भावना असतात. सावरी, माझ्या वाक्यातला प्रत्येक शब्द सजीव आहे. माझी प्रत्येक भावना सजीव आहे. पण सध्या आपल्यातल हे कोमेजलेल प्रेम मला बेजीव का वाटतय समजत नाही. चूक तुझी नाही. चूक माझी नाही. पण तरीही आपण केलेलं प्रेम तुला चूक वाटत. चुकीच वाटत. का ते हि मला कळत नाही. विचारायचं म्हंटल तर तस आपल्यात आता गोड गोड बोलन हि होत नाही. तुला माझा राग राग येतो. माझ्याकडून हि काही उलट-सुलट तुला उत्तर दिली जातात. त्याच शब्दांमागच प्रेम तुला दिसत नाही याच दुखः होत. पण बोललेल्या शब्दांना शब्दानिशी पकडून तू माझ्याबद्दल बरेच गैरसमज मानून तिकड तू अशी बसली आहेस. 
मी तिकडे समजवायला येऊ हि शकत नाही. आणि यायचं म्हंटल तर तुझी भेटायची इच्छा नाही. पण आपली भेट महत्वाची आहे ग. भेट हि सोड पण ते आधीसारख बोलन तरी व्हायला हव. हे बघ मी म्हणत नाही कि तू माझ्यावर प्रेम कर किंवा केलच पाहिजेस. तस बोलन जबरदस्ती होईल माझी तुझ्यावरची. पण बोलन व्हायला हव ना ? हे बघ प्रेम कुणावर हि होत. कधी हि होत. आणि कस हि होऊ शकत. एका कॉलवर पण प्रेम होऊ शकत. फिल्म मध्ये हिरो एक राँग नंबर उचलून त्या आवाजाच्या प्रेमात पडतो. तो सीन बघून लोक टाळ्या वाजवतात. हिरोची वाहवा करतात. ती कल्पना असली तरी तस सत्यात घडू हि शकत. ते जाऊदे. मूळ मुद्दा हा कि तू बोलत नसल्याचा मला त्रास होत राहतो. तुला माझा राग येत असेल मान्य आहे मला. पण तुला वाटतो इतका हि मी वाईट नाही ग.... 
सावरी... प्रेम काय असत ? मला माहित नाही अस तुला वाटत पण एक सांगू तू प्रेमच कुठ केल आहेस माझ्यावर इतक कि तुला प्रेम म्हणजे काय हे नक्की समजल आहे...एकदा माझ्यावर विश्वास ठेव आणि पुन्हा पहिल्यासारख माझ्यासोबत बोल. माझ्यावर प्रेम कर. माझी शाब्दिक काळजी घे. मी नाही ग राहू शकत तुझ्याशिवाय. खूप सोप्प असत ग अस म्हणन कि मी तुझ्याशिवाय राहू शकते. पण ते फक्त म्हणायला सोप्प असत. ऐकणाऱ्याला ते ऐकून घ्यायला आणि समजायला किती जड जात तुला काय कळणार. अस म्हणतात दगडाची पूजा करून पण त्याचा देव बनतो. मी तर तुझ्यावर प्रेम केलय आणि तुला ते माहित आहे. कळत आहे. समजतय ते मला. पण तू का समजून घेत नाहीयेस ?
जर का तुला नसेलच माझ्या आयुष्यात रहायचं तर मी काय करू जगून ? कस आहे ना आयुष्य चालल होत कस तरी त्यात तू मला भेटलीस. आणि मी माझ आयुष्य तू न मागता तुझ्या नावे करून टाकल. माझ मन तुला देऊन टाकल. प्रेम देऊन टाकल. तू जाते अस म्हणतीयस. मग मला सांग तू निघून गेल्यावर वर लिहिलेल्यातल माझ्याकडे काय उरणार आहे ? काहीच नाही. फक्त श्वासाने माणूस जगत असता तर कोणताच माणूस कधीच मेला नसता ग.... ऑक्सिजन काय कमी आहे का जगात ? हवा काय संपलीय का ? मस्त माणूस जगला असता हवा तेवढा श्वास घेत. पण तस नाही ना. मग एकदा विचार कर ना माझा. सावरी... मी इतक प्रेम करतो ना तुझ्यावर कि तूच काय कुणीच विचार करू शकत नाही. खूप खूप सार प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझा प्रत्येक क्षणाला विचार किंवा तुझी आठवण काढून मी माझा एक एक सेकंद आयुष्यातला वाढवत राहतो. ज्या क्षणी तू मला सोडून जाशील तुझे विचार आणि तुझी आठवण मी दोन्ही सोडून देईन. आणि मग ते श्वास पण घेण अपोआप बंद होऊन जातील....
पत्र मिळाल तर कॉल कर. पण तेव्हा गप्प राहू नको. मला आवडतात ते शब्द एकदा ऐकव....

तुझाच.......


0 टिप्पण्या