नवीन एक पत्र


प्रिय,
ऐश्वर्या. ( तुला आवडत नसल तरी हे तुझ्यासाठीच आहे हे पत्र कळण्यासाठी म्हणतोय. समजून घे )

लिहीण्यासारख बरच काही आहे अस असल तरी मी तुझ्यासाठी लिहीण तेवढ कमीच आहे. याआधी तुझ्यासही बोलतो तेव्हापासून तुझी तारीफ करत आलोय. पण तरी ती तारीफ अपूर्णच आहे. ‘तू खूप सुंदर दिसतेस’ इतकस गोड वाक्य पण तुझ्याबद्दल बरच काही बोलून जात. आणि तू जितकी सुंदर आहेस त्याहून तू जास्त सुंदर असल्याच प्रमाण मला तू तुझा फोटो पाठवलास कि मिळत. कित्येक विचारांचा विचार करून त्यातल्या नेमक्या शब्दांना उचलून-धरून मी तुझी तारीफ करत असतो. अगदी व्यक्ती, चंद्र, सूर्य, तारे आणि अख्ख ज. सगळ्यांची तुझ्याशी तुलना केल्यावर पण तुझ्याबद्दल बोलताना बरच काही बोलायचं उरून जात.
तू म्हणतेस तस किती तरी मुली असतील या जगात सुंदर मग तुलाच का मी सुंदर म्हणतो ? तर ऐक, सुंदर आणि सौंदर्य यात फरक असतो. सुंदर मुळात असाव लागत. जी तू आहेस आणि सौंदर्य लय मेकअप वैगरे लावून मिळवता येत.  जे त्या मुली करतात आणि सुंदर होतात. जाऊदे, मला काय करायचं आहे त्याचं. नकोच त्यांचा विषय. विषय या पत्राचा “फक्त तू” आहेस. एक सांगू माझ जग तू आहेस आणि या जगात सर्वात सुंदर तू आहेस.  तुला माहितीय ? देवाने हे जग कित्येक हजार वर्षापूर्वी बनवल. स्वतः तयार होऊन मग त्याने देवी बनवली आणि नंतर देव्या बनवल्या. त्यानंतर अप्सरा बनवल्या. त्यात त्या देवच समाधान झाल नाही. म्हणून त्याने जगात खूप स्त्रिया बनवल्या. पण इतक्या हजार वर्षात त्या देवाला एक पण मनासारखी सुंदर स्त्री बनवता आली नाही.  याच त्याला खूप दुःख झाल असेल.  संशोधन, खूप मेहनत ई बरच सौंदर्य बघून जेव्हा त्याने तुला अति प्रयत्नाने बनवल असेल तेव्हा तो खुश झाला असेल. आता इथून पुढे अशाच सुंदर स्त्रिया बनवू असा त्याला विचार आला असेल. पण तुला एक सांगू ? फसला ग तो देव...... तुला बनवल आणि त्याला पुन्हा दुसरी कोणतीच स्त्री तुझ्याइतकी सुंदर बनवता आली नाही. तूच एकटी सुंदर. तुला बघून वरच्या सगळ्या अप्सरांचा जीव वर खाली झाला असेल म्हणून त्यांच्या विनंतीवरून देवाने तुला या जगात जन्म दिला. पण बर झाल. त्यामुळे तुझी माझी ओळख झाली. निदान मला तुला बघत तरी येत पण देवाला तेही नशिबात नाही. त्याच्या दुःखाने निसर्गाचा जीव बेहाल आहे. त्यामुळे कधीही पाऊस पडतो. कधीही उन येत. थंडीचा तर सुमारच नाही.
बर परी तुला माहितच असेल ? अशा परी कथा एक असते कि एक राजा असतो त्याच्या स्वप्नातली परी असते.  ती परी खोटी काल्पनिक आहे. पण तू सत्यातली खरीखुरी माझी परी आहेस. कोण म्हणत नॉर्वेला सुंदर आकाश आहे. रंगीत अस लाल, जांभळ, लाईट लागल्यासारखं दिसत. पण त्या लोकांना कोण सांगणार ? कि तू इथ आहेस म्हणून इथ आकाश सुंदर नाही. तुझ्यापुढे त्याची नीळशार राहण्याची लायकी नाहीये. तू तिकड नाहीस म्हणून लोकांच मनोरंजन करायला ते आकाश तिकड सुंदर आहे. लोक म्हणतात सर्वात सुंदर दिलखेचक चंद्र आहे. माणसाला समोर बघायला वेळ नाही त्या दिलखेचक डाग असलेल्या चंद्राकडे कोण बघत हल्ली ? उगीच काहीही बोलतात लोक. तुझ्यात तर अशी खुबी आहे कि, वर तुझ्या अंगाला स्पर्श करून गेला तर तो क्षणात गरम होतो. हि जादू आहे तुझ्या अंगाची. नाजूक, एखीव, मापात अगदी तुझ अंग अप्रतिम आहे. कोणताही रंग तुझ्यावर उठून दिसतो. कारण उठावदार आहेस तू.
अस म्हणतात, म्हणजे असा शोध लागला आहे कि, जर का माणसाला अख्ख जग बघायचं असेल तर त्याला किमान सहाशे वर्षाच आयुष्य हव. लोक फक्त पन्नास वर्ष पण जगत नाहीत सध्या. पण मी या आठवड्यात अख्ख जग बघितलय तुझ्या प्रेमात. कितीतरी खंड, त्यातले देश, शहर, खेडेगाव, रस्ते-गल्ल्या-बोळ, सगळ-सगळ बघून झालय माझ. आता काय बघायचं राहिलच नाहीये.  “ बस आता आयुष्यातला उरला-सुरला वेळ तुला बघण्यात आणि तुझ्यावर प्रेम करण्यात घालवायचा आहे” खूप प्रेमानंतर तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मी खूप विश्वास ठेवलाय तुझ्यावर. श्वास आणि हवा जस हे नात आहे, तस मी तुला माझी गरज बनवत चाललोय. मला सोडून जाऊ नकोस. खूप एकाकी, एकटा पडेन मी. वर तुझ्यावरच प्रेम संपून जाईल. खूप त्रास होईल मला. आणि तू माझ्या मनातून उतरून जाशील. कायमची.  इतरांसारखं आपल प्रेम नाही कि रोज भेटलो बोललो. आपण लांब राहतो. हे सारख शक्य होणार नाही,  जमेल तेव्हा भेटूच आपण हे नक्की. तेव्हा खूप चांगला वेळ एकत्र घालवू आपण. तेव्हा तुझ्या माझ्या नजरेत फक्त प्रेम दिसायला हव आपल्याला. खूप वर्षांनी मी कुणावर तरी विश्वास ठेवत आहे. तो तुटू नये इतकच वाटतय मला.  प्रेमात जे होत ते सगळ आपल्यात व्हाव वाटत. माझ लग्न झाल तरी मी तुझ्या नात्यात तितकाच अडकून राहीन. तुला साथ देईन. तुझ्या सोबत राहीन. तुझ्यावर मनापासून जीवापाड प्रेम करीन.  तुला फसवणार नाही. तुझा वापर करून घेणार नाही. तुला दुखावणार नाही. बस तुला खुश करेन. सतत.
तुझा प्रत्येक दिवस तुला हवा असला तरी लवकर संपणार नाही. कारण तुझा एक हि क्षण मी दुःखात घालवणार नाही. सगळे दिवस तुला आनंदाने जगताना चोवीस तासाचा दिवस पण चाळीस तास असावा अस वाटेल. दिवस कमी पडेल तुला माझ्यासोबत आनंद जगायला. तुझा नवरा करत नाही त्याहून जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. आई जितकी माया करत नाहीत त्याहून जास्त मला तुझी काळजी वाटते. तुझ्या वडिलांपेक्षा तुझा जास्त एक मुलगी म्हणून सतत मला तुझा विचार येत असतो. आणि आजवर कुणीच असा तुझ्यावर लावला नसेल इतका तुझ्यावर जीव लावतो. माहित नाही माझ तुझ्यावर किती प्रेम आहे पण खूप करतो एवढ नक्की. एवढीच अपेक्षा आहे कि हे पत्र वाचून तुला माझ्याबद्दल विचार करावासा वाटेल. माझी भावना कळेल. काळजी आणि खूप सार प्रेम हि समजेल.  पत्र वाचल कि नवरा असेल त्यामुळे कॉल नाही निदान एक मेसेज कर. तुझ्या उत्तराची वाट बघत बसलेला....

तुझाच
अजिंक्य. 


copyrighted@2020         

0 टिप्पण्या