किती जगतो मीकिती जगतो मी ? फक्त एक क्षण. जेव्हा तुझा विचार येतो त्या विचारात मी मला जगतो तुझ्यासोबत. नंतर मी मी नसतोच. असलो तरी मी मला जिवंत वाटत नाही. किती आठवणी बनल्या गेल्यात तुझ्या-माझ्यात. सगळ विसरल जातंय आता. तू केव्हाच विसरून गेलीस. वेळेसोबत होतच अस. मान्य, पण मग तुझी आठवण आली कि माझे डोळे लाल होऊन पाण्याने भिजतात आणि कसलासा त्रास होतो. कसा ? का ? कळत नाही. पण होत असत काहीतरी, मग अस वाटत तुला भेटाव. तुला जवळ घ्याव. पण शक्य नसत आणि मग अजून त्रास व्हायला लागतो. एकटा आहे मी. आणि एकटाच असतो मी. आरशासमोर उभा राहिलो तर भरलेल्या डोळ्यांचा, तुटलेल्या हृदयाचा, भंगलेल्या प्रेमाचा दरिद्री मी मला नाही बघवत. डोळ्यातल पाणी घाईने अस काही ओठांपर्यंत पटकन येत, जशी तू यायचीस माझ्या मिठीत अगदी त्याच वेगाने. मी हातांची होणारी थरथर थांबवू नाही शकत. फक्त एका जागेवर बसून मग पहिल्या तुझ्या “आय लव्ह यु” पासून “मला तू आता आवडत नाहीस” पर्यंतच सगळ आठवत बसतो. आणि मग सगळ अंग शांत होत. माझ मन, शरीर, विचार सगळ शांत होत. मी मग तुला विसरून जातो. तुला विसरण्यासाठी तुला आठवत राहाण हा आता माझा रोजचाच भाग आहे. बस काल मी तुझा होतो आज नाही हे एकच सत्य मला मानता येत नाही. आणि म्हणून हा इतका खाटाटोप माझा. बस आणखी काही नाही बघ. तुझी आठवण येते. पण....  

0 टिप्पण्या