पौर्णिमेचा चंद्र तो. कोण प्रेमात नसेल त्याच्या ? हर एक जण त्याचा चाहता असतो. प्रत्येकजण त्याच्या प्रकाशात उजळत असतो. ते उजळण ती प्रत्येकाची आवड असते. त्या प्रकाशात अंधाऱ्या वाटेने चालताना मिजास कुठेतरी चेहऱ्यावर दिसत तर असतेच. तो चंद्र वर कुठे फार प्रकाशमय असतो. त्यासोबतचे ढग, चांदण्या आणि न संपणार आकाश पण नजर चंद्रावरच खिळते. मग त्याच्या वरच्या खड्डया-डागांचा विसर सहज पडतो. त्याचे उलट नंतर कौतुक शब्दात व्यक्त होते. कुणी चंद्रासारख दिसत-वाटत-असत-आहे अशा उपमा कित्येक गोष्टी-व्यक्तींना देताना कित्येक चंद्र इथे वावरताना मी बघितलेत. मी तुला बघितल आणि मला तू आवडलीस. मी हि तुला उपमा दिल्या. तुझी जगातल्या कित्येक सुंदर गोष्टींशी तुलना केली. नंतर इतर लोकांसारखी तुझी तारीफ थेट चंद्र म्हणून केली. खर सांगू मला चंद्रापेक्षा तू सुंदर वाटलीस. ज्या समाजात राहतो मी त्या समाजाच्या विचाराच्या अगदी वेगळी-विरुध्द माझ्या मनाच्या समजा करून मी तुला माझा पहिला चंद्र मानायला लागलो. तसे इथे सगळे खास व्यक्तीला आपल्या चंद्र मानतात पण दुसरा.... मी तुला पहिला चंद्र मानल. चंद्रावरचे डाग-खड्डे पुढे अधोरेखित करून मी तुझ्या सुंदर चेहऱ्याला कित्येक उपमा दिल्या. ज्यात किती पौर्णिमा गेल्या आणि किती अमावस्या झाल्या. पण तुझ्यावरच्या या माझ्या प्रेमाचा असर कधी कमी नाही झाला. अक्षरशः चंद्राला कुरूप ठरवून तुला सिध्द करून मी दोषी झालो.
काल रात्री दत्त जयंतीला बाहेर गेलो होतो एका देवळात. डोंगरावर होत ते देऊळ. गर्दी होती लोकांची आणि अचानक तिथे लाईट गेली. अगदी पाचच मिनिट. तरी सगळी लोक काही गोंधळ न घालता आरती करत-म्हणत होते. मी हि.
सहज बाजूला बघितल लोक फिकट पण तजेल दिसत होते. वर चंद्र दिसला आणि माझी त्याच्या विरोधी बोललेली वाक्य मला आठवली. तुझ्यासारखा तो हि विसरून गेलाय ती वाक्य आणि मला हे मी समजून गेलो. पहिल्या सारखा तो आता आकाशात आलेला दिसला. तू हि कुणा दुसऱ्याच्या प्रेमात हरवून आहेस तू तुझ आयुष्य अस मला समजल आहे. आणि मी......... ?
copyrighted@2020
0 Comments