कुणीतरी


कधी सोबत चालल्याचा भास. कधी मोबाईलमध्ये तू ऑनलाईन असल्याचा आभास. कधी मोबाईल वाजलाच तर तुझा मेसेज आल्याचा दचका. कधी रस्त्यावर तुझ्यासारखा शर्ट घातलेला दिसला तर तू दिसल्याचा धसका. न आवडणार गाण आता ऐकून ऐकून तोंडपाठ झाल. सोमवार ते शुक्रवार कधी आठवला नाही. कायम शनिवार रविवारच माहित मला. कारण तेव्हाच तर आपण भेटायचो. आता हल्ली रविवार ते पुढचा रविवार मोजून मोजून संपतो. हसणारी मी कायम तुझ्यासोबत आज रडवेली झालीय रे. मजबूर होती तुझ्या प्रेमाची आता मोतात झालीय तुझी. कायम सतत वाटत तू येशील. मला भेटशील. पुन्हा जवळ घेशील. भविष्यातली स्वप्न दाखवशील. तुला माहितीय ? मला फिल्म बघायला आवडत नाही. मला तुझ्या सोबत पुढची स्वप्न बघायला आवडतात. मला एकट कधी वाटल नाही आता वाटत. कधी विचार आले नाहीत आता येतात. कधी शांत बसवत नाही एका जागी आता एका जागी खोलीत बसून असते. दिवसदिवस अख्खा. का कळत नाही तुला ?मनाने माझ्या किती हाका मारल्यात तुला. पण नाही कळत तुला. ऐकू नाही येत तुला. आधी मी तोंड उघडल कि वाक्य पूर्ण व्हायच्या आधी तुला सगळ समजायचं मला काय सांगायचंय तुला ते. आता सांगून, ओरडून पण तुला समजत नाहीये. किती वेदना होतायत माझ्या मनाला आत्ता कळतय का तुला ? नुस्त भेटलो, बोललो म्हणजे प्रेम झाल, नाही होत अस. ते निभावाव लागत. वागण्यातून, बोलण्यातून. तू प्रेम दाखवलस. आणि मी प्रेम केल. तुझा दिखावा होता अस हि मी म्हणत नाही. पण आत्ताची स्थिती बघता तुझ माझ्यावर प्रेम होत अस हि म्हणता येत नाही. सतत रे तुझी आठवण येते. सगळे फोटो सेव्ह आहेत मोबाईल मध्ये. सगळ्या आठवणी सेव्ह आहेत माझ्या मनामध्ये. तुझ्यासाठी काय नाही केल मी ? कि तुला दुसरीची गरज भासली ? काय मी द्यायचं होत तुला ? सांगायचं तरी होत मला. इतका तर मोकळेपणा आपल्यात होताच कि. दिल असत हव ते तुला. वस्तू, मन, शरीर सुद्धा. पण तू बोलला नाहीस. न बोलता टाळत राहिलास. समजत असून पण मी तुला काम असेल असा वेडा विचार करत राहिले. तुझ्या विचारात गुंतत राहिले. तुझ्यावर प्रेम करत राहिले. तुझ्यावर हक्क दाखवत आले.  सगळ्या सगळ्याचा तू विसर पाडलास. इतक सोप्प असत का प्रेम तोडण ? मग प्रेम करन इतक अवघड का असत समजत नाहीये मला. समजत तर हे पण नाहीये मला आता कि मी काय करू ? तुला मिळाली दुसरी मी कोण दुसरा बघू ? तुझ्याकडे देण्यासारख काही नाही माझ्याकडून घेण्यासारखं बरच काही आहे. फायदा घेतील रे दुसरे माझा. मी त्यांची नाही तुझी आहे. दुसरी घेतील गैरफायदा. तू घेशील फायदा तरी मी तयार आहे. पण तू ये. एकदा भेट. माझ्याशी बोल. मला जवळ घे. मी इतकी हि वाईट नाही जितका तू समजतोस. खोलीत कायम बंदिस्त आहे मी तुझ्या आठवणीत. आणि तू माझ्या मनात बंदिस्त आहेस. मला तू हवास बाकी काय नको. एक एवढीच शेवटची इच्छा समज माझी पण तुला माझी इच्छा सोड तुला तर मीच नको आहे....मी काय करू ?

Copyrighted@2018

2 टिप्पण्या