Commonवाईफ | episode 01

पार्ट झिरो वन.
'शूट वन पॉर्न क्लिप'

अपार्टमेंटचा तिसरा मजला,
पाच पोलीस हवालदार दारात उभे राहून आजूबाजूची गोळा झालेली लोकांची गर्दी बाजूला करत होते. दोन पोलीस आत उभे होते.
देशमुख : झालं की आता, आता कसला शोक पाळायचा. भेंचोद करताना भीती नसती  आणि सगळं झाल्यावर गांड फाटती. मग करायचंच कशाला कांड. भोसले, उचला ह्याला. हा काय आता उठत नसतोय. ऍम्ब्युलन्स कधी येणारे ?
भोसले : पाच पन्नास देतो जास्त बोललोय येईल लवकर. मागच्या वेळेचा हरामी होता. समाजकार्य म्हणून ये बोलवलं तर बॉडी माहुलीला पोचली तेव्हा आला तो. म्हणून याला पैसे द्यावे म्हंटल.
देशमुख : ह्याचा मोबाईल घ्या तो तिथं टेबलावर पडलाय. तिचा मोबाईल ( एक नजर खोलीत टाकून ) तो बघा खुर्ची खाली. दोघांचे मला द्या आणि चला.
मोबाईल्स उचलून भोसले देशमुखांना देतात. सोबतची हातकडी उघडून पुढच्याला इशारा करतात. तो दोन्ही हात पुढे करतो.
भोसले : असले सिन पिक्चरमध्ये असतात. चल तू. तू संपलाच आहेस, खाली गाडी पर्यंत चाल मोकळा श्वास घेऊन.
दोघे खाली निघाले.

तो गाडीत बसला. समोर भोसले बसले.
मागून ऍम्ब्युलन्स आली. वरून बॉडी आणली आणि त्या ऍम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. पोलिसांची एक गाडी ऍम्ब्युलन्समागे गेली. एक गाडी पोलीस स्टेशनला.
मेसेज : व्हीडिओ झाली ?
रिप्लाय : नाही.
मेसेज : मग कधी करणार ? सेट लावू घरी? कास्ट अँड क्रीव्ह पाठवू का, मादरचोद.... अर्धा तास. अर्धा तास फक्त. नाहीतर अर्ध्यातासाने तिथं लाईव्ह येईन मी. लाईव्ह व्हिडीओ बनवीन तुझंच घर. तुझाच मोबाईल, तुझीच बायको. पण हिरो मी. तू व्हिडीओ एडिट करून दे. चाललेल ?
रिप्लाय : नाही.
मेसेज : मग अर्धा तास. दोन मिनिटं गेले अठ्ठावीस मिनिट फक्त. सच्चा प्यार आहे ना तुझा तिच्यावर..हहा...सच्चा प्यार, कुणाची कल्पना आहे ही. हा.... कामाला लावलं त्याने सगळ्यांना. अब यही सच्चा प्यार तेरा बुरा वक्त बन रहा है. और मैं बुरा इंसान लग रहा हूं. हो ना? क्या करे, इंसान कभी बुरा नही होता बस उमसे अच्छाई कम होती है. मुझमे तो बहुत कम है. ही सदतीसावी व्हिडिओ. आहे. हजार करायचेत लवकर लवकर. पंचवीस मिनिट.जा कर व्हिडिओ.
भोसले : सर, हॅकर आलाय. त्या मोबाईल मधले डिलीट झालेले मेसेज हा मिळवून देईल.
देशमुख : चहा घेणार ?
प्रतीक : नको.
देशमुख : अरे घे रे कोणतं ही काम फ्री करायचं नसत. नाहीतर केलेल्या कामाची पुढच्याला कदर राहत नाही. आणि आत्ता काम केलंस नीट तर परत बोलवीन की चौकीवर.
प्रतीक : बर कटिंग चालेल.
चहा आला. पिऊन झाला. भोसले देशमुख पवार आणि प्रतीक एका खोलीत गेले. प्रतीक बराच वेळ 'तो' मोबाईल लॅपटॉपला जोडून बरीच कोडींग लिहून वैग्रेर डेटा मिळवत होता.
ऐश्वर्या कपडे घालत आरशातून पुढे बघत,
 ऐश्वर्या : तू असा का सेक्स करतो जीवावर आल्यासारखं ? मी इतकी फिगर नीट ठेवलीय. तुला आवडतात तसे केस वाढवून स्ट्रेट करून घेतलेत. नाकात सानिया मिर्झा स्टाईलची चमकी टोचलीय. मानेवर तुझं नाव कोरलय. पण तू काहीच बघत नाहीस. कशाचं कौतुक करत नाहीस. उगीच राक्षस अंगात आल्यासारखा कुठून पण मला ओढून बेडवर आणतोस. तुच म्हणतोस ना फिजिकल ऍट्राक्शन संपल की नात्याचा दि एंड लवकर होतो. ही सदतीसावी वेळ आहे. तू माझा न होता माझा झालायस. मी बायको आहे म्हणून सोडून देतेय पण गर्लफ्रेंड असते ना केव्हाच सोडलं असत तुला.
एका तासाने सगळे मेसेज स्क्रीनवर दिसायला लागले.
आणि पहिली व्हिडीओ प्रतीकने सुरू केली.
आता बोल की अजिंक्य, शांत बसून तुला बर वाटत असेल मला नाही. का अस करतोयस ? तुला तर हे सगळं आवडत ना ? मग ही आवड कुठं गेली ? आवडत तर संपत नाही कधीच,अस तू म्हणतोस मग ?
अजिंक्य : आवड संपली नाही जपतोय मी. सेक्स म्हणजेच प्रेम आहे. तो झाला ना? मग बस.. सेक्स प्रेम आहे. तो कसा का होईना झाल्याशी मतलब. आणि मी चार चार वेळा खाऊन कमी विचार करून ताकद स्टोअर करतोय ती इथे घालवायला करतोय ना ? सगळं ठीक आणि बरोबर चाललं आहे. यात तुला माझं प्रेम कमी वाटत असेल तर विचार बदल. आत्ताच. कारण विचार करायला पुन्हा जमत पण ती वेळ  पुन्हा आणायला जमत नाही. प्रेम... नुसतं करायचं नसत ते समजायचं पण असत. कासव आणि माणसातल्या संवादासारखं असत प्रेम.
ऐश्वर्या : कासव ?
अजिंक्य : माणसाला बोलता येत आणि ऐकत येत. पण स्पर्श आणि त्यातली भावना प्रत्येकाला समजत नाही. आणि कासव, त्याला तर यातलं काहीच नाही. आवाज नाही, ऐकायला येत नाही. ते पाळलेल कासव घरात मोकळं फिरत असेल तर त्याला भूक लागलीय का त्याला पाण्याची गरज आहे हे समजण्यावर आहे.
ऐश्वर्या : त्याने काय होत ?
अजिंक्य : होत काहीच नाही. पण ती  समज आपल्या समजाला खर करून टाकते. माणसाला वाटलं त्या कासवाला भूक लागलीय म्हणून त्याने कासवाला पाण्यात सोडलं तर कासव तहान लागलीय म्हणून पोहायचा थांबणार नाही. समज खरा होतो. त्यामुळे तू माझ्या बाबतीतला समज नीट करून घे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि कायम राहील. आय लव्ह यु.
प्रतीक : सर, ही व्हिडिओ तर प्रायव्हेट शूट केलेली पॉर्न क्लिप आहे.
देशमुख : पण ही सेंड का केलीय ? ही व्हिडीओ आधी कुठल्या साईटवर आहे का शोध आणि डिलीट कर. मग बाकीच पुढे बघू.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies