फुकटचे सल्ले

( image by google )


भावनांच्या आधीन होणारे कधी कधी मानसिकरीत्या हाताबाहेर जातात. अस का झाल ? अस का होत ? याचा विचार न करता या ना त्या गोष्टीला, व्यक्तीला ते दोष देत राहतात. चूक स्वतःची असते पण दोष इतरांना देऊन स्वतःच्या बोडक्याच ओझ काही वेळ का होईना अशी लोक हलकी करतात. मग मी किती सुखात आहे असा बनाव करून जगात अस वावरतात कि काहीच झाल नाही अस भासवतात. पण मुळात अशा लोकांना मनात सगळ लपवता येत असेल हि पण सगळ्याच गोष्टी चेहऱ्यावर लपून राहत नाहीत.
अट्टल चोरासारख आपल दुखः लपवून जगात वावरताना पुन्हा पुन्हा सतत सतत धक्के खात हि लोक जगत राहतात. त्यात प्रत्येक वेळीस त्यांचीच चूक असते अस नाही किंवा प्रत्येक वेळीसच पुढचीच व्यक्ती त्यांना फसवते, त्रास देते अस हि काही नाही. समज, गैरसमज या सीमेच्या पलीकडे यांना बहुदा जगायला, जायला आणि विचार करायला आवडत नसाव. म्हणून तर अशा व्यक्ती आपल्या चुकांची फक्त इतरांना दुषण लावत बसतात.
अशी लोक वैयक्तिक विचार स्वतः करत नाहीत तर चार लोकांची मत घेऊन त्यावर विचार करतात तो हि अर्धवट. म्हणजे जे मत सोप्प, सोयीस्कर वाटत त्याला अंमलात आणून घडलेल्या गोष्टीचा आनंद किंवा पश्चाताप करत बसतात. आनंद मिळाला तरी तो थोड्काच असतो मग परत ओरडत बसतात आणि पश्चाताप झाला कि त्या लोकांच्या नावाने खडी फोडायची म्हणजे अस पण आणि तस पण दोन्ही बाजून ओरडायच.
आजकालच्या सोशल साईटच्या जमान्यात ओळखीच्या पेक्षा अनोळखी व्यक्तीशी नात निभवायला प्रत्येकाला आवडत. सल्ला हा फुकट असतो. जगायला लागणारा प्यायचं पाणी पण विकत घ्याव लागत इथ कारण जगायला पाणी महत्वाच आहे तसच जगण्यासाठी अनुभव हा हवाच आणि त्यासाठी सल्ला हि हवा पण तो मात्र इथ फुकट मिळतो. आणि असा हा फुकटा सल्ला अनोळखी व्यक्ती कडून घेऊन तस वागायला आजकाल कुणालाच काही वावग वाटत नाही.
अशाने एकच होत कि  फुकटच जास्त टीकत नाही आणि म्हणून फुकट सल्ल्याच्या बदल्यात कायम पश्चाताप हा मिळतोच. मग करायचं काय अशा लोकांनी ? जे विचारी नाहीत. जे हुशार नाहीत. जे अल्लड बालिश विचारांचे आहेत किंवा ज्यांना स्वताचे विचार स्वतः करायची अक्कल नाही.किंवा जे सुशिक्षित आणि हुशार हि आहेत.
अशांनी एकच कराव प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर असत आणि त्या उत्तराच्या दोन बाजू असतात. एक चांगली दुसरी वाईट. प्रत्येक जण हाच विचार करून चांगल्या मार्गावर पाउल ठवतो कि मला बदल्यात चांगलच मिळेल किंवा मी या मार्गाने गेलो तर माझ चांगलच होईल. पण चांगल्या मार्गात नेहमी वाईट मार्ग वाट अडवून असतोच. आनंदाचा मार्ग जर पायवाट असेल तर वाईट मार्ग मेगा हायवे आहे. म्हणूनच कोणत हि काम करताना आधी वाईट गोष्टीचा विचार करून त्याच्या विरोधात आपल्याला कस जाता येईल ,आलेल संकट कस हटवता येईल हा विचार करत करत जर चांगल्या आनंदाच्या मार्गावर आपण जर उतरलो तर बदल्यात कायम सुखच मिळेल. आणि यासाठी कुणाचा फुकट सल्ला घेण्याची हि गरज नाही.
बाकी बारा महिने चोवीस तास आपल्या सोबत फुकटी सल्ले घेऊन फिरणारे या जगात कमी नाही. पण एक लक्षात ठेवल पाहिजे आपण कि त्यातल्या एकाचा हि सल्ला आपल्या कधी कामी येत नाही......... ( काही निवडक अनुभवी व्यक्ती सोडून )
0 टिप्पण्या