काहीस सांगायचंय

प्रिय,
सावरी...😘
किती दिवस झाले आपली ओळख होऊन ते मोजता येतील पण तुझ्यासोबत घालवलेला वेळ आणि त्याची किंमत अशी सहज मोजता येणार नाही बघ. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते जग जाहीर आहे. जसा आकाशातला चंद्र निर्भीड पणे रोज उगवतो मी तसच तुझ्यावर खूप प्रेम करतो जगाचा विचार न करता. तुझ्याशी बोलून काय मिळत मला माहित नाही पण एक सुकून मनाला मिळतो. त्याच मी शब्दात वर्णन करू शकत नाही. सावरी, तू जेव्हा मला म्हणतेस ना माझंपण तुझ्यावर प्रेम आहे. मला ना इतक भारी  वाटत ना काय सांगू तुला. म्हणजे जागेवर बसून आकाशात उडल्याचा भास होतो मला. कित्येक तरी विचार सतत माझ्या डोक्यात घुटमळत असतात. सगळे विचार तुझेच असतात. बाकीचे विचार कुठं हरवलेत कुणास ठाऊक ?
तुझ्याशी बोलून झाल्यावर पण तुझाच आवाज कानाशी घुमतो माझ्या. अजिंक्य... असा आवाज येतो मला. असा रस्त्यावरून जात असलो कि बहिरा असल्याचं वाटत माझं मलाच. अग खरच काहीच ऐकायला येत नाही मला डोक्यात तुझा विचार डोळ्यासमोर तुझा बघितलेला तो फोटो आणि कानात तुझा एकसारखा येणारा आवाज. मूक बधिर आंधळा करून सोडतात मला. खूप खोलवर भिनलियस तू माझ्यात. आणि मी खूप खोलवर गुंतलोय तुझ्या प्रेमात..
इतकं भारी असत का प्रेम ? म्हणजे मोबाईलचा आवाज आला कि पहिली आठवण येते तुझी. अस वाटत तुझाच मेसेज आला असेल. मेसेज दुसऱ्याचा असेल तर मन नाराज होत. एकदा तुझ्या चॅट वर जाऊन बघत तू ऑनलाईन आहेस का. पण तुझा मेसेज आला असेल तर ? पोटात अस गुदगुल्या झाल्यासारखं होत आनंदाने. काय सांगू तुला. आणि कधी रिंग वाजलीच मोबाईलची आणि तुझा कॉल आला असेल तर ? हृदय इतकं धडधडत कि त्या क्षणाला कोणत्या डॉक्टरकडे गेलो ना तर तो एकच सांगेल अजिंक्य ऍडमिट हो इथं तू तुला आता हार्ट अटॅक येणारे.. इतकी म्हणजे माझी अशी अवस्था होते.
तुला बघितलं नाही पण तुझं मन बघितलंय मी. तुझा स्पर्श झाला नाही मला पण तुझ्या आवाजाने माझ्या कानाला कित्येकदा स्पर्श केलाय. आणि त्यातच मी खुश आहे. एकदा तुला जवळ घेऊन मिठी मारायचा विचार आहे. आणि काहीतरी बहाणा करून तुझ्या ओठांना पण स्पर्श करण्याचा विचार आहे माझा. तुझ्यावर इतकं प्रेम करतो मी कि तो गोष्टीतला रोमिओ पण माझं प्रेम जाणून घेण्यासाठी वर तिथं मराठी भाषा शिकत असेल. रांझा पण मराठी भाषेचं व्याकरण शिकत असेल. त्यांना हि त्यांचं प्रेम कमी वाटेल इतकं इतकं जास्त प्रेम मी आत्ताच्या या घडीला तुझ्यावर करत आहे. सावरी...तुझ्या सोबत राहण्याचा. सोबत जगण्याचा एवढाच एक माझा हट्ट आहे. बाकीचे हट्ट मी तुझे पूरविन बाकी माझं अस मत काही नाही.
माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि ते फक्त तुझ्यासाठीच आहे.....
तुझाच..

0 टिप्पण्या