ए ‘लव्हज’ ए

01( Imgae by google )


सकाळी साडे सातच्या सुमाराला अधिता नाष्टा करून रूमवर निघाली होती. रस्त्यान चालत असताना तीच फक्त एकटी शांत आणि बाकीच आख्ख जग गोंधळलेल होत. गाड्यांचा आवाज. बी.आर.टी. मार्गातून वाट काढत आणि सतत ब्रेक दाबत जाणाऱ्या पी.एम.पी.एम.एल.चा आवाज. रस्त्याने कोण गाण गुणगुणत जातंय ,कोणी मोबाईलवर बोलत चालतय, कुठून तरी सकाळ सकाळच्या आरतीचा आवाज आणि सोबत घंटेचा आवाज येतोय. आणि यात भर म्हणून उडप्यांच्या हॉटेलातून कर्कश्श गाण्यांचा आवाज येतोय. अस सगळ असताना अधीत बधिरा सारखी शांत , निवांत रस्त्याने चालत चाललीय. जगाचा तिचा काही संबंध नाही किंवा जगाचा तिला आवाज येत नाही अश्या अविर्भावात ती चालत असते. कारण तिने कानात हेडफोन लावलेले आहेत.
कस आहे, पुण्यात मुंबईसारखी खूप धावपळ नसली तरी, असते काहीबाही धडपड लोकांची, पोहे-सांबरची प्लेट आपण उशिरा आलो तरी आपल्यलाला पहिली मिळावी म्हणून ढकला-ढकली करण्याची धडपड, बस मिळण्यासाठी नाही तर बस मध्ये बसायला जागा मिळण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याची धडपड. आणि हि धडपड रोज अगदी सारखीच असते. टाईम टू टाईम सगळ असत नाष्टा, चहा, बस स्टॉपवर थांबायची वेळ, बसची यायची वेळ. अस सगळ बघयला मिळत पुणे शहरात.
तस काहीस अधिताच होत. रोज वेळेत जाऊन नाष्टा करायची ती. आणि रोज ती घरी जाताना तिला रोजचा तो एक मुलगा तिच्याकड बघत जायचा. दिसायला चांगला होता तो. पण अधिता त्याच्याकडे बघायचीच नाही. आज हि. अधिता जात होती आणि बरोबर त्याच वेळेला म्हणजे पावणे आठला तो मुलगा तिच्या समोरून आला. तो तिच्याकडे बघत होता. तिने लक्ष दुसरीकडे करायला रस्त्याच्या पलीकडे बघितल. पलीकडून रोज दिसणारी एक मुलगी जात होती. ती अधिताकडे बघते आणि नजर फिरवते. कारण तिने सहजच बघितलेलं असत अधितला. आणि हा मुलगा अधिता पुढ गेली तरी तिला मग वळून बघत असतो.


अधिता रूमच्या अलीकडे पोचलेली असते. आणि गाण्याचा आवाज एक सेकंद कमी होतो आणि परत मोठा होतो. कुणाचा तरी मेसेज आला असेल या विचाराने ती बघत नाही. रूमवर पोचते ती आणि मग कानातली हेडफोन काढून ती मोबाईल चेक करते तर फेसबुकला एक फ्रेंड रिक़्वेस्ट आलेली असते. ती नाव बघते. “आदर्श पुरोहित” फोटो तर टॉम क्रुझचा असतो. ती त्याच्या अपलोड फोटोत जाऊन बघते पण त्याचा एकही फोटो नसतो. ती विचार करते जाऊ दे फेक अकाउंट असेल म्हणून ती बॅक घेते तेवढ्यात मोबाईलचा आवाज होतो. तिला मेसेज आलेला असतो फेसबुकवर.


( Image by google )


आदर्श : हाय
अधिता ठरवते नको बोलायला याच्याशी. आधीच तिला ते फेक अकाउंट वाटत होत. तरीपण खात्री करायला हवी म्हणून ती त्याला मेसेज करते.
अधिता : हेल्लो.
आदर्श : हाऊ आर यु ?
अधिता : आय एम फाईन.
आदर्श : बिझी आहेस का ?
अधिता : नाही..का ?
आदर्श : मग मला विचारलं नाहीस
अधिता : काय ?
आदर्श : मी कसा आहे ते.
अधिता : हम... कसा आहेस ?
आदर्श : मी कायम फाईन असतो.
अधिता : हो का ?
आदर्श : हो ना..
अधिता : ओके.
आदर्श : ऍड कर ना मला.
अधिता : का ?
आदर्श : असच. तुझ्या का ला, माझ्याकडे उत्तर नाही.
अधिता : बर.
अधिता अलकेमीस्ट नावच पुस्तक हातात घेते. पंच्याऐंशी पान तिची वाचून झालेली असतात. आता थोडी चार पाच पान वाचावीत असा विचार करून ती मोबाईल बाजूला ठेवते. आणि पुस्तकाच पान पलटते तर पुन्हा मोबाईल वाजतो. ती हातात मोबाईल घेते आणि मेसेज बघते.
आदर्श : तू कुठे राहतेस ?
अधिता : इतकी का घाई आहे जाणून घेण्याची ? आत्ताच बोलायला लागलोय ना आपण ? आणि अजून आपण एकमेकांना ऍड पण नाही झालो.
आदर्श : असच विचारलं डीअर.
अधिता : हे...प्लीज डोंट कॉल मी डीअर. नाहीतर आय विल ब्लॉक यु.
आदर्श : नको नको.. सॉरी परत नाही बोलणार ओके ?
अधिता : येस.. गुड फॉर यु. सो नंतर बोलते बाय.
आदर्श : लगेच बाय का ? बर टी.सी.
अधिता मग पुस्तक वाचून आवरते. मग कॉलेजला जाऊन येते. संध्याकाळी वाडेश्वरला जाऊन मैत्रिणीसोबत नाष्टा करते. आणि मग संध्याकाळी रूम वर येते. आता काय करायचं ? रूमवर तर टीव्ही नव्हता. मोबाईल हेच तीच एंटरटेनमेंट होत. पण ते फेसबुक ओपन केल कि कोण ना कोण उगीच मेसेज केलेले तिला दिसायचे तिला नव्हत आवडत. म्हणून ती ठरवते. चित्र काढत बसाव बेस्ट ऑप्शन. कलर , ब्रश , पाणी आणि कॅनव्हास घेऊन ती बसते. मोबाईलच इंटरनेट सुरु करते आणि एक न्यूड लेडीचा फोटो गुगल वरून डाऊनलोड करून घेते आणि लगेच इंटरनेट बंद करते. चित्र थोड काढून होतच तोवर अधिताला कॉल येतो.
ती कॉल रिसीव्ह करते.
प्रियांका : हेल्लो ... आधु. कुठ आहेस यार ? पार्टी थोड्यावेळाने स्टार्ट होणारे. सगळे कपल्स जमलेत इथ. येणा लवकर.
अधिता : मी सांगितलेलं ना तुला नाही जमणार मला. मी काय करू तिथ एकटी. तुमच्या कपल्स मध्ये. एन्जोय कर.
प्रियांका : आग ऐक तर... हेल्लो .. हेल्लो...
अधिता कॉल कट करते. आणि तीचा आता चित्र काढायचा पण मूड गेलेला असतो. ती इंटरनेट सरू करते आणि फेसबुक ओपन करते... आदर्शचे मेसेज आलेले असतात बारा.

02


( Image by google )


आजकाल अस झालय कि समोर आल तर कोण कुणाशी जास्त बोलत नाही पण अस फेसबुक वर हव तितक वाट्टेल ते बोलायचं हक्कान ठिकाण सापडल आहे प्रत्येकाला. मग अशात पुढची व्यक्ती कोण आहे ? कुठली आहे ? कुठल्या भावनेने ती आपल्याशी बोलते काही काही माहिती नसते. मग कित्येक अशा काल्पनिक मित्रांना संलग्न होऊन त्यांच्याशी तास न तास बोलत बसायचं. एकमेकांच दुखः एकमेकांना शेअर करायचं. आणि यातून फायदा काय तर काहीच नाही. आदर्श दिसायला कसा होता अधिताला माहित नाही आणि अधिता कशी आहे दिसायला हे आदर्शला माहित नाही. तरी दोघ बोलत बसायचे. दिवसभर.
जसा तिला वेळ मिळत तशी ती आदर्शाला मेसेज करत. आदर्शाला वेळ मिळाला कि तो तिला रिप्लाय देत. अस सगळ असताना दोघ एकमेकांच्या इतके जवळ आले कि अधिता कधी कधी त्याच्याशी खाताना चहा पिताना कधी कधी तर बाथरूम मध्ये मोबाईल घेऊन जायची. एक तलफ असते तशी तिला आदर्शसोबत बोलायची सवय लागली.
आज अधिता रिकामीच होती.कुठ जायचं नव्हत काही काम नव्हत. त्यामुळे आवरल पण नव्हत. इंटरनेट सुरु केल आणि धडाधड आदर्शचे मेसेज आले.  ते म्हणतात न अस पोटात बटरफ्लाय उडाल्यासारख होत आणि मग चेहऱ्यावर एक गोड स्माईल येत अगदी तस अधिताला झाल. कशाचा विलंब न करता तिने त्याला रिप्लाय दिला.
अधिता : काय करतोस रे मुला ?
आदर्श : बघतोय वाट एका मुलीची.
अधिता : होका ? कोणे बर ती लकी गर्ल ?
आदर्श : आहे एक. मी का सांगू ?
अधिता : का मी कोण नाही का तुझी ? का तेवढा हि हक्क नाही मला.
आदर्श : अस काही नाही.
अधिता : असुदे असुदे नको सांगू मला काय जा तिच्याशीच बोल आणि तिचीच वाट बघ.
आदर्श : ए बाळा गम्मत केली ग. ती मुलगी तुला माहित आहे कोण आहे ते ?
अधिता : कोण आहे ?
आदर्श  : तू ओळखतेस तिला
अधिता : खर ?
आदर्श : हा मग ? अधूला ओळखत नाहीस का तू ?
अधिता गालात हासते आणि आपल हसू लपवत ,
अधिता : नाही बाबा मी नाही ओळखत तुझ्या आधु बिदू ला
आदर्श : हो का ? बघ हा परत म्हणू नकोस काही.
अधिता : ए गप नालायका. जरा बोलले कि चालला दूसरीकड मार देईन बघ
आदर्श : हा मग माहित आहे न तुला मी तुझ्याशीच बोलतो. मग काय विचारतीस नवीन ओळख झाल्यासारखी. बर आवरलस का ?
अधिता : नाही रे आता अंघोळीला जाणार.
आदर्श : होका ? बर बर आवर.
अधिता : हो आता गिझर चालू करते आणि पाणी सोडते.
आदर्श  : मी येऊ का ?
अधिता : कुठ ?
आदर्श : अंघोळीला ?
अधिता : का तू केली नाही का अंघोळ ई.. शी पारुसा ?
आदर्श  : ए तुझ्यासारखा नाही मी झाली कधीच माझी अंघोळ 
अधिता : हा मग बस कि गप्प तिकड.
आदर्श : अग येतो कि.
अधिता : गप रे बाबा. आवरते मी बाय.
आदर्श : ऐक ना.
अधिता : काय ?
आदर्श : तुझा फोटो पाठव ना.
अधिता : पाठवलेला ना परवाच.
आदर्श : ओये निट आठव परवा नाही एक आठवडा झाला.
अधिता : हा तेच ते. पाठवलेला ना.
आदर्श : हा मग तोच फोटो किती दिवस बघायचा मी ? नवीन पाठव ना.
अधिता : अरे मी कुणाला पाठवत नाही तुलाच पाठवलाय फक्त आणि तो पण टी-शर्ट घालून काढलेला फोटो आहे.
आदर्श : प्लीज ना पाठव ना.
अधिता :बर पाठवते मुला. आधी अंघोळ करू का नको सांग ?
आदर्श : नको करू . आधी फोटो पाठव असही तू सुंदरच दिसतेस.
अधिता : आ.....हां.हा नको हा मस्का मारूस. पाठवते आवरून फोटो.
ती जाते आणि अंघोळ करून अंग पुसताना आदर्शच बोलन तिला आठवत खूप चांगला मुलगा आहे भरोशाच्या लायक. आपल्याला तो आवडतो त्याला हि मी आवडत असेन. पण इतक्यात काही मनात आणायला नको आहे ती मैत्री टिकवू आणि त्याची टेस्ट घेऊ लगेच हि त्याच्यावर विश्वास नको ठेवायला असा अधिता आदर्शाचा विचार करत टॉवेल बाजूला करून स्लीप घालते आणि स्लीपवरच एक फोटो काढून आदर्शाला पाठवते.
आदर्श तिच्याच विंडो वर होता.
अधिता : काय करतोस रे ऑनलाईन ?
आदर्श : तुझी वाट बघतोय.
अधिता : फोटो पाठवला आहे. बघ आणि कसा आहे सांग आणि तुला माझी शप्पथ आहे बघून झाल कि फोटो डिलीट कर.
आदर्श : हो ग बाळा, तुझी शप्पथ करतो डिलीट

तो फोटो बघतो आणि अजून एक तिला फोटो मागतो ती नाही नाही म्हणते पण आदर्शाचा हट्ट तिला पुरवावासा वाटतो ती अजून दोन फोटो काढून पाठवते. मग ती आवरून कॉफी पीत पीत त्याच्याशी बोलू लागते.03


अधिता आदर्शच बोलन दिवसेंदिवस वाढत चालल होत. आधी रात्रीला फक्त बाय आणि जी.एन पाठवणारे आता दोघांना गुड नाईट , स्वीट ड्रीम्स , टेक केअर , मिस यु असा मोठा शब्द साठा पाठवून मगच बाय म्हणून झोपायचे. नक्कीच हे प्रेम होत ना ?
सकाळी नाष्टा करत असताना अधिताला आदर्शच मेसेज येतो.
आदर्श : आपण खूप दिवस झाले बोलतोय. मला तू तुझा नंबर हि दिलास पण मीच कधी कॉल लावला नाही. पण मला ना तुला भेटायचं आहे.
अधिता : हो मला पण
आदर्श : खर ?
अधिता : हो खरच.
आदर्श  : मग कधी भेटायचं ?
अधिता : उद्या ?
आदर्श : मला चालेल. पण कशी असेल आपली भेट ? ति पण पहिली.
अधिता : कशी असेल म्हणजे एकदम मेमोरेबल.
आदर्श : हो बहुतेक जास्तच मेमोरेबल असेल.
अधिता : होका का बर ? काय करणार आहेस अस ?
आदर्श : नथिंग स्पेशल बट असच. बर काय खाऊन झाल कि नाही. ?
अधिता : देतोयस का खाऊन धड ?
आदर्श : हा मग मला सोडून खातीस एकट एकट मग का खाऊन देऊ मी तुला नीट सुखा-सुखी ?
अधिता : हा बस हा. झाल माझ खाऊन. हे हे पचका झाला.
आदर्श : हम माझा राहिलंय अजून नाष्टा.
अधिता : कुठ भेटायचं आपण ? आणि किती वाजता ?
आदर्श : ते तूच सांग. तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं बस एवढच काम आहे मला.
अधिता : हो का ? नको डायलॉगबाजी करू. सांग कुठ भेटायचं ?
आदर्श : इम्प्रेस गार्डन ?
अधिता : हो चालेल. कितीला ?
आदर्श : १२ चालेल का ?
अधिता : हो चालेल.
आदर्श : काय घालून येणार ?
अधिता : काय म्हणजे ड्रेस घालून येणार तशीच तर येऊ शकत नाही ना रस्त्याने बावळटा
आदर्श : अग हो तस नव्हत म्हणायचं मला , कोणता ड्रेस घालून येणार आहेस ?
अधिता : बघते ना.
आदर्श : ब्लू घाल खूप भारी दिसतो तो तुला ड्रेस.
अधिता : हो का बघू.
आदर्श : बघू काय बघू घाल ना.
अधिता : तुझ्या मर्जीने घालायला मी काय तुला खुश करायला नाही येत बाळा, आपली डेट नाही फक्त भेट आहे. लक्षात असुदे.
आदर्श : हो मी कुठ काय म्हंटल , पण आपली भेट पहिली डेट झाली तर ? काय हरकत आहे ?
अधिता : हो हरकत आहे ना.
आदर्श : काहीही हा. आता नको कारण सांगू.
अधिता : कारण नाही रियालीटी सांगते
आदर्श : काही नको सांगू , माहित आहे कारण देण्यात कोण हात धरणार नाही तुझा .
अधिता : तू ऐकून घेणारेस का नाही आता सांग मला जरा ?
आदर्श : बर सांग ऐकतोय.
अधिता : आपण फक्त भेटायचं आहे. कारण मी इतके दिवस तुझ्याशी बोलले माझ पर्सनल बोलण, माझे फोटो मी तुला शेअर केलेत आणि म्हणून तुला एकदा भेटून बघायचं आहे मला.
आदर्श : बघायचं आहे का खात्री करायची आहे कि मी फेक आहे का रिअल ?
अधिता : अस म्हणाले का मी ? माझा खूप जास्त तुझ्यावर विश्वास आहे.
आदर्श  : मला वाटल कि तुझ माझ्यावर प्रेम आहे.
अधिता : नाही ते शक्य नाही.
आदर्श  : का ? का शक्य नाही ?
अधिता : मला बॉयफ्रेंड आहे.
आदर्श : काय ?
अधिता : हो सहा महिने झाले आम्ही रिलेशन मध्ये आहे. तो कामात बिझी असतो सो आमच बोलण रात्री होत.पण बाकी वेळ...
आदर्श : एक मिनिट म्हणजे तू माझ्यासोबत टाईमपास करतेस का ?
अधिता : नाहीरे मला वाटल होत मी सावरेन स्वतःला पण तुझ्या बोलण्यापुढे मी नाही रोखू शकले स्वतःला जितक मी बॉयफ्रेंडशी बोलले नसेन तितक तुझ्याशी बोलले आहे. आय लाईक यु.
आदर्श : आय लव्ह यु
अधिता : बघू उद्या भेटू आणि बोलू.
आदर्श : काय बोलणार आता ?
अधिता : काय झाल ?
आदर्श :  सगळ वाया गेल माझ
अधिता : काय ? वाया गेल
आदर्श  : काही नाही सोड
अधिता : मला पण तू आवडतोस नको नाराज होऊ. चल मी आता घरी जायला निघते.

दोघ बाय म्हणतात. अधिता रस्त्याने जात असते तोच तो रस्त्यावरून जाणारा मुलगा तिच्याकडे बघतो. ती नजर फिरवते आणि रोज दिसणारी ती मुलगी मोबाईल मध्ये बघत चालत असते. अधिता घरी जाते.

04

( Image by google )

सकाळी सकाळी पहिला मेसेज आदर्शचाच असायचा. आज हि नेहमी सारखी अधिता लवकर उठ्लेली. तिने आवरल आणि नाष्टा करायला गेली. तिने पहिला नाष्टा केला. तिथ खात असताना आदर्श ऑनलाईन आला. दोघांच बोलण सुरु झाल.
आदर्श : काय करतीस ग ?
अधिता : मी काहीही करेन तुला काय करायचं आहे रे ?
आदर्श : हो का ? असस बर बर जातो मी
अधिता : कुठ चाललास रे  ?
आदर्श : ऑफलाईन
अधिता : का ?
आदर्श : तुला नीट बोलायचं नाहीये ना. काय करू मग थांबून मी ?
अधिता : मज्जा कळत नाही का ?
आदर्श : कळते पण तुझ्या लक्षात आहे का ?
अधिता : काय ?
आदर्श : काही नाही जाऊदे. वाटल नव्हत विसरशील
अधिता : काय ते तर सांग. इतक बोलतोयस नुसता दिवसभर काय काय लक्षात ठेवू
आदर्श : आपण आज भेटणार होतो
अधिता : होतो म्हणजे भेटायचं नाही का ?
आदर्श  : आता तुझ्या लक्षात नाही मग काय फायदा भेटून
अधिता :  ते आहे रे लक्षात मला वाटल दुसर काय बोलतोयस
आदर्श : नाही हेच भेटायचं होत
अधिता : हा मी घरी जाऊन आवरणारच आहे मग भेटू.
आदर्श : हा चालेल.
अधिता : तुझ्या आवडता निळा ड्रेस घालणार आहे.
आदर्श : का काल तर म्हणालीस ना , भेट आहे आपली फक्त डेट नाही मग ? कशाला माझ ऐकतेस.
अधिता : का नको का ऐकू ?
आदर्श : अस कुठ म्हंटल मी ?
अधिता : हा मग आता आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचच ऐकायचं असत ना
आदर्श : हो का म्हणजे मी तुला आवडतो का ?
अधिता : हो.
आदर्श : पण काय उपयोग तुला तर बॉयफ्रेंड आहे ना
अधिता : त्याच्यापेक्षा तू खूप चांगला आहेस. मला फक्त तुला एकदा बघायचं आहे.
आदर्श : म्हणजे मी चांगला दिसत असलो तर माझ्याशी मैत्री ठेवणार का ? म्हणजे फक्त बघायला येणारेस का तू मला ?
अधिता : बघायला म्हणजे भेटायला रे
आदर्श : गप आत्ता म्हणालीस बघायचं आहे.
अधिता : तू कसा हि असलास तरी मला तू आवडतोस.
आदर्श  :मला पण तू खूप आवडतेस.
अधिता : हा मग म्हणूनच भेटायचं आज आपण
आदर्श : हो ऐक ना, मला एक बोलायचं आहे तुला.
अधिता : मला हि बोलायचं आहे तुला एक काहीतरी
आदर्श  : हा बोल मग
अधिता : नको आधी तू बोल
आदर्श : लेडीज फर्स्ट
अधिता : आय लव्ह यु आदर्श.
आदर्श : आदर्श नको म्हणूस मला
अधिता : मग काय म्हणू
आदर्श :  भेटल्यावर सांगेन.
अधिता : बर
आदर्श : पण हे नक्की न ?
अधिता : काय ?
आदर्श : हेच कि यु लव्हज मी
अधीता : हो
आदर्श :  आणि तुझा बॉयफ्रेंड ?
अधिता : नको आहे तो मला . मला हवा तसा अगदी सेम आहेस तू
आदर्श :  बर जा आवर लवकर भेटता.
अधिता बाय म्हणून तिथून निघते. इंटरनेट बंद करते आणि रस्त्याने चालू लागते. रस्त्यात तोच तो रोजचा मुलगा दिसला. तो तिच्याकडे बघून आज पहिल्यांदा हसला. आता अधिताला वाटल त्याला थांबून विचारावच नाही म्हणजे काय आहे काय ? माझ्याकडे रोज बघतो. मी गेले तरी माग वळून वळून बघतो. काय आहे काय माझ्यात ? आदर्शला भेटायला जायचं होत उशीर होत चाललेला म्हणून ती बोलते जाऊदे. नंतर बघते याला असा विचार करून ती निघाली. सहज तिने पलिकड बघितल पण ती रोज दिसणारी मुलगी तिला दिसली नाही. अधिता निघाली. घरी आल्यावर तिने केस धूतली. मस्त आवरून निळा ड्रेस घातला. नवीन पर्स घेऊन ती तयार झाली. आता ती वाट बघत वेळ होण्याची. आदर्शाला भेटायला जाण्याची वेळ होत आली आणि अधिता घरातून निघाली. आणि इम्प्रेस गार्डनला जाऊन आत कट्ट्यावर बसली. आणि ऑनलाईन येऊन बघितल पण आदर्श नव्हता. थोड्यावेळाने त्याचा मेसेज आला.
आदर्श : हेय कुठ आहेस ?
अधिता : मी आलीय इथे तू सांग तू कुठ आहेस ?
आदर्श  : मी पण आलोय
अधिता : कुठ आहेस मग ?
आदर्श : मला तू दिसली आहेस.
अधिता : तू कुठ आहेस मग लवकर सांग ना.
तेवढ्यात अधिता इकड तिकड बघते आणि तिच्या शेजारी रोज दिसणारी ती मुलगी येते. अधिता तिच्याकड बघून दुर्लक्ष करते आणि आदर्शला ती मेसेज करते,
अधिता : तू कोणत्या कलरचा ड्रेस घातला आहेस ?
आदर्श : पांढरा काळा
आणि अधिताला सेकंदात चक्कर आल्यासारखं होत आणि ती पटकन अशी खाली बसते. ती मुलगी तिच्या जवळ जाते आणि तिला सावरते.


05

( lesbian couple image by google )


अधिता आजूबाजूला बघते पण पांढरा ड्रेस घातलेलं कोणीच दिसत नाही. फक्त त्या मुलीने पांढरा ड्रेस घातलेला असतो.
अधिता : नाव काय तुझ ?
इरा : इरा.
अधिता : बर. मी ओळखते तुला.
इरा : मी पण ओळखते तुला.
अधिता : तस नाही मी प्रश्न केला तुला कि मी ओळखते का तुला ?
इरा : हो.
अधिता : कस काय ?
इरा : रोज रस्त्याने जाताना बघतेस ना माझ्याकडे.
अधिता : हो ते सहजच बघते.
इरा : हा मी पण. इकडे का आली आहेस ? कोण येणार आहे का ?
अधिता : हो माझा मित्र.
इरा : कोण ?
अधिता : आदर्श.
इरा : तो मीच
अधिता : काय ?
इरा : आदर्श मीच आहे.
अधिता : मला समजल नाही काहीच.
इरा : मला तू आवडतेस.
अधिता : काय बावळट आहेस का जरा तू ?. का मला फसवलस. माझ्या बॉयफ्रेंडशी मी बोलन कमी केल कमी काय बोलणच बंद केल. कुणासाठी तर तुझ्यासाठी एका मुलीसाठी ? तुला जराही काय वाटल नाही का ? मला अस फसवताना ? तूला काय मी लेस्बो वाटली का ?
इरा : नाही पण
अधिता : जाऊदे चुकल माझच असा कुणावर विश्वास ठेवला. आता चुकून हि नाही ठेवणार आणि फेसबुक ओपन पण नाही करणार.
इरा : अस नको करू.
अधिता : सोड तुझा अधिकार नाही माझ्यावर समजल का. मुलगा असतीस तर अंगाला हात लाऊन दिला असता माझ्या पण तो हि हक्क तू गमावला आहेस.
इरा : इतके दिवस तू कुणावर प्रेम केलस आदर्श वर का त्याच्या मनावर ?
अधिता : त्याच्या मनावर.
इरा : मग काय प्रॉब्लेम आहे ?
अधिता उठते आणि निघून जाते. इरा तिच्या मागे अधिता-अधिता हाक मारत जाते. लोक त्यांच्याकडे बघत असतात.    
अधिता : प्लीज माझी वाट सोड. नको मला हाक मारू. तू बोललेलं माझ नाव फक्त मेसेजवर छान वाटायचं रिअल मध्ये नाही प्लीज नको हाका मारू
इरा : ऐक तर मग. थांब ना. एकदा जाणून घे मी का अस केल. अस नको व्हायला कि तू माझ ऐकलच नाही आणि मला हि गिल्टी नको वाटायला कि मी तुला फसवल.
अधिता : मग तुला काय अजून हि असच वाटत का कि तू काहीच नाही केल ?
इरा : अस नाही पण मी फसवल नाही. केल ते फक्त प्रेम केल मनापासून. आणि त्याला हि कारण आहेत.
अधिता : तुझ्यापाशीच ठेव तुझी कारण.
अधिता निघून जाते. इरा तिथेच थांबते. आणि अधिता कॉल लावते. ती उचलत नाही.
इरा खूप कॉल करते मेसेज करते पण अधिता काहीच रीस्पोंस देत नाही. शेवटी. इरा तिला मेसेज पाठवते , मला तुला एकदा शेवटच भेटायचं आहे. अधिता ठरवते आधी नको पण तिला हि प्रेम झालेलं असत आदर्शच्या म्हणजे इराच्या मनावर तीच प्रेम जडलेल. म्हणून अधिता तिला संध्याकाळी सातला माझ्या रूम वर ये अस सांगते आणि पत्ता सेंड करते.

इरा संध्याकाळ व्हायची वाट बघते.


06


दाराची बेल वाजते. अधिता जाऊन दार उघडते. दारात इरा असते. अधिता माघारी फिरते आणि आत जाते. लागलीच इरा दार लाऊन तिच्या माग-माग बेडरूम मध्ये जाते. दोघी बेडवर बसलेल्या असतात. दोघीत बरच अंतर होत. इरा अधिताच्या जवळ सरकते आणि तिचा डावा हात धरते. तेवढ्यात अधिताला तिच्या बोयफ्रेन्डचा कॉल येतो. अधिता हात झटकून मोबाईल हातात घेते आणि मोबाईल स्वीच ऑफ करते. इरा अजूनच अधिता जवळ सरकते आणि तिच्या उजव्या खांद्यावर हात ठेवते. आणि घट्ट हातानी खांदा धरते. आणि तिच्या केसांना सरकवून ती अधिता जवळ सरकते पण अधिताला काहीतरी होत असत. ती डोळे मिटते. इरा अधिताच्या मानेवरची केस बाजूला करत मानेचा कीस घेते. अधिता हरवत चाललेली स्वतःला. अजून काहीच झाल नव्हत दोघींच्यात पण तरीही ती स्वतःला सावरू शकत नव्हती. इरा अधिताच्या दोन्ही हाताच्या पंजाना ती  हातात घेते. दोघी एकमेकांच्या डोळ्यात बघतात. दोघींच्यातल अंतर कमी होत. इरा अधिताच्या ओठांजवळ आपले ओठ न्यायला चेहरा जवळ नेते तोच अधिता उठून बाहेरच्या खोलीत जायला निघते. लगेच इरा उठून तिच्या मागे जाते आणि तिला मागून घट्ट धरते. एका हाताने पोटाला घट्ट धरून दुसरा हात तिच्या छातीला दाबत ती मागून मानेला कीस करत राहते. छातीला झालेल्या स्पर्शाने आता अधिताला राहवत नाही. दोघी बेडवर जातात. आणि झोपतात. आणि खूप प्रेम करतात. प्रेम झाल्यानंतर इरा उठून अधिताच्या पायाशी बसते. आणि तिच्या पायावर हात फिरवते. अधिताने ड्रेस काढलेला असतो. त्यामुळे ती अंगावर पांघरून ओढून झोपलेली असते इराला बघत.


( lesbian couple image by google )


इरा : सॉरी मी तुला फसवल. पण काय करू मी खूप दिवस झाले तुला सकाळी जाताना कुठतरी बघते. आणि मला तू आवडलीस. मी लेस्बियन नाही. मला पण बॉयफ्रेंड होता पण त्यान मला फसवल. मी नादच सोडला परत मुलांचा. पण तुला बघितल आणि मला तुझ्याबद्दल फिलिंग्स आल्या.
अधिता : इट्स ओके. मला बॉयफ्रेंड आहे पण तोही लायकीचा नाही. मला पण प्रेमाची गरज होती आय थिंक तुझ्या. सो thank you.
इरा : आय वोन्ट यु, गेले कित्येक दिवस मनातल्या साऱ्या गोष्टी मला कुणालातरी सांगायच्या होत्या पण ऐकायलाच कुणी नव्हत. मुल होती तयार आणि बॉयफ्रेंडहि होता. पण मुलांपुढ आपण रडल कि सिंफतिच्या बदल्यात ते फक्त सेक्स करतात. मानसिक त्रासात शारीरिक त्रासाची भर पाडण्या व्यतिरिक्त ते काहीच करत नाहीत. आय लव्ह यु अधिता.
अधिता : हम.
इरा : फक्त हम काय ?
अधिता : ठीके पण पुढे काय ?
इरा : लग्न करू आपण.
अधिता : समाजाच काय ?
इरा  : हे बघ आपली बाजू , आपल प्रेम नाही कळणार कुणाला. समाजाला घाबरून समाजाचा विचार करून तू तोडणारेस का हे आपल नात ? समाजाचा विचार करून आपण जगतो. पण आपल्या ठिकाणी आपल्या सारखी सिच्युएशन आली कि हाच समाज सगळे विचार सोडून स्वतःला हव तेच करतो समजल का अधिता ?
अधिता : हो पण.....
इरा : तुला एक सांगू का अधिता ?
अधिता : हा ?
इरा : फिल्मच्या स्क्रिप्ट सारख मीही स्वप्न बघायची,  पण त्या स्वप्नात कधी राजा नाही बघितला. राणीच बघायची मी अगदी तुझ्यासारखी.
अधिता : ओह... पण हे आपल अस वेगळ प्रेम मला काहीच सुचत नाहीये इरा.
इरा : सेम जेंडरच प्रेम काय वेगळ आहे ? सांग ,मला. फरक फक्त इतकाच कि त्या दोन मुलीत एक रेग्युलर मुलगी असते आणि एक काल्पनिक स्तन असलेला एक मुलगा. बाकी प्रेम सगळ सारखच असत दोघींचं.
अधिता : आणि तुझा बॉयफ्रेंड त्याच काय आता ?
इरा : आहे नाही होता. आता एक्स झाला तो माझा. लाईफ खरच खूप शॉर्ट अधिता. त्यात स्वतःच्या तालावर नाचवणारा बॉयफ्रेंड आहे. धाक दाखवणारा घरी बाप आहे. आणि हक्क आहे म्हणून रोज रात्री बेडवर मनाविरुद्ध सेक्स करणारा नवरा आहेच. म्हणून मला ते नकोत. तू हवीयस मला अधिता. मला अनलिमिटेड प्रेम करायचंय तुझ्यावर. तुझ्यासोबत. “आय हेट्स मेल कारण बलात्कार फक्त पुरुषच करतात” शांत का आहेस?
अधिता : मला समजत नाहीये काय तरी होतय.
इरा : तेच प्रेम आहे.
अधिता : माझ हार्ट धडधडतय फास्ट.
इरा : बघू मला तुझ्या छातीवर डोक ठेवून, माझ्यासाठी मिनिटाला शंभर वेळा धडकणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकायचेत.
इरा अधिता जवळ जाते. अधिता उठते. इरा तिच्या छातीवर डोक ठेवते. अधिता तिला जवळ घेते.
अधिता : ओह .. डार्लिंग आय लव्ह यु इरा.
इरा : काय ?
अधिता : आय लव्ह यु. एक सांगू ?
इरा : हा सांग
अधिता : तू मला का आवडलीस.? मगाशी तू मला किस करताना जो स्पर्श मला केलास ना तेव्हा माझाच स्पर्श मला झाला पण तुझ्या हाताने. खूप ओस्सम वाटल.
इरा :  यु आर मे फेवरेट थॉट डीअर. यु आर मे फेवरेट पर्सन. आय लव्ह यु अधिता.
दोघी उठून नीट बसतात. अधिता ड्रेस घालायाला लागते.
अधिता : गाण ऐकणार का ?
इरा : मला नाही आवडत.
अधिता : का ?
इरा : बघ ना, गाण्यात फिमेल वर्जन मेलसाठी असत आणि मेल वर्जन फिमेलसाठी असत. पण कोण फिमेल लेस्बियनसाठी किंवा कोणता मेल सिंगर गे साठी गाण म्हणत नाही. त्यांना नसत का प्रेम कधी. म्हणून मला राग येतो या सिंगरचा आणि त्यांच्या गाण्यांचा.


( lesbian copuple kissing image by google )

दोघी नंतर बोलत राहतात. अधिता कॉफी बनवून आणते दोघी पितात. आणि इरा निघून जाते.
दुसऱ्यादिवशी.........
सकाळी किचन मध्ये अधिता असते. तीच डोक दुखत असत म्हणून ती कॉफी बनवत असते तिला कालच इराच आणि तीच प्रेम आठवत. तिला बॉयफ्रेंडचा कॉल येतो ती कट करते आणि त्याला ब्लॉक करते. आणि कॉफी पिऊन ती नाष्टा करायला बाहेर जाते. समोरून तोच मुलगा येतो आणि तिला बघतो. अधिता हि त्याच्याकडे बघून हासते. तो खूप खुश होतो.तो तिच्या जवळ जायला लागतो. आणि अधिता त्याच्या जवळून रस्त्याच्या पलीकडे जाते आणि पलीकडून जाणाऱ्या त्या रोज दिसणाऱ्या मुलीचा म्हणजेच  इराचा हात धरते आणि दोघी नाष्टा करायला जातात. तो मुलगा त्यांना बघतच राहतो.......


समाप्त.  सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            

7 टिप्पण्या

  1. छान कथा लिहिली आहे . एका वेगळ्याच विषयावर. त्यांच्यातील प्रेम पण चांगल्या प्रकारे मांडलं आहे.

    उत्तर द्याहटवा