म्हणून मला तू नको.

shape of you song music love story
( image by google )


01
संध्याकाळचे पाच वाजलेत. श्रद्धा दारात उभी असते. आतला एकदा कानोसा घेते. “कर्ज” फिल्मची थीम ऐकू येत असते. त्यात “अजीब दास्ताँ है ये, कहा शुरू कहा ख़तम ?” हे म्युजिक पण ऐकू येत होत. ती आत गेली. आत पाच मुलांचा ग्रुप गोल करून बसलेला. मध्ये अभिमान सर, त्यांनी श्रद्धाला बघून स्माईल दिल. श्रद्धा हि हासली. तिला त्यांनी खुणावल. तिने भिंतीवर लावलेल्या गिटारापैकी एक काळ्या रंगाची तिच्या आवडती गिटार घेतली. आणि खुर्चीवर बसली. मांडीवर टेकवून गिटार ती वाजवण्याऐवजी ती त्या पाच मुलांकडे बघत होती.
अभिमान सर आले. तिला सांगत होते. स्ट्रिंग कशा पद्धतीने वाजवायच्या पिकच्या मदतीने. मग ती प्रयत्न करत होती. टंगळ-मंगळ हि करत होती. मधेच आतून “कर्ज फिल्म”ची थीम ऐकली कि अंगात संचारल्यासारख ती पिक गिटारच्या स्ट्रिंग ( तारा ) वर फिरवायची. पण पूर्णपने चुकीच. या इतक्या आवाजात कुठ कुणाला कळणार होता तिचा चुकीचा भेसूर आवाज आणि तिची चूक. इतक्यात एक मुलगा दारात आला. जरा पावसात भिजला होता. केसांतून हात फिरवत आणि मग खिशातून रुमाल काढून तोंडावरून फिरवत तो रुमाल खिशात ठेवेपर्यंत अभिमान सरांनी त्या पाच जणांत अजून एक खुर्ची वाढवली. आणि तो मुलगा आत येऊन बसला. त्याच्याकडे स्वतःकडे स्वतःची गिटार होती. श्रद्धाला त्याच अप्रूप वाटल. आपण पण शिकू आणि घेऊ असली गिटार पण काळ्याच रंगाची असा विचार करून तिने पुन्हा आपल गिटार वाजवण्यात लक्ष घातल.
“पल पल दिल के पास तुम रेहती हो” अशा शब्दांच्या सुरेल आवाजात अजून भर पडत होती गिटारच्या अचूक सुरेल आवाजाची. श्रद्धा त्या मुलाकडे बघते. तो मुलगा मात्र गाण म्हणण्यात आणि त्याच वेळेस गिटार वाजवण्यात मग्न होता. तेवढ्यात त्याच थोडस चुकत. अभिमान सर त्याला बोलतात,
अभिमान सर : अरे “इ मेजर” मिस केलास. खूप मोठा मेजर प्रोब्लेम झाला ना हा ?
करण : हो सर. पुन्हा करू का पहिल्यापासून सुरु ?
अभिमान सर : नको. बस आधीची लाईन घे.
“करण” तो मुलगा म्हणजे करण. त्याने गाण म्हणन सुरु केल. अभिमान सर थोड्यावेळाने गाण संपल्यावर त्याची तारीफ करतात. आणि श्रद्धाकडे येतात.
अभिमान सर : बघितल का वाजवून सांगितल तस ?
श्रद्धा : हो.
अभिमान सर : जमल का ?
श्रद्धा : हो म्हणजे...
अभिमान सर : बघू मला दाखव वाजवून.
श्रद्धा प्रयत्न करते पण तिच्या हाताला घाम फुटतो. क्लास लाऊन तिला आज दुसरा दिवस सुरु होता. आणि अस का करतात सर अशा विचारात ती घाबरलेली. सर म्हणाले,
अभिमान सर : जमेल जमेल. माझ हि असच झालेलं. सगळ्यांचच होत अस. लागतो वेळ. निदान सहा महिने केलास क्लास तर त्या करण सारख वाजवशील. करण स्वतःच नाव ऐकून श्रद्धाकडे बघतो. आणि गालात हसतो. आणि श्रद्धा त्याच्याकडे बघते. पण काही प्रतिसाद देत नाही.
अभिमान सर : बर, झाला आजचा अर्धा तास. पहिला महिना फक्त अर्धा तास आणि नंतर एक तास. उद्या ये वेळेवर उद्या दुसरा लेसन देतो. गिटार अडकव तिथ.
श्रद्धा उठली. तिने गिटार अडकवल. अभिमान सरांना “बाय” म्हणाली आणि निघाली. बाहेर दारात गेली. करण गाण म्हणत असताना दाराकडे बघतो. गिटारची तार सैल पडत होती. आवाजही कमी. कारण श्रद्धा त्याला बघते, गालात हासते आणि निघून जाते. मग करण पुन्हा पुढ बघत बाकीच गाण सुरु ठेवतो.
घरी.
 आरशासमोर येऊन श्रद्धा नेहमीसारखी केसांशी खेळत एक कविता बनवण्याचा प्रयत्न करते. कारण तस काही नव्हत. पण उगीचच “पल पल दिल के पास” गाण तिला आठवत होत. किशोर कुमारच्या आवाजात नाही. “कुमार” करणच्या आवाजात. कुमार त्याच आडनाव नाही. तो लहान होता न तिच्या वयाचा पंचवीस वर्षाचा. बिनालग्नाचा म्हणून “कु” म्हणजे कुमार.
“त्याने मला बघितल. मी त्याला बघितल. काय साध्य झाल ? त्याच्या आवाजासमोर माझ मन गिटार वाद्य झाल.” आणि उगीच काहीसा विचार केल्यासारखा श्रद्धा केसात हात फिरवते आणि पुढ बोलते,
“पहिल्या बघण्यातच मला, त्याची माझी ओळख अगदी जुनी वाटते,”
पण पुढे काय ?
अम्म्म....
आणि श्रद्धाला उचकी लागली.
हा...
“पहिल्या बघण्यातच मला, त्याची माझी ओळख अगदी जुनी वाटते. बुडता सूर्य, पाउस बाहेर, समोर त्याच्या मी आणि माझ्या सोमोर तो, तरी मला उचकी लागते.....”

०२

आतासा कुठ महीना झाला क्लास लाऊन श्रद्धाला. पण एकच गाणी ती शिकली. ते पण सगळ्यात सोप्प “कर्ज” फिल्मची थीम ते पण सुरूवातीच कडव फक्त. अधल-मधल काहीच नाही. पण काहीतरी येतय ना या आनंदात ती तेच तेच वाजवत बसायची. या मधल्या वेळात करण तिला दिसला नाही. दिल्लीच्या एका कार्यक्रमात तो गिटार वाजवायला गेला होता वीस दिवस. कार्यक्रम मोठा होता. आणि श्रद्धाच्या हि डोक्यात काही त्याच्याबद्दल विचार नव्हते. त्या दिवसानंतर नाही काहीच नाही.
तेव्हासारख पुन्हा आज झाल. पाच मुल खुर्चीवर बसलेले. अभिमान सरांची खुर्ची रिकामी होती. करण दारात उभा. बूट काढून आत आला. मोकळ्या खुर्चीवर तो बसला. गिटार काढली तोच मुलांनी त्याची चौकशी केली. कसा होता कार्यक्रम ? कस वाटल ? काय झाल ? कस झाल ? आणि बरेच प्रश्न. त्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा त्याने खिशातून मोबाईल काढला आणि व्हिडीओ दाखवला. सगळे ते बघत होते. त्याची तारीफ करत होते. तो गिटारची ट्युनिंग करत बसला होता. मुलांच्या त्या कौतूकान हरभराच्या झाडावर तो चढलेला पण चेहऱ्यावर न दाखवता दुर्लक्ष करत होता. ट्युनिंग झाल. आणि त्याने पिक घ्यायला खिशात हात घातला. नाही. कुठ पडल का काय ? या विचारात तो गिटार खाली खुर्चीला टेकवून दोन्ही हात खिशात घालून चाचपू लागला. पण नव्हत. त्याच काळ गिटार पांढऱ्या शुभ्र फरशीवर स्पष्ट दिसत होत. त्याने त्या मुलांच्यातल्या एकाला विचारल पिक आहे का ? त्यांनी नकार दिला. आता काय कराव म्हणून तो इकड तिकड बघत शेवटी गिटार उचलून मांडीवर घेतो. आणि बोटाने म्हणजे नखांनी वाजवायला सुरुवात करतो. पण नेमक मधल्या बोटाच नख तुटल. ते अर्धवट नख दाताने नीट तोडून त्याने खिडकी बाहेर टाकल. आणि पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. आणि त्याच लक्ष उजवीकड गेल. श्रद्धा त्याला बघत होती. त्याने एक स्माईल दिली. आणि तिने सुद्धा. या स्माईलचा फायदा घेऊन करणने विचारलं,
करण : तुझ्याकडे एक्स्ट्रा पिक आहे का ?
श्रद्धा : आहे ना.
करण : देतीस का ? माझ पडल वाटत कुठ तरी ? मोबाईल काढताना कुठ तरी खिशातून.
श्रद्धा : हा वेट.
श्रद्धाने गुलाबी रंगाच पिक त्याला दिल.
करण : thank you..!
श्रद्धा : इटस ओके.

करण गिटार आत वाजवत बसला. सोबत गाण पण म्हणत होता. श्रद्धाची वेळ संपली. तिने गिटार अडकवल भिंतीवर आणि गेली. अर्ध्या तासाने करणला आठवल त्याचा मोबाईल बाहेर आहे. तो बाहेर आला मोबाईल न्यायला आणि त्याला दिसल. मोबाईल होता बाहेर त्याचा पण श्रद्धा नाही. तो आत गेला.
दुसऱ्या दिवशी.
करण खाली रस्त्याच्या कडेला थांबलेला. त्यांचा क्लास दुसऱ्या मजल्यावर होता. आज बहुतेक तोच पहिला आलेला. श्रद्धा आली. नेहमीसारखा करण हसला. आणि ती सुद्धा.
करण : तुझ पिक माझ्याकडे राहील काल.
श्रद्धा : हा. तुझ तुला मिळाल का ?
करण : नाही ना. गेल ते कुठ तरी. कंटाळल वाटत मला ते.
श्रद्धा : ( हसून ) का रे ?
करण : सारख वाजवत बसतो ना मी गिटार. इथ पण घरी पण. म्हणून गेल सोडून मला.
श्रद्धा : हम.
करण : ( तिच्यापुढे पिक धरत ) हे धर तुझ. नाही तर हे पण जाईल कुठ तरी.
श्रद्धा : नाही जात. ते माझ पिक आहे. आणि माझ पिक कुणावर जीव लावला कि लावत कायमच. ठेव तुला. माझ्याकडे आहेत अजून तीन.
करण : बर. ( खिशात हात घालून ) शीटट...
श्रद्धा : काय झाल ?
करण : तुला सांगायचं राहील एक.
श्रद्धा : काय ?
करण : आज क्लासला सुट्टी आहे.
श्रद्धा : का ?
करण : सर गिटार घेऊन पुण्याला गेलेत स्ट्रिंगस बदलायला सगळ्या गिटारच्या. बदलायला लागतात ना. वर्षातन दोनदा तरी. सो.
श्रद्धा : मग नाहीच का आज क्लास ?
करण : नाही.
श्रद्धा : आणि उद्या ?
करण : उद्या आहे.
श्रद्धा : क्लास नाहीतर मग तू काय करतोस इथ ?
करण : मला पण माहित नव्हत. इथ आलो तर क्लास बंद मग सरांना फोन केला तेव्हा समजल. मी पण निघणारे आता.
दोघ निघून जातात. श्रद्धा रिक्षा थांबवते आणि निघते. पोवईनाक्यावर सिग्नल लागला. आणि तिच्या रिक्षा शेजारी नेमका करण गाडी घेऊन उभा. त्याच लक्ष रिक्षाकडे गेल.
करण : रिक्षाने येतेस का तू ?
श्रद्धा : हो.
करण : कुठ आहेस रहायाला.
श्रद्धा : शनिवार पेठ.
करण : आणि मी राजवाड्याच्या मागे.
श्रद्धा : तिथ कुठ रे ?
करण : जलमंदिरच्या मागे रोड जातो न तिथ. चालणार असेल तुला तर जाता जाता वाटेत तुला सोडत जाईन. म्हणजे घरापाशी नाही अगदी. देवी चौकात तरी.
श्रद्धा : हा चालेल पण उद्या पासून.
करण : का ?
श्रद्धा : आत्ता बसले ना रिक्षात.
करण : हा. उद्या कितीला येणार ?
श्रद्धा : नेहमी सारखी पाचला. पण तुझ माझ टायमिंग नाही जुळत. तू जास्त वेळ बसतोस.
करण : उद्यापासून नाही.
श्रद्धा : म्हणजे ?
करण : मी लवकर येईन उद्यापासून. आणि तुझ्यासोबत निघेन.
श्रद्धा : अरे एवढ कशाला तुला तुझ महत्वाच आहे. मी अत्ताशीक शिकतेय.
करण : असुदे. ( मागून गाड्यांचे हॉर्न सुरु झाले ) चल भेटू उद्या.

आणि रिक्षाच्या पुढे सुसाट करण निघून जातो. आणि श्रद्धा हि घरी पोचते दहा मिनिटांनी.
03

क्लासची वेळ झाली. श्रद्धा आवरून निघाली. रिक्षा केली देविचौकात आणि पोवई नाका गाठला. आज रस्त्याच्या या बाजूला पार्किंग होत. म्हणजे क्लासच्या दारात. आणि श्रद्धाला वर जाताना करणची स्प्लेंडर दिसली. म्हणजे तो आलाय. ती वर गेली. क्लासच्या आत जाऊन तिने गिटार घेतली. आणि कर्ज फिल्मची थीम वाजवायला लागली. सर आले. त्यांनी बघितल तिला. एकदा वाजवून दाखव म्हणाले. आणि तिने वाजवून दाखवल. सरांनी त्यांचं गिटार घेतल आणि तिच्यासमोर खुर्चीवर बसले. आणि “अजीब दासता हे ये, कहा शुरू कहा खतम, ये मंजिले हे कौनसी ? न वो समझ सके ना हम” इतकी ओळ वाजवून दाखवली. पुस्तकात लिहिलेले तारांचे अंकगणित (tab) दाखवून ते उठले. त्यांनी त्यांचं गिटार अडकवल भिंतीवर आणि काही आडल तर करणला नाहीतर वैभवला विचार अस सांगून ते निघून गेले बाहेर.  
करण बघत होता तिला. कारण तीच चुकत होत. विनाकारण तिच्याकडे जाण त्याला हि कस तरी वाटत असेल. म्हणून तो थांबला. आणि तिला राग आला. काय हे अस ? पाहिलं गाण जमल आणि हे का जमत नाही म्हणून तीन गिटार वाजवण थांबवल आणि बसली हातात मोबाईल घेऊन. मांडीवर गिटार तशीच होती. आणि त्या गिटारवर कोपरे टेकवून ती मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसते. काहीतरी म्हणजे ?
नेहमीची पद्धत, मोबाईल घेतला त्याच लॉक उघडल. आणि उगीच हवेत वर वर बोट फिरवली. पुढच्याला वाटाव ती काय तरी लिहितेय. करण उठला. तेवढ्यात वैभव पण उठला. श्रद्धाने मोबाईल ठेवला. आणि तिने करण कडे बघितल कारण त्या क्लास मध्ये सध्या सरांनंतर करणच तिच्या ओळखीचा होता. आणि तेवढ्यात करणच्या आधी वैभव तिच्या जवळ आला.
वैभव : सरांनी सांगितलय तुझ्याकडे लक्ष द्यायला. आय मीन काय आडल तर सांगायाल. तू नुसती बसलीस. जमत नाहीये का काय ?
श्रद्धा : ( करण कडे बघत ) हो. म्हणजे काही समजत नाहीये.
वैभव तिची गिटार घेतो पिक मागतो. आणि वाजवून दाखवतो. आणि तिच्याचसमोर बसतो. आता तो मधेच तिच्या समोर बसल्यामुळ तिला करण दिसत नव्हता आणि करणला ती. वीस-पंचवीस मिनिट झाली असतील. मग वैभवला कॉल आला म्हणून तो बाहेर गेला. कारण क्लासमध्ये गिटारचा आवाज होता खूप. तेवढ्यात करण आणि श्रद्धाची नजरानजर झाली. आणि करणने गिटार पाठीला अडकवली. तशी श्रद्धा पण उठली. तेवढ्यात वैभव आला.
वैभव : चाललीस ?
श्रद्धा : हो.
वैभव : वाजवल पण नाहीस तू आणि अर्धातास पण नाही झाला तुला अजून येऊन.
श्रद्धा अरे जरा बाहेर जायचं आहे. म्हंटल कशाला क्लास बुडवा म्हणून आलेले. उद्या येईन आणि वाजवेन.
वैभव : चालेल. उद्या काय सरच घेतील तुझा क्लास.
श्रद्धा : हो. ( मनात – बर झाल उगीच त्रास तुझा मला )
श्रद्धा निघाली खाली. करण मागून गेला. श्रद्धा मोबाईलवर बोलत होती आईशी. करण आला. त्यान तिच्याकडे बघितल. तिने तोंडावर बोट ठेवून खुणावल. बोलण झाल आणि ती त्याच्या मागे गाडीवर बसली. त्याने गाडी सुरु केली. पहिला गिअर टाकला. वरून खिडकीतून वैभव दोघांना बघत होता. आणि त्याला राग आला करणचा.
करण : निवांत बस बर का.
श्रद्धा : हो.
करण : रिक्षान किती घेतात इकड यायला ?
श्रद्धा : का तू तेवढे घेणारेस का ?
करण : नाही तस नाही म्हणजे तू काय बोलत नाहीस मग बोलायला विषय नको का काय म्हणून आपल सहज विचारल.
श्रद्धा : साधी केली तर चाळीस, शेअरन दहा.
करण : मग तू कशी येतेस ?
श्रद्धा : शेअर.
करण : उद्यापासून मी येईन घ्यायला आणि सोडेन पण. म्हणजे तुला चालणार असेल तर.
श्रद्धा : आणि बदल्यात काय हवय तुला ?
करण  : मागितल तर देशील ?
श्रद्धा : हो.
करण : बर.
श्रद्धा : सांग काय हवय ?
०४


करण : अग खास नाही काय. मला कोणतरी हवय.
श्रद्धा : का ?
करण : असच जरा हवय.
श्रद्धा : पण कोण मुलगी हवीय का ?
करण : हा. चालू शकते.
श्रद्धा : कशाला प्रेम करायला का ?
करण : नाही ग. अग पाच दिवसांनी एक कार्यक्रम आहे.त्यासाठी.
श्रद्धा : कसला ?
करण : गाण्यांचा. आणि तुला माहितीय का ? मी पाच सहा कार्यक्रम केलेत महाराष्ट्रात आणि बाहेर दिल्लीला दोनदा. गिटार वाजवलय, गाण पण म्हंटलय. पण तो दुसऱ्याचा कार्यक्रम असायचा. त्यात कधी एक दोन गाणी म्हणायला मिळायची. पण आयुष्यात पहिल्यांदा माझा कार्यक्रम आहे. ज्यात जास्त गाणी माझी आहेत. चार गाणी. तीन केलेत मी तयार. अनप्लग. पण एक अजून हवय मला. लिहिणारा हवाय कोण तरी.
श्रद्धा : काय गाण का ?
करण : हा. लिरिक्स लिहिणार हवय. मला वेळ मिळत नाहीये लिहायला. आणि सुचत पण नाहीये. आणि मला जरा हटके लिरिक्स हवते. जरा वेगळ करायचय गाण. आवडल पाहिजे लोकांना.
श्रद्धा : आवडणार कि तुझा आवाज किती मस्त आहे. का नाही आवडणार.
करण : हम. पण, तुझ कोण आहे का फ्रेंड ? लिरिक्स लिहिणार.
श्रद्धा : नाहीरे.
करण :  माझा एक मित्र होता पण त्याला भाव आला लगेच. देतो-देतो करत एक आठवडा घालवला आणि गेला पुण्याला. स्वतःचा कार्यक्रम करायला.
श्रद्धा : असुदे. असच करतात. मुलच नाही मुली पण तश्याच असतात. अरे.
करण : त्याच्या आधीच्या शो-ला मी गेलेलो गिटार वाजवायला त्याला ऐनवेळेला कोण मिळत नव्हत म्हणून. मी त्याची वेळ काढली तर,
श्रद्धा : तसच असत रे काम होई पर्यंत गोडगोड बोलायचं आणि परत कोण तू म्हणून निघून जायचं.
करण : हम. बघू मीच लिहीन काहीतरी. कवी पण नाही माझ कोण ओळखीच.
श्रद्धा : का ?
करण : कवीला पण जमू शकत ना.
श्रद्धा : होका. पण मला अनुभव नाही.
करण : कसला ?
श्रद्धा : मी कवी आहे. म्हणजे अस प्रोफेशनल नाही पण लिहित असते. दोन हजार कविता पूर्ण झाल्यात लिहून.
करण गाडीच स्पीड कमी करतो.
करण : प्लीज श्रद्धा, मला देशील लिरिक्स लिहून ?
श्रद्धा : हो पण मला माहित नाही कस लिहितात.
करण : मी आहे ना. मी तुला म्यूजिक ऐकवतो. नुस्त चाल ऐकून जे सुचेल ते लिही चांगल. चाल ऐकून लिहायला सोप्प पडेल तुला.
श्रद्धा : चालेल. पण कधी लिहू ? आणि तू ऐकवणार कधी मला ?
करण : जागा हवी शांत बसायला.
श्रध्दा : हो.
करण : उद्या वेळ आहे तुला ?
श्रद्धा : नाही ना कॉलेज आहे.
करण : होका.
श्रद्धा : पण जाणार नाही जर तुला हव असेल उदया लिहून तर.
करण : मग माझ्या घरी भेटायचं ?
श्रद्धा : अस कस अरे ? आज तर आपली ओळख झाली. आणि लगेच तुझ्या घरी. आणि घरी कोण असत तुझ्या ?
करण : कुणी नसत म्हणून तर बोलवतोय.
श्रद्धा : हम. चालेल. कितीला ?
करण : बाराच्या पुढे.
श्रद्धा : चालेल, नेमक कुठ आहे घर तुझ ?
करण : देवी चौकात ये मी येतो न्यायला. बाराला.
श्रद्धा : चालेल.

करण गाडी थांबवतो. श्रद्धा गाडीवरून उतरते आजूबाजूला एकदा बघते कोण आहे का ओळखीच आणि, करणला बाय म्हणून निघून जाते. करण पण निघून जातो. दोघांच्या हृदयात धडधड सुरु होती. दोघांची अंग शहारलेली होती. दोघांच्या मनात काहीतरी आणि बरच काही सुरु होत. आणि ? मी काय सांगायचं अजून....०५

करण देवी चौकात येऊन थांबला. बारा वाजले होते. पण श्रद्धा कुठ दिसत नव्हती. एक रस्ता वरच्या बाजूला जात होता. तो तिच्या घराकडेच जात होता. पण जिथवर नजर जातीय तिथवर श्रद्धा दिसतच नव्हती.
मागून आवाज आला.
श्रद्धा : हाय.
करण मागे वळून बघतो. इकडून कुठून आलीस तू ?
श्रद्धा : सिक्रेट रस्ता आहे. अरे म्हणजे रिचार्ज करायला आलेले खाली. तेवढ्यात मला तू इथ दिसला म्हणून आले पटकन.
करण : जास्तच पटकन आलीयस.
श्रद्धा : हा. हे धर.
करण गाडीच्या आरशातून मागे बघतो. श्रद्धा मागे बसलेली असते. आणि तिने डाव्या हातात करणच्या खांद्याजवळ मागून कॅडबरी धरलेली असते.
करण : अग कशाला आणायची.
श्रद्धा : मैत्री झाली ना मग द्यायला नको का ?
करण : लिरिक्स लिहून देणार आहेस कि. ते खूप आहे माझ्यासाठी.
श्रद्धा : हम तरी असुदे. घेणारेस का खाऊ मीच ?
करण : खा तू माझ्यावरच.
श्रद्धा : कसलायस रे. मी इतक आणल आणि.
करण : ठेव तुझ्या हातात जाता आपण. परत कोण तरी बघेल तुला.
ती हातातच कॅडबरी ठेवते. तो गाडी चालवतो. दोघ शांतच असतात पूर्ण वेळ गाडीवर. दोघांच्यात काही बोलण पण होत नसत. रस्ता भरलेला असला, सगळा गोंधळ ऐकू येत असला, गाडीच स्पीड कमी असल तरी श्रद्धाला ती लॉंग ड्राईव्ह वाटत होती. कारण तिच्या घरी गाडी नव्हती. घरी फक्त ती आणि आई होती. वडील ती लहान असतानाच वारलेले. कवीळ झालेली. मग अशात तिला फिरवणार कोण नव्हत. तिला गाडीच खूप अप्रूप होत. कधीतरी कॉलेज मधून घरी येताना मुली सोडायच्या तिला घरी. पण आज जरा वेगळच काहीतरी वाटत होत. आणि गजबजलेल्या रस्त्यावर दोघांतली शांतात मोडत श्रद्धा बोलते ,
श्रद्धा : तुला मग गर्लफ्रेंड असेलच ?
करण : नाही.
श्रद्धा : खर का ? का उगीच सिन्सियरपणा दाखवतोयस मला.
करण : खरच. नाहीये.
श्रद्धा : का ?
करण : गर्लफ्रेंड करायची. तिचे लाड पुरवायचे. तिला हव ते द्यायचं. नाहीतर ती चिडणार सोडून जाणार आणि ती गेली तर आयुष्यच संप अशी फिलिंग येणार. यात कुठ तरी वडिलांकडे दुर्लक्ष होणार नाही आवडत मला ते सगळ.
श्रद्धा : आई ?
करण : सहा महिने झाली गेली.
श्रद्धा : कशाने ?
करण : बाबा आणि आई गेले होते चिकवडीला. तिथ मामाची स्प्लेंडर घेऊन निघाले होते दोघ आत्याकडे. वाटेत कुत्र आल मधीच. बाबांनी जोरात ब्रेक दाबला कुत्र वाचवायला. त्यात गाडी घसरली. बाबा गाडीसोबत फरफटत गेले पुढ. आई एकाबाजूला दोन्ही पाय करून बसलेली साडीमुळ. गाडी घसरली तशी जोरात मागग पडली. तोल सावरता आला नाही तिला. कोमात होती दोन दिवस. आणि नंतर संपल.
श्रद्धा : काहीच नव्हते का चान्स ? आईंचे वाचायचे ?
करण :  आई जागेवरच गेलेली बाबा म्हणतात. डॉक्टर म्हंटले होईल काय तरी म्हणून ठेवल तिला दवाखान्यात. दोन दिवसाच त्यांनी बिल खाल्ल. पस्तीस हजार. पैसे गेले आणि आई पण.
श्रद्धा : मला पण वडील नाहीत. कावीळ झालेली त्यांना.
करण : मग घरी कोण असत तुझ्या ?
श्रद्धा : मी आणि आई. दोघीच.
करण : माझ्या घरी मी, बाबा आणि बहिण.
श्रद्धा : मग बाबा काय करतात ? बाबा ऑर्केस्ट्रा मध्ये आहेत पुण्यात. काम असल तस जातात. येऊन जाऊन करतात. तिथ पियानो वाजवतात. आणि बहिण इथ पार्टटाईम जॉब करते. ती जाते साडे अकराला. म्हणून म्हंटल बाराला भेटू. तस काय म्हणत नाही ती. पण मलाच कस तरी वाटत. आणि मी वाजवून दाखवेन गिटार ट्यून पण तुला लिहायला सुचल पाहिजे शांतात हवी म्हणून. इकड बोलवल तुला.
श्रद्धा : असुदे रे...... अंमम.. करण,
करण : काय ग ?
श्रद्धा : काय मदत लागली तर मला नक्की सांग मी नक्की करेन.
करण : तू बोललीस यातच मदत झाली.
गाडी थांबली. ती उतरली. त्याने गाडी लावली. तिने हातातली कॅडबरी त्याला दिली. त्याने ती फोडली. आणि दोन बाईट तिला दिले. दोन स्वतः खाल्ले. बाकीची हातात ठेवली. गाडीच्या चाविलाच घराची चावी अडलेकवलेली. त्याने कुलूप उघडल. दोघ आत गेली. ती बाहेरच्या खोलीत खुर्चीवर बसली. तो आत पाणी आणायला गेला. पाणी आणि कोकम सरबत दोन्ही एकदम घेऊन आला.
श्रद्धा : आणि तुला सरबत रे ?
करण : नको. भूक नाही.
श्रद्धा : ते काय जेवण आहे का ?
करण : नाही पण.
श्रद्धा : जा पटकन आणि मोकळा ग्लास आण.
तो उठला आत गेला. ग्लास आणला. तिला दिला. तिने निम्म निम्म वाटून घेतल सरबत. तो तिच्या समोर बसला. दोघांची नजरा नजर झाली. धडधड वाढली. आणि गरम व्हायला लागल. थंड सरबत पिऊन. दोघांनी नजर तोडली. तो ग्लासात बघायला लागला. ती घरातल्या वस्तू इकड-तिकड बघत होती. तीच पिऊन झाल. ती उठली आत ग्लास ठेवायला जायला लागली. लागलीच त्याने एका दमात सरबत पिल तो तिला अडवत तिच्या हातून ग्लास घेतो आणि आत जाऊन दोन्ही ग्लास ठेवतो. तो बाहेरच्या खोलीत आला. आणि मधल्या चौकटीच्या पडद्यामूळ त्याला ती दिसली नाही तो तिला धडकला. तो सॉरी म्हणत राहिला आणि तिने हि त्याला पहिल्याच सॉरीत माफ केल.
मग दोघ समोरासमोर खुर्चीवर बसले. त्याने गिटार काढल. तिची ती गुलाबी पिक घेतली आणि वाजवायला लागला. तिने त्याला बघितल त्याने तिला बघितल आणि ? गिटारच्या तारा हरवल्यासारखच झाल त्याला.
श्रद्धा : काय झाल ? बर नाही का ?
करण : पाच मिनिट हा. तो गिटार ठेवून आत निघून गेला. आणि पाणी प्यायला लागला.

०६
धडधडणार हृद्य जरा सावरून तो बाहेर आला. पुन्हा त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. आणि तिला एक म्युजिक ट्यून वाजवून दाखवली. तिला आवडली. पण लक्षात काही राहिल नाही. परत दोन तीन वेळा वाजवून दाखवल्यावर तिला समजली. त्या ऐकलेल्या ट्यूनवर आता तिला लिरिक्स लिहायच्या होत्या. तो शांत बसला. ती काहीतरी लिहायला लागली. एक कडव लिहून झाल. तिने त्याला वही दिली. त्यान वाचल. आणि त्याला आवडल पण. तिला वही देत तो तिच्याकडे बघतो. ती त्याच्याकडे बघते. तो जाऊन आतून दाराला कडी लावतो.
श्रद्धा : काय झाल रे ?
करण : काही नाही त्या शेजारच्या येतील बितील, उगीच गावभर करतील मी घरी मुलगी आणली कोणतरी म्हणून. आणि उगीच बाबा ओरडतील. बहिण काय बोलत नाही पण. आपल्यात काही नाहीतर मग कशाला उगीच ऐकून घ्यायचं जगाच. आणि माझ्यामुळे तुला कुणी काय बोललेलं मला आवडणार नाही.
श्रद्धा : का ?
करण : तू कशासाठी आलीयस तुला महित आहे. आणि बाहेर वेगळच कारण पसरल तर चुकीच आहे ना ते.
श्रद्धा : तू वाजवतो छान तसा विचार पण करतोस छान.  
करण : हम. अस काही नाही बस वाटत. म्हणजे आहेत असे माझे विचार.
श्रद्धा : चांगले आहेत. असच राहा कायम.
करण : हो. बर पुढच लिही परत तुला जायला वेळ होईल. 
श्रद्धा : हो.
ती लिहित बसते. तो गिटार वाजवत बसतो. तीच लिहून होत. ती त्याला वही देते. तो वाचत बसतो. तोवर ती त्याची गिटार घेऊन कर्ज फिल्मची थीम वाजवत बसते. त्याला तिने लिहिलेलं आवडत. तो वहीच पान तिला विचारून फाडून घेतो. आणि टीव्हीवर ठेवतो. तेवढ्यात श्रद्धाच वाजवताना थोडस चुकत.
श्रद्धा : शीssss काय जमतच नाही.
करण : काय झाल ?
श्रद्धा : कधी शिकणार मी तुझ्यासारख वाजवायला.
करण : येईल कि आत्ता तर दोन महिने होत आलेत तुला. मला चार महिने लागले. सर सहा महिने म्हणतात पण शिकलं नीट लक्ष देऊन तर तीन चार महिन्यात जमत.
श्रद्धा : मला एक शिकवतोस का ट्यून. छोटीशी ?
करण : हो. अंमम... सनम तेरी कसमची ट्यून शिकवतो. सोप्पी आहे. आणि भारी पण.
त्याने गिटार घेतल. आणि वाजवून दाखवली. तिला तिच्या वहीवर ( tabs ) लिहून दिल्या. आणि तिला वाजवायला सांगितल. तिला थोड थोड जमत होत. पण सावकाश. ती ट्यून पटपट वाजवायची होती. आणि ती खूप सावकाश थांबत थांबत वाजवत होती. तो तिच्या खुर्चीजवळ गेला. आणि अचानक तिचा उजवा हात धरून बी अंकाच्या तारेवर तीच पिक टेकवल. तिला काहीतरी व्हायला लागल. एकदम ती गरम झाली. आणि तिच्या अंगावर काटा आला. त्याला जाणवल. खुर्चीच्या दोन्ही बाजूला असलेल्या हात ठेवाच्या जागेवर तो बसला आणि तिचा हात धरून तिला वाजवायला मदत करत होता. तिला जमायला लागल. बाहेर कसला तरी छोट्या मुलांचा आवाज येत होता. अधून मधून गाड्यांचा आवाज. आणि घरात ? स्मशान शांतात. गिटार वाजायची थांबली. तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर त्याचा उजवा हात होता. तो तसाच हळू हळू वर यायला लागला. अग्रबाहू आणि दंड मग खांदा. तिच्या हातून पिक खाली पडल. मांडीवरून गिटार पण सटकल. त्याला सावरत त्याने ते गिटार जमिनीवर नीट ठेवल.
तिच्या दंडाला धरून त्यान तिला पूढ ओढलं. तस ति जागची उठली. तिची नजर खालीच होती. तो तिचे दोन्ही हात धरून उभा होता तिला बघत. अचानक तिने त्याच्या हाताना घट्ट आवळून धरल. तिला गरज आहे. जी त्याला आहे अस समजून त्याने तिला जवळ ओढलं. तीही आली. त्याच्या छातीशी तिचे दोन्ही हात रुतत होते त्याला. तस तर ती मिठी त्यानेच मारलेली. नंतर तिला जरा आपलस वाटल तेव्हा तिने मधले दोन्ही हात बाजूला करत त्याला मागून घट्ट पकडल. मग अजूनच ताकदीने त्यान तिला पकडल. आणि त्याच्या गळ्याशी लपवलेल्या तिने त्या चेहऱ्याभोवती त्याने स्वतःचे ओठ फिरवले. आणि केसातून फिरता फिरता पुढे त्याला तिचा गाल लागला. कोरड्या गालावर होणारा ओला स्पर्श अंगावर अजूनच काटा आणत होता. आणि ती अजूनच मिठीत जास्त शिरत होती. त्याच्या ओठांचा स्पर्श व्हावा अजून हि उरल्या गालाला म्हणून ती जरासा चेहरा उचलते. आणि गाल सोडून दोघांच्या ओठांना ओठ मिळतात. सगळ्या अंगातली ताकद दोघांच्या ओठात उतरली. हातपाय गळाटले. पण ओठात ताकद वाढली. आणि तिच्या पाठीवरच्या एका हाताने तिच्या केसात प्रवेश केला. आणि तिच्या केसांना कुरवाळत अजून जवळ करत त्याचं प्रेम सुरु होत. प्रेम ? हो प्रेमच. बघण + आकर्षण = सेक्स ( प्रेम ) ओह... मग कंसात प्रेम का बर ? कारण आधी बघण, बोलण, भेटण होत मग आकर्षण वाटत. ते प्रेम नसत. शारीरिक गरज गरज असते सगळ्यांना. मग गोष्टी होतात आणि मग नकळत किंवा बळजबरी आपण प्रेम करू लगतो. म्हणून प्रेम कंसातच लिहिलेलं शोभतय. तर उभ्या उभ्या यांनी सुरु केलेलं प्रेम. मधेच थांबल. तिला तहान लागली. तिने पाणी मागितल.
तो आत गेला. ग्लासात पाणी भरेपर्यंत ती आत गेली. तो ग्लास घेऊन मागे फिरला तोच ती. तिने हातातला ग्लास घेतला. पाणी प्यायली थोडच. आणि त्याला उरला ग्लास दिला. त्याने तिच ते उष्ट पाणी प्यायल. आणि बेसिन पाशी ती गेली हात धुवायला. तसच चेहऱ्यावर पाणी फिरवल. आता कस गार वाटत होत. आणि त्याने ग्लास किचनकट्ट्यावर ठेवला आणि तिच्या माग थांबून तिला छातीला धरून घट्ट पकडल. आणि केसांचा वास घेऊ लागला.     ०७
श्रद्धा : काय होतय करण ?
करण : फील करतोय तुला.
श्रद्धा : मला कस तरी होतय.
करण : मला पण.
श्रद्धा : छातीचा हात तर काढ.
करण : असुदे ना.
त्याने तिला त्याच्याकडे फिरवल. ती त्याला बघूच शकत नव्हती. याच्या पुढ काय ? कुणाला माहित नसत, अस कुणी कधी का असत ? ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. त्याने तसच तिला मिठीत घेऊन चालण सुरु केल. तिपण त्याच्या पावलासोबत चालत त्याच्या मिठीत ते दोघ आतल्या खोलीत गेले. त्याने तिला एकदा घट्ट मिठीत धरल आणि मग तिला बेडवर बसवलं. स्वतःचा शर्ट काढला. तिला आता काहीच सुचेना. काय होणार पुढ ? कस होणार ? या विचारात ती गुंतलेली. जमेल का नाही मला ? का काय चुकेल या विचारात तो. ती स्वतःला सावरण्याच्या विचारात आणि तो तिला सुख देण्याच्या विचारात. दोघांच्या विचारांत तारतम्य नाही. दोघ समोर असून एकमेकांचे नाहीत. अगदी सगळ विसरले ते. विसरले हे पण कि त्यांना भेटून दोन तीनच दिवस झालेत. आणि एवढ्या कमी वेळातली हि प्रगती कुठेतरी खटकणारी होती. तो शर्ट काढून तिच्या पुढे आला. आणि त्याने खाली कामरेवरचा पट्टा काढला. तिने त्याचा हात धरला.
श्रद्धा : प्लीज. नको ना. मला भीती वाटतीय.
करण : मी आहे ना. तू कशाला घाबरतीस.
श्रद्धा : तरी नको ना. नंतर कधी तरी पण आत्ता नको.
करण गुढग्यावर बसून तिच्या पायाशी तिच्या मांडीवर हात फिरवत तिची समजूत काढतो. ती त्याला नकार देता देता मधेच बोलते,
श्रद्धा : मग माझ्याशी लग्न करशील ?
करण : तुला चालणार असले तर करीन.
श्रद्धा जरा शांत झाली. तिने खांद्यावरची ओढणी काढली. करण उभा राहिला. तिने त्याच्याकडे बघितल. ती उठली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. आणि त्याने हि मग तिला जवळ घेतल. पण करायचं कि नाही पुढे काय त्याला समजत नव्हत. तो विचारणार तोच. तिच्या मनात त्याचे शब्द ऐकू आले. “ तुला चालणार असेल तर करीन” ( लग्न )
आणि तिने त्याला मिठीत घेतलेल तसच घट्ट पकडल त्याच्या पाठीला. आणि ती माग झाली. मग त्याने बेडचा अंदाज घेऊन त्याने तिला बेडवर झोपवल. आणि त्याचं शारीरिक प्रेम सुरु झाल. दोघांचा पहिलाच क्षण असा. ज्यात ते एकमेकांना ओळखत होते. जाणून घेत होते. एकमेकांना एकमेकांच प्रेम आणि इज्जत-लज्जा देत होते. आणि सगळ झाल्यावर तिने पुन्हा प्रश्न केला.
श्रद्धा : तू लग्न करणार ना माझ्यासोबत ?
करण : हो. माझ्या आईची शप्पथ.
श्रद्धा : मला सोडून जायचं नाहीस. तू. कध्धीच.
तो अगदी लाडात येऊन तिच्या हाताला पकडतो. आणि तिला जवळ ओढतो. ती त्याच्या छातीवर उजव्या बाजूला डोक टेकवून झोपते.  आणि बाहेर मोबाईल वाजतो. करण उठतो. आणि बाहेर जातो. आणि तो कॉल उचलतो. आणि मटकन खुर्चीवर बसतो. गिटार खाली पडते. श्रद्धा बाहेर येते तर करण तिला रडताना दिसतो. ती त्याच्या जवळ जाऊन विचारते काय झाल ? तो उठून आत गेला. आणि कपडे घालायला लागला. शर्टतर उलटा घातला. बटण सापडेनात लावायला. ती आत आली तिने त्याला नीट शर्ट घातला. पण काय झाल सांगायला तो काय तयार होईना. तिने तोवर कपडे घातले. आणि त्यान तिला मिठीत घेतल आणि रडायला लागला.
श्रद्धा : काय झाल सांग ना ?
करण : बाबा गेले.
श्रद्धा : कस काय ?
करण : माहित नाही. पुण्याला बोलावलय. मी जातो.
श्रद्धा : ( रडत ) मी पण येते.
करण : नको तू घरी जा. तू काय सांगून येणार तिकड आणि आई तुला सोडणार आहे का ?
श्रद्धा : मी सांगते काय तरी खोट.
करण : नको. तू जा. मला तुझ्या डोळ्यात आता पाणी नाही बघायचं. तू तुझ्या बाबांचं बघितलस. सगळ आता पुन्हा नको. त्रास होईल मी जातो मला जाऊदे. मला बाबाला बघायचंय.
श्रद्धा : हो चल मी तुला सोडते. बसपर्यंत.
करण : मी जातो गाडीवरून.
श्रद्धा : अजिबात नाही. मला उगीच टेन्शन नको करण. बसनीच जा.
श्रद्धा : आणि बहिण कशी जाणार ?
करण : तिला सांगयचं राहिला सांगतो तिला. नाहीतर तिला घेऊन जातो. तू प्लीज जा. आता इथून.
तो तिच्या हाताला धरून बाहेर जातो. घराला कुलूप लावतो. आणि वेड्यासारखा पळत रिक्षात बसून निघून जातो. आणि श्रद्धा भर रस्त्याने रडत चाललेली. सगळी लोक तिला बघत होती. अगदी माग वळून वळून बघत होती. आणि ती घरी जाऊन तिच्या खोलीत रडत बसली. इतक प्रेम केल. सगळ एकमेकांना दिल त्याच राहील बाजूला हे भलतच झाल काहीतरी.
करण आणि त्याची बहिण पुण्याला पोचले. वडिलांना सातारला आणल आणि माहुलीला अग्नी दिली. तिरका भांग आता पडणार नव्हता काही महिने. केसात हात घालायची सवय पण मोडणार होती त्याची. तेराव्याचा कार्यक्रम सुरु होता. आणि०८
कोल्हापूरच्या आत्त्याने विषय काढला. करणच्या बहिणीच्या लग्नाचा. अस हि तीच सत्तावीस वय होत आणि आता वडील पण नाही लोकांच्या नजरा चांगल्या नसतात. करण एकटा काय करणार ? याचा विचार कुणी केला नाही. तात्पुरत त्या विषयाला स्वल्पविराम देऊन दोघांनी स्वतःच्या डोक्याला आराम दिला. कार्यक्रम झाला. संध्याकाळीच सगळे पाहुणे आपापल्या घराकडे निघाले. पाहुणे नातेवाईक म्हणजे म्हणजे फक्त दिखावा. मृगजळ. दिसतात दुरून पण जवळ नसतात. मग करण आणि सिद्धी म्हणजे करणची बहिण दोघ शांत झोपलेलं. सिद्धी आत बेडवर झोपायची. करण बाहेरच्या खोलीत सोफ्यावर झोपायचा. दोघांना पण झोप येईना. दोघ हि शांत नुसते पडून होते. वडिलांची आठवण येत होती.
अधीमधी झोप लागायची मधेच जाग यायची अस करत करत सकाळचे पाच वाजले. सिद्धी पाणी भरायला लगली. करणही जागा होता. आजवर कधी न उठणारा मुलगा आज बहिणीला पाणी भरायला मदत करायला लागला. पाणी भरून झाल. आणि तिने त्याला कॉफी बनवू दिली. दोघ कॉफी पीत बसले. ती सुद्धा नीट जात नव्हती. इकड श्रद्धा काळजीत, विचारात. करण कसा असेल काय करत असेल आणि बरेच ते प्रश्न. प्रश्न तयार करावेत तर फक्त मुलींनी. तोड नाही त्यांच्या प्रश्नांना. वेळ जात होता. दिवस निघून गेले होते. आता दोन महिने झाले होते करणच्या वडिलांना जाऊन. आणि करण गिटार क्लासला आला. इतक्या दिवसांनी क्लासला त्याला आलेल बघून सरांनी त्याची चौकशी केली. सांत्वन केल. त्याचे मित्रपण त्याच्याशी बोलत होते. वैभव बघत होता करणला पण त्याच्या जवळ जाऊन काहीच बोलला नाही. करणला ते जाणवल पण त्याने दुर्लक्ष केल.
त्याने गिटार वाजवली. त्याचा एक दीडतास झाला. आता तो घरी जाणार तेवढ्यात त्याला बहिणीचा कॉल आला. तिने त्याला घरी बोलावल होत. तो निघाला. तो निम्म्या वाटेत होता. मागून एक रिक्षा हॉर्न वाजवत होती. दोन तीन वेळा हॉर्न वाजल्यावर त्याला राग आला त्याने आरशातून माग बघितल एक रिक्षा होती. तिला बहुतेक पुढ जायचं होत. त्याने वाट दिली. रिक्षा त्याच्या सोबत वेगाने चालायला लागली. करणने सहज रिक्षात बघितल आणि पुढ बघून निघून गेला. रिक्षापेक्षा जोरात. आणि रिक्षा एका बाजूला थांबली डावीकड. रिक्षाला पैसे देऊन त्यातून श्रद्धा उतरली. तिला बघून पण न बघितल्यासारख केल करणने. त्याची काय चूक नाही त्यात त्याला दुख आहे. तो दुखात आहे. पण मी तरी कुठ मजेत आहे ?
सतत त्याचा विचार, त्याची आठवण आणि त्याच्या सोबत घालवलेला वेळ. इतकच तर आठवतय मला. पण त्याला फरक पडत नाही. या दोन महिन्यात त्याला माझी आठवण आली नाही. तो नाही म्हणून मी पण दोन महिने गिटार क्लासला गेले नाही. आई ओरडून थकली पण उगीच कसली तरी कारण देऊन मी घरात बसली. आणि हा ? निवांत गाडीवरून गिटार पाठीला अडकवून क्लासला जातोय. एक कॉल करायचं पण याच्या जीवावर आल का ? जाऊदे मीच चुकले. त्याने जरा काय रडून दाखवल कि मी पण सिंफती दाखवायला गेले. आणि झाल काय माझाच वापर झाला. इतके दिवस कधी कुणाकड बघितल नाही. किती ती गल्लीतली मुल माग लागातात. माग माग येतात. वाटेत अडवतात. पण म्हंटल माझ्यासारखा हा सुद्धा समदुखी आहे पण नाही. दया दाखवायच्या लायकीच कोण नाही. सगळ्या अशा विचारात ती घरी पोचली. रात्री कविता लिहित असताना तिचा मोबाईल वाजला. करणचा मेसेज आला. मला तुला भेटायचं आहे. तिने मेसेज केला कधी-कुठ वैगरे. आणि त्याने तिला घरी बोलावल. आता मात्र तिला राग आला. तिने बाहेर बोलावल भेटायला राजवाड्यावर. जिथ लोकच लोक असतील. आता तिला नव्हत पुन्हा ते काही करायचं. आणि त्याचा तर तोच विचार दिसतोय अस तिला तरी वाटत होत. आणि ते साहजिकच आहे.

त्याने सांगितल सिद्धीने भेटायला बोलावल आहे. तेव्हा तिला काहीस हायस वाटल आणि ती गेली दुसर्या दिवशी सिद्धीला भेटली. करणच्या क्लासला आहे ते करणची फ्रेंड आहे इथपर्यंत ओळख सांगत करत करण त्याचं बोलन तोडत सिद्धीला सांगतो श्रद्धा मला आवडते. सिद्धीला पण श्रद्धा आवडते. सिद्धीसाठी मामाने एक सिव्हील इंजिनिअर मुलगा बघितला होता. जो जर्मनीला कामाला होता. दोन वर्षातून एकदा इकडे एक महिन्यासाठी यायचा. त्याला सिद्धीचा फोटो पाठवलेला आणि त्याला ती आवडली होती. दोघांच बोलन झाल होत सोशलं साईटसवर. त्यामुळे दिसण आणि मन या दोन्ही बाजू धरता दोघांच पटत होत. आणि म्हणूनच तीन महिन्याच्या ओळखीनंतर त्यांनी एकमेकांना होकार दिला. हि गोड बातमी तिला वडिलांना द्यायची होती. पण तीच लग्न बघन त्यांच्या नशिबात नव्हत. आता पुढच्या महिन्यात तीच लग्न होणार होत. कारण तो एक महिन्यासाठी सुट्टीला इथ येणार होता भारतात. आणि मग लग्न करून दोघ जर्मनीला जाणार होते. मग राहिला एकटा करण. त्याच काहीतरी बघायला हव. म्हणून तिने त्याला विचारल होत. तुला कोण आवडत का ? असेल तर सांग माझ्यासोबत तुझपण लग्न लावून देते. तू असा एकटा राहू नको. तेव्हा त्याने श्रद्धाच नाव सांगितल होत. आणि सिद्धी श्रद्धाच्या घरी गेली. मागणी घालायला. आईने नकार दिला. आणि सगळा आनंद पुन्हा विजून गेला. ०९
दुसरा दिवस. ठिकाण गिटार क्लास.
अभिनव सर : अग कुठ होतीस दोन महिने ?
श्रद्धा : जरा कॉलेजच काम सुरु होत त्या धावपळीत जमल नाही यायला.
अभिनव सर : हा. पण आता पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागेल. रोज वाजवाव लागत गिटार तर हातात बसत नाहीतर मध्येच सोडल आणि परत वाजवायला घेतल तर पुन्हा पहिल्यापासून शिकाव लागत, गिटार आहे का तुझ्याकड ? घरी ?
श्रद्धा : नाही ना.
अभिनव सर : आता रोज येणार आहेस न ?
श्रद्धा : हो सर.
अभिनव सर : हा. घे गिटार आणि बस. मी आलो थोड्यावेळाने तुझ्याकडे.
श्रद्धा : हो सर.
ती गिटार घेऊन बसली इतक्यात भिजून आलेला करण दिसला. ती नाराजच होती. आज काय ती त्याच्याकडे फक्त बघत होती. थोडा वेळ गिटार वाजवली पण तिला जमेना. मन पण लागत नव्हत. मग तिने करणकडे बघितल. करणने खुणावल तिला. आणि तिने गिटार भिंतीला अडकवून ती बाहेर निघून गेली. करण पण बाहेर निघून गेला. दोघ खाली भेटले. वैभव खिडकीतून वरून दोघांना बघत होता.
करण : कुठ जायचं ?
श्रद्धा : का ?
करण : बोलायचंय तुझ्याशी.
श्रद्धा : कास रोडला जाऊ.
करण : तिथ कुठ बसायचं ?
श्रद्धा :  तिथ ते साईबाबाकडे जाताना कट्टे आहेत ना त्या कट्ट्यावर बसू.
त्याने गाडी सुरु केली. सहज गाडीवर बसताना श्रद्धाच लक्ष वर गेल. वैभव तिला बघत होता. तिने नजर चोरली. आणि गाडीवर बसली. दोघ तिथ पोचले. गाडी बाजूला लावून दोघ कट्ट्यावर बसले. बरेचजण अंतरा-अंतरावर बसलेलं. वाऱ्याचा आणि गाड्यांच्या वरीसवर अधूनमधून वाऱ्यासोबत येणाऱ्या माणसांचा आवाज. इतकाच काय तो आवाज हि दोघ अगदी शांत बसलेले.
करण : काय करायचं आपण आता ?
श्रद्धा : चूक झाली माझीच ?
करण : कसली ?
श्रद्धा : तुझ्यासोबत केली मी. मलाच आता कस तरी वाटतय.
करण : अग काही काय बोलतीस ? अस असेल तर मी पण चुकलोय. कारण ते करायला सुरुवात तर मीच केली होती ना.
श्रद्धा : हो पण मी करू दिल हि माझी मोठी चूक झालीय. काय करू समजत नाहीये. काय माझ्या मनाची हालत होतीय नाही समजू शकत तू.
करण : समजतो मी.पण
श्रद्धा : नाही समजत. ती हालत फक्त मुलीलाच कळते. तुझ्या सोबत असताना तेव्हा प्रत्येक क्षणाला आतून तुटत होते. चूक करतेय माहित होत. पण तुझा स्पर्श झाला, तू माझ्याकडे बघितल कि पुन्हा तुटलेली मी अगदी घट्ट त्या स्पर्शात तुझ्या जोडली जात होते. थोडाच वेळ घालवला एकत्र आपण पण आयुष्यभराच सगळ देणघेण झाल त्यात. आणि एवढ होऊन पण आपल एकमेकांशी लग्नच होणार नाहीये ? मी तयार कोणत्या गोष्टीवर झालेले त्यासाठी आठवतय ना ?
करण : हो मी लग्न करणार तुझ्याशी म्हणून.
श्रद्धा : मग ?
करण : करू ना आपण लग्न.
श्रद्धा : कस ? आई नाही म्हणते. आणि मला आई आणि तू दोघ हवेत. एकासाठी मी दुसऱ्याला नाही सोडू शकत.
करण : हो बरोबर आहे तुझ म्हणन. पण.
श्रद्धा : तुला माहितीय का ?
करण : काय ?
श्रद्धा : वैभवने मला प्रपोज केलय.
करण : कधी ?
श्रद्धा : झाला महिना.
करण : आणि तू आत्ता सांगतीयस ?
श्रद्धा : सांगायला आपली भेट झालीय का ? त्याच्या वडिलांना पण त्याने आणलेलं सोबत.
करण : कशाला ?
श्रद्धा : आज प्रपोज केल आणि दुसऱ्यादिवशी क्लास मध्ये वडिलांना आणल मला भेटायला. मला त्यांनी विचारल काय करते  ? कुठ राहतेस ? आणि बरेच प्रश्न. आणि जाताना बोलले. पसंत आहेस तू माझ्या मुलाला आणि मला पण. बघ विचार कर. वैभवला स्वतःच घर आहे. गाडी आहे. सगळ व्यवस्थित आहे. आरामात राहशील. मला सांग तुझ उत्तर. त्यांचा नंबर दिला मला त्यांनी.
करण : मग ? काय दिल उत्तर तू त्यांना ?
श्रद्धा : फक्त नंबर सेव्ह केलाय उत्तर नाही दिल. भूक लागली म्हणून दुसऱ्याच उष्ट आपण खात नाही. आणि मुळात ते तसल उष्ट बघून आपल्या ताटातल चांगल अन्न पण आपल्याला जात नाही.
करण : हा बरोबर. पण म्हणजे ?
श्रद्धा : मी जरी दिसायला चांगली वाटले वैभवला त्याच माझ्यावर प्रेम असेल-नसेल माहित नाही मला. पण त्याला हवी असलेली गोष्ट मी तुला देऊन बसलेय. तुझ्यासोबत करून बसलेय. हे मी माझ्या आईला, वैभवच्या बाबांना किंवा वैभवला सांगू शकत नाही. उघडपणे. पण आहे ते आहे. आणि आता मला इच्छा नाही कुणाजवळ जायची. आणि एवढी मोठी चूक करून तर आता मला तुझ्या जवळ पण पुन्हा यायची इच्छा नाही.
करण : मी फसवत नाहीये तुला. मी काहीही करून लग्न करणार आहे तुझ्याशी. १०
श्रद्धा : न होणारी गोष्ट होणार अस म्हणून जर का ती खरच झाली असती तर आज सगळे सुखात असते. पण नाही होत नुस्त काही म्हणून. आणि मी सांगितलय तुला मला आई आणि तू दोघ हवेत एकच कुणी नको. आणि मला तितकी समज आहे आता कि, बर वाईट कळत आता मला. आपल्यात झाल ते नकळत न ठरवलेलं होत. आणि झाल ते दोघांच्या मर्जीने झाल. चूक म्हणायची तर दोघांची आहे नाही तर कुणाची पण नाही.
करण : बरोबर. पण ऐक ना. का तू म्हणतेस लग्न होऊ शकत नाही आपल. आपण पळून जाऊन करू ना ?
श्रद्धा : कुठ पळणार आपण ? देवळात ? लग्न झाल कि कुठल्या तरी भाड्याच्या घरात ? ओळखीच्यापासून. का एकमेकांपासून ?
करण : अस का बोलतीयस ? म्हणजे आधीच बरोबर आहे पण आपण आपल्यापासून का लांब जाऊ ?
श्रद्धा : माझ्यावर प्रेम करतोस ना ?
करण : हो खूप.
श्रद्धा : किती दिवस करणार ?
करण : शेवटपर्यंत.
श्रद्धा : मग मला काही ऐकायचं नाहीये. तू माझा आहेस. मी तुला माझ सगळ दिलंय. तू आता माघार घ्यायची नाहीस. मला काही काही काही माहित नाही, तू माझ्याशीच लग्न करायचं नाहीतर बघ.
करण : हो. पण मला एक कळाल नाही तुझ्या आईंनी का नकार दिला मला ?
श्रद्धा : मी आईला विचारल, ती सांगत होती. कस मुल प्रेमाच नाटक करून फसवतात वैगरे. आणि काय काय सांगत बसलेली.
करण : तुला मी फसवणारा वाटतो का ?
श्रद्धा : पुढच तर ऐक. आई म्हणाली एकतर आपल्यात कोण पुरुषमाणूस नाही. उद्या काय कमी जास्त झाल तर त्याच्याकडच पण कोण मदतीला येणार नाही. न त्याला कामधंदा आहे न कोणती नोकरी. ते गिटार वाजवून कोण मोठ झालय ? भिकेचे डोहाळे आहेत ते. माणसान कस नोकरी करून पैसे कमवून जगाव. ते काय आपल इकड तिकड भटकायचं भिकाऱ्यासारख गिटार वाजवत. तो काय सुखी ठेवणार तुला ? तुला एकतर बापाच छत्र मिळाल नाही निदान नवऱ्यान तरी तुला सुख द्याव इतकीच इच्छा. मी सांगते ते तुझ्यासाठीच सांगते. बाकी पोरग चांगल वाटल. त्यापेक्षा त्याची बहिण चांगली आहे. सोज्वळ. सालस.
करण : म्हणजे त्यांना माझा प्रॉब्लेम आहे का ?
श्रद्धा : नाही रे. तू नोकरी करत नाही ह्याचा प्रॉब्लेम आहे.
करण : करतो ना मी. मग होतील का त्या तयार ?
श्रद्धा : नाही. तुझ्या घरी मोठ कोण नाही वडीलधार.
करण : मला वाटल नोकरी करून होईल सोप्प पण ते हि नाही. मग काय करू म्हणजे तुझ्याशी मी लग्न करू शकतो.
श्रद्धा : तूच बघ आता. मला तर काही सुचत नाहीये. आणि खूप त्रास होतोय. डोक दुखतय. सारखी चक्कर येतीय. आणि तुला महितीय का ?
करण : चक्कर कशाने येतीय तुला ? पाणी पीत जा भरपूर.
श्रद्धा : मला पिरेड आला नाहीये. मागच्या महिन्यात. आणि त्याच्या मागच्यापण. मला भीती वाटतीय.
करण : काय ? हे का नाही सांगितल तू मला. यार काय झाल हे ? तस काय आहे का ?
श्रद्धा : मला पण कळत नाही. पण तसच कायतरी वाटतय.
करण : मेलो जाम मेलो आता तर. काय न करता आधी जर का असल काय झाल ना तर....
श्रद्धा : तर तुला नाही कोण विचारणार काय मलाच सगळे बोलतील.
करण : चल. डॉक्टरकड जाता.
श्रद्धा : आणि ?
करण : असेल काय तर पाडता.
श्रद्धा : बंदी आहे पाडायला.
करण : असुदे. ते फक्त बाहेर म्हणायला. आत सगळ चालत.
श्रद्धा : पैसे पण लागतात त्याला. आहेत का तुझ्याकड आठ-दहा हजार ?
करण : नाही.
श्रद्धा : आणि मला त्रास होईल त्याच काय ? का स्वतःला वाचवायला तू मला त्रास देणार का ?
करण : नाही ग पण मला वाटल तूला नको असेल ते बाळ.
श्रद्धा : पण मला माहिती नव्हती कसली की यातली तुला माहित होत ना. मग कस काय झाल अस ?
करण : लक्षात नाही आल.
श्रद्धा : अस कस म्हणतोस तू. लक्षात नाही आल. अरे पाच मिनिटानंतर त्या आयुष्यभराच लोढण माग लागत. तू तर आयुष्यभराच सोडून त्या पाच दहा मिनिटांच्या विचारात होतास का ? काय करायचं आपण तस काय असेल तर पोटात माझ्या ?
करण : मला काय सुचत नाहीये.
श्रद्धा : खरच उगीच असल्या फांद्यात पडले. प्रेम करण्याआधी जगण्याआधी प्रेमाची निशाणी. काय अर्थ आहे याला आणि मी हे मुल पाडणार नाही. आपल्या चुकीची शिक्षा त्या बाळाला का ?
करण : मी नोकरी शोधतो. मी घेतो जबाबदारी.
श्रद्धा : हो. घे. चल जाता. परत आईला शक येईल आपण भेटलो म्हणून.

दोघ निघतात आणि तो तिला घराजवळ सोडून घरी निघून जातो. ११
करण सकाळी लवकर उठला. लवकर म्हणजे नऊ वाजता. एरवी दहा साडेदहाला उठायचा. उठून बाहेर गेला. पेपर आणला. सगळी रंगीत पान सोडली आणि बारीक अक्षरात लिहिलेलं जाहिरातीच एकरंगी पान उघडल. पानावर खाली-वर-बाजूला नजर फिरवली. सापडलं. “नोकरी विषयक”. सगळा तो भाग पूर्ण दोन वेळा वाचून पटेल तिथल्या नोकरीवर कॉल लावला. आणि पाच ठिकाणी कॉल लावल्यानंतर त्याला एका ठिकाणी बोलावल. पटकन जाऊन त्यान आवरल. आणि निघाला. एका स्क्रीन ऑफसेट दुकानात मुलगा हवा होता. तिथ त्याच काही जमल नाही. कारण त्यांना कोरल सोफ्टवेअर येणारा मुलगा हवा होता. करणला जरास उदास वाटल. पहिलाच प्रयत्न आणि निराशा. घरी येऊन त्याने एका मित्राला कॉल करून जोब असेल तर सांग अस सांगितल. त्याने सांगितल ये ऑफिसवर झाल तर झाल काम तुझ येऊन तरी जा मी सरांना सांगून ठेवतो. मग सकाळपासून काहीच खाल्ल नव्हत त्याने चहा पण प्यायला नव्हता. तो तसाच तिकडे गेला. त्याचा मित्र तिथे नव्हता. कस तरी होत होत त्याला. म्हणजे अस छातीत धडधड वैगरे होत होत. मग तिथे त्याला आत बोलवल गेल. दहा मिनिटांनी तो बाहेर आला. सरळ ऑफिसच्या बाहेर गेला. आणि आधारकार्डची झेरॉक्स काढली. आणि पुन्हा आत गेला. थोड्यावेळाने बाहेर आला रुमालाने घाम पुसत. आणि बाहेर येऊन सरळ घरी आला.
खिशातून मोबाईल काढला. आणि निवांत झोपला बेडवर. आणि मोबाईलची स्क्रीन सुरु केली सात मिसकॉल ते पण एकट्या श्रद्धाचे. काय झाल इतक ? त्याने सायालंट ठेवलेला मोबाईल. त्यामुळे त्याला कळाल नाही. त्याने कॉल लावला. तिने उचलला नाही. नंतर तिसऱ्या कॉलला उचलला.
करण : काय झाल ?
श्रद्धा : कुठ होतास ? बोलायचं नाही का ?
करण : जॉबच बघायला गेलेलो.
श्रद्धा : मग ?
करण : मिळाला.
श्रद्धा : कुठ ?
करण : कुरियरच्या इथ. रोज गाडीवरून पतसंस्था असतील गावातल्या तिथे त्यांची कुरियरन आलेली कागदपत्र पोचत करायची. अकरा ते सात काम आहे. म्हणजे अकराला फिक्स जायचं यायचं टायमिंग फिक्स नाही म्हणाले ते सात साडे सात आठ. पण ठीके करीन.
श्रद्धा : जमणारे का तुला ?
करण : हो गाडीवर जायचंय माझ्या. पेट्रोल ते देणारेत. आणि मी गाडी कशी चालवतो माहितीय ना. निम्या वेळात सगळ काम करून आरामत जाईन संध्याकाळी.
श्रद्धा : पगार किती ?
करण : आठ हजार. पेट्रोल वेगळ. आणि काय झाल मला तर त्याचे वेगळे.
श्रद्धा : म्हणजे ?
करण : म्हणजे पडलो बिडलो कुठ आणि गाडीला काय झाल तर त्याचा खर्च. उद्यापासून बोलावल आहे.
श्रद्धा : हम. बर. झाल. गरज होतीच नोकरीची.
करण : हो म्हणूनच ठरवल आज बघायचंच काहीही झाल तरी. आणि साताऱ्यात आठ हजार म्हणजे खूप झाला पगार. बर तू का कॉल करत होतीस ?
श्रद्धा : मी डॉक्टरकड गेलेले.
करण : का आता ? काय झाल ? सर्दी झाली का ?
श्रद्धा : नाही.
करण : मग ?
श्रद्धा : प्रेग्नेंट आहे मी. दोन महिन्याची.
करण शांतच बसून होता. काय बोलाव त्याला समजेना. आनंद व्यक्त करण्यासारखं त्याचं अजून तस नवरा बायकोसारख नात नव्हत. कशात काही नाही आणि हे ब्याद आता पदरात पडणार या विचाराने त्याला सुचायचं बंद झाल. तेवढ्यात त्याला तिकडून आवाज आला. रडत-रडत.
श्रद्धा : काय झाल शांत का ?
करण : काय बोलू ?
श्रद्धा : केलच ना. आता निस्तरायच पण आहे.
करण : मी उद्या पासून जॉबला जातो. आणि पुढच्या महिन्यात पगार आला कि पाडू आपण बाळ.
श्रद्धा : नाही.
करण : का ? वेडी आहेस का ? ठेवणारेस का तू बाळ ?
श्रद्धा : नाही.
करण : मग ? अस का बोलतीयस.
श्रद्धा : माझ्या पोटातल्या पिशवीची तेवढी ताकद नाहीये. आणि डॉक्टर बोलले कि, आत्ता पाडलं तर नंतर दिवस राहिले तरी बाळ नाही वाढणार त्यामुळे आत्ता ते बाळ काहीही करून नऊ महिने वाढवायला लागणार आहे.
करण : आणि लग्न ?
श्रद्धा : अजून लग्नच सुचतय का तुला ? माझे काय हाल झालेत ऐकून समजतय का ? कॉल केले इतके. मला एकट जायला भीती वाटत होती शेवटी एकटी गेली. आणि तू तिकड पैशाच बघतोय.
करण : तुझ्याचसाठी करत होतो पण,
श्रद्धा : मला भेट तू आत्ता.
करण : कुठ ?
श्रद्धा : तुझ्या घरी. मला न्यायला ये लगेच.

करण : आलोच.


१२

करण श्रद्धाला न्यायला जातो. दोघ करणच्या घराकडे निघतात. वाटेत दोघांच्यात काही बोलण होत नाही. ती आपली नुस्त गाड्या वैगरे बघत असते. तो गाडी चालवत असतो. घर येत. ती उतरते. तो गाडी लाऊन दाराजवळ जातो. कुलूप उघडून दोघ आत जातात. ती बसते खुर्चीवर. तो आत पाणी आणायला जातो. बाहेरच्या खोलीत येतो तर श्रद्धा नसते. दार उघड असत तिरक. तो ग्लास टीव्हीवर ठेवून बाहेर वाकून बघतो. ती दिसत नाही. निघून गेली का काय बाहेर म्हणून तो चप्पल घालतो. आणि तो दार पूर्ण उघडून हाक मारतो. “श्रद्धा”
“काय रे ?” आतून आवाज आला. तो दार लाऊन चप्पल काढून टीव्हीवरचा ग्लास घेऊन आत जातो.
श्रद्धा बेडवर झोपलेली असते.
करण : इथ कधी आलीस ? मला वाटल गेलीस बाहेर निघून.
श्रद्धा : चक्कर यायला लागली म्हणून झोपली.
करण तिच्याजवळ बसतो. तिला पाणी पाजतो. ग्लास खाली फरशीवर ठेवतो. तिच्या केसातून हात फिरवतो. ती त्याचा हात धरते आणि छातीशी लावते. आणि गच्च डोळे मिटून झोपते. थोड्यावेळाने करण तिला हाक मारतो ती उठत नाही. तिला झोप लागलेली असते. तो हळूच हात काढतो. तिच्या जवळ हळूच जाऊन तिच्या अंगावर हात टाकून झोपतो. झोपेत का होईना तिला त्याचा स्पर्श होतो. तो डोळे मिटतो आणि ती डोळे उघडून बघते. तो शांत झोपलेला असतो. तो त्याचा झोपलेला बालिश चेहरा बघून तिला खूप प्रेम येत त्याच्यावर ती अजून त्याच्या जवळ सरकते. तो हि तसाच डोळे मिटलेल्या अवस्थेत तिला घट्ट जवळ घेतो.
श्रद्धा : करण, झोपला का ?
करण : नाही आहे ना. तू झोपली म्हणून जवळ झोपलो. मला न तुझ्या जवळ झोप येती शांत.
श्रद्धा : हा. मी तुझीच आहे. रोज झोपायचं तू अस मला जवळ घेऊन. मला तुझ्या मिठीत झोपायला आवडत. म्हणजे तू अस अंगावर हात टाकला कि आवडत.
करण : हो. रोज झोपायचं आपण असच. म्हातार झाल तरी.
श्रद्धा : हो. पण म्हतार झाल्यावर आपल्याला जाव लागेल ना ?
करण : कुठ ?
श्रद्धा : वर.
करण : हा मग ?
श्रद्धा : मग ?
करण : गप काहीही विषय काढू नको शांत झोप.
श्रद्धा त्याच्या गालाला कीस करून त्याच्या डोळ्यात बघते. त्याच्या डोळ्यात श्रद्धासाठी प्रेम जाणवत. ती विचारते,
श्रद्धा : माझ्यावर प्रेम करतो तू माहितीय मला. खूप खूप करतोस ना. मग मला सांग ना, मी तुला का हवी ?
करण : का म्हणजे. माझ तुझ्यावर प्रेम आहे.
श्रद्धा : एवढच ? मला वाटल काहीतरी अजून बोलशील. सांग ना अजून का हवी मी तुला ?
करण : ( तिच्या केसात हात फिरवत तीच डोक छातीशी टेकवून तिला जवळ घेतो. तीही त्याच्या अंगावर हात टाकून ऐकू लागते ) जगात किती काही सुंदर गोष्टी आहेत. म्हणून या गोष्टींच एक जग बनल आहे. आणि म्हणून हि म्हण आहे कि जग खूप सुंदर आहे. पण या जगाहून सुंदर मला तू वाटतेस. किती ना तू बालिश, चंचल आहेस. प्रेमळ आहेस. माझ्यावर प्रेम करतेस. मला समजून घेतेस. मला गरज होती तर मला साथ दिलीस. बाबा गेल्यावर तू सावरलस मला. सोप्प असत ग प्रेम करन वैगरे. ते निभावण एकमेकांना समजून घेण खूप अवघड आहे. पण तुझ्यासोबतीन मला ते खूप अस साध सोप्प वाटतय. आता बहिणीच लग्न होईल पुढच्या आठवड्यात मग मी एकटा पडलो असतो पण तू आहेस. मला माझी आई बहिण बाबा सगळे मिळाले. मला बायको कशी हवी तर तुझ्यासारखी. मी दुसऱ्या कुणाच उदाहरण दिल असत पण अस कोण नाही या जगात. तूच एकमेव आहेस. त्यामुळे मला बायको हवितर तुझ्यासारखीच. आणि तिपण इच्छा पूर्ण होईल. माझ खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू असशील तर मी जग जिंकायला निघेन. सिकंदर हरला. मी नाही हरणार तू सोबत असताना. तू माझ आयुष्य भविष्य सगळ आहेस. तू बोलायचं तस मी करायचं यातच मी माझ सगळ सगळ प्रेम तूझ्यावर करायचं इतकच माझ ध्येय आहे. मी हे काम चांगल करेन उद्यापासून. आलेला पगार साठवून लागेल तसा वापर करीन. तुझ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीन. जे तुला मला काटकसरी आणि अस दुखी आयुष्य मिळाल ते मी आपल्या बाळाला आणि तुझ्या वाट्याला येऊन नाही देणार. मी बाळावर पण तितकच प्रेम करीन जितक तुझ्यावर करतो. आणि अस मला वेगळ भारी आयुष्य जगताना मला तूच फक्त सोबत हवी दुसरी कोण नको. आणि म्हणून मला तू हवी..!   

13
श्रद्धा करणच्या अजून मिठीत शिरते. तो तिच्या केसात हात फिरवतो. त्याच्या श्वास तिच्या कपाळावर अगदी गरम पडत होता. आणि तिचा श्वास त्याच्या गळ्याला लागत होता. ते ऑक्सिजन वैगरे सगळ झूट. या दोघांचेच श्वास एकमेकांना पूरक होते आत्ता तरी जगायला. दोघ झोपून गेले. दहा मिनिटांनी तिला कॉल आला. आईचा होता. घरी कधी येणार विचारत होती. करण तिला घरी सोडायच म्हणून उठतो. ती त्याच्या जवळ जाऊन पटकन मिठी मारते. तो हि तिला घट्ट मिठीत घेतो.
करण : जायचच आहे का तुला ?
श्रद्धा : हो. पण नाही जाऊ वाटत. तुझ्याजवळ बसावस वाटतंय.
करण : लाव ना आईंना कॉल वेळ लागेल सांग ना.
श्रद्धा : नाही ऐकणार आई. तिला नाही आवडत.
करण : ( तोंड नाराज झाल्यासारखं करून ) प्लीज बघ ना.
त्याच ते केविलवान तोंड बघून ती बेड पाशी गेली. मोबाईल घेतला आईला सांगितल मला यायला संध्याकाळ होईल पाच सहा. आणि कॉल कट करते.
करण : काय झाल ?
श्रद्धा : चालेल बोलली आई.
करण तिला मिठीत घेतो.
करण : बोल काय खाणार ?
श्रद्धा : तू बनवणार का ?
करण : हो.
दोघ शांत किचन मध्ये गेले. दोघ बनवू लागले. तिने भाकरी बनवली. त्याने मस्त भरलं वांग बनवल. तिने कुरडया तळल्या चवीला. करणला आवडतात म्हणून त्याने राहिलेल्या गरम तेलात दोन तीन मिरच्या तळ्ल्या. दोघ बाहेर ताट घेऊन बसले. त्याने टीव्ही लावला. ती नको म्हणली. त्याने बंद केला. दोघ आता समोरासमोर बसले. तिने घास तोडला. भाकरीला वाटीत वांग्यात बुडवल आणि हात उचलला. तोच करणने तिला घास भरवायला हातपुढे केला.
श्रद्धा : तुला कस कळाल मी पण हेच करणार होते.
करण : असच.
दोघ एकमेकांना भरवतात. आणि मग करण तिच्याकडे बघतो. श्रद्धा तिच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात ठेवते. वांग त्याच्या वाटीत ओतते. कुरडई त्याच्या ताटात ठेवते. आणि स्वतःच मोकळ ताट बाजूला ठेवून त्याच्या मांडीवर दोन्ही हात ठेवून लहान बाळासारखी तोंडाचा आ करून बसते. आणि तो एक घास तिला आणि एक घास स्वतःला खात बसतो. दोघांच जेवण होत. आणि दोघ मिळून भांडी घासून ठेवतात. आणि दोघ बसतात टीव्ही बघत. एक फिल्म बघत टीव्हीला लागलेली. तेवढ्यात श्रद्धाला कॉल आला. आईसोबत तिला बाहेर जायचं होत. श्रद्धा नकार देते पण आई सांगते कि महत्वाच काम आहे. कॉल कट होतो.
करण : काय म्हणतायत आई ?
श्रद्धा : काहीतरी काम आहे. जाते मी.
करण : मी सोडतो ना.
श्रद्धा : बर चल लवकर.
दोघ निघतात. तो तिला देवी चौकात सोडतो. ती घरी जाते. घर आवरलेल असत. आई नवीन साडी नेसून बसलेली असते खुर्चीवर. श्रद्धा आत आली. तिला आवरायला सांगितल. तिने पण आवरल. आता बाहेर जायचं म्हणून तिने चप्पल घातली. दारात काही माणस आली. त्याचं स्वागत करून आईने श्रद्धाला त्या बसलेल्या त्याच खुर्चीवर बसायला सांगितल. ती माणस म्हणजे एक मुलगा आणि त्याचे आई वडील असे आले होते. श्रद्धाचा बघा-बघीचा कार्यक्रम होता. श्रद्धाला कळाल. तिला उठायचं होत. पण आत्ता उठल तर आईचा अपमान होईल. आणि आई करण सोबत कधीच लग्न करून देणार नाही. म्हणून ती गप्प बसून राहिली. विचारेल त्या प्रश्नांना उत्तर देत राहिली. ती माणस निघाली. आईने त्यांना सांगितल तुमच उत्तर कळवा. आणि पटकन त्या मुलाने होकार दिला. दोन्हीकडे आनंद झाला. श्रद्धा सोडून. पाहुणे गेले. आईने साडी बदलली. रोजची घरातली मळखपाऊ साडी नेसली. श्रद्धाने सुद्धा पंजाबी ड्रेस घातला. आणि आईने तिला जेवनाच ताट आणून दिल.
श्रद्धा : मी जेवलीय.
आई : कुठ ?
करण : करणच्या घरी.
आई : तुला मी सांगितल होत त्याच्या पासून लांब राहा. का गेलीस तू तिकड ? तुला मी लहानच मोठ केल. बाप गेला तर जगाला तोंड देऊन मी तुला पोसल आणि आता तुझ चांगल भल व्हाव म्हणून बघते तर तू त्याच ऐकतेस ? त्याच्या नादाला लागतेस ? श्रद्धा अग जरा विचार कर स्वतःचा. कुणी नसत ग सोबत आपल्या. सुख मिळेपर्यंत असतात हे पुरुष सोबत परत नाही. कधी कळणार ग तुला ? लहान आहेस तू. समाजात एका बाईने वावरन काय असत कळेल तुला. त्याचा नाद सोड. उद्या लग्न झाल त्या अविनाशसोबत आणि त्याला समजल तर काय होईल वाटोळ होईल संसाराच. बाळा माझ ऐक तुझ प्रेम बीम असेल तर विसर तुमच सगळ. तुझ्या भविष्याच बघ. त्याला नाही कोण पुढ माग. निदान तू तरी माझा विचार कर. मी हे करतेय ते कुणासाठी ?
श्रद्धा : आई मी नाही सोडू शकत त्याला.
आई : आता आईची किंमत पण नाही का राहिली तुला ?
श्रद्धा : तस नाही आई, मला तुझाच विचार आहे. पण मी काय करू. मी प्रेग्नेंट आहे.
आई : काय ???????
श्रद्धा : आणि मी नाही राहू आता शकत त्याच्या शिवाय.
आई रडायला लागली. त्या नंतर आई श्रद्धाशी बोलली नाही. स्वतः जेवली नाही. मुलीच्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेतली. काय करणार आईच मन ते. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा मिळाला नाही. म्हणून श्रद्धा आत गेली बघतील तर आई झोपलेली दिसली. ती आई जवळ गेली उठावायला तर तीच अंग गरम लागत होत. ताप आलेला. तिने आईला जाग केल आईने तोंड दाखवू नकोस अस बोलून झोपून गेली. पण तो बहाणा होता खरतर पांघरुणात एकट रडण्याची तयारी होती ती. श्रद्धा आवरून बाहेर गेली. करणला भेटून सगळ सांगाव या हेतूने ती करणला कॉल लावते तो उचलत नाही. खुप वेळा केला पण तो उचलत नाही. ती मग त्याच्या घरी चालत जाते. पण घराला कुलूप मग आठवल. तो तर कामाला गेला असेल. आज त्याचा पहिला दिवस होता. त्याचा एक मिसकॉल आलेला श्रद्धाला पण ती उशिरा झोपली त्यामुळे सकाळी तिला जागच आली नाही. बर संध्याकाळी भेटू अस ती ठरवून घरी निघते.
मोकळ्या अशा आड गावातल्या रस्त्यावर जाताना तिची आठवण येत होती. तिचा स्पर्श, तीच बोलन, हसण, लाजण, सगळ आठवत होत. काल तिने विचारल होत मला मी का तुला हवी. पण हाच प्रश्न मी तिला विचारायाचा राहून गेलो. आज भेटलो कि विचारेन. विचारा विचारात जाताना गाडीच स्पीड ऐंशी झाल. नेहमीच स्पीड होत त्याच. अचानक मध्ये कुत्र आल. कचकन दाबला ब्रेक. गाडी अनावर झाली. गाडी सकट तोही पडला. घसरत-फरफटत गेला. डोक्याला मार लागला. दीड तास त्या रस्त्यावरून कोण फिरकल नाही. आणि जेव्हा एक माणूस आला तो तर घाबरून तसाच पुढे निघून गेला. गाडी चालू तशीच होती. त्यातल ऑईल सांडत होत. त्याच रक्त हि सांडत होत. आणि त्याचा श्वास धीमा होत चाललेला. आणि बाजूला कुत्र मरून पडलेले. पावणे दोन तासाने जेव्हा एक चारचाकी तिथून निघाली कशी तरी वाट काढत तेव्हा त्यांना करण दिसला बाजूला पडलेला. त्यांनी त्याला दवाखान्यात नेल.      


१४

म्हणून मला तू नको... स्वतःशीच श्रद्धा बोलली. किती दिवस झाले. आता महिना होत आला. करण मला भेटला नाही. काय हव, काय नको मला काही-काही विचारायला आला नाही. ते बाळ काय माझ्या एकट्याच आहे का ? त्याच पण आहेच कि. उलट त्याच्यामुळे हे झालय सगळ आणि त्यानेच अस माझ्याकडे आणि बाळाकडे दुर्लक्ष केल तर कस होणार ? माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतीस. तुझ्यामुळे माझा एकटेपणा गेला आणि काय काय बोलून त्याने मला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आणल. प्रेमाच्या शपथा घेऊन सांगितल मला तू हवी. पण पुढे काय ? मी का त्याला हवी हे मला समजल पण मला तो का हवा विचारायचं तेव्हा राहून गेल. बोलायचं पण राहून गेल तरी ऐक, तू समोर नसलास तरी तुझ्या मनाचा एक भाग माझ्या मनात आहे. आणि तू जिथ कुठ आहेस तिथपर्यंत तुला माझे शब्द ते जाऊन पोचतील. माझ बाळ ते तुझ हि आहे. गरज खरतर मला तुझी होती सोबत तुझ्या प्रेमाची होती. पण ते आता मला बाळाला सुद्धा वाटून द्याव लागणार आहे. ठीक आहे. पण तरी एकदा विचार करायचा माझा.

मला काय हव नको. मला काय वाटत. माझ हे अस बाळ जन्माला घालण पहिलीच वेळ आहे. जशी प्रेम करायची पहिली वेळ होती तशीच. कुणा-कुणाशी मी इतक बोलले नाही तितक तुझ्याशी बोलण्यासाठी मी माझा वेळ काढून ठेवला होता बाजूला. माझ्या स्वप्नांना बाजूला ठेवून तुझ्यासाठी तयार झाले. माझ मी कधी भविष्य बघितल नाही पण आपल्या बाळासाठी मी काय-काय विचार करायला लागले. पण तू काय केल ? मला सोडून गेलास लांब ते हि कायमचा. काय कमी पडल होत माझ्या प्रेमात कि तुला इतकी घाई झाली मला सोडून जायची. जवळ आलास पटकन. पहिली भेट आपली एकत्र आणि त्यात सेक्स केला तो हि पटकन. बाळ हा विषय डोक्यात नसताना पण त्या बाळाचा विषय तूच तयार केलास तो पण पटकन. लग्न तर राहील बाजूला साथ राहिली बाजूला प्रेम निभावण तर देच सोडून पण मला सोडून जायचा निर्णय पण घेतलास तो हि पटकन. तू आता नाहीस. तुझ माझ बाळ जन्माला येणार आहे. मी सांभाळेन त्याला. पण त्या बाळाला माझ एकट्याच प्रेम मिळेल तुझ नाही. मी हि कमनशिबीच मला हि तुझ प्रेम मिळणार नाही. असा सगळा विचार केला कि आता वाटत काय करून बसले मी. नको करायला पाहिजे होत मी प्रेम तुझ्यावर. पण करून बसले. आणि फसले. या आता एकट्या जगण्याला अर्थ काही वाटत नाही पण जगण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या चुकीची शिक्षा मी बाळाला देऊ शकत नाही मला तो हक्क नाही. नको मला आता असल फसवं कुणाच प्रेम आणि म्हणून मला तू नको आहेस. पुन्हा कधीच. पुढच्या जन्मी सुद्धा. श्रद्धा रडत बसते. करणचा फोटो मोबाईलवर बघत.    


समाप्त

सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            

11 टिप्पण्या